तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
तारी भवसागरी करी मज मोकळा
देई तुझ्या रे चरणी तू ठाव मला
झालो चिंब भक्तीत मीपणा नुरला
माझा देह हा चंदनाचा रे झाला
नामाचा गोडवा माझ्या ओठी आला
पामर रे तुझा हा भक्ती रस प्याला
पाहूनी राधेसी तुझिया रे अंकावरी
होई रुकमाई रे कावरी बावरी
झाले सहन न तिला आली दिंडीरवनाला
देवा आला तू पाठी समजूत घालण्याला
पाहूनी झोपडी रे चंद्रभागेतीरी
देवा क्षण दोन क्षण तू थबकला
देवा क्षण दोन क्षण तू थबकला
आतून वीट फेकली पुंडलीक बोलला
तू थांब मातापित्याची सेवा करु दे मला
तू थांब मातापित्याची सेवा करु दे मला
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
लोटली युगे अठ्ठावीस किती काळ गेला
विठू तू न विटेवरूनी रे हलला
विठू तू न विटेवरूनी रे हलला
येती दर्शनाला भक्त भेटायाला
आषाढी आणि कार्तिकीच्या रे वारीला
आषाढी आणि कार्तिकीच्या रे वारीला
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
तू उभा विटेवर तुझे हात कमरेवर
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
आलो विठू तुझ्या रे मी दर्शनाला
--यमकांकित (सतीश गावडे )
१४ नोव्हेंबर २०१७
प्रतिक्रिया
14 Nov 2017 - 12:42 pm | प्रचेतस
आजच्या कार्तिकी एकादशीच्या सुमुहूर्थावर समयोचित कविता.
'मेरे रशके कमर' च्या चालीवर म्हणून पाहिली, परफेक्ट जुळतं.
14 Nov 2017 - 12:43 pm | किसन शिंदे
लय भारी बे !! नुसरत फतेह अली खाँ साहेबांनी अजरामर केलेल्या 'मेरे रश्के कमर'च्या चालीवर म्हणून पाह्यलं आणि पर्फेक्ट जमलं. =))
14 Nov 2017 - 12:53 pm | खेडूत
छान छान!
आता आज वेगळे आळंदीला जायला नको!
14 Nov 2017 - 1:20 pm | गामा पैलवान
कविता असेल तर चांगली आहे. विडंबन असेल तर फालतू आहे.
-गा.पै.
14 Nov 2017 - 1:44 pm | नाखु
भक्ती भाव उतरले आहेत
घरकोंबडा वारकरी नाखु
14 Nov 2017 - 2:21 pm | सूड
वाह!!
14 Nov 2017 - 6:21 pm | सूड
प्रेरणादायी कवितांपेक्षा बरंच उच्च प्रतीचं आहे.
15 Nov 2017 - 11:10 am | दुर्गविहारी
आधी हॅश टॅग बघून पोटात गोळा उठला, म्हटले ईक्षुदंड नाहीत म्हणजे कवीवर्यांनी ट्रॅक बदलला कि काय? ;-)
पण तुमची कविता खरच छान आहे.
15 Nov 2017 - 11:15 am | जागु
छान.
15 Nov 2017 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा
सखूवाला धन्या आणी नवा स. गा. दोण्ही उ तरलेत काव्यात! ;)