अंग पेटून सांज जीव चिरते
पापण्यांच्या पंखातून हळूच पाणी फिरते
सय येता हुंदका कंठात फुटतो
गहिवरलेल्या क्षितीजातून उदास रंग गळतो
प्राणाच्या ओघळीत व्याकूळ शीळ तडफडते
काळोखाच्या काठावरती दिवसाचे बन विझते
खोल खोल गात्रात पिरतीचा मोहोर जळतो
उरात आसवांचा झरा उचंबळुनी वाहतो