ताज्या घडामोडी - भाग १७

गॅरी ट्रुमन's picture
गॅरी ट्रुमन in काथ्याकूट
28 Nov 2017 - 4:26 pm
गाभा: 

यापूर्वीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा सुरू करत आहे.

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

12 Dec 2017 - 9:48 am | सुबोध खरे

व्हिसाचा फुलफॉर्म सापडला का?
त्यानंतर पासपोर्ट ची व्युत्पत्ती पण शोधून पहा.
हे सापडले कि डॉकलामच्या समर प्रसंगाचे वेळेस युवराज न सांगता चीनच्या राजदूताने भेटायला का गेले ते सांगा?
त्यात अगोदर आम्ही "गेलोच नाही" म्हणायचे आणि मग "हळूच कबुली" द्यायची हे शाळकरी मुलासारखे वागणे.
हीच परिस्थिती आता पण. पहिल्यांदा असे काही घडलेच नाही आणि मग सबळ पुरावा दिल्यावर पण त्या बैठकीत "गुजरात निवडणुकीचा विषय निघालाच नाही" अशी सारवासारव करायची. घरच्या भांडणाची शत्रूची मदत घ्यायची ही अत्यंत हीन प्रवृत्ती आहे.
जे काही करायचे आहे ते समोरासमोर करा. हे झुरळांसारखे फटीत शिरून करणे काँग्रेसच्या लोकांना शोभत नाही.
जाता जाता -सारवासारव याची व्युत्पत्ती-- केलेली घाण नजरेस पडू नये म्हणून शेणाबरोबर जमिनीत सारवून टाकणे

babu b's picture

12 Dec 2017 - 5:27 pm | babu b

आता काय करावे या फौजी डॉक्टरसाहेबाना!

मनमोहन पे भरोसा नै
मोदी पे भरोसा नै.

त्या डिनर पार्टीला एक एक्स फौजी होते - दीपक की कायतरी नाव आहे पेप्रात. तेही म्हणालेत - गुजरात निवडणुकीवर बोलणे झाले नाही .

त्यांच्यावरपण भरोसा नै का ?

सुबोध खरे's picture

12 Dec 2017 - 7:52 pm | सुबोध खरे

पहिल्यांदा तुम्ही म्हणालात सरकारला "हे" कळले नाही का?
सरकारला "कळले" हे समजल्यावर तुम्ही दुसऱ्या बाजूने बॉलिंग चालू केली
काँग्रेसी म्हणाले आम्ही भेटलोच नाही. पहिल्यान्दा चीनच्या राजदूताना मग पाकिस्तानच्या
नंतर म्हणाले आम्ही भेटलो पण गुजरातबद्दल चर्चा झालीच नाही.
मग चर्चा कशाबद्दल झाली?
आमची मटण बिर्याणी चांगली का तुमची?
आमचे बोकड चांगले का तुमचे?

आमचा भरवसा मोदींवर आहे पण काँग्रेसवर नाहीच.
तुमच्यावर तर अजिबात नाही.
रच्याकने-- तुम्ही आर्मीत भरती होणार होता त्याचे काय झाले? तुम्हालाही "फौजी डॉक्टर" होण्याची संधी आहे
(मोठ्याने बोंबलत होतात आर्मीत सुखसोयी भरपूर मिळतात म्हणून)

लोकहो,

कन्हैय्या कुमारचे दिव्य विचार इथे वाचता येतील : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/kanhaiya...

या विचारांचा समाचार घेतलाच पाहिजे.

१.

या देशाचं संविधान आणि या देशातील लोकशाहीचं स्पिरीट वाचवायचं असेल तर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे.

शहाबानो प्रकरणाच्या वेळेस घटनेची मोडतोड करून कायदा संघाने बदलला होता का?

२.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस)चा भारत नको असेल तर सर्वांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र यायलाच हवं

संघाची अर्धी चड्डी जाऊन पूर्ण चड्डी आली हो. अगोदर तुमची चड्डी सावरायला शिका. मग समान कार्यक्रमाचं बघू.

३.

प्रत्येक गावात फूट पाडण्यात संघ यशस्वी झाला आहे.

च्यायला, कम्युनिस्ट (म्हणजे डावे) कुठल्याही समाजाची आहेरे आणि नाहीरे अशी सरसकट विभागणी करतात. तरीपण गावपातळीवर फूट पाडण्यात मात्र संघाला यश येतंय. अशा प्रसंगी डाव्यांनी शिकवणी लावायला पाहिजे ना संघिष्टांची?

४.

आता दंगली करण्यासाठी बाहेरचे लोक येत नाही. स्थानीकच दंगली करत आहेत.

आयला हो? मग देशभरात सर्वत्र दंगली उसळायला हव्यात. गुजरातेत २००२ नंतर एकही दंगल झाली नाही. कन्हैय्या कुमार दारू ढोसून बडबड तर करंत नाहीये?

५.

कालपर्यंत जे एकत्र क्रिकेट खेळत होते. तेच आता एकमेकांना पाकिस्तानधार्जिणे ठरवून ठोकत आहेत.

अगदी बरोबर. मुस्लिम व्होट बँकेचं थोतांड निकालात निघालं आहे. त्यामुळे भारतप्रेमी मुस्लिम न घाबरता रास्त बाजूने व्यक्त होऊ लागला आहे. मग ती बाजू भले हिंदूंची असो. अर्थातंच सेक्युलर लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.

म्हणूनंच प्रत्येक सेक्युलर नेता आपणंच मुस्लिमांचा तारणहार अशा आवेशात भाषणं ठोकू लागला आहे. साहजिकंच त्यांत फाटाफूट होऊन एकमेकांना पाकिस्तानी हस्तक ठरवायची स्पर्धा जुंपली आहे. ही स्थिती भारताला अनुकूल असून पाकिस्तानला प्रतिकूल आहे.

६.

फॅसिस्ट शक्तिंनी समाजात हिंसा सामान्य केली आहे.

बरोबर. केरळात साम्यवादी हिंदूंच्या निर्घृण हत्या करताहेत. काश्मिरी हिंदूंना नेसत्या कपड्यांनिशी परागंदा व्हावं लागलं आहे.

७.

'मार्क्सवादी, आंबेडकरवादी आणि प्रगतीशील समतावादी विचारधार ही संख्या खूप मोठी आहे. आरएसएस त्याच्या पासंगालाही उरत नाही....'

नुसत्या आकड्यांच्या बेरजेने काय होणारे? ठोस कार्यक्रम हवा ना? मार्क्स भारताला राष्ट्र मानंत नाही, उलट आंबेडकर भारताला ठामपणे राष्ट्र मानतात. कशी बांधणार आवळ्याभोपळ्याची मोट?

८.

भारत सिव्हील वॉरच्या दिशेने जात आहे. हे आपल्याला मोठ्या स्वरूपात दिसत नाही.

अरे बथ्थडा, सिव्हील वॉर हाच क्रांतीचा मार्ग असतो ना? डावी विचारसरणी विसरलास? प्रोलेटारियेट आणि बूर्ज्वा काय गळ्यात गळे घालून नृत्य करतात का?

९.

घरातील डिनर टेबलची दोन भागात वाटणी झाली आहे. बाप धर्मनिरपेक्षेवर बोलत असेल तर मुलगा बापाला पाकिस्तान धार्जिणा ठरवत आहे.

म्हणूनंच घराला धर्मनिरपेक्ष थोतांडाची गरज नसून हिंदू संस्कारांची आवश्यकता आहे.

१०.

मुस्लिम वस्त्यांना मिनी पाकिस्तान ठरवलं जातंय.

पाकिस्तानी झेंडे कोण फडकावतं? हिंदू का?

११.

तुमचे जीवनमरणाचे प्रश्न अवाजवी ठरवले जात आहेत.

सेक्युलर मुखंडांचे जीवनमरणाचे प्रश्न अवाजवी ठरवले जात आहेत खरे. पण ते भारतीय जनतेकडून. जनता लोकशाहीत सर्वोच्च असते, माहित नाही का?

१२.

त्यामुळे उद्या असमानतेच्या आधारे लोकांना मारायचं ठरवलं तर कोणाकोणाला माराल?

जाऊन स्टालिन, लेनिन, ट्रोट्स्की वगैरेंना विचारा. इथे कुणाला विचारताय? डावी विचारसरणी विसरलांत?

१३.

आई-पत्नीही कोणीही एकसारखं दिसत नाही. त्यांनीही मारायचे का?

मी सभ्य गृहस्थ असून कन्हैय्या कुमारसारखी उघड्यावर लघवी करीत नाही. त्यामुळे मला कोणी हटकंत नाही. सबब कन्हैय्या कुमार माझ्यापासून वेगळा आहे. ही त्याला ठार मारायची अर्हता होऊ शकते का यावर विचारमंथन व्हायला पाहिजे.

१४.

कोणी आंबेडकरवादी असेल, कोणी मार्क्सवादी असेल, कोणी लेनिनवादी असेल किंवा आणखी कोणी समाजवादी असेल, आपण कोणत्याही विचारधारेचे असलो तरी आपल्यात एकता निर्माण झाली पाहिजे,

नाहीतरी आवळ्याभोपळ्याची मोट बांधायचीच आहे तर मग रास्व संघाला पण घ्या ना बरोबर.

१५.

आज आपल्या काळातील आंबेडकरांची गरज आहे, आपल्या काळातील गांधींची गरज आहे. आपल्या काळातील भगतसिंग आणि सावित्रीबाई फुलेंचीही गरज आहे.

हेडगेवार, गोळवलकर यांचीही गरज आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे म्हणजे तिन्ही सावरकर बंधूंचीही गरज आहे.

असो.

ककुने वैचारिक रीत्या भरकटल्याचा उत्कृष्ट नमुना पेश केला आहे.

आ.न.,
-गा.पै.

babu b's picture

10 Dec 2017 - 4:38 am | babu b

हेडगेवार , गोळवलकर , सावरकर ...

मोदीजी मात्र गांधींचे विचार , खादी अन चरखा यावरच बोलत असतात.

सुबोध खरे's picture

10 Dec 2017 - 4:30 pm | सुबोध खरे

काय सांगताय काय?
तुम्ही मोदींची भाषणे ऐकायला/ वाचायला लागलाय?
पर्वा त्यांची स्तुती पण करून झाली.
सांभाळा हो!

गामा पैलवान's picture

10 Dec 2017 - 11:52 pm | गामा पैलवान

गांधी, खादी आणि चरख्याच्या पलीकडे जग आहे हे आजून कित्येकांच्या लक्षात येत नाहीये. त्यांच्या कलाने घ्यायला हवं ना?
-गा.पै.

babu b's picture

12 Dec 2017 - 5:34 pm | babu b
babu b's picture

12 Dec 2017 - 5:35 pm | babu b

पिस्तूल , मशिनगन , बाँब ! गांधी कभी मरते नही !!

...
भाजप्याना लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे.

लाक्षागृह जाळल्यावरही दुर्योधन रोज सकाळी गुप्तहेराना पांडवांबाबत विचारणा करत होता. त्याला भिती वाटत होती , हे चुकुन परत आले तर ?

तशीच गत भाजप्यांची झाली आहे. पूर्ण सत्ता मिळुनही सुख भोगता येईनासे झाले आहे आणि तीन्ही त्रिकाळ राहूल , सोनिया , इंदिरा , नेहरु आणि बापूजी यांची आठवण काढणे सुरु आहे .. हे परत आले तर ... ?

सारखे सारखे बापू , चरखा , खादी म्हणूनच आठवतात ह्याना !

गामा पैलवान's picture

12 Dec 2017 - 7:21 pm | गामा पैलवान

बाबुराव, हा तुमचा गोड गैरसमज आहे. मोदींना गांधीजी आठवतात कारण काँग्रेसमुक्त भारताची कल्पना गांधीजींनीच प्रथम मांडली होती.
आ.न.,
-गा.पै.

भाजप्याना लाक्षागृह सिंड्रोम झाला आहे.

जसा काँग्रेसला नेताजींना संपवूनही होतच राहायचा?
===========================================

पूर्ण सत्ता मिळुनही सुख भोगता येईनासे झाले आहे

हा दोष सत्ता नावाच्या गोष्टीचा आहे, भाजपचा नाही. पण काँग्यांना तर सत्ताविवस्त्रता पण सुखानं भोगता येईनाय ना?

नेताजींच्या प्रकरणाच्या रिओपन केलेल्या फायलींचे काम कुठवर आलाय?

सध्याला नेहरू नेताजींच्या पाहुण्यांवर गुप्तपणे पाळत ठेऊन असायचा इतकं सिद्ध झालंय. रशियात स्टॅलिननंतर नेताजींचा खून घडवून आणला असे काही सूत्रे सांगत आहेत.
==================
फायली आजवर नेताजींच्या खून्यांच्याच हातात होत्या म्हणून त्यांच्यात थेट काही सापडणार नाही. सगळं पुरावे पुन्हा मिळवावे लागणार.

babu b's picture

15 Dec 2017 - 5:05 pm | babu b

पुरावे कुठे आहेत ?

फायलीत !

फायली कुठे आहेत ?

नेहरुनी नष्ट केल्या !

.....

गवत कुठे आहे ?

गायीने खाल्ले !

गाय कुठे आहे ?

पळून गेली !

बाळूचा कागद कोराच अन उगाच ढिंढोरा पिटायचा ... गवत खाणार्या गायीचे चित्र काढले म्हणून.

पोर्तुगीज आणि इंग्रज पळून गेले तरी काही काही घार्‍या डोळ्याचे लोक आहेतच ना, तस्संच काही काही गवत काही काही गाई शिल्लक आहेत. एम एफ हुसेनची चित्रं बघायच्या मौजेत बाळूची चित्रं बघायला सवडच नाही आणि मनायचं बाळूच नाही! अरे व्वा!!

बाळूची काय चित्रे काढली आहेत आणि कुठेत??

सुबोध खरे's picture

15 Dec 2017 - 9:57 am | सुबोध खरे

सारखे सारखे बापू , चरखा , खादी म्हणूनच आठवतात ह्याना !
ते सर्व नाममात्र आहे. पुरोगामी निधर्मांध लोकांचा कात्रज करण्यासाठी.
कात्रज काय आहे ते श्री शिवाजी महाराजांच्या इतिहासात पहा
नाही तर जाल आलमगीरनाम्यात वाचायला.

पुरोगामी निधर्मांध लोकांचा कात्रज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडत्या मुख्यमंत्रांच्या सौना घेऊन जावे लागेल.
-
बिचाऱ्या मिसेस फडणवीस क्रिसमस निमित्त काही गरीब मुलांना मदत करायचे आवाहन करायला गेल्या आणि ट्रोल्स ने त्यांना कात्रज फिरवून आणायचा प्रयत्न केला.

मुख्यमंत्रांच्या सौना सुद्धा ... असे वाचावे.

सुबोध खरे's picture

15 Dec 2017 - 7:51 pm | सुबोध खरे

त्या कोणत्या घटनात्मक पदावर आहेत म्हणायचे?

घटनात्मक पदावर असणाऱ्यांनाच कात्रज दाखवणार का ? लगेच फिल्टर लावला का ?

babu b's picture

15 Dec 2017 - 11:31 pm | babu b

बाहेरून काळा पैसा आणणार असे सांगून इथल्याच काळ्या पैशाला ऐन नोटाबंदीत वॉलंटरी डिस्क्लोजरात घालून सफेद केले.

इतर पक्षाच्या भ्रष्ट नेत्याना तुरुंगात डांबू असे ओरडून अखेर त्याना आपल्याच पक्षात घेतले.

ह्या अशा कात्रजांसमोर तो जुना कात्रज फिक्का वाटू लागलाय .

विशुमित's picture

15 Dec 2017 - 10:53 pm | विशुमित

<<कात्रज काय आहे ते श्री शिवाजी महाराजांच्या इतिहासात पहा>>>
==>> महाराजांचा इतिहास अजून संशोधीत करून त्यांची नवी जन्म तारीख शोधून काढली आहे भाजप च्या आमदाराने.
आता ४थी का ५वी शिवजयंती ??

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 11:05 pm | श्रीगुरुजी

रामदास स्वामी व दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते हा जावईशोध खांग्रेसींनी/राष्ट्रव्याधींनी लावला होता किंवा मुस्लिम मुस्लिमांना मारूच शकत नाहीत हे दिव्य दृष्टीने काकांना दिसले होते. हा पण त्यातलाच प्रकार दिसतो.

विशुमित's picture

15 Dec 2017 - 11:08 pm | विशुमित

होय का ?
बर करा अजून एक जयंती साजरी मग.

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 11:15 pm | श्रीगुरुजी

हरकत नाही. पण यासाठी काकांची परवानगी लागेल.

विशुमित's picture

15 Dec 2017 - 11:21 pm | विशुमित

काकांची काय परवानगी मागताय? तुमचे आवडते सरकार आहे, त्यांनी संशोधन केले आहे. बदला म्हणावं अजून एक तारीख.

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 11:26 pm | श्रीगुरुजी

काकांची परवानगी घेतली नाही तर काका आपल्या नेहमीच्या सवयीनुसार जातीयवादी काडी टाकून मजा बघतील.

एवढे काय घाबरायचे आणि लाजायचे मज्या बघणाऱ्यांना?

babu b's picture

15 Dec 2017 - 11:35 pm | babu b

तसेही कमळीकडून त्याना पद्म दिलेले आहेच ना ?

दादोजी पुतळा हटवल्यावर अवघ्या २ महिन्यात दादांनी स्थायी समिती अध्यक्षपदासाठी रसद पण पुरवली होती झीडकरला. ती झिडकर ने निर्लज्ज पणे स्वीकारली हि होती.
आता काय एवढे घाबरायचे ??

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 11:53 pm | श्रीगुरुजी

दादांना आत्मक्लेश करून प्रायश्चित्त घ्यायचं होते म्हणून पुरवली असेलच रसद.

श्रीगुरुजी's picture

15 Dec 2017 - 11:49 pm | श्रीगुरुजी

आम्ही घाबरत नाही हो. पण काकांनाच या उतारवयात मज्जा झेपायची नाही.

विशुमित's picture

15 Dec 2017 - 11:58 pm | विशुमित

घाबरत नाही तर मग बदला कि शिवजयंतीची तारीख. काकांच्या उतारवयाची कशाला काळजी करता एवढी ?
ते चांगले हट्टे कट्टे आहेत. ऑपेरेशन होऊन देखील शेतकरी दिंडीच्या समारोपाला हजेरी लावली होती. सक्रिय आहेत.

श्रीगुरुजी's picture

16 Dec 2017 - 9:08 am | श्रीगुरुजी

बदलून किंवा न बदलून काहीच फरक पडणार नाही.

हजेरी लावली म्हणजे ते काही दिंडीत चालले नव्हते. लोकांच्या मदतीने व्यासपीठावर चढून चिथावणीखोर भाषण ठोकले एवढाच त्यांचा सहभाग आणि सक्रीयता.

babu b's picture

16 Dec 2017 - 9:23 am | babu b

गांधीना नावे ठेवायची अन निवडणूक अन परदेशात गांधी नमो म्हणायचे.

ताजमहालाला नावे ठेवायची , अन मग तिथे झाडायला जायचे.

अन हे काय ? मोघलकुलोत्पन्न आलमगीराच्या नातवाच्या - बहाद्दूरशहाच्या थडग्यावर चक्क फुले उधळताहेत . ....

ब्

https://m.timesofindia.com/india/pm-modi-visits-mughal-ruler-bahadur-sha...

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Dec 2017 - 10:48 am | हतोळकरांचा प्रसाद

सवयीप्रमाणे अंध हल्ले करत राहणे गरजेचेच आहे जणू! वरील तिन्ही उदहाराणांमधील मोदींची भूमिका सांगता का जरा? आणि वस्तुस्थितीला धरून काही असेल तर सांगा काही नाहीतर असले वांझोटे आरोप करणारे पाचरीला पन्नास आहेत बाजारात सध्या!

मार्मिक गोडसे's picture

16 Dec 2017 - 11:07 am | मार्मिक गोडसे

पाचरीला पन्नास नव्हे, पासरीला पन्नास.

हतोळकरांचा प्रसाद's picture

16 Dec 2017 - 3:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

ओके...पण पन्नासच की जास्त?

सुबोध खरे's picture

16 Dec 2017 - 3:55 pm | सुबोध खरे

प्रसाद राव कुठे नादाला लागता त्यांच्या
गुजरातवर फार आशा लावून बसले होते.
गाढवही गेलं आणि ब्रम्हचर्य ही
अशी अवस्था असल्याने फार जळफळाट होतोय.
सोडून द्या.

श्रिपाद पणशिकर's picture

16 Dec 2017 - 6:34 pm | श्रिपाद पणशिकर

हे मात्र भन्नाट होत डॉक. ;)

मार्मिक गोडसे's picture

16 Dec 2017 - 4:21 pm | मार्मिक गोडसे

वाक्प्रचारानुसार पन्नास.

https://www.dailyo.in/politics/netaji-files-subhas-chandra-bose-soviet-r...

One of the files declassified by the central government on June 29 has yielded a sensational claim that Netaji Subhas Chandra Bose, reported dead in 1945, was in Soviet Russia as late as 1968.

babu b's picture

15 Dec 2017 - 6:25 pm | babu b

२०१६ ची बातमी , अजून दंड दिला नाही का ?

दळवी, पोंक्षे वगैरेना बोलावून लगोलग एक नाटक लिहून घ्या.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Dec 2017 - 8:41 pm | हतोळकरांचा प्रसाद

तसं ते नाटक लिहिण्यात आलं तर तुम्हाला काही आक्षेप असायला हवा का?

श्रिपाद पणशिकर's picture

16 Dec 2017 - 6:48 pm | श्रिपाद पणशिकर

श्रियुत गजानन कागलकर
आपण एखादा चांगला psychiatrist गाठुन उपचार करून घेणे हे आपल्या व आपल्या मांजरीच्या जंता साठि अतिउत्तम. तुम्हि मुंबईतच आहात तर डॉ. खरे सुद्धा तुमची ह्या कामात मदत करतिल. Get well soon. और सुनो मिंया चाउस, कंपाउंडर होते हुये MBBS लिखना जुर्म है. ना तो शक्ल से ना तो अक्ल से तुम MBBS लगते हो.

गामा पैलवान's picture

16 Dec 2017 - 7:38 pm | गामा पैलवान

MBBS = म्याट्रिकला बसून बसून सडलेला

-गा.पै.

तेजस आठवले's picture

16 Dec 2017 - 8:34 pm | तेजस आठवले

बाबूसाहेबांसारख्या आयडीचे तर आपण सगळ्यांनी आभारच मानले पाहिजेत.त्यांना मिपाचे दिग्विजयसिंग ही पदवी देण्यात यावी.ते मोदींची मदतच करत आहेत, २०१७ मध्ये जर मोदी परत निवडून आले तर त्या विजयात बाबूसाहेबांचा वाटा असणार आहे.

तेजस आठवले's picture

16 Dec 2017 - 8:40 pm | तेजस आठवले

सुधारणा : २०१९ मध्ये असे वाचावे.