नृसिंह सरस्वती स्वामी आरती

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
20 Dec 2017 - 4:17 pm

आज श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जयंती आहे. त्यानिनित्ताने मी आरती लिहिली आहे.

आरती श्री अवधूताची | माझ्या दत्तात्रेयाची ||धृ.||

कलियुगी दाखविण्या चमत्कार
नृसिंह सरस्वती अवतार |
घेऊया आले पृथ्वीवर
उद्धरिले जनांसी अपार || १ ||

श्री पाद वल्लभ गाणगापूरी
मध्यान्हकाळी मागती माधुकरी |
अन्नछत्र अन्नदान भक्त करी
दर्शन देती ज्याच्या मनी इच्छा खरी ||२ ||

तीर्थक्षेत्र पीठापूर कुरवपूर
औदुंबर पर्वत गिरनार |
दत्त स्थानी वास निरंतर
गुरूंचा मुक्त संचार ||३ ||

पांघरी अंगी भगवे वस्त्र
हाती धरी चक्र त्रिशूल अस्त्र |
धरुनिया आम्हावरी कृपाछत्र
तारिले बहुत सत्पात्र ||४ ||

तरण्यास्तव भवसागराला
नाव माझी न्यावी पैलतीराला
ऐशा श्री गुरू दत्ताला
जोडोनी कर नमितो वैभव पदाला ||५ ||

कविता

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

21 Dec 2017 - 7:23 am | दुर्गविहारी

उत्तम लिहीलय, आपल्यामुळे दिनमान समजत असते. आता कोणताही हिंदु सण चुकणार नाही याची खात्री पटली आहे. कॅलेंडर गुंडाळून ठेवतो. आता फक्त ईंग्रजी तारखा असलेले बँकेचे कॅलेंडरच आवश्यक आहे

सतिश गावडे's picture

21 Dec 2017 - 9:46 am | सतिश गावडे

कॅलेंडर गुंडाळून ठेवतो.

ठेवतो? आम्ही वैभव सरांच्या पहील्या तीन कविता वाचल्यानंतर लगेच ठेवून दिले.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Dec 2017 - 9:24 am | ज्ञानोबाचे पैजार

श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय,
आरती वाचताना प्रत्यक्ष महाराजांचेच दर्शन घेतो आहे असे वाटले.
अजून दोनचार कडवी लिहीली असती तर महाराज स्वतःच हातामधली काठी पारजत आले असते.
आता ख्रिसमस निमित्त मायबाप येशुवर एखादी झकास आरती येउद्या.
पैजारबुवा,

अनन्त्_यात्री's picture

22 Dec 2017 - 8:56 am | अनन्त्_यात्री

एकदम क्रिसमस पर्यंत कळ काढावी? विनायक चतुर्थी (आज), अयन करिदिन (२३ डिसेंबर) व भारतीय ग्राहकदिन ( २४ डिसेंबर) यावरील कवितांची अनेकजण वाट पाहातायत त्यांचं काय?

स्पा's picture

22 Dec 2017 - 10:54 am | स्पा

महाराज स्वतःच हातामधली काठी पारजत आले असते.

ळॉळ

वैभवदातार's picture

21 Dec 2017 - 11:19 am | वैभवदातार

धन्यवाद

पगला गजोधर's picture

21 Dec 2017 - 11:36 am | पगला गजोधर

वैभवजी छान आरती.

एस's picture

21 Dec 2017 - 3:07 pm | एस

आरती आवडली.

पगला गजोधर's picture

21 Dec 2017 - 3:20 pm | पगला गजोधर

आरती आवडली.

आरती टिकेकर ?

श्रीगुरुजी's picture

22 Dec 2017 - 3:01 pm | श्रीगुरुजी

आरतीची रचना सुंदर आहे. आवडली.

मदनबाण's picture

24 Dec 2017 - 11:55 am | मदनबाण

आरती आवडली...
वरती ख्रिसमसची आठवण कोणीतरी काढलेली दिसतेय... त्यांच्यासाठी भोजपुरी व्हर्जन देउन जातो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझे कितना प्यार है तुम से, अपने ही दिल से पूछो तुम जिसे दिल दिया है वो तुम हो, मेरी जिंदगी तुम्हारी है :- Dil Tera Deewana [ Mohammed Rafi, Lata Mangeshkar ]

हे काय काल नाताळानिमित्त येशूची आरती नाही लिहीलीत?