अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला
"पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:-
मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले.
त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून १२ लाख रु.दिले. त्यानंतर सागरनाथने आणखी पाच लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली.
नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "करणी वडिलांवर उलटली आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर वडिलांचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले.
कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी बुवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी सागरनाथ मीठानाथ परमार आणि चंदुलाल सागरनाथ परमार यांच्यावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे.
....या प्रकरणावरून काय दिसते ?
मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे.
असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही.
श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:-
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.)
३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.)
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते. शेवटी सागरनाथबाबा न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हांला अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. वैद्यांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला देवानेच पाठविले आहे. त्याने नऊ हजार रु. मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. वैद्यांना वाटले देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. देवाच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.
शेवटी २८ लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी सागरनाथबाबा वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली. पोलीसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल.
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे
प्रयत्नपूर्वक विसर्जन करणे.
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. मंदार वैद्यांनी भोंदूबाबावर श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण बाबाकडे गेले. त्यामुळे तो बुवा सांगेल ते सत्य मानून वैद्य त्याच्या आज्ञा पाळत गेले. दासाला स्वामीच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. मग फसवणूक अटळ असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये.
******************************************************************************
प्रतिक्रिया
5 Nov 2017 - 11:21 am | तुषार काळभोर
आपण जवळजवळ सगळे कमी जास्त फरकाने एका वा अनेक प्रकारच्या श्रध्दांमध्ये गुरफटलेले असतो.
श्रद्धा मनावर किती प्रभावी ठरते व बुद्धी किती कमजोर, त्यानुसार आपण श्रद्धेच्या किती आहारी जातो ते ठरत असावे का?
मी सतरा वर्षांपासून संकष्टी चतुर्थीला उपवास धरतो, पण चतुर्थीला थेऊरला जाण्याला माझा विरोध असतो. गर्दीमुळे. एखाद्या चतुर्थीला उपवास मोडला तरी मला जास्त वाईट वगैरे वाटत नाही.
"आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये.
हे आवडलं. या भ्रमानेच बहुतेकांचा घात होत असेल.
5 Nov 2017 - 2:40 pm | यनावाला
धन्यवाद पैलवान . लेखाविषयी तुम्ही अनुकूल मत व्यक्त केले.
....यनावाला
4 Nov 2017 - 10:41 pm | एस
अंधश्रद्धा म्हणता येतील अशा भोळसट प्रकारच्या श्रद्धा ठेवण्याविरोधी तुमचे नेटाने सुरू ठेवलेले कार्य कौतुकास्पद आहे. फक्त एक या लेखाविषयीने म्हणू इच्छितो की ज्या प्रकारच्या श्रद्धेमुळे वैयक्तिक आणि समाजाचे नुकसान होणार नसते अशा प्रकारची श्रद्धा निरुपद्रवी म्हटली पाहिजे. दुसरे म्हणजे काही प्रकारची श्रद्धा ही विश्वासातून आणि संस्कारातून निर्माण होते, जी देशाच्या हिताची असते. याचे उदाहरण म्हणजे देश ही संकल्पना. या संकल्पनेप्रमाणे इतरही अशा संकल्पना आपल्या रोजच्या व्यवहारात आपण सगळेच मानतो, ज्या म्हटल्या तर खऱ्या आहेत, आणि म्हटले तर त्यांच्यापलीकडे बरेच काही वैश्विक आहे. दुसऱ्या शब्दांत त्या फक्त एक विचार आहेत. त्या विचारांवर बहुसंख्यांची श्रद्धा असते. या प्रकारच्या श्रद्धा सामूहिक हिताच्या दृष्टीने आवश्यक म्हटल्या पाहिजेत.
अर्थात हे सगळं अवांतर झालं. पण वरील उदाहरणाच्या बाबतीत असे मोठे, जाणते व्यावसायिक असे फसले कसे याचं आश्चर्य वाटल्याखेरीज राहत नाही.
5 Nov 2017 - 9:52 pm | यनावाला
तुम्ही म्हणता ते ठीकच आहे. बातमी वाचल्यावर मला ती खरी वाटेना. २८ लक्ष रु.दिले ? असे कसे शक्य आहे? पण म.टा. सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने बातमी नांवानिशी प्रसिद्ध केली होती. त्यात पोलीस ठाणे तसेच तेथील अधिकारी यांची नांवे होती. त्यामुळे त्यामुळे बातमी खरी मानली. मग सगळे पृथक्करण केले आणि लेख लिहिला.
6 Nov 2017 - 10:58 am | arunjoshi123
यनावाला,
झालेली घटना दुर्दैवी आहे. पण आपण तिचा संदर्भ बदलून, रम्य कल्पना करून जो श्रद्धा शब्दाबद्दल सुतावरून स्वर्ग गाठला आहे तो देखील दुर्दैवी आहे.
=============================
गुगलवर "ब्लॅक मॅजिक स्पेशालिस्ट पुने" असं लिहा आणि येणारे रिझल्ट पोलिसांना द्या. आपणांस आणि अनिंसला माझा फुल्ल पाठिंबा (टोकन) आहे.
4 Nov 2017 - 11:37 pm | प्रचेतस
उत्तम लेख
5 Nov 2017 - 1:45 am | सुबोध खरे
https://en.m.wikipedia.org/wiki/Anubhav_Plantations
हे 400 कोटी लोक कोणत्या श्रद्धेचे बळी आहेत?
शेवटी लोभ हा वाईटच. त्याचा गैरफायदा घेणारे लोक सर्वत्र आहेतच.
मग श्रद्धा असो व नसो
लोभाविष्ट: नर: वित्तम बिक्षते नैवचापदं।
दुग्धम पश्यती मार्जार:न तथा लगुडाहतीम।
यनावाला फक्त श्रद्धेवरच एकांगी टीका करताना आढळतात
5 Nov 2017 - 1:45 am | सुबोध खरे
https://en.m.wikipedia.org/wiki/Anubhav_Plantations
हे 400 कोटी लोक कोणत्या श्रद्धेचे बळी आहेत?
शेवटी लोभ हा वाईटच. त्याचा गैरफायदा घेणारे लोक सर्वत्र आहेतच.
मग श्रद्धा असो व नसो
लोभाविष्ट: नर: वित्तम बिक्षते नैवचापदं।
दुग्धम पश्यती मार्जार:न तथा लगुडाहतीम।
यनावाला फक्त श्रद्धेवरच एकांगी टीका करताना आढळतात
7 Nov 2017 - 6:50 pm | Duishen
मला वाटत दोन बाबीमध्ये फरक करायला पाहिजे - एक श्रद्धा आणि दुसरा विश्वास.... श्रद्धा (Belief ) ही एखाद्या संकल्पना / न पाहिलेल्या बाबींवर असू शकते मात्र विश्वास (Trust ) साठी एखादी जिवंत व्यक्ती किंवा मूर्त कल्पना आवश्यक आहे. श्रद्धेमध्ये करार असत नाही पण विश्वासात करार असू शकतो.
एखाद्या कंपनीत पैसे गुंतवणे, विम्यात पैसे गुंतवणे, बँकेत गुंतवणे किंवा ठेवणे याला व्यक्ती/ संस्था यामधील करार आहे. तेंव्हा ४०० कोटी श्रद्धेचे बळी नसून कायदेशीर करार मोडल्याचे बळी आहेत. फसवणाऱ्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा इथल्या न्यायालयाला अधिकारही आहे.
7 Nov 2017 - 7:44 pm | सुबोध खरे
श्रद्धा (Belief ) ही एखाद्या संकल्पना / न पाहिलेल्या बाबींवर असू शकते मात्र विश्वास (Trust ) साठी एखादी जिवंत व्यक्ती किंवा मूर्त कल्पना आवश्यक आहे
या अनुभव प्लांटेशन मध्ये पैसे गुंतवलेल्या किती लोकांनी सागाचे झाड पाहिलेले असेल याची शंका आहे. त्यातून किती लोक त्या श्री नटेशन ना ओळखत असतील किंवा त्यांना पाहिलं असेल? मग त्यांच्या वर विश्वास नक्की कोणत्या "जिवंत व्यक्ती किंवा मूर्त कल्पना" पाहून ठेवला?
आता याला तुम्ही अंध विश्वास म्हणा किंवा श्रद्धा म्हणा हा सर्व शब्दाचा खेळ आहे.
करार हा काही लेखीच असायला पाहिजे असे नाही तोंडी पण करार असू शकतो. याच भोंदू बाबाने तुम्हाला गुप्त धन मिळवायला मी मदत करेन म्हणून अगदी स्टँम्प पेपर वर लिहून दिलं तर तो करार कोणत्या आधारावर होईल?
मी परत तेच म्हणतो कि यनावाला एक फसवणुकीचा मामला पकडून श्रद्धेवर एकांगी टीकेची झोड उठवत आहेत.
7 Nov 2017 - 7:59 pm | सुबोध खरे
मी गणपतीची पूजा करतो.
यात श्रद्धा आली कि विश्वास आला?
गणपतीची मूर्ती हि मूर्त कल्पना आहे ती संकल्पनाही आहे आणि प्रत्यक्ष गणपतीला कोणीही पाहिलेले नाही.
मग गणपतीची पूजा करणारा अंधश्रद्धेचा बळी आहे का?
आपण पराकोटीचे नास्तिक असाल तर ठीक आहे. ( असा कोणीही आजतागायत माझ्या पाहण्यात नाही). श्री कलबुर्गी यांनी हिंदू मूर्तीवर मूत्र विसर्जन केले पण अशा एखाद्या व्यक्तीला आपण आपल्या वडिलांच्या तसबिरीवर मूत्र विसर्जन करा सांगितले तर तो करेल का? कारण ती तसबीर हे एक प्रतीकच आहे जसे मूर्ती हेही एक प्रतीक आहे. प्रत्यक्ष व्यक्ती नाही.पण तरीही त्याबद्दल (वडिलांच्या तसबिरीबद्दल) वाईट गोष्ट करणे हे अशा माणसालाहि जमत नाही.
याला आपण काय म्हणाल विश्वास कि श्रद्धा?
7 Nov 2017 - 8:02 pm | सुबोध खरे
हायला
मला पण "गोल" बोलायला जमायला लागलंय कि !
मिपा कि जय हो!
8 Nov 2017 - 3:19 am | Duishen
@सुबोधजी,
माझ्या दृष्टीने कुठेलेही ईश्वर रूप घ्या ती संकल्पनाच आहे. "....आणि प्रत्यक्ष गणपतीला कोणीही पाहिलेले नाही." या मताशी मी सहमत आहे म्हणून माझ्या दृष्टीकोनातून ही श्रद्धा आहे.
पण जेंव्हा गणपतीची मूर्ती दुध पिते असा समज सामोरा येतो; त्यावेळेस आपण त्याला श्रद्धा म्हणणार की अंधश्रद्धा?
8 Nov 2017 - 4:44 am | Duishen
@सुबोध जी, श्रद्धा हा चिकित्सेचा विषय आहे हे अनेक जणांना अमान्य आहे! पण विश्वास हा नक्कीच चिकित्सेचा विषय आहे! 'अनुभव प्लांटेशन' साठी मुख्य व्यक्तीला भेटणे गरजेचे असतेच असे नाही. कर्मचारी वर्ग असणारच. तिथून विश्वासाची पायरी सुरु होते.
आपल्या तर्काने विचार केल्यास जे रिलायंसचे / टाटा / एअरटेल चे सीम कार्ड वापरतात त्यापैकी कितीजण अंबानी, टाटा आणि भारती मित्तल यांना भेटले? ...मग अंबानी, टाटा आणि भारती मित्तल ही श्रद्धास्थाने मानावयाची का?... का इथे विश्वास काम करतो? ....जाहिरातींमध्ये या कंपन्यांनी दर दिवशी १ जीबी डेटा देऊ असे म्हणले आहे मग आपण ते श्रद्धाळू आहोत म्हणून ती जाहिरात मानतो की कंपनीवर विश्वास ठेवून जाहिरात मानतो? उद्या एखाद्या गटाने (ज्यात आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी इ.इ.) ठरवले की अंबानी, टाटा आणि भारती मित्तल भेटावयाचे तर ते भेटूही शकतील ना! त्यांच्या अस्तित्वाची खात्री करता येण्याजोगी आहे. तशी खात्री अनुभव कं. च्या मुख्य माणसाची पण होऊ शकेल.
दुसऱ्या एका प्रतिसादात तुम्हीही मान्य केले की "...प्रत्यक्ष गणपतीला कोणीही पाहिलेले नाही." पण अंबानी, टाटा आणि भारती मित्तल किंवा श्री. नटेश यांना कुणीही पाहू शकतं.समजा एखाद्या व्यक्तीने ईश्वराच्या एखद्या रूपावर आक्षेप घेतला तर त्या ईश्वराला मानणारे चिडतील, त्रागा करतील किंवा कलबुर्गी करतील पण अंबानी, टाटा आणि भारती मित्तल यांच्यावर कुणी निराधार आक्षेप घेतला तरीही समाज त्रागा करणार नाहीत किंवा त्यांचा कलबुर्गी होणार नाही.
मला खात्री आहे की आपण - ज्या लोकांनी अनुभव कं पैसे गुंतवले त्यांच्या भावनांना श्रद्धा ठरवून श्री. नटेश सारख्या व्यक्तींना ईश्वरासारख्या उदात्त संकल्पनेच्या रांगेत बसवणार नाहीत.
आता डेटा ऐवजी दुसरा प्रसंग विचारात घेऊ.. मंदिरात गेल्यावर हातावर प्रसाद ठेवला आणि प्रसाद खाण्याने आपल्या आयुष्याचे चांगले होईल असे वाटणे ही देवावरची श्रद्धा की देवावरचा विश्वास? जसे डेटाचा वापर पडताळता येतो तसा प्रसादाचा वापर पडताळता येणे शक्य आहे का?...प्रसादाचा अनुभव खूप व्यक्तीसापेक्ष असणार आहे. एखादा भाविक कदाचित फायदा होईल असा विचारही करणार नाही; एखादा भाविक कदाचित प्रसादामुळेच माझा अबक प्रश्न सुटला असे म्हणू शकेल. पण एखाद्या भाविकाला अपेक्षा असूनही चांगला अनुभव आला नाही/ त्याच्या/तिच्या समस्या सुटल्या नाहीत तर तो ईश्वराला जाब विचारेल का? एखाद्याला १ जीबी डेटा नाही मिळाला तर व्यक्ती कंपनीला जाब विचारू शकते पण प्रसाद खाऊन ही चांगला अनुभव नाही आला तर जाब विचारल्या जात नाही.
तेंव्हा कंपनी असो किंवा सरकार असो, किंवा बँक असो आपल्याला जाब विचारण्याची सोय आहे कारण हा विश्वासाचा प्रकार आहे; पण देवाला जाब विचारल्या जात नाही कारण तिथे श्रद्धा आहे.
जेंव्हा जेंव्हा एखादी व्यक्ती श्रद्धास्थान बनायला लागते त्यावेळेस त्या व्यक्तीच्या प्रभावाचा जेव्हडा परीघ आहे त्या परिघातील लोकांचे / व्यक्तींचे नुकसान होत जाते मग ती व्यक्ती कितीही चांगली असो किंवा वाईट... आणि मुळ गाभा हरवतो...
5 Nov 2017 - 1:47 am | सुबोध खरे
400 कोटींचा अपहार झाल्याने लुबाडले गेलेले किंवा दिवाळखोरीत गेलेले लोक
5 Nov 2017 - 2:58 am | गामा पैलवान
यनावाला,
श्रद्धेमुळे फसवणूक झाली. ठीके. धरा श्रद्धेला जबाबदार. पण कितीतरी वेळा श्रद्धेचा संबंध नसतांना फसवणूक होते. तेव्हा कोणाला जबाबदार धरणार?
विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडली तर खाणंच बंद करणार का? की अन्न पारखून खाणार?
आ.न.,
-गा.पै.
7 Nov 2017 - 6:55 pm | Duishen
विषारी फळ खाल्ल्याने प्रकृती बिघडली तर खाणंच बंद करणार का? की अन्न पारखून खाणार?
अन्न पारखून खावे का नाही यापेक्षा विषारी फळ खाणे पूर्णत: बंद करावे हा एकमेव पर्याय आहे.
7 Nov 2017 - 7:08 pm | माहितगार
चांगली फळे आणि सडकी फळे यात फरक असतोच ना ! यनावालांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी दुसर्या टोकाचा दुराग्रहही तर्कसुसंगत ठरत नसावा किंवा कसे ?
5 Nov 2017 - 4:45 am | चामुंडराय
बाकी काहीका होईना, अठ्ठावीस दश प्रतिसादांची निःश्चिती !
5 Nov 2017 - 8:13 am | arunjoshi123
यनावाला यांनी मिसळपाव वर लेख टाकलेला आहे. म्हणजे ते शिकलेले असणार. त्यांनी वृत्तपत्रास पत्र देखिल लिहिले होते. म्हणजे त्यांना जगाचे अनेक व्यवहार माहित आहेत. त्या पत्राखाली प्रा. मंजे प्राध्यापक असे लिहिले होते. म्हणजे त्याअर्थी त्यांचीआर्थिक स्थिती उत्तम आहे. त्यांच्या लेखात व्याकरणाच्या चुका नाहीत, म्हणजे बुद्धीमान इ इ असणार. पेपर वाचतात म्हणजे जागृत देखील असले पाहिजेत.
सुरुवातीच्या पदावरून प्राध्यापक बनायला वेळ लागतो. आपण त्यांनी १० वर्षे नोकरी केली असे मानू. सरकारने कधी त्यांच्या घरी चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. ज्याला व्हॅलिड लेखी करार म्हणावं त्यासाठी लागणारा कोणताही "स्कोप आणि करेस्पाँडिंग कंसिडरेशन" असणारा लेखी करार त्यांच्यात सरकारमधे नाही. म्हणजे सरकार हे पैसे घेऊन यनावालांसाठी काय करणार आहे हे लिखित मधे यनावालांकडे नाही.
तरीही यनावाला सरकाराला दरवर्शी आपल्या उत्पन्नाचे ३०% देत आहेत. अज्ञात संकेतस्थळी अज्ञात लोकांना ते हे पैसे सोपवत असतात. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडते हे सत्य आहे.
इतके पैसे गेल्यावर किमान मंदार वैद्यांना शंका तरी आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. पण यनावाला यांना अजूनही सरकारची पोलिसांकडे फिर्याद करावी असं वाटलेलं नाही.
=================================================
मुद्दा असा आहे यनावाला, व्यवस्थेतला गुन्हा हीच व्यवस्था आहे असा कांगावा करू नये, मग ते सरकार असो नैतर धर्मव्यवस्था असो.
5 Nov 2017 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनावाला यांच्यावर व्यक्तिगत लिहिण्यापेक्षा आपण लेखाबद्दल प्रतिसादाबद्दल लिहिले पाहिजे असे वाटते.
राहवलेच नाही म्हणून सांगितले, बाकी, आपली मर्जी.
-दिलीप बिरुटे
5 Nov 2017 - 9:38 pm | मराठी कथालेखक
सदर प्रतिसादक भान हरपून फक्त त्वेषाने प्रतिसाद लिहित आहे असेच दिसते.
6 Nov 2017 - 9:04 am | mayu4u
आणि अजोंचे प्रतिसाद टाळून अन्य प्रतिसाद वाचतो.
6 Nov 2017 - 10:51 am | arunjoshi123
आणि यासाठी मी ईश्वराचा अत्यंत ऋणी आहे.
6 Nov 2017 - 10:45 am | arunjoshi123
आपण मी काय लिहिलं आहे त्यातल्या कोणत्याही एका विधानावर भाष्य करण्याची पात्रता दाखवा. मग काय अर्थ काढायचा तो काढा.
6 Nov 2017 - 10:50 am | arunjoshi123
आणि डॉ. दिलिपजी, याला वैयक्तिक लिहिणं म्हणतात.
===============================
यनावालांच्या दुसर्या धाग्यात दुशियेन यांनी माझ्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन केलं आहे. तिथे मी त्यांना प्रेमानं, सन्मानानं लिहिलं आहे. विधानं मागे घेतली आहेत. तुमच्या मुद्द्याच्या विरोध केला मंजे तुमचा विरोध केला या मानसिकतेत्नं बाहेर यायला हवं. (मलाही हे अवघड आहे, पण मी यासाठी काँशसली कमिटेड आहे.)
6 Nov 2017 - 10:41 am | arunjoshi123
मी त्यांच्याबद्दल काहीही वैयक्तिक लिहिलं नाही. रुपक आहे ते.
-----------------------------------------------------------------
खालचा त्यातला मुद्दा महत्त्वाचा आहे - श्रद्धा नावाच्या व्यवस्थेतला एक गुन्हा निवडून ती संकल्पना घातक सिद्ध करणे मूर्खपणाचे आहे.
7 Nov 2017 - 7:14 pm | माहितगार
व्यक्तिगततेचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवला तर सरसकटीकरणामुळे विरोधाभास होत असावा असे म्हणण्यास जागा शिल्लक रहाते.
6 Nov 2017 - 11:12 am | पुंबा
१. एक तर कर घेणे हा गुन्हा कसा झाला? कर देणे हे कायद्याने बाध्य आहे. सरकार ही व्यवस्था संविधान नावाचे सामाजिक कंत्राट करून तयार केलेली आहे. सर्व नागरिक त्या कंत्राटाचे स्टेकहोल्डर्स आहेत. सदर व्यवस्था चालावीत यासाठी जे कायदे केलेत ते लोकांच्या प्रतिनीधींनी केलेत. धर्मव्यवस्थेत असं काही आहे काय?
२. दुसरं व्यवस्थेतला गुन्हा निपटवण्यासाठी स्टेटने निराळी व्यवस्था केलेली आहे. धर्मव्यवस्थेत कसली सोय आहे गुन्ह्याबाबत आवाज उठव्ण्याची?
बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक नाही असला स्वतःचा समज करून घेऊ नकात. वैयक्तिकच आहे हे.
6 Nov 2017 - 12:30 pm | arunjoshi123
हो का?
मी एक अस्तिक, श्रद्धावंत, धार्मिक, इ इ मनुष्य आहे.
तुमच्या न्यायाने यनावालांनी खालील विशेषणे मला वापरली आहेत - हास्यास्पद, असत्यवादी, श्रद्धाळू, बुद्धीहीन, तर्कहिन, कॉमनसेन्स नसलेले, विचारशक्ती बधिर असलेले, बुद्धाला अतींद्रीय शक्ती आहे असे मानणारे, मेंदू कुंठीत झालेले, पुरोहितांकडून धूळफेक करून घेतेलेले, फसवले गेलेले, बनवले गेलेले, सुबुद्ध नसलेले, तर्कबुद्धी नसलेले, वैज्ञानिक दृष्टिकोन नसलेले स्वत:ची बुद्धी न वापरणारे,अनुभवाचा, कॉमनसेन्सचा वापर न करणारे, शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य, गतानुगतिकता मानणारे, स्वबुद्धीचा न वापरणारे, माणुसपणाचा खरा सन्मान न करणारे, गुलामगिरि, दास्यत्व पत्करणारे, शिक्षकांना प्रश्न न विचारणारे.
======================
श्रद्धावंतांची मूळात प्रतिष्ठेची लायकीच कमी असते हा विचार दूर सारून संतुलित बुद्धिने विचार करा कि कोण संयमी भाषा वापरत आहे नि कोण वैयक्तिक? "पाकाडे हरामखोर असतात" म्हटलं कि ते वाक्य सर्व पाकिस्तानी नागरिकांना लागू होतं हे नास्तिकी लॉजिकच्या बाहेर जातंय का?
===================================================
आता एकेका नास्तिकी (कारण तुलना धर्माशी आहे.) गैरसमजाबद्दल बोलू.
सरकार मला जितकी सेवा देतं तितका त्याने कर घ्यावा, नै का? माझ्या उत्पन्नांचा वा खरेदींचा वा अशाच करपात्र व्यवहारांच्या मूल्यांचा आणि सरकार मला ज्या सेवा देत आहे त्यांच्या मूल्यांचा संबंध काय आहे? आय शूड बी बिल्ड फॉर व्हॉट आय हॅव बीन सर्व्ड! शिवाय सरकारने मला कोणत्या सेवा हव्यात, नकोत ते मला बिल करताना प्रत्यक्ष ठरवू द्यावे. कंपन्यांना कर लावताना खर्च, गुंतवणूक वगळून नफ्यावर कर आणि सामान्य नागरिकाला अख्ख्या उत्पन्नावर कर!! अर्ध्या लोकांना शेती करतात म्हणून उत्पन्न कितीही असले तरी कर शून्य!!! वेगळं असं "कर सरकार" नसतं, सगळे मुद्दे मिक्स होतात केवळ करासाठी सरकारवर मत देता येत नाही. सरकार स्वतः सेवा , उत्पन्न विकत घेतं तेव्हा कर शून्य. अनेक बाबींवर करदर वेगवेगळे! सरकार कराचं काय करणार आहेहे बजेट अगदी सरकार ९९% अधिकार्यांना पण आधी माहित नसते, मग आमचा काय पाड. सरकारी यंत्रणेचा खर्च्च अपरंपार आणि ती बरीच अक्षम. यात चिकित्सक नास्तिकांना न्याय कसा दिसतो. स्वतः सरकारनेच कायदे केले असल्याने ते कशाला याला गुन्हा म्हणेल? पण नास्तिक तर कशाचीही चिकित्सा करू शकतात ना?
====================================================
धर्मव्यवस्थेत शासन, व्यापारी, प्रजा इ इ साठी अनेक तत्त्वे आहेत. अर्थशास्त्र हा शब्द आपण वापरता तो एक धार्मिक ग्रंथ आहे त्या विषयावरचा. असं प्रत्येक धर्मात आहे. अर्थात आता धर्मव्यवस्था नसल्याने यांचं संकलित रुप देणं अवघड आहे.
-------------------
धर्म हि देखील एक सामाजिक व्यवस्था होती, सर्वमान्य होती. तिचे मेरिट डिमेरीट न पाहता सरसकट फेकून दिली आहे. आपण तर सामाजिक रचना नावाचा प्रकार आहे का असाच प्रश्न विचारताय.
===============================
धर्मव्यवस्थेत अगदी छोट्या छोट्या नैतिक गुन्ह्यांपासून ते नीच गुन्ह्यांपर्यंत सर्वाना शिक्षा, न्याय इ ची सोय आहे. आजची जी पद्धत आहे - छोट्या लोकांना जास्त त्रास, शिक्षा म्हणजे कोंडणे, हजारो पळवाटा, उशिराचा न्याय, एकीकडे एक न्याय दुसरीकडे दुसरा, एकाच देशात वेग्वेगळ्या कोर्टांचे तेच, हुशार वकील दिला तर सुटका असले प्रकार धार्मिक व्यवस्थेत कमी होते.
6 Nov 2017 - 12:38 pm | arunjoshi123
https://www.mvnadkarni.com/files/Hindu%20Eco%20Philosophy.pdf
यात चर्चेला घेतलेले विषय आपण पाहू शकता.
5 Nov 2017 - 9:33 am | arunjoshi123
ते श्रद्धाळू नाहीत. म्हणजे श्रद्धाळू हे विशेषण या माणसासाठी सर्वात उचित असं असतं तर सगळे लोक श्रद्धाळू असल्यामुळे अक्षयधनकुंभांचे शॉपिंग मॉल्स असते. सदर इसम एक आधुनिक कॅपिटॅलिस्ट, मटेरियालिस्ट आहे. त्यानं कै २८ लाख देव पाहायचे नैत दिले. (ते ही योग्य नसतं म्हणा) तो फक्त एक गुंतवणूकदार आहे आणि त्याच्यात आणि अन्य कोणत्या गुंतवणूकदारात काहीही फरक नाही. हा मनुष्य निर्लज्ज लोभी आहे. प्रकरण पैशाव्यतिरिक्त अन्य बाबींवर घसरलं (प्रेत घरासमोर टाकणे) तेव्हा त्याने गुंतवणुकीची रिस्क अव्हेरली.
अक्षयधनकुंभ हि तसं तर एक सरकारी कल्पना आहे. त्यांचा कारखाना (मंजे त्याची मालक असलेली लिगल एंटीटी) हा एक अक्षयधनकुंभ आहे असं एक सरकारी गृहितक आहे. मंजे ही कंपनी अनंतकालीन, सदा नफा कमावणारी असते, असू शकते हे सरकारलाच अभिप्रेत आहे.
====================
किंबहुना सागरनाथाकडे "खरा अक्षयधनकुंभ" नाही म्हणून तर या माणसानं पोलिसांकडे तक्रार केली नाही ना???
===============
बुवा-बाबा-स्वामींचे येणे जाणे ही एक उत्तम गोष्ट आहे.
==============
नास्तिक (अश्रद्धावंत) पार्टी बिघडावत असले तर त्यांचे येणे जाणे बंद करावे.
===================
बाकी हे वैद्य एक श्रद्धाळू नसून एक अनप्रोफेशनल, अशिक्षित खरिददार आहे.
९००० रु मधे अनंत धन कसं विकत घेणे हे अर्थहिन विधान आहे - यावर अंधश्रद्ध देखिल विश्वास ठेऊ शकत नाही.
आणि कारखाना चालवणार्या माणसानं धनाचं स्वरुप, धन काढायचे काळ, राशी, पद्धत, पेमेंट टर्म्स इ इ ची चौकशी करू नये?
त्यालाच का विकत आहे, स्वतः का वापरत नाही, हे देखिल प्रश्न आहेतच. श्रद्धा आणि प्रश्न हे विरोधार्थी शब्द नाहीत.
===============================
एरवी मला हेत्वारोप करायला आवडत नाही, पण यनावालांचा इतिहास पाहता नको तिथे श्रद्धेला बदनाम करायची त्यांची सवय पाहून इथे त्यांनी श्रद्धेला गोवलेलं आवडलेलं नाही. काळी जादू मंजे श्रद्धा का हो यनावाला? उगाच कुठून कुठेही घसरायचं.
http://punemirror.indiatimes.com/pune/crime/bizmen-duped-of-rs-33-lakh-a...
हा वैद्य हवालात सामिल आहे.
===============================
श्रद्धा नावाच्या चांगल्या व्यवस्थेचे हे गुन्हेगार आहेत. त्यांना पकडण्यात अनिंसने केलेली मदत स्तुत्य आहे.
5 Nov 2017 - 9:47 am | arunjoshi123
अगायो, मन नावाचा कोणता प्रकार नसतो. असतो ही यनावालांची अपार अंधश्रद्धा आहे. त्यापेक्षा अक्षयधनकुंभ ही अंधश्रद्धा बरी. किमान काही दिसतं. काही ट्रिक होते.
http://ncrb.nic.in/StatPublications/CII/CII2015/cii2015.asp
उगाच खपतंय म्हणून काहीही विकणार? आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, मद, मत्सर, काम आणि अशा सर्वच भावनांनी लिप्त झाले की माणसाची बुद्धी लुळी पडते. मग सोडून द्यायच्या का सगळ्या भावना??
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत.
5 Nov 2017 - 12:48 pm | संजय पाटिल
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत.
=))) लोल....
5 Nov 2017 - 10:09 am | arunjoshi123
१. अपारंपारिक नास्तिकता - ब्रह्मांडाचे आपल्याला सबंध आकलन झाले आहे तेव्हा प्रत्येकच गोष्टीची चिकित्सा स्वतः करावी नि कशावरही विश्वास ठेऊ नये. (उदा. आपला बाप त्याने तसे म्हटले आहे म्हणून मानू नये. जेनेटीक्स स्वतः शिकावे आणि खात्री करून घ्यावी. अंततः मातीच्या कोणत्या ढेकळात आणि आपल्या बापात काही फरक नाही असे जाणावे ज्ञान होते.)
२. रँडमली ओरियंटेड नास्तिकता - अन्य लोक काय करताहेत आणि आपण काय करत आहोत याचा काहीही संबंध न ठेवणे. एक रँडम बिहेविअर जनरेटर प्रोग्राम करून कधी काहीही करावे. (उदा. शास्त्रज्ञांनी सांगीतलेले विश्वाचे स्पूकी भौतिक स्वरुप सत्य आहे असे दुपारी मानू नये. सकाळी मानावे. )
३. निराशावती नास्तिकता - http://aisiakshare.com/node/6281 इथे राजेश घासकडवी म्हणतात तसे मूळात निसर्ग असम्यक आहे, निसर्गतःच मनुष्य एक मूल्यहिन रानटी प्राणी आहे, उत्क्रांतीतून भांडाभांडी हा गुण उत्पन्न आला आहे इ इ मानावे. (उदा. दुसर्या गटाचा, टोळीचा माणूस आपल्याला ठार मारेल असे मानावे.)
४. अभयोद्भवाधमी नास्तिकता - आपल्याला जितकं दिसतंय कळतंय तितकंच भय आपल्याला आहे असं मानावं. मग भय नसेल तर आपण स्वार्थासाठी कसेही वागू शकतो असंही मानावं. मला काही भयच नसेल तर, आणि चान्स असेल तर आणि माझं एकट्याचं सगळं मस्तच होणार असेल तर मी सगळीकडे विध्वंस का माजवू नये? (उदा. जिवंत माणसाचे भूकेने प्राण गेले तरी देवाचे भय नसल्याने आपली तिजोरी कितिही भरत राहणे.)
7 Nov 2017 - 7:21 pm | माहितगार
प्रयत्न बरा आहे पण थोडा थांबून प्रयत्न केला असता तर आणखी चांगल जमू शकल असत ?
5 Nov 2017 - 10:30 am | arunjoshi123
प्रस्तुत लेखात यनावालांची अपारंपारिक नास्तिकता दिसते.
मी फक्त हवाला व्यवहार करतो असं पण वाटलं का?
अनींसवाले बुवांना सामील असतात का? एक आपली चिकित्सा!!! नसतात कशावरून? अनिंसवाले हिंदू आणि मुस्लिम धर्मांना भारतात बदनाम करायचा घाट तर घालून नसतील.
http://antisuperstition.org/2-years-after-that-dark-day/
इथे पहिलंच वाक्य 2 years after that dark day, our organisation is bravely fighting against the brazen government machinery असं आहे. मागच्या लेखात घटनेचा हवाला दिला होतात नं? इथे चक्क त्या घटनेलाच ब्रेझन म्हणताय?
सरकारी अंधश्रद्धांबद्दल अनिंसचा विरोध अजिबातच नाही. तीन रंगाच्या कापडाचा माणसानं आदर का करावा? काय आहे म्हणे विशेष त्या तीन रंगांत? किंवा एक विशीष्ट गीतात? सरकारनं आपल्या श्रद्धा अगोदर सोडल्या तर लोक मागे मागे सोडतील ना?
भारतातल्या सग्ळ्या लोकांची, मला धरून, राष्ट्रध्वज, राश्ट्रगीत, देश, देव, धर्म यांच्याबद्दल चांगली श्रद्धा असताना अनिंस केवळ विशिष्ट श्रद्धा टार्गेट करते म्हणजे चिकित्सेला, तर्काला, बुद्धीमत्तेच्या वापराला बराच स्कोप आहे.
====================================================
यनावाला, अनिंसवरच शेकेल असं लॉजिक का मांडता?
5 Nov 2017 - 10:38 am | वामन देशमुख
काय तरी असते एकेकाची अंधश्रद्धा, आणि निलाजरं वर्तन!
नुसत्या अर्थहीन लेखांच्या जिलब्या पाडायच्या, सतत समाजविघातक (हो, समाजविघातकच) अजेंडा घेऊन वावरायचं, आपलं पितळ (की जर्मल) उघडं पडलं की आपल्याच धाग्यांवरून पळून जायचं, एकही प्रतिसादाला, प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, आणि काही दिवसांनी पुन्हा नव्या लेखात जुनीच गटारगंगा वाहवत ठेवायची.
आधीच्या धाग्याबद्धल माफी मागा आणि मग काहीतरी चांगलं लिहायला शिका, मिपाकरांचा वेळ म्हणजे श्रद्धाहीनांचं वाळवंट नव्हे!
5 Nov 2017 - 4:16 pm | mayu4u
नक्की काय?
6 Nov 2017 - 11:04 am | arunjoshi123
चिकित्सा आहे हो ती!!!
नास्तिकी चिकित्सा नास्तिकांची पण करायची असते. त्यात चिडायला काय झालं?
6 Nov 2017 - 12:56 pm | mayu4u
१. यनावाला यांचा अजेंडा काय?
२. तो समाजविघातक कसा?
असं विचारतो.
आधीही हेच विचारलेलं, पण
असं उत्तर मिळालं, जे मला समजलं नाही. ही माझ्या आकलनक्षमतेची मर्यादा असू शकेल, असं मानून सविस्तर उत्तराची नम्र अपेक्षा करतो.
- (सदैव नवीन शिकण्यास तयार) मयुरेश
7 Nov 2017 - 7:29 pm | माहितगार
नास्तिकांचि चिकित्सा ठिक त्यांच्या लेखनावर वैचारीक टिका करण्याचा अधिकार आहे पण तसे करताना यनावालांचा चिकित्सेचा अधिकार हकनाक नाकारणे सयुक्तीक ठरत का ? यनावालांच्या टिकेमुळे तुम्हाला तुमची मते लिहिण्याची संधी मिळाली असाही विचार करता येऊ शकतो ना ?
5 Nov 2017 - 11:28 am | arunjoshi123
यात श्री वैद्य यांची काय चूक आहे? सागरनाथांच्या श्रद्धाक्षेत्रात (फिल्ड ऑफ बिलिफ) मधे तुमचा मेंदू आला तरी असंच होइल. माणसाला फ्री विल नसते विज्ञानाप्रमाणे.
5 Nov 2017 - 11:51 am | arunjoshi123
हे तुमच्या घरच्यांना, विद्यार्थ्यांना, वाचकांना देखील लागू आहे. कोणताही कुटुंबसदस्य, प्राध्यापक, धागालेखक हा लबाड, फसवेगिरी करणारा असू शकतो. विद्यार्थ्यांनि अगोदर तुमची छाननी केली पाहिजे कि तुम्ही पैसे कमवायसाठी काही बाही खोटं नाटं तर शिकवत नाहि. लेखावरून वाटतं कि तुमचा मागच्या लेखात मच टावटेड कॉमन सेन्स श्रद्धा म्हटलं कि बिथरतो. दास्य ते हिटलरशाही या अख्ख्या रेंजमधलं सगळं तुम्हाला रँडमली आठवायला चालू होतं.
================
एक वाचक म्हणून मी आपल्याबद्दलच्या सर्व श्रद्धा टाकून देत आहे. मला गुलाम बनायचं नाही आपला.
मला आता खालिल प्रश्नांची उत्तरं द्या -
आपण खोटारडे आहात का? समजा तुम्ही नाही म्हटलं तर पुरावा द्या.
आपण फ्रॉड आहात का? नाही ? पुरावा द्या.
आपण अश्रद्ध आहात का? हो ? पुरावा द्या?
=================================
मागे आपण घटनेत असं असं लिहिलं आहे असं म्हणालात. ग्रंथप्रामाण्यवाद्याप्रमाणे घटना का मानता? घटनेची तुम्ही काय चिकित्सा केली आहे?
==================
डोकं बाजूला ठेवल्यामुळे आपण नास्तिकांचे दास्य स्विकारले आहे काय?
5 Nov 2017 - 12:00 pm | arunjoshi123
बादवे यनावाला,
८ नोव्हेंबरला गतवर्षी नोटबंदी झाली म्हणून देशाचे २% जीडीपी इतके नुकसान झाले असे तुमचे मत असेलच. सत्य तरी आहे तसं. वर सरकार म्हणत होतं कि म्हणे याने नुकसानापेक्षा फायदाच जास्त होणार आहे.
तर
१. जर फायदा नसेल तर २%*१२५ लाख कोटी = २.५ लाख कोटी इतकी फसवणूक मोदींच्यावर श्रद्धा ठेवल्याने लोकांची झाली. आपण आणि अनिंस त्या कायद्याखाली त्यांच्यावर कार्यवाही करा. ही फसवणूक वैद्य यांच्या रकमेच्या १० लाख पट आहे.
२. जर फायदा असेल तर कुणाचं नुकसान करून कुणाचा फायदा केला आहे त्याचा रिपोर्ट मागा. आणि पुन्हा कार्वाई करा.
5 Nov 2017 - 12:13 pm | राही
य.ना.वाला यांचे लेख गेली अनेक वर्षे वृत्तपत्रे आणि मिपासारख्या सोशल मीडियामधून येत आहेत. ज्या अर्थी मिपावरच्या इतक्या निरर्गल टीकेने आणि खिल्लीने अजिबात खचून न जाता ठराविक कालावधीनंतर ते या विषयावरचे लेख पुन्हा पुन्हा टाकत राहातात त्याअर्थी त्यांनी हा विरोध गृहीत धरला असून हे काम एक वसा म्हणून स्वीकारले आहे. म्हणजे असे लिखाण पुन्हा पुन्हा हळुवारपणे hammer करण्यात त्यांचा निर्लज्जपणा दिसत नसून उलट धैर्य (संयम) आणि धाडसच दिसून येते.
गेली कित्येक वर्षे त्यांच्या लिखाणावरचे अत्यंत आवेश आणि अभिनिवेशयुक्त प्रतिसाद वाचताना एक चिरंतन वास्तवाचा पुन:प्रत्यय येत राहिला आहे. ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच.
वरती कुणीतरी माफीनामा मागितला आहे. खरे तर हे दुर्लक्ष्य करण्याजोगेच. पण मौनातून अप्रत्यक्ष सहमती सूचित होऊ नये म्हणून लिहीत आहे की माफी मागण्याचे त्यांना काहीच कारण नाही. ना त्यांनी अश्लाघ्य अथवा उर्मट भाषा वापरली आहे किंवा ना त्यांनी देशद्रोही घटनाद्रोही असे लिखाण केले आहे.
तेव्हा, य.ना. भाऊ आपण लिहीत राहालच आणि आमच्यासारख्या अनेक मूकवाचकांची आपल्या लिखाणाला मूकसंमती राहीलच.
आपण प्रज्वलित केलेल्या या प्रबोधनाच्या छोट्याश्या दीपाला शुभेच्छा.
5 Nov 2017 - 1:42 pm | प्रचेतस
सहमत आहे.
आस्तिकांची असहिष्णुता.
6 Nov 2017 - 6:56 am | राही
मोजक्या शब्दांत नेमका आशय.
5 Nov 2017 - 1:55 pm | सर टोबी
शब्दा शब्दाशी सहमत आहे.
5 Nov 2017 - 2:05 pm | चौथा कोनाडा
प्रतिसाद आवडला.
5 Nov 2017 - 5:25 pm | तर्राट जोकर
सहमत आहे.
ज्यांच्या शेपटावर पाय पडतोय तेच कळवळून फुत्कार टाकत आहेत.
यनावाला कुठलीतरी जालीम नस दाबत आहेत ज्यामुळे सगळे तळमळत आहेत.
यनावाला यांना इतक्या शिव्या पडत आहेत ह्याचा अर्थ त्यांच्या बोलण्यात काहीतरी दम आहे.
5 Nov 2017 - 5:39 pm | mayu4u
सहमत!
7 Nov 2017 - 7:48 pm | माहितगार
तुम्ही विज्ञानवादाचा प्रसार करू इछित असालतर लॉजीकल फॉलसीज शिल्लक असणे श्रेयस्कर ठरते किंवा कसे . List of fallacies
5 Nov 2017 - 5:28 pm | निशाचर
प्रतिसाद आवडला.
5 Nov 2017 - 5:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसादाशी सहमत. मपावरची टीका अतिशय तिखट असते तरीही आपल्या विचारांशी तडजोड न करता प्रामाणिकपणे ते लिहित असतात.
आणि त्यांचं लेखन आवर्जून वाचायला आवडते.
य.ना. भाऊ आपण लिहीत राहालच आणि आमच्यासारख्या अनेक मूकवाचकांची आपल्या लिखाणाला मूकसंमती राहीलच.
आपण प्रज्वलित केलेल्या या प्रबोधनाच्या छोट्याश्या दीपाला शुभेच्छा.
असेच म्हणतो...!
-दिलीप बिरुटे
5 Nov 2017 - 9:29 pm | यनावाला
सर्वश्री प्रचेतस, सरटोळी, चौथा कोनाडा, तर्राट जोकर, mayu4u , निशाचर, आणि माझे मित्र प्रा.दिलीप बिरुटे या सर्वांचे हार्दिक आभार. तुमच्यामुळे इथे लेखन करायला बळ मिळते.
....यनावाला
6 Nov 2017 - 5:16 pm | mayu4u
तुम्ही देणं अत्यन्त गरजेचं आहे. कृपया याचा गांभीर्यानं विचार करावा.
5 Nov 2017 - 9:14 pm | यनावाला
@राही
आपल्या समर्पक प्रतिसादार्थ धन्यवाद ! निरर्गल टीका आणि खिल्ली यांनी मुळीच विचलित होत नाही.
त्यांना लिहूं द्या. लेखनावरून लिहिणार्याची संस्कृती कशी आहे, आकलनशक्ती किती आहे, मानसिक संतुलन बिधडले आहे की कसे, अशा अनेक गोष्टी सुबुद्ध वाचकांना कळतात. म्हणून "जो जे वांच्छील तो ते लिहो ।" मिसळपाववर लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठा वाचकवर्ग लाभतो. इथे पंधरा लेख लिहिले. त्यांतील "सहप्रवासी" या लेखाची २४००० वाचने झाली. अन्य दोन लेखांची प्रत्येकी ११०००वाचने तर उर्वरित लेखांची दोन ते पाच हजार वाचने झाली आहेत. वाचनसंख्या प्रतिमाह वाढत आहे. प्रस्तुत लेखाची दोन दिवसांत १०००वाचने झाली. हे उत्साहवर्धक आहे.
6 Nov 2017 - 2:31 pm | arunjoshi123
लेखनाचा संबंध लेखनापुरता मर्यादित ठेवावा.
7 Nov 2017 - 10:36 pm | माहितगार
सर, सुबुद्ध वाचकांना आपल्या लेखांच्या वाचनाशिवाय सुद्धा वर्तन आदर्श असेल. आणि आपण उर्वरीतांसाठी लिहित असाल तर त्यांच्याकडे विवेक नाहीच निर्बुद्धच आणि मानसिक संतुलन बिघडलेले असे गृहीत धरता त्यांच्यावर दुषणे देण्यात वेळ खर्च करण्यात आपण त्यांच्यापेक्षा अधिक शहाणे असा अहंकार जोपासण्यापलिकडे नक्की काही हशिल आहे ? तसे कुणि किती अभिमान आणि किती अहंकार जोपासावेत ज्याची त्याची मर्जी. जर तुमचे आवाहन विवेकाला असेल तर आपणच केवळ विवेकी आहोत या अहंकाराला मुरड घालण्याची कुठे जागा शिल्लक आहे का ?
5 Nov 2017 - 10:41 pm | एस
प्रतिसाद आवडला. विशेषतः आज विचारवंत, बुद्धिप्रामाण्यवादी, लेखक, कलावंत, साहित्यकार इत्यादी वर्गाला झुंडशाहीच्या जोरावर हाडहुडूत करण्याची विकृती ज्या प्रकारे समाजात पसरवली जात आहे, त्या पार्श्वभूमीवर यनावालांसारखे लिखाण नेटाने करत राहणे आणि अशा विकृतींचा जमेल तसा विरोध करत राहणे आवश्यक आहे.
6 Nov 2017 - 6:54 am | राही
सहमत आहे.
यानिमित्ताने माध्यमांतल्या समविचारी लोकांनी आता मौन सोडून सहमत हा एक शब्द लिहून पाठवावा आणि ' साय्लेंट मेजॉरिटी' ची जाणीव करून द्यावी असे वाटते.
7 Nov 2017 - 8:07 pm | पगला गजोधर
सहमत
6 Nov 2017 - 11:03 am | पुंबा
पुर्ण सहमत..
गटारगंगा म्हणायचं असेल तर वैयक्तिक, लॉजिकल असल्याचा आव आणून काही तरी शब्दबंबाळ फेकाफेक करणार्या प्रतिसादांना म्हटलं पाहिजे.
यनावालांचा मागचा लेख पटला नसला आणि सरसकट सगळ्या श्रद्धांना घाऊक विरोध ही भुमिका आतातायी वाटत असली तरीही सदर लेख पुर्णपणे पटला आहे.
ह्याला +१११११११
6 Nov 2017 - 11:26 am | सुचिता१
यनावालांचा लेख तर उत्तम आणि आशयपूर्ण आहेच. पण ततुमच्या प्रतीसादाशी ११०% सहमत .
मूक वाचकांच्या विचांरांना तुमही चपखल शब्दात मांडले.
6 Nov 2017 - 1:04 pm | arunjoshi123
उत्तम आणि आशयपूर्ण लेखात बुद्धीमांद्य असलेले आणि गुलामगिरी करणारे ही विशेषणं एक नास्तिक म्हणून कदाचित तुम्हाला लागू नसतील.
===============
उत्तमपणाचं म्हणाला तर आरुषिचा खून झाला म्हणून मनमोहन सिंग यांना शिक्षा करा इतकं उत्तम लॉजिक लेखात आहे. कारण लॉ अँड ऑर्डरसाठी अंततः ते जबाबदार आहेत, जसं प्रत्येक अशा गुन्ह्यासाठी श्रद्धा ही एकच गोष्ट जबाबदार आहे!?
6 Nov 2017 - 11:28 am | arunjoshi123
ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश नसतो तिथे देखील आशय असतोच असे नाही. आवेश, अभिनिवेश आणि आशय या असंबंधित संकल्पना आहेत. तुम्हाला आशय पाहायला आवडलं तर तो पाहा. नाहीतर शेवटपर्यंत आवेशाबद्दलच भांडत बसा.
==============================
लेख टाकणे आणि लेंड्या टाकणे यांमधे फरक आहे. श्रद्धावंतांचे तत्त्वज्ञान धाग्यात यनावालांना अनेक प्रश्न विचारले आहेत, अनेक प्रकारे विरोध केला आहे, अनेकांनी माझ्याप्रमाणे आवेश फुल थ्रॉटल न करता अत्यंत संयमाने देखील प्रश्न विचारले आहेत. यनावालांनी काहीही उत्तर दिलेले नाही.
===================
याचा संदर्भ मागच्या धाग्याशी आहे. मी स्वतःला श्रद्धावान नि अस्तिक नि धर्मवादी नि परंपरावादी इ इ समजतो. अशा लोकांबद्दल त्यांनी काय भाषा वापरली आहे ते कळण्यासाठी तो लेख पुन्हा वाचा. बुद्धिहिन, तर्कहिन, दास्यत्ववादी, बेअक्कल, इ इ शब्दांचा वर्षाव केलाय त्यांनी माझ्यावर.
------------------------------------------------
लक्षात घ्या हि भाषा त्यांनी हेतूपुरस्सर नाही वापरली. त्यांच्या नास्तिकत्वाचे रिझल्ट्सच तसे येतात.
6 Nov 2017 - 1:44 pm | मूकवाचक
आमच्यासारख्या अनेक मूकवाचकांची आपल्या लिखाणाला मूकसंमती राहीलच ... माझी श्रद्धानिर्मूलनाला विरोध करणार्यांना मूकसंमती आहे.
7 Nov 2017 - 7:35 pm | माहितगार
'किंबहुना तो नसतोच' मध्ये दुसर्या बाजूचा दुराग्रह असू शकतो की नसतोच ? 'डोंगराचा मागे धूर दिसतो' या विधानाचे कोणत्याही बाजूने एकेरी अर्थ काढणे कितपत तर्कसुसंगत असते या बद्दल साशंकता आहे.
7 Nov 2017 - 7:45 pm | माहितगार
य.ना.वाला यांचे लेख गेली अनेक वर्षे वृत्तपत्रे आणि मिपासारख्या सोशल मीडियामधून येत आहेत....
गेली कित्येक वर्षे त्यांच्या लिखाणावरचे अत्यंत आवेश आणि अभिनिवेशयुक्त प्रतिसाद वाचताना एक चिरंतन वास्तवाचा पुन:प्रत्यय येत राहिला आहे. ते म्हणजे जिथे आवेश आणि अभिनिवेश असतो तिथे आशय असतोच असे नाही. किंबहुना तो नसतोच...
समर्थनार्थ प्रतिसाद कदाचित घाईत आल्यामुळे
List of fallaciesची आठवण येते . यनावालांच्या लेखनात अंध नास्तिकता अथवा सरसकटीकरण असावे पण त्याबद्दल त्यांच्या लेखनाच चिकित्सा करता येते . माफीनाम्याची मात्र गरज दिसते असे वाटत नाही.
5 Nov 2017 - 12:22 pm | मराठी_माणूस
लेखाची चिकित्सा न करता येत रहाणार्या लेखाला आधीच संमती ? ही सुध्दा एक अंधश्रध्दा
5 Nov 2017 - 5:43 pm | कंजूस
श्रद्धा निर्मुलनाचे वर्ग ?
5 Nov 2017 - 8:22 pm | सुबोध खरे
एखाद्या माणसाला तू फारच जाडा आहेस म्हणालात तर तो वजन कमी करण्याची शक्यता शून्य आहे कारण माणूस नकारात्मक मनोवृत्ती स्वीकारतो.
अर्थात मूळ हेतू केवळ त्या माणसाला दूषणेच द्यायची असतील तर गोष्ट वेगळी. पण जर समाज प्रबोधन करायचे असेल तर टीका टोकाची असून चालत नाही.
आपण सडेतोड वागतो याचा दुराभिमान बाळगण्यापेक्षा अतिश्रद्धावान लोकांना त्यांच्या अतिरेकाची हळुवारपणे जाणिव करून दिल्यास जास्त फायदा होईल असे वाटते.
7 Nov 2017 - 1:38 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी सहमत आहे! सुबोधजी http://www.misalpav.com/comment/616321#comment-616321 इथे मी त्याविषयी मांडले आहे
5 Nov 2017 - 8:23 pm | सुबोध खरे
एखाद्या माणसाला तू फारच जाडा आहेस म्हणालात तर तो वजन कमी करण्याची शक्यता शून्य आहे कारण माणूस नकारात्मक मनोवृत्ती स्वीकारतो.
अर्थात मूळ हेतू केवळ त्या माणसाला दूषणेच द्यायची असतील तर गोष्ट वेगळी. पण जर समाज प्रबोधन करायचे असेल तर टीका टोकाची असून चालत नाही.
आपण सडेतोड वागतो याचा दुराभिमान बाळगण्यापेक्षा अतिश्रद्धावान लोकांना त्यांच्या अतिरेकाची हळुवारपणे जाणिव करून दिल्यास जास्त फायदा होईल असे वाटते.
5 Nov 2017 - 10:11 pm | गामा पैलवान
तजो,
त्याचं काये की यनावालांची अंधश्रद्धा केवळ देवाधार्मापुरतीच मर्यादित आहे. तिला व्यापक स्वरूप मिळंत नाही म्हणून आम्ही सगळे आस्तिक तळमळत आहोत.
आ.न.,
-गा.पै.
7 Nov 2017 - 8:35 pm | Duishen
त्याचं काये की यनावालांची अंधश्रद्धा केवळ देवाधार्मापुरतीच मर्यादित आहे. तिला व्यापक स्वरूप मिळंत नाही म्हणून आम्ही सगळे आस्तिक तळमळत आहोत.
गामा जी, एक समजले नाही...देवधर्म ही संकल्पना व्यापक नाही असे आपले मत आहे का?...आणि जर व्यापक आहे तर देव-धर्मापुरत "मर्यादित" कसे असू शकेल?
5 Nov 2017 - 10:28 pm | तर्राट जोकर
गापै, पळपुटी कारणे आहेत ही. स्वतःची हतबलता लपवण्याची.
आत कुठेतरी हे सर्व चुकीचे आहे हे जाणवते पण सोडवत नाही म्हणून तळमळ होते.
बोले तो एक पैर इधर, एक पैर उधर और बीच में.....
ज्याची श्रद्धा अपरंपार त्याला असल्या हजार लेखांनी काही भोकं नाही पडायची.
6 Nov 2017 - 3:00 am | गामा पैलवान
तजो,
सर्व चुकीचं आहे असं म्हणता तुम्ही. पण सर्व म्हणजे नक्की काय? यादी करता येईल का?
आ.न.,
-गा.पै.
6 Nov 2017 - 6:51 am | चौकटराजा
श्री वैद्य यांचे वैयक्तिक नुकसान झाले असे त्याना वाटत असेल तर मला त्याचे दु: ख आहे. त्याना आपण एक साधूला २८ लाखाची " दक्शिणा" दिल्याची श्रद्धापूर्वक सार्थकता वाटत असेल तर मला अत्यानंद आहे. शेवटी सूज्ञपणा वा मूर्खपणा या परिणामसापेक्ष गोष्टी आहेत तशा त्या दृष्टीकोन सापेक्षही .
6 Nov 2017 - 12:34 pm | nishapari
स्मशानात मोठा विधी करावयाचा आहे, कोणीतरी करणी केल्यामुळे धन मिळणे थांबले आहे ,करणी उलटली व 10 लाख न दिल्यास प्रेत आणून दारात टाकू अशी आश्वासने आणि धमक्या देऊन पैसे घेणारी व्यक्ती साधू कशी ? साधू या पदवीचे काही निकष असतात का ? माझ्यामते तरी स्वतः दारिद्र्यात जीवन जगत असताना शिवाजीमहाराजांनी आपणहून पाठवलेला नजराणा ज्यांनी आम्ही विठ्ठलाचे भक्त या धनाची आम्हाला जरुरी नाही असे म्हणत परत पाठवून दिला ते संत तुकाराम यांना साधू म्हणता येऊ शकेल ..... संत तुकाराम , एकनाथ, ज्ञानेश्वर , नामदेव यापैकी कुणीही अमुक पूजा करा देव तुम्हाला संपत्ती देईल असे कुणाला सांगितल्याची कथा आजवर वाचनात आलेली नाही किंवा इतके द्रव्य मला द्या मीच ती पूज / विधी संपन्न करतो त्यानंतर तुम्हाला भरपूर धन मिळेल असे सांगितल्याची कथाही कधी ऐकली नाही
6 Nov 2017 - 12:54 pm | arunjoshi123
यनावालांच्या मते संत तुकाराम , एकनाथ, ज्ञानेश्वर , नामदेव हे सर्व नास्तिक असणार. घटनेत तसं लिहिलं आहे असा त्यांना अर्थ निघत असणार.
=================
आणि हे संत धार्मिक होते हे त्यांना माहित असेल तर यनावालांची विशेषणमाला त्यांना लागू आहेच!
7 Nov 2017 - 8:33 pm | पगला गजोधर
धार्मिक व आध्यात्मिक, यात आपण करू पाहत असलेली, सरमिसळ पाहून मला वाईट वाटले.
संतांचे कार्य आध्यात्मिक....
ज्ञानदेवांना शुद्धीप्रत्रक मागणारे धार्मिक ठेकेदार...
यानावाल्यांच्या संयत भाषेला, असं जिंगोइस्टिक उत्तर पाहून निराशा वाटली.
असो बाकी चालू द्या..
8 Nov 2017 - 6:20 pm | Duishen
संत परंपरा विशाल होण्यासाठी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्व संतानी व्यक्ती आणि ईश्वर यामधील मध्यस्थ आणि कर्मकांड नाकारले. व्यक्ती ईश्वराशी सरळ जोडू शकते त्यासाठी मध्यस्थ वा कर्मकांडाची गरज नाही हा नवीन विचार त्याकाळात रुजवला आणि एकाही संताला तत्कालीन समाजव्यवस्थेने सहज स्वीकारले नाही. ज्ञानदेवांना अवघ्या १९ व्या वर्षी समाधी घ्यावी लागली तर तुकोबाचा मृत्यू संशयास्पद राहिला आहे. यातील काही संतांना तर धर्म मानणाऱ्या व्यक्तींनी धर्मविरोधी म्हणून नाकारलेही होते.
देवभोळेपणाचा गैरफायदा घेतल्याचे आजही अनेक उदाहरण सापडतील. आसाराम बापू किंवा राम-रहीम ही तर आत्ताची उदाहरणे! त्यांच्या मागे जाणारी जनता श्रद्धावान होती हे नाकारता येत नाही. घोळ केला तो मध्यस्थाने ...म्हणजे आसाराम बापू आणि राम-रहीम सारख्या व्यक्तीने. ...आणि माध्यम वापरले ते लोकांची श्रद्धा! आसाराम बापू आणि राम-रहीम या मध्यस्थांवर विश्वास ठेवून आणि ईश्वरावरील श्रद्धेचा वापर होऊन जनता फसल्या गेली. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवून पुढचे पाउल टाकावे यासाठी तरी चिकित्सा आवश्यक ठरते. जशी विश्वासाची चिकित्सा आवश्यक, तशी श्रद्धेची!
वरील नमूद लेखात मांत्रिकाने श्रद्धेचा गैरवापर केला हे नक्की! हा लेखाचा एक गाभा म्हणून बघण्यास हरकत नसावी. दुसरी बाजू श्री. मंदार यांची... ते पूर्वीही सश्रद्ध होते आणि या घटनेनंतरही कदाचित सश्रद्ध राहतील. पण एक व्यक्ती म्हणून श्री. मंदार यांचा विचार केल्यास त्यांची पूर्वीची श्रद्धा आणि या घटनेनंतरची श्रद्धा सारखीच असेल काय?! श्री. मंदार यांचा श्रद्धा सोबत लोभ या दोन्ही भावना होत्या हे नाकारता येत नाही! शिवाय चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला आणि चुकीच्या कारणासाठी, हे पण जाणवत आहे.
6 Nov 2017 - 5:02 pm | चौकटराजा
साधू म्हणजे साधणारा या अर्थी मी वापरला आहे संत या अर्थी नव्हे !
6 Nov 2017 - 12:56 pm | arunjoshi123
जगात केवल (अबसॉल्यूट) असं काही नसतं हा एक नास्तिकी विचार आहे.
6 Nov 2017 - 9:05 am | सतिश गावडे
मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा. एखाद्या गोष्टीच्या असण्याविषयी, सत्यतेविषयी असलेला विश्वास ज्याला कोणत्याही पुराव्याची आवश्यकता नाही म्हणजे श्रद्धा.
अंधश्रद्धा हा शब्द चळवळींनी (बहुतेक अंनिसने. नक्की माहिती नाही) जन्माला घातल्या. दैनंदिन जीवनातील, देव विषयक निरुपद्रवी (काही वेळा उपयुक्तही) श्रद्धांसाठी त्यांनी श्रद्धा हा शब्द तसाच ठेवला. तर समाजघातक, हानिकारक श्रद्धेसाठी अंधश्रद्धा हा नवा शब्द जन्माला आला. डॉ. दाभोलकरांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके वाचली तर या "अंधश्रद्धा" किती भीषण होत्या याची कल्पना येते. अंनिसने याला बराच आळा घातला. कुणी कितीही नाक मुरडले तरी अंनिसने खुप चांगले काम केले आहे या बाबतीत.
आता राहिला प्रश्न श्रद्धेचा. श्रद्धा माणसासाठी सहाय्यकारीही असू शकते. देवविषयक श्रद्धा तर बहुतेक वेळा असतेच. देव माझ्या पाठीशी आहे ही कल्पनाही माणसाला संकटाला सामोरे जायला बळ देते. कुणाचा स्वतःवर विश्वास असतो तर कुणाचा देवावर. अशा श्रद्धेला कुणी आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही.
मात्र ही श्रद्धा जेव्हा लाउडस्पीकरने बोलू लागते, रस्त्यावर मंडप घालून रहदारीला अडथळा निर्माण करते, ढोल बडवते किंवा कानठळ्या फोडणारे आवाज करणारे फटाके फोडते त्याला कुणी आक्षेप घेतला तर त्यात गैर काहीच नाही.
काही लोक श्रद्धेला आक्षेप घेतला की चवताळून उठतात. "तुम्हाला आम्हीच दिसतो किंवा आमचेच दिसते, ते किंवा त्यांचे दिसत नाही" असा आक्षेप हे लोक घेतात. या आक्षेपातच या चिडण्यामागील उत्तर दडलेले आहे. श्रद्धेला विरोध हा व्यक्तिगत न घेता एका विशिष्ट समूहाला विरोध म्हणून घेतला जातो. या व्यक्तींच्या अस्तित्वाविषयी कल्पनांमध्ये (आयडेंटिटी) या समूहांचा एक घटक असण्याचाही समावेश असतो. त्यामुळे एखाद्या समुहाच्या प्रथांना विरोध हा आपल्याच अस्तित्वाला विरोध समजला जातो आणि मग टोकाचा प्रतिसाद येतो.
6 Nov 2017 - 9:16 am | mayu4u
बेशर्त सहमत!
6 Nov 2017 - 11:54 am | नाखु
संतुलित आणि नीरक्षीर प्रतिसाद देणार्या धनाजीराव यांचे अभिनंदन
सगळ्यांसारखे आपले ही मातीचे पाय आहेत पण ते लपविण्यासाठी अट्टाहास न करणारा सश्रद्ध डोळस नाखु
6 Nov 2017 - 12:49 pm | arunjoshi123
उत्तम प्रतिसाद.
अबसॉल्यूट श्रद्धेला अनक्वालिफाइड आक्षेप (यनावाला टाईप) घेतला तर मी चवताळून उठतो. नास्तिकतेच्या १०० गोष्टी न पाहता श्रद्धेवर सरसकट टिका योग्य नाही.
6 Nov 2017 - 1:05 pm | सुबोध खरे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक नक्की कसा ठरवायचा?
आताच माझ्या कडे एक ५५ वर्षांच्या बाई आल्या होत्या स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्ण आहेत. चौथ्या स्टेजला पोहोचून जेवढे उपलब्ध आहेत तेवढे उपचार टाटा रुग्णालयात झाले आहेत. यजमान रेल्वेत असल्याने ३२ लाख रुपये खर्च रेल्वेने दिला आहे. रोग सर्वत्र पसरला आहे. पोटात छातीत पाणी झालं आहे.
आयुर्वेदिक उपचार करुन पाहू या श्रद्धेने त्या माझ्या मित्राकडे उपचारासाठी गेल्या आहेत.त्याने सद्य स्थिती काय आहे यासाठी सोनोग्राफीसाठी त्यांना माझ्याकडे पाठवलं आहे. (या आयुर्वेदाचार्याला आपली क्षमता आणि मर्यादा माहित आहे). आम्ही दोघेही त्यांचा उपचार सवलतीत करत आहोत.
आता प्रश्न असा आहे कि अशा "श्रद्धेने" आलेल्या बाईंना सडेतोडपणे सांगायचे का कि हि तुमची श्रद्धा नसून अंधश्रद्धा आहे.
कि आपण "प्रयत्न करू" म्हणून त्यांचे काय जे दोन चार महिने शिल्लक आहेत ते ( खोट्या का होईना) आशेवर पण आनंदात जातील याचा विचार करायचा.
हे उपचार काही फुकट किंवा स्वस्त नाहीत. आणि त्याचा उपयोग होणार नाही हे त्यांच्या ३० वर्षाच्या मुलाला मी आणि माझ्या मित्राने सांगितले आहे.
6 Nov 2017 - 2:18 pm | arunjoshi123
यावर गावडे यांचे मत अत्यंत संतुलित आहे.
-----------------
यनावालांचे मते बहुधा वैज्ञानिक सत्य लपवले तर ... ते चूक असावे.
6 Nov 2017 - 5:13 pm | चौकटराजा
कोणीही या जगात पूर्ण चिकित्सावादी नाही की पूर्ण श्रद्धावादी. यस धिस इज बेसिक. श्रद्धा हा प्रत्यक्ष जीवनात घेतलेला शॉर्टकट असतो. काही वेळेस तो अनुभवावर आधारित असतो काही वेळेस स्वकल्पनेवर. चिकित्सा त्यामानाचे कष्टाची व वेळखाउ प्रक्रिया आहे. आपण एखाद्या डॉ. कडे जातो ते कुणाच्या तरी संदर्भाने. ही झाली श्रद्धा . आपण ज्याने आपल्याला विशिष्ट डॉ कडे जायला सांगितले आहे हा याचा खालील प्रमाणे अभ्यास करून निर्णय घेतला तर ती चिकित्सा.
१. त्या माणसाला डॉ. कडून काही कमिशन मिळत असेल का .२. तो त्याचा नातेवाईक आहे का? ३.त्याला आलेल्या अनुभवांची जंत्री व संबधित अनुमाने यात काही संबंध आहे का? ४. डॉ ची पदवी खरी आहे का.......... वगैरे.
श्रद्धा व चिकित्सा या मनाच्या प्रवासाच्या दोन पध्दती आहेत त्याचा देव, धर्म, सुडो सायन्सेस, नितीमत्ता, तत्वज्ञान याशी निश्चित असा काही संबंध नाही.
6 Nov 2017 - 9:33 pm | यनावाला
विश्वास-श्रद्धा-निष्ठा
माणसाच्या मेंदूत बुद्धीचा उगम होतो. मानवी बुद्धीचे निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, इत्यादि नऊ घटक आहेत. बुद्धी अमूर्त आहे. तिला वस्तुरूप अस्तित्व नाही. तसेच मेंदूत काम-क्रोध-मद-मत्सर-मोह-दंभ, प्रेम,आनंद, दु:ख अशा अनेक भावनाही उद्भवतात. श्रद्धा हीसुद्धा एक भावना आहे. या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे. मन अमूर्त आहे. मनाला वस्तुरूप अस्तित्व नाही. पण माणसाच्या ठिकाणी भावनांचे आविष्कार दिसतात. दु:ख झाले की माणूस खिन्न होतो. प्रसंगी रडतो. आनंद झाला की हसतो. या आविष्कारांवरून भावना ओळखता येतात. बुद्धी आणि मन यांचा उद्भव मेंदूत होतो. मेंदू मूर्त आहे. त्याला वस्तुरूप अस्तित्व आहे.
जी गोष्ट खरी नाही, तिचा त्याग करणे आवश्यक आहे, हे बुद्धीला कळते पण भावनेला ती सोडवत नाही. अशी गोष्ट भावनेच्या प्रभावामुळे खरी मानण्याची मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. श्रद्धेमागे कोणताही तर्कसंगत विचार नसतो. थोडक्यात म्हणजे जिची सत्यता माणसाच्या तर्कबुद्धीला कोणत्याही प्रकारे पटत नाही, पटविता येत नाही ती गोष्ट पूर्वग्रहांमुळे केवळ भावनेच्या आधारे खरी मानण्याची तर्कविहीन मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा होय.
"देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ? पायथ्यागोरसच्या प्रमेयाची सिद्धता बुद्धिगम्य आहे. म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवतो. तिथे श्रद्धेची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीची/तत्त्वाची/संकल्पनेची सत्यता बुद्धीला पटली तर विश्वास ठेवतात. बुद्धीला पटत नसता भावनेच्या आधारे सत्य मानणे म्हणजे श्रद्धा ठेवणे.
विश्वास आणि श्रद्धा यांच्यांशी अर्थ साधर्म्य असलेला "निष्ठा" असा एक शब्द आहे. .विश्वास आणि श्रद्धा यांचा संबंध माणसाच्या विचारांशी आहे तर निष्ठेचा संबंध आचाराशी आहे. (या तीन शब्दांचे अर्थ स्पष्ट करण्य़ासाठी स्वतंत्र लेख लिहिला आहे. तो कधीतरी इथे देईन)
7 Nov 2017 - 4:05 am | ट्रेड मार्क
या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचे
इथेच तर सगळं स्पष्टीकरण फसलं. एखाद्या मानवाला मेंदू, फुफ्फुसं, हृदय ईई अवयव असतात तसं मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल काय? मनाला वस्तुरूप अस्तित्व नसतं म्हणताय पण तरी ते मानायचं मग आत्म्यालाही वस्तुरूप अस्तित्व नसतं मग आत्मा का नाही मानायचा?
सगळ्या मानवी भावना लिहिल्यात आणि श्रद्धा ही पण एक भावना आहे म्हणताय, मग सगळ्या माणसांत सगळ्या भावना सारख्याच प्रमाणात असाव्यात हा अट्टाहास का? एखादी व्यक्ती जशी सतत चिडकी असते तर काही आनंदी असतात. तसंच काही व्यक्ती श्रद्धाळू असतात हे का मान्य होत नाही? या सर्व भावना सतत कमी जास्त होत असतात. एखादी श्रद्धाळू व्यक्ती काही कारणाने अश्रद्ध होऊ शकते आणि उलटही होऊ शकतं. भलेभले डॉक्टर सुद्धा एखाद्या क्रिटिकल पेशंटसाठी सर्व प्रयत्न करून झाल्यावर आता सर्व देवाच्या हातात आहे म्हणतात. अश्या पेशंटचे आयुष्यभर देवाला नावं ठेवणारे वडील सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडताना दिसतात. वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे अतिशय अडचणीत असताना देव माझ्या पाठीशी आहे ही भावनाच कित्येकांना विपरीत परिस्थितीतून तारून नेते.
माझ्याकडे माझे स्वतःचे असे काही अनुभव आहेत की जे कुठल्याही स्पष्टीकरणापलीकडचे आहेत. दुर्दैवाने त्यावेळेला कॅमेरा असण्याएवढी ऐपत नसल्याने तुम्ही ज्याला प्रूफ मानाल असं काही नाहीये. पण अनुभव म्हणून सांगू शकतो. आणि हो त्यातले काही अनुभव जसे प्रूफ न दाखवता येण्यासारखे आहेत तसेच काही (सोय असती तर) प्रूफ दाखवता आले असते असे आहेत.
वर तुम्ही ज्याचे उदाहरण दिले आहे त्यातला बाबा म्हणजे एक भामटा आहे आणि त्याला फासलेला एक लोभी मूर्ख मनुष्य आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे त्याने माणसावर श्रद्धा ठेवली आहे देवावर नव्हे.
नेहमीप्रमाणे या प्रतिसादाला तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा नाही पण निदान वाचाल तरी अशी अपेक्षा ठेवतो.
7 Nov 2017 - 7:37 pm | Duishen
"देव अस्तित्वात आहे." हे जर बुद्धीला पटत असेल ,त्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका नसेल तर देवावर विश्वास ठेवावा. तिथे श्रद्धेची आवश्यकता काय ?
जिथे विश्वास असतो तिथे श्रद्धेची आवश्यकता नाही.... हे वाक्य खूप आवडले. जी गोष्ट सिद्ध झाली तिथे विश्वास असू शकतो...
7 Nov 2017 - 1:47 pm | प्रकाश घाटपांडे
यनावाला म्हणतातच श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक म्हणजे एक शब्द दोन अक्षरी आहे तर दुसरा चार अक्षरी.
मला गंमत वाटते कि मराठीत आपण अंधश्रद्धा म्हणतो पण हिंदीत त्याला अंधविश्वास म्हणतात. श्रद्धा हा शब्द खर तर हिंदीत देखील आहेच की!
दाभोलकर आपल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा या पुस्तकात म्हणतात कि " श्रद्धा म्हणजे भावनेचे विचारामध्ये विकसित झालेले सत्याधिष्ठीत कृतीशील मूल्यात्मक रुप."
"उपलब्ध वस्तुस्थितीला ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या सहाय्याने प्रश्न विचारल्यानंतर जी टिकते त्याला विश्वास किंवा श्रद्धा म्हणतात.जी टिकत नाही त्याला अंधश्रद्धा म्हणतात"
आता कुणी म्हणेल की या शाब्दिक कसरती आहेत. मला ते एका अर्थाने ते मान्यही आहे. जोपर्यंत आपल्या मेंदूत भावना नावाचा घटक आहे तो पर्यंत माणुस कमी अधिक प्रमाण अंधश्रद्ध असणार आहे.
[आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही]. ( उधृत अस्मादिकांचे मनोगत 'यंदा कर्तव्य आहे')
आता श्रद्धेची सर्वसमावेशक स्थल,काल,व्यक्ती निरपेक्ष अशी व्याख्या होउ शकत नाही हे मान्य केले पाहिजे. ती संकल्पना आहे. सतीची प्रथा हा एके काळी धर्मश्रद्धेचा भाग होता आता ती निखालस अंधश्रद्धा आहे. म्हणजे कालबाह्य व समाजविघातक असे ते क्रुर कृत्य आहे.
तात्पर्य काय तर आपली विवेकबुद्धी ठरवते श्रद्धा-अंधश्रद्धा. वयाच्या विसाव्या वर्षी असलेल्या श्रद्धा अंधश्रद्धा या संकल्पना वेगळ्या असतील वयाच्या चाळीस पन्नासाव्या वर्षी त्या वेगळ्या असू शकतात. आपल्या ज्ञानात अनुभवात काही भर पडत असतेच ना!
7 Nov 2017 - 9:09 pm | Duishen
मराठीत आपण अंधश्रद्धा म्हणतो पण हिंदीत त्याला अंधविश्वास म्हणतात.
विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही
पूर्णत: सहमत. छान मांडणी केली आहे...चिकित्सा अतिशय महत्त्वाची आहे...
10 Nov 2017 - 1:36 pm | अर्धवटराव
श्रद्धा - अंधश्रद्धा वगैरे पसार्याबद्दल नो कमेण्ट्स. त्या घोळात शिरायचच नाहि. वर कुठेतरी भावना, तर्कबुद्धी वगैरे भानगडी वाचल्या. त्याबद्दल एक अवांतर...
मानवी जीवनात, किंबहुना कुठल्याही जीवंतपणात, भावनेचा रोल तर्कबुद्धी, चिकीत्सा वगैरे भानगडींपेक्षा फार मोठा आणि सखोल आहे. आपलं आजपर्यंतचं सर्व्हायव्हलच मुळी भावना नामक सिस्टीममुळे झालय. पुढेही यात बदल होण्याचे चान्सेस शुण्य आहेत. जीवनाचा एक यःकश्चीत भाग जाणिवेच्या कक्षेत येतो आणि त्यापेक्षाही लहान भाग तर्कबुद्धीच्या परिघात येतो. जीवन एक अखंड साखळी आहे. त्यातल्या एक-दोन लिंक्स तर्कबुद्धीच्या कक्षेत येतात. त्या लिंक्सच्या अलिकडे-पलिकडे जीवन नावाची ऑर्गेनीक प्रोसेस अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने चाललेली असते व ती भावनेनेच सपोर्टेड असते. तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच करुन भावनांना दुय्यम समजणं म्हणजे नळाची तोटी फिरवणे तहान लागण्यापेक्षा जास्त महत्वाचं मानण्यासारखं झालं. भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे. समाजसुधारणेच्या नावाखाली आपला इगो गोंजारताना आपण ज्या फांदीवर बसलो आहोत तिच्यावरच कुठाराघात करणारी शेखचिल्ली वृत्ती फायद्याची तर नाहिच, प्रसंगी नुकसान करणारी आहे.
असो.
12 Nov 2017 - 10:27 am | प्रकाश घाटपांडे
:)
विवेचब आवडले.म्हणून तर आयक्यू बरोबर ईक्यू देखील तितकाच महत्वाचा आहे
12 Nov 2017 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे.
वाह ! जोरदार टाळ्या !!!
6 Nov 2017 - 10:54 am | पुंबा
बोंबला!!
माझ्या मते, हा मुर्खपणा अधिक आहे अंधश्रद्धेपेक्षा.
6 Nov 2017 - 11:31 am | दीपक११७७
असे असु शकेलं का, हा प्रकार बुआ-बाजीचा नसुन बुआ आड लपलेला money laundering आणि तत्सम व्यवहार असेलं,
वचन पुर्तता होत नाही म्हणंटल्या वर बुआ-बाजीची केस टाकली असणार...... कारण रक्कम मोठी आहे आणि इतकी रक्कम हाताळणारा मुर्ख असेल असे वाटत नाही
6 Nov 2017 - 11:43 am | विशुमित
मी हेच टायपायला घेतले होते तेवढ्यात तुमचा प्रतिसाद पडला.
मला सुद्धा याचीच जास्त शक्यता वाटते आहे.
6 Nov 2017 - 12:43 pm | arunjoshi123
श्रद्धाळू लोक हवाला व्यवहार करतात असं वैद्य या माणसाबद्दल वाचून यनावाला तसंही म्हणतील. काय सांगावं.
======================
त्यांनी लेखात उभा केलेला पायस बिझनेसमॅन मूळात तसा नाहीच.
6 Nov 2017 - 1:13 pm | दीपक११७७
एकमत झाले आपले
6 Nov 2017 - 12:13 pm | मालोजीराव
सागरबुवाचं टॅलेंट कौतुकास्पद आहे
6 Nov 2017 - 12:59 pm | चांदणे संदीप
सगळ्यात दुर्लक्षित राहिले सागरभाऊ!
Sandy
6 Nov 2017 - 1:05 pm | arunjoshi123
हा हा.
बेकार लोकांचे स्फूर्तिस्थान ठरू शकतात.
6 Nov 2017 - 6:44 pm | गामा पैलवान
यनावाला,
तुम्हांस पुनर्जन्म मान्य आहे का?
सुमारे पन्नास वर्षांपूर्वी विज्ञानवादी पुनर्जन्म हे थोतांड मानंत असंत. मात्र आज डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी पुनर्जन्मावर अनेक पुस्तकं प्रकाशित केली आहेत. मग पुनर्जन्म खरा मानणं ही श्रद्धा की अंधश्रद्धा?
आ.न.,
-गा.पै.
6 Nov 2017 - 9:38 pm | यनावाला
नाही. पुनर्जन्मावर माझा तिळमात्र विश्वास नाही. प्रत्येक सजीवाचा एकच जन्म असतो. पहिला आणि शेवटचा तोच. पूर्वजन्म नाही. पुनर्जन्म नाही.
...यनावाला
6 Nov 2017 - 11:14 pm | गामा पैलवान
यनावाला,
तुमचा पुनर्जन्मावर तिळमात्र विश्वास नाही ते तुमचं वैयक्तिक मत झालं. मात्र इतरांनी असा शोध घेतलेला आहे. डॉक्टर इयन स्टेव्हनसन यांनी पुनर्जन्माच्या प्रकरणांवर प्रत्यक्ष माहिती जमवली आहे. त्यांनी त्यावर अनेक पुस्तकं लिहिली. त्यापैकी एक पुस्तक हे आहे : https://www.amazon.co.uk/Children-Remember-Previous-Question-Reincarnati...
मग पुनर्जन्म ही वस्तुनिष्ठ घटना का माणू नये?
आ.न.,
-गा.पै.
7 Nov 2017 - 9:15 am | अनन्त्_यात्री
वस्तुनिष्ठ असेल तर ती मानावी लागते की स्वयंस्पष्ट/स्वयंसिद्ध असते?
7 Nov 2017 - 1:46 pm | गामा पैलवान
अनन्त्_यात्री,
घटना स्वयंसिद्ध असली तरी दिसली पाहिजे ना. उद्या सूर्योदय झाला तरी मी डोळे झाकून तो उगवलाच नाही अशी बतावणी करू शकतो ना? मग लोकांना स्वयंसिद्ध घटना वस्तुनिष्ठपणे मला पटवून द्यावी लागेल.
यनावाला यांचा स्वयंसिद्ध घटनेवर विश्वास नाही. म्हणून हा खटाटोप.
आ.न.,
-गा.पै.
6 Nov 2017 - 10:09 pm | वीणा३
लेखातल्या काही गोष्टी पाटल्या काही नाही. मला हि केस "३ लाखाची गादी" किंवा ते काही लाखाचं "इच्छा पूर्ती यंत्र ", किंवा एमवे टाईप चेन मार्केटिंग मधली वाटली. सगळं असताना सुद्धा मोहापायी माणूस फसत जातो त्याचं उदाहरण वाटलं. कमीत कमी कष्टात / पैशात जास्तीत जास्त फायदा घेणं या विचारामागे "श्रद्धा / अंधश्रद्धा" पेक्षा "मोह/ हाव /भीती " आहे असं वाटतं. एमवे टाईप चेन मार्केटिंग मध्ये एवढ्या पैशांना (कितीतरी जास्त पैशांना ) फसलेली लोक जगभर सापडतील.
7 Nov 2017 - 1:57 pm | प्रकाश घाटपांडे
कधी भुरळ तर कधी अज्ञात कारणामुळे मती कुंठीत होते. माझ्या अंनिस तल्याच मित्राला एका भामट्याने फोन वरुन एटीएम कार्डाविषयी माहिती विचारुन घोळात घेउन त्याच्याकडून पिन काढून घेतला होता. आता याने वर्तमान पत्रात याविषयी अनेक बातम्या वाचल्या होत्या, मी स्वतः त्याला अनेकदा अशा गोष्टींपासून सावध रहा असे सांगितले होते. काही काळानंतर तो भानावर आल्यावर नंतर बँकेत जाउन कार्ड ब्लॉक केले.
7 Nov 2017 - 12:07 pm | arunjoshi123
इथे यनावाला आणि अनेक वाचकांनी माझे त्यांना विचारलेले प्रश्न दुरुद्देशप्रेरित आहेत असा अर्थ काढला आहे. आपल्या नास्तिकत्वासाठी आणि पुरोगामीत्वासाठी अनेक शुभेच्छा. व्यक्तिकेंद्रित आरोपांवर धागा केंद्रित झाल्यामुळे माझा रामराम.
7 Nov 2017 - 1:49 pm | धर्मराजमुटके
मृत मुलाला जिवंत करण्याचा प्रयत्न, १० दिवसांपासून मृतदेह चर्चमध्ये
कुणीतरी वरील बातमीचा उपयोग करुन किरिस्ताव कसे अंधश्रद्धाळू असतात असा एखादा उपदेशात्मक / विडंबनात्मक लेख पाडा रे ! अगदी यनावाला स्टाईलमधे. म्हणजे लेखकाचे नाव वाचले नाही तर लेख यनावाला साहेबांचाच वाटला पाहिजे. बघूया कोण उचलतो हे शिवधनुष्य ! (सॉरी, सॉरी क्रॉस !)
7 Nov 2017 - 2:15 pm | सुनील
नक्कीच असा लेख वाचायला आवडेल!
बातमीतील शेवटचे वाक्य - अंनिसच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी नागपाडा पोलिसांकडे तक्रार केल्याचे वृत्त आहे, रोचक वाटले!
लगे रहो, अंनिस.
7 Nov 2017 - 3:46 pm | स्वधर्म
यनावाला सर,
कितीही टोकाचा बुध्दीप्रामाण्यवादी असला, तरी मानवप्राणी पूर्णपणे अश्रध्द असणे अश्यक्य अाहे, हे मला अाता पटू लागलेले अाहे. त्याचे अगदी चांगले स्पष्टीकरण थोड्याशा वेगळ्याच विषयासंबंधी वाचताना मला मिळाले. युवाल हरारी यांचे होमो सेपियन्स हे पुस्तक तुंम्ही जरूर वाचा असे सुचवतो. त्यात मानवाने उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर जी हनुमानउडी मारली, त्याविषयी एक अख्खे प्रकरण अाहे. त्याचे नांव अाहे: इंटर सब्जेक्टीव रियालिटी. त्याचा थोडक्यात गोषवारा असा, की मानवांत परस्पर सापेक्ष वस्तुस्थिती (reality) निर्माण करण्याची क्षमता जेव्हा अाली, तेंव्हा मानवाने इतर प्राण्यांच्या तुलनेत प्रचंड मोठी हनुमानउडी मारली. या रियालिटीवर अनेक मानवांचा विश्वास बसू शकला व त्याचमुळे मानव प्रचंड मोठ्या संखेने सहकार्य करू शकला व इतर एकेकट्या प्रचंड मोठ्या प्राण्यांवरही अधिकार गाजवू शकला, उत्क्रांतीच्या प्रवाहात तग धरू शकला. उदा. चिंपांझी एकमेकांशी ‘मी उद्या तुला केळे देतो, त्यामुळे अात्ता मला तू मदत कर’ या प्रकारे भविष्यातील शक्यतेवर विश्वास ठेऊन परस्पर व्यवहार करू शकत नाहीत, पण माणूस मात्र करू शकतो. खरे तर ‘उद्या मिळणारे केळे’ ही absolute वस्तुस्थिती नाही, ती केवळ या दोन माणसांमधील सब्जेक्टीव्ह रियालिटी अाहे, पण ती काम करते. मानवी व्यवहार त्यावर हजारो वर्षे चालत अाले अाहेत. त्यामुळे मानवाला एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी ती गोष्ट अाज अात्ता प्रत्यक्षात समोर अस्तित्वात असायची गरज नसते. त्याचमुळे व्यवहारात ही श्रध्दा असतेच. पैसे हे याचे उत्तम उदाहरण अाहे. जरी भारताच्या रिझर्व बॅंकेच्या गव्हर्नरची नोटेवर छापील सही असली, तरी कोणीही ते मूल्य मागण्यासाठी त्यांच्याकडे जात नाही. त्या अर्थाने ती नोट प्रत्यक्ष प्रमाणाने सिध्द न होता केवळ सर्वजण त्यावर विश्वास ठेवत असल्याने काम करते.
दुसरे म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वत: सिध्द केल्याखेरीज वापरणारच नाही, असे अापण जगूच शकत नाही. याकरता प्रत्येक गोष्टीची चिकीत्सा करावी लागेल, व ते केवळ अशक्य अाहे.
या जीवनपध्दतीत श्रध्देचे संपूर्ण उच्चाटन होणे शक्य नाही. फक्त घातक, फसवणूक करणार्या गोष्टींवर विश्वास ठेवणे टाळता येऊ शकेल, तेही प्रत्येकाला सर्व वेळेस नाही. अापण सांगितलेली वरील गोष्ट ही अशा फसवणूकीचे एक उदाहरण अाहे. त्यात देवाचा, अार्थिक माॅडेल्सचा किंवा विज्ञानाचाही (उदा. डीडीटी किंवा रासायनिक खते वापरण्यामागे असलेली श्रध्दा) वापर होऊ शकला असता.
8 Nov 2017 - 7:42 pm | चौकटराजा
कितीही टोकाचा बुध्दीप्रामाण्यवादी असला, तरी मानवप्राणी पूर्णपणे अश्रध्द असणे अश्यक्य अाहे, हे मला अाता पटू लागलेले अाहे. अता मी माझ्या प्रतिसादात जे म्हटले आहे ना ते तुम्हाला उमगलेले दिसतेय. पण मी पुढे म्हणतो देव धर्म अस्तिक नास्तिक ईई शीच श्रद्धा व चिकित्सा यांचा सम्बन्ध आहे असे नाही तर या दोन मार्गानी आपले सारे आयुष्य व्यापलेले आहे. त्या दोन मानसिक प्रवासाच्या अवस्था आहेत. चिकित्सा हरघडी करून आयुष्य क्रमणे शक्य नसल्याने श्रद्धा ( कल्पनेने साकारलेली म्हणा हवंतर ) विश्वास ( अनुभवाने साकारलेला म्हणा हवंतर ) यांचा वापर करावाच लागतो. मी तो करतो व त्यामुळे आयुष्यात क्वचितच पस्तावाची पाळी आलेला असा माझा मी उल्लेख करू शकतो. नो लाईफ इज फ्री फ्रॉम गॅम्बल !!
12 Nov 2017 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे
स्वधर्म सहमत आहे. आमचे मित्र राजीव साने यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ऐवजी अंधश्रद्धा निवारण समिती असा शब्दप्रयोग सुचवला होता.
7 Nov 2017 - 4:37 pm | मोहन
+१००
7 Nov 2017 - 6:21 pm | Duishen
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.)
३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.)
तुम्ही केलेले वर्गीकरण आवडले. काही संमिश्र भावना या श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्हीतून निर्माण होतात.
आमच्या एका मैत्रिणीच्या वडिलांचे अकाली निधन झाले. भाऊ नसल्याकारणाने तिने अग्नी द्यावा असे आम्हा मित्र-मैत्रिणींचे मत होते. त्याला तिची तयारीही होती पण शेवटच्या क्षणी नातेवाइकांनी 'मुलीने अंत्यसंस्कार केल्यास वडिलांच्या आत्म्यास शांती लाभणार नाही आणि त्यास तू जबाबदार असशील. शिवाय "आपल्या" समाजात मुली/स्त्रिया स्मशानात जात नसतात' म्हणून तिला त्यापासून रोखलं. खरतर तीचे वडील तिच्या आणि त्या गावातील सर्व लोकांच्या मानाने वैचारिक दृष्ट्या पुढारलेले होते. ज्यागावात १० वी होणे मुलींसाठी उच्च शिक्षण होते आणि लग्नाची तयारी होते त्यावेळेस त्यांनी उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी मुलीला पाठवले. कदाचित काका अधिक जगले असते तर त्यांनी शेवटची इच्छा म्हणून मुलीकडून अंत्यसंस्कार करवून घेण्याची व्यक्त केली असती. "आत्माशांती' चा उल्लेख करून अंत्यसंस्कार करू न देणाऱ्या किती नातेवाइकांनी नंतर 'मदत' केली हे ही अनुभवले.
मुलाने एखादी बाब केली तर योग्य आणि मुलीने केली तर ती अयोग्य ही पारंपारिक विचारसरणी एखाद्याला सरणावर नेतानाही कायम असावी हे खचितच मनाला त्रासदायक आहे. मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या 'आत्म्याचे' माहिती नाही पण जिवंत माणसाला मात्र नंतर मरेपर्यंत रुखरुख लागून राहते!
भयोद्भव श्रद्धेमुळेही अनेक व्यक्ती बदल्याण्यास कचरतात आणि योग्य निर्णय होऊ शकत नाहीत. तुमचा लेख आणि वर्गीकरण आवडले.
8 Nov 2017 - 11:09 am | विशुमित
<<<भयोद्भव श्रद्धेमुळेही अनेक व्यक्ती बदल्याण्यास कचरतात आणि योग्य निर्णय होऊ शकत नाहीत.>>>
==>> या वाक्याने यानावालांचा लेख सार्थकी लागला.
बाकी या धाग्यावर तुमच्या एन्ट्रीने यानावालांचा रानरेट चांगलाच वाढला आहे.
7 Nov 2017 - 11:16 pm | गामा पैलवान
Duishen,
चांगला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर प्रश्नांतच दडलेलं आहे. धर्म ही संकल्पना अतिशय व्यापक आहे. सृष्टीच्या कुठल्याही अंगाकडे लक्ष देऊन बघितलं तर त्यास धर्म आहेच. त्यामुळे यनावाला ज्याला अंधश्रद्धा म्हणतात त्यादेखील सर्व सृष्टीत कमीअधिक प्रमाणावर उपस्थित आहेत.
अशा अंधश्रद्धा जेव्हा उपासनेचं रूप घेऊन येतात तेव्हा त्यातून बुवाबाजीचं प्रस्थ वाढतं. त्यामुळे यनावाला जे बुवाबाजीच्या विरोधात रान उठवतात ते योग्यंच आहे. मात्र असं करतांना अंधश्रद्धा आणि खरीखुरी उपासना यांत रेघ मारायला विसरतात. यावर उपाय म्हणजे यनावाला यांनी इतर क्षेत्रांतल्या अंधश्रद्धा व सत्ये हुडकून त्यांच्यामध्ये रेघ मारायचा सराव करणे हा होय. यनावालांच्या प्रयत्नांस व्यापक स्वरूप यावं हा माझा आग्रह अशा अर्थी आहे.
जरी धर्म व्यापक व सर्वस्पर्शी असला तरी उपासना (= अध्यात्मिक साधना) प्रत्येक व्यक्तीपुरती मर्यादित आहे.
आ.न.,
-गा.पै.
8 Nov 2017 - 3:01 am | Duishen
मुद्दा पुन्हा त्याच बाबींकडे येतो आहे देव-धर्म या व्यापक (आणि सर्वस्पर्शी) संकल्पना आहेत तर इतर कुठलेही क्षेत्र घेतले तर ते या संकल्पनांपासून मुक्त असू शकणार नाही. त्यामुळे एखादी रेष मारून ते विभाजन करणे खूप अवघड.
काही बाबी या सार्वकालिक आणि सर्व जागांवर चूक असू शकतात; उदा: स्त्री-पुरुष भेदाभेद, जात, धर्म, प्रादेशिकता, राष्ट्रवाद यावरून भेदाभेद
तर बऱ्याच बाबी ह्या बरोबर किंवा चूक यांच्या सीमा रेषेवर असतात... याची तर भरपूर उदाहरणे आहेत...यावर चर्चाही होत आहेत.
धर्मासोबत असणाऱ्या कर्मकांडांचा भाग असेल तर चर्चा, वाद, प्रतिवाद टाळता न येण्यासारखे! पण अध्यात्म म्हणून स्वत:पुरते ठेवले तर त्याचा इतरांना त्रास होणार नाही हे नक्की.
8 Nov 2017 - 8:55 am | आनन्दा
एक साधा सरळ विचार आहे, तो सांगतो आम्हाला शिकवलेला.
जो गुरू आपले फोटो स्वतः विकतो, मी देव आहे असे उच्चरवाने सांगतो, येता जाता चमत्कार करतो , आणि पैसे घेऊन अनुग्रह/समाधान देतो, तो गुरू नव्हे.
अश्या माणसाकडे एखादी सिद्धी, जुगाड किंवा गेलाबाजार हातचलाखी आहे असे समजून जावे.
ज्यांना अध्यात्म खरेच समजले आहे अशी माणसे अत्यंत प्रसिद्धीपरांगमुख, बऱ्याच वेळेस जवळजवळ माणुसघाणे म्हणता येईल इतकी अंतर्मुख असतात, अश्या माणसांना शोधणे फार कठीण असते, क्वचितच एखादे संत ईश्वरेच्छा म्हणून लोकसंग्रहाच्या वाट्याला जातात.
बाकी कर्मकांड हा ईश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग नव्हे याबद्दल सगळ्या संतांचे एकमत आहे, पण याचा अर्थ कर्मकांडात शक्ती नाहीच असे नाही. अर्थात तो या लेखाचा विषय नाही म्हणून यावर मतप्रदर्शन टाळतो. पण व्यवहाराचे नियम काळाप्रमाणे बदलत असतात, आणि ते तसे बदलले पाहीजेतच याबद्दल दुमत नसावे. शेवटी आपल्याला चांगला समाज बनायचे आहे.
जगात सार्वकालिक चूक आणि बरोबर काहीही नसते, आपण एक समाज म्हणून उत्क्रांत होत आहोत. तुम्ही ज्या गोष्टी मांडल्यात त्या जेमतेम 100 वर्षांपूर्वी बरोबर मानल्या जात होत्या. कशावरून यामध्ये आजच्या काही गोष्टी वाढणार नाहीत? उदा.मांसाहार. (किंवा शाकाहार) त्यामुळे आपला परीघ खूप छोटा आहे आणि आपण आपल्या काळाचे अपत्य आहोत एव्हढी जाणीव ठेवणे पुरेसे आहे.
8 Nov 2017 - 7:11 pm | Duishen
जो गुरू आपले ...तो गुरू नव्हे. या मताशी सहमत!
ज्यांना अध्यात्म खरेच समजले आहे ...अश्या माणसांना शोधणे फार कठीण असते या मताशीही सहमत!
बाकी कर्मकांड हा ईश्वराकडे जाण्याचा एकमेव मार्ग नव्हे..
मला असं वाटत की अध्यात्मात कर्मकांड नसावे आणि धर्मात कर्मकांड आहे. अध्यात्मात साधना असते. तीन भरतीय महनीय व्यक्तींची उदाहरणे घेऊ..
१. महावीर जैन
२. गौतम बुद्ध
३. शंकराचार्य
या तीनही व्यक्तींनी साधनेतून मिळवले ते एक एक व्यक्ती म्हणून मिळवले आहे. तिथे जमावही नव्हता किंवा कर्मकांडही नाही. सर्वच सामान्य (संसारिक) माणसाला असे एकटे राहून शक्य नाही म्हणून त्यांनी आपापले संघही तयार केले. पण त्यात कर्मकांड घुसले... जर कर्मकांड वजा केले तर आस्तिक किंवा धार्मिक म्हणवून घेणाऱ्या व्यक्तींचाच अधिक फायदा आहे असे मला वाटते... पण जेंव्हा कर्मकांड म्हणजेच धर्म अशी व्याख्या होऊ लागते तेंव्हा प्रगतीचा मार्ग खुंटतो असे माझे मत आहे. आणि आजच्या काळात स्पर्धात्मक कर्मकांड वाढत आहे असे माझे निरीक्षण आहे.
जगात सार्वकालिक चूक आणि बरोबर काहीही नसते, आपण एक समाज म्हणून उत्क्रांत होत आहोत.
समाज म्हणून उत्क्रांत होत आहोत... अंशत: मान्य कारण उत्क्रांतीचे पैलू /पातळ्या विविध आहोत. उदा: ज्या काळात सतीप्रथा होती त्याचकाळात इतर जातीत विधवा पुनर्विवाह सामान्य होते. याचा अर्थ ज्या पुण्यात रमाबाई सती गेल्या त्याच पुण्यात इतर जातीतील विधवा महिलांचे पुनर्विवाह करण्याची परंपरा होती. याचा अर्थ काही समाज उत्क्रांत होता काही समाज प्रतिष्ठित असूनही उत्कांत नव्हता असे जाणवते... म्हणून भेदाभेद करणे हे धार्मिक लक्षण / सामाजिक / पारंपारिक लक्षण काळाच्या कसोट्यांवर अयोग्यच आहे. असो. या विषयावर कधी एखादा धागा आल्यास सविस्तर बोलू!
श्री. मंदार यांच्या उदाहरणातही अध्यात्म तर नक्कीच नव्हते! श्रद्धा, विश्वास, लोभ या सर्वांचा तो परिपाक आहे. विश्वास ठेवायचा की नाही याचा माणसे सतत विचार करतात पण श्रद्धा ठेवायची की नाही हा सतत विचार केल्या जात नाही. श्री, मंदार यांच्या उदाहरणात लोभामुळे श्रद्धा निर्माण झाली असे वाटत नाही कारण तसे असते तर त्यांची श्रद्धा सतत बदलती राहिली असती... पण इथे श्रद्धेतून लोभ निर्माण झाला असे जाणवते.. श्रद्धा आहेच पण या श्रद्धेच्या माध्यमातून आपण अधिकचे आर्थिक फायदे मिळवू शकतो असा तो लोभ निर्माण झाला असणार!
8 Nov 2017 - 12:49 pm | arunjoshi123
छ्या छ्या, असं कसं? प्रायनावालीय तर्काप्रमाणे "भारतात हजारो विद्यार्थी सरकारी मान्यता नसलेल्या पण तसे खोटे भासवणार्या, सरकारी नोकरी मिळण्यास निरुपयुक्त शैक्षणिक संस्थांतून शिकून आपली वर्षे, पैसे वाया घालवतात" म्हणून शिक्षण ही संकल्पना समाजविघातक ठरते. सबब लोकांनी आपापल्या प्राध्यापकपदाच्या नोकर्या सोडून दिल्या पाहिजेत.
8 Nov 2017 - 1:46 pm | गामा पैलवान
Duishen,
नेमक्या याच कारणासाठी साधना आवश्यक आहे. मग ती कोणत्याही क्षेत्रातली असो. खरा कोण आणि खोटा कोण हे ओळखता आलंच पाहिजे.
आ.न.,
गा.पै.
12 Nov 2017 - 10:33 am | प्रकाश घाटपांडे
मला वाटल यासाठी चिकित्सा आवश्यक आहे. मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो. खरा वैज्ञानिक कोण व छद्मवैज्ञानिक कोण हे ओळखता आलच पाहिजे
12 Nov 2017 - 2:07 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरा वैज्ञानिक कोण व छद्मवैज्ञानिक कोण हे ओळखता आलच पाहिजे
+१००
छद्मवैज्ञानिकी म्हणजे वैज्ञानिक बुरख्याआडची बुवाबाजीच !
12 Nov 2017 - 2:42 pm | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
आता एक सांगायला हरकत नाही की विज्ञान ( = सायन्स) आणि स्याद्विज्ञान ( = सुडोसायन्स) यांच्यात निश्चित सीमारेषा नाही. तात्विक सीमाप्रश्न गेले निदान शतकभर तरी वैज्ञानिक आणि तत्त्ववेत्त्यांना छळंत आला आहे. यानुसार विज्ञान (science), अविज्ञान (non science), स्याद्विज्ञान (pseudo science), तत्त्वज्ञान (philosophy), परस्परसंबंधविज्ञान (religion), अधिभौतिकी (metaphysics) या सर्वांत सुस्पष्ट सीमारेषा नाही. मात्र असं असलं तरी प्रयोग करून निष्कर्ष काढावेत हे जवळजवळ सर्वमान्य आहे.
सांगायचा मुद्दा काये की कोणी वैज्ञानिक असो वा अध्यात्मिक साधक असो, स्वत:शी कितपत प्रामाणिक आहे हे महत्त्वाचं.
आ.न.,
-गा.पै.
12 Nov 2017 - 4:46 pm | प्रकाश घाटपांडे
मी छद्मविज्ञान शब्द स्यूडोसायन्स ला समानार्थी वापरला
12 Nov 2017 - 5:06 pm | पगला गजोधर
सायंटॉलॉजी
रेफ, टॉम क्रूझ...
या धर्माला काय म्हणणार ??
छडमविज्ञान ? की श्रद्धा ???
22 Nov 2017 - 11:00 pm | पी महेश००७
तथाकथित श्रद्धाळूंच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा लेख.
मुळात मंदार वैद्य नामक व्यक्ती कारखानदार आहे. 28 लाख रुपये देण्याइतपत तो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे. या माणसाला हिशेब कळतो, तसे पैसा कसा कमवायचा तेही उत्तम कळते. अक्षय धनाचा कुंभ देणारा सागरनाथ नावाचा बुवा त्या बदल्यात सुरुवातीला 9 हजार रुपये मागत होता, त्याच वेळी मंदार वैद्यांना प्रश्न पडायला हवे होते. ते म्हणजे अक्षय धनाचा कुंभ आहे तर या बुवाने तो स्वतःसाठीच का वापरला नाही, दुसरे म्हणजे 9 हजार रुपये हवे होते, तर वैद्यांनी त्याला त्या कुंभातून तू हवे तेवढे काढून घे आणि जमले तर मलाही दे, असं तरी म्हणायला हवं होतं. कारण वैद्य व्यावसायिक आहेत. फायद्याचं त्याला कळतं. उगाच कारखानदार झाला नसता. बरं 28 लाख रुपये गमावल्यानंतर श्रद्धेच्या धुंदीतून वैद्यबुवा बाहेर आले... कमाल आहे, इतका आंधळा कारभार करणारा हा माणूस कारखानदार म्हणून कसा टिकला हेच कळत नाही.. मला वाटतं, वैद्यांपेक्षा सागरनाथ जर कारखानदार असता तर त्याने वैद्यांपेक्षा चांगला व्यवसाय केला असता...
असो, यनावाला यांनी श्रद्धा आणि विश्वास याचं उत्तम विश्लेषण केलं आहे... त्याबद्दल त्यांना 100 पैकी 100...
1 Jan 2018 - 8:36 pm | palambar
खरे साहेब यांचि प्रतिक्रिया
वाचुन आश्च् र्य वातले .
यनावाला सर तुम्हि लिहित रहा. आम्हाला तरि तुमचे मत बरोबर वाट्ते आहे.