नोटबंदी
नोटाबंदी नोटाबंदी झाले की हो एक वर्ष
आला का बाहेर काळा पैसाझाला का हो तुम्हा हर्ष? .१
संध्याकाळी बातमी प्रसृत झाली
हजार पाचशे नोट बुडाली
कपाटे तिजोरी भरभर रिकामी
मोदींनी योजिली युक्ती नामी .२
काळ्यापैशाच्या भीतीमुळे तेव्हा
धनदांडगे झाले वेडे पिसे
व्यवस्थापन नीट नसे योजनेचे
सुरुवातीला जनता त्रास सोसे .३
नोटबंदी निर्णय जाहला
कोणास आवडे कोणा नावडे
भ्रष्टाचार काळापैसा नष्ट होऊ दे
नको फक्त नोटांचे नवे रुपडे .४
- शब्दांकित (वैभव दातार )
८ नोव्हेंबर २०१७
विनंती : नोटबंदी योग्य कि अयोग्य त्याचे फायदे तोटे ,त्यामागील राजकारण हे सर्व बाजूला ठेवून एक प्रसंगानुरूप केलेली कविता असे समजून कवितेचा आस्वाद घ्यावा हि नम्र विनंती .
प्रतिक्रिया
8 Nov 2017 - 12:11 pm | खेडूत
शीर्षकात अशी दुरुस्ती हवी..
नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी केलेली आरतीसदृश कविता.
8 Nov 2017 - 12:40 pm | प्राची अश्विनी
ते||___ ||-हायलं.
8 Nov 2017 - 2:02 pm | अनन्त्_यात्री
||नोटबंदीच्या मिषे जी काव्यसुमने वाहिली
इक्षुदंडांच्या* भयाने मी न पुरती वाचली ||
(*) = ||
9 Nov 2017 - 5:49 am | हरवलेला
सुंदर कविता.
नोटबंदीवर वाचलेली पहिली संतुलित कविता.
इतक्या कमी शब्दात नोटबंदीवर टीका अथवा नोटबंदीचे समर्थन न करता, संतुलित भाष्य (कविता) केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
अतिशय गहन अर्थ आहे या कवितेत.
कवितेचा विषय नेहमीप्रमाणे वेगळाच.
9 Nov 2017 - 6:14 am | शब्दबम्बाळ
माझ्यापण चार ओळी
नोटाबंदी नोटाबंदी केली नोटाबंदी
नोटाबंदी आणि पेsssssच!
सगळ्या काळ्यापैशाला डुबवून बना संपूर्ण गुलाबी
नोटा काळ्या, नोटा फेक(fake )
केली नोटाबंदी!!
(विको वज्रदंतीच्या चालीत वाचावे)
9 Nov 2017 - 11:45 am | एमी
(विको वज्रदंतीच्या चालीत वाचावे) >> हे भारीय :D
9 Nov 2017 - 2:33 pm | सूड
मी मनोमन देवाचे आभार मानले की कुटुंब कल्याण केंद्राने विशेष दिवस ठरवून विशिष्ट बंदी नाही करवून घेतली. =))
10 Nov 2017 - 10:37 am | वैभवदातार
'हरवलेला', तुमच्या प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे