अठ्ठावीस लक्ष रुपये
अठ्ठावीस लक्ष रुपये .......यनावाला
"पैशांचा पाऊस ! भोंदू बाबाने व्यावसायिकाला अठ्ठावीस लाख रु.ना गंडवले." या शीर्षकाची बातमी पुणे म.टा.(31-01-2017) मध्ये अनेकांनी वाचली असेल. ती अशी:-
मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७ वर्षे, विठ्ठलनगर, सिंहगड मार्ग, पुणे) यांचा शिरवळ येथे कारखाना आहे. ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्याकडे बुवा-बाबा-स्वामींचे येणे- जाणे असते. सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले.
त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली. वैद्यांनी मुदत ठेवी मोडून १२ लाख रु.दिले. त्यानंतर सागरनाथने आणखी पाच लाख रु.मागितले. वैद्यांनी तीही रक्कम सुपूर्द केली.
नंतर मंदार वैद्यांना सागरनाथच्या मुलाचा फोन आला. "करणी वडिलांवर उलटली आहे. ती परत उलटविण्यासाठी १० लाख रु.पाठवावे. नाहीतर वडिलांचा मृत्यू होईल. मग त्यांचे प्रेत आणून मी ते तुमच्या दारासमोर टाकीन. " वैद्य घाबरले. त्यांनी दहा लाख रु.पाठविले.
कांही दिवसांनी आणखी पैशांची मागणी आली. इतके पैसे गेल्यावर आतां मंदार वैद्यांना शंका आली की हा बुवा कदाचित् आपल्याला फसवित असावा. मग त्यांनी बुवाविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. पोलीसांनी सागरनाथ मीठानाथ परमार आणि चंदुलाल सागरनाथ परमार यांच्यावर जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास चालू आहे.
....या प्रकरणावरून काय दिसते ?
मंदार वैद्य हे व्यावसायिक आहेत. त्यांनी भोंदू बाबाला २८लाख रु. दिले. त्याअर्थी त्यांची आर्थिक स्थिती उत्तम होती. म्हणजे ते आपला व्यवसाय चांगल्या कार्यक्षमतेने सांभाळत होते. यावरून ते व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, होते. कारखान्याचे व्यवस्थापन चांगले असणार. म्हणजे मंदार वैद्य बुद्धिमान आहेत. त्यांचे वय ४७ वर्षे आहे. म्हणजे ते अनुभवी आहेत. अशा या व्यवहारज्ञानी, कार्यकुशल, सक्षम, बुद्धिमान, अनुभवी व्यावसायिकाचे २८ लक्ष रुपये एक फडतूस, ढोंगी बाबा लुबाडतो याचे महदाश्चर्य वाटते. या बुवाने चोरी केली नाही. दरोडा घातला नाही. खुनाची धमकी दिली नाही. वैद्य यांनी त्याच्या पायांवर डोके ठेवले आणि हातावर लाखो रु. ठेवले. कोणताही लेखी व्यवहार केला नाही. हे अचंबित करणारे आहे. अविश्वसनीय वाटते. पण असे घडले हे सत्य आहे.
असे घडण्याचे कारण काय ? यावर विचार करता एकच कारण संभवते. ते म्हणजे देव-धर्म आणि त्याच्याशी संबंधित विषयांवर मंदार वैद्य यांची असलेली श्रद्धा. अपरंपार श्रद्धेविना असे घडणे असंभवनीय आहे. श्रद्धा ही एक मनोभावना आहे. मन आणि बुद्धी यांचे उत्पत्तीस्थान मेंदूच आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, लोभ, श्रद्धा, मद, मत्सर, काम अशा अनेक भावनांचा समुच्चय म्हणजे मन. माणसाचे मन श्रद्धा भावनेने लिप्त झाले की त्याची बुद्धी लुळी पडते. बुद्धीपेक्षा मन प्रबळ बनते. बुद्धी निष्प्रभ होते. बुद्धीची विचारक्षमता नष्ट होते. मेंदूवर श्रद्धेचे नियंत्रण येते. त्यामुळे सर्व निर्णय श्रद्धे अनुसार होतात. विवेक, चिकित्सा हे बुद्धीचे घटक मागे पडतात. मग व्यवहारज्ञान, क्षमता, बुद्धिमत्ता, अनुभव यांचा कांही उपयोग होत नाही.
श्रद्धेचे चार प्रकार आहेत. ते सोदाहरण असे:-
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा. सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्रे वाहावी.) २) गतानुगतिक श्रद्धा. (उदा.लालबागचा राजा नवसाला पावतो.)
३)आशावती श्रद्धा. ( उदा.श्रीयंत्राचे पूजन केले तर धनप्राप्ती होते.) ३) भयोद्भव श्रद्धा .( उदा.मृताचे धार्मिक अंत्यसंस्कार केले नाहीत तर त्याचा अतृप्त आत्मा कुटुंबाला पीडा देतो.)
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते. शेवटी सागरनाथबाबा न बोलावता, त्यांच्या घरी आला. कांही न विचारता , "तुम्हांला अक्षय धनाचा कुंभ देतो." असे आपण होऊन म्हणाला. वैद्यांना क्षणैक साक्षात्कार झाला असावा की या बाबाला देवानेच पाठविले आहे. त्याने नऊ हजार रु. मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. पुढे तो वारंवार पैसे मागू लागला. वैद्यांना वाटले देव आपल्या श्रद्धेची परीक्षा पाहतो आहे. आपण कमी पडता नये. देवाच्या कसोटीला उतरलेच पाहिजे. या विचाराने ते पैसे देत राहिले. त्यांना वाटले "मी कुणाला कधी फसवले नाही. कुणाचे कधी वाईट केले नाही. वाईट चिंतिलेसुद्धा नाही. मग माझे कशाला काही वाईट होईल ? देव आहे. देवाला डोळे असतात ना ? तो पहातो आहे ना ? माझे भलेच होणार. देवाने पाठविलेला हा बाबा मला फसवणे शक्य नाही. अंतीं तो माझे कल्याणच करील." असे त्यांना सारखे वाटत राहिले असणार.
शेवटी २८ लाख रुपये गेले तरी काहीच चांगले घडले नाही. हे ध्यानी आल्यावर ते श्रद्धेच्या ग्लानीतून थोडे बाहेर आले. "म्हणजे बुवा-बाबा श्रद्धाळू लोकांना लुबाडतात असे अंनिसवाले सांगतात ते खरे असते की काय ? " अशी पुसटशी शंका त्यांच्या मनात तरळली असावी. मग त्यांनी सागरनाथबाबा वि्रुद्ध पोलीसांत तक्रार दिली. पोलीसांनी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला. पुढे काय झाले याची बातमी अद्याप वाचली नाही. नेहमीप्रमाणे पोलीसतपास चालू असेल.
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक गोष्टीवर चिकित्सा करून योग्य निर्णय घेणारी बुद्धी श्रद्धा-क्षेत्रात चालेनाशी झाली. कारण मन श्रद्धेने ओतप्रोत भरले होते. त्यामुळे बुद्धीने कोणत्याही गोष्टीची चिकित्सा केली नाही. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतून बुद्धी बाजूला पडली. किंबहुना श्रद्धेने तिला बाजूला सारले. आणि सर्व नियंत्रण आपल्या हाती घेतले. श्रद्धा भावनेमुळे प्रबळ झालेल्या मनाने मेंदुद्वारे निर्णय घेतले. कर्मेंद्रियाने (हातांनी) ते कार्यवाहीत आणले. भोंदूबाबाने मागितले तेवढे पैसे त्या्ला दिले. शेवटी माणूस म्हणजे त्याचा मेंदू. तो मेंदू श्रद्धाभावनेच्या आहारी गेला म्हणजे अशी फसवणूक होणारच. याची अनेक उदाहरणे आहेत. श्रद्धाळू लोकांचा निरुपाय असतो. श्रद्धेपुढे त्यांचा मेंदू हतबल होतो. श्रद्धेच्या गुंगीतून बाहेर आल्यावर "मी त्या बाबाला इतके पैसे दिले तरी कसे? " याचे आश्चर्य स्वत: वैद्यांनाच वाटले असेल. श्रद्धेची झिंग ही अशी असते. श्रद्धाळूंची फसवणूक होणे अपरिहार्य असते. त्यावर एकच उपाय तो म्हणजे श्रद्धेचे
प्रयत्नपूर्वक विसर्जन करणे.
श्रद्धा ठेवणे हे दास्य (गुलामगिरी) पत्करल्याचे लक्षण आहे. मंदार वैद्यांनी भोंदूबाबावर श्रद्धा ठेवली म्हणजे त्यांनी आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. म्हणजे त्यांच्या बुद्धीचे नियंत्रण बाबाकडे गेले. त्यामुळे तो बुवा सांगेल ते सत्य मानून वैद्य त्याच्या आज्ञा पाळत गेले. दासाला स्वामीच्या आज्ञा पाळाव्याच लागतात. मग फसवणूक अटळ असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या प्रतिष्ठित दैनिकात छापून आलेली ही सत्य घटना आहे. श्रद्धावंतांनी यावर स्वबुद्धीने विचार करावा. "आमचे महाराज अशी बुवाबाजी करणारे नव्हेतच." अशा भ्रमात राहू नये.
******************************************************************************
वर्गीकरण
वाचने
48898
वाचनखूण
प्रतिक्रिया
138
तार्किक दृष्ट्या चांगले विवेचन
In reply to तार्किक दृष्ट्या चांगले विवेचन by तुषार काळभोर
धन्यवाद पैलवान . लेखाविषयी
अंधश्रद्धा म्हणता येतील अशा
In reply to अंधश्रद्धा म्हणता येतील अशा by एस
@ एस
In reply to @ एस by यनावाला
यनावाला,
उत्तम लेख
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org
In reply to https://en.m.wikipedia.org by सुबोध खरे
हे 400 कोटी लोक कोणत्या श्रद्धेचे बळी आहेत?
In reply to हे 400 कोटी लोक कोणत्या श्रद्धेचे बळी आहेत? by Duishen
श्रद्धा (Belief ) ही एखाद्या
In reply to श्रद्धा (Belief ) ही एखाद्या by सुबोध खरे
मी गणपतीची पूजा करतो.
In reply to मी गणपतीची पूजा करतो. by सुबोध खरे
हायला
In reply to मी गणपतीची पूजा करतो. by सुबोध खरे
... मूर्ती हि मूर्त कल्पना आहे ती संकल्पनाही आहे...
In reply to श्रद्धा (Belief ) ही एखाद्या by सुबोध खरे
विश्वास आणि श्रद्धा काही उदाहरणे...
400 कोटींचा अपहार झाल्याने
श्रद्धा आणि फसवणूक
In reply to श्रद्धा आणि फसवणूक by गामा पैलवान
विषारी फळ खाल्ल्याने...
In reply to विषारी फळ खाल्ल्याने... by Duishen
चांगली फळे आणि सडकी फळे यात
अठ्ठावीस दश प्रतिसादांची निःश्चिती !
कांगावा
In reply to कांगावा by arunjoshi123
लेखावर प्रतिसाद लिहिले तर वाचायला आवडतील.
In reply to लेखावर प्रतिसाद लिहिले तर वाचायला आवडतील. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत
In reply to सहमत by मराठी कथालेखक
हेच म्हणतो.
In reply to हेच म्हणतो. by mayu4u
ऋणी
In reply to सहमत by मराठी कथालेखक
आपण मी काय लिहिलं आहे
In reply to सहमत by मराठी कथालेखक
आणि डॉ. दिलिपजी, याला
In reply to लेखावर प्रतिसाद लिहिले तर वाचायला आवडतील. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
यनावाला यांच्यावर व्यक्तिगत
In reply to यनावाला यांच्यावर व्यक्तिगत by arunjoshi123
सरसकटीकरणामुळे विरोधाभास ?
In reply to कांगावा by arunjoshi123
मुद्दा असा आहे यनावाला,
In reply to मुद्दा असा आहे यनावाला, by पुंबा
बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक
In reply to बाकी, हा प्रतिसाद वैयक्तिक by arunjoshi123
हिंदू इकनॉमिक फिलॉसॉफी.
मंदार अरविन्द वैद्य ( वय ४७
अंधश्रद्ध यनावाला
In reply to अंधश्रद्ध यनावाला by arunjoshi123
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि
ह्या दोन गोष्टि मेंदूत आणि वरच्या भावना मनात असतात असा शोध लावल्यासाठी तुम्हाला नोबल दिलं पाहिजे. तुमच्याच अंधश्रद्धा जास्त दिसताहेत.=))) लोल....नास्तिकतेचे प्रकार
जाणावेज्ञान होते.) २. रँडमली ओरियंटेड नास्तिकता - अन्य लोक काय करताहेत आणि आपण काय करत आहोत याचा काहीही संबंध न ठेवणे. एक रँडम बिहेविअर जनरेटर प्रोग्राम करून कधी काहीही करावे. (उदा. शास्त्रज्ञांनी सांगीतलेले विश्वाचे स्पूकी भौतिक स्वरुप सत्य आहे असे दुपारी मानू नये. सकाळी मानावे. ) ३. निराशावती नास्तिकता - http://aisiakshare.com/node/6281 इथे राजेश घासकडवी म्हणतात तसे मूळात निसर्ग असम्यक आहे, निसर्गतःच मनुष्य एक मूल्यहिन रानटी प्राणी आहे, उत्क्रांतीतून भांडाभांडी हा गुण उत्पन्न आला आहे इ इ मानावे. (उदा. दुसर्या गटाचा, टोळीचा माणूस आपल्याला ठार मारेल असे मानावे.) ४. अभयोद्भवाधमी नास्तिकता - आपल्याला जितकं दिसतंय कळतंय तितकंच भय आपल्याला आहे असं मानावं. मग भय नसेल तर आपण स्वार्थासाठी कसेही वागू शकतो असंही मानावं. मला काही भयच नसेल तर, आणि चान्स असेल तर आणि माझं एकट्याचं सगळं मस्तच होणार असेल तर मी सगळीकडे विध्वंस का माजवू नये? (उदा. जिवंत माणसाचे भूकेने प्राण गेले तरी देवाचे भय नसल्याने आपली तिजोरी कितिही भरत राहणे.)In reply to नास्तिकतेचे प्रकार by arunjoshi123
प्रयत्न बरा आहे पण थोडा
लॉजिक
निलाजरं वर्तन!
In reply to निलाजरं वर्तन! by वामन देशमुख
समाजविघातक?
In reply to समाजविघातक? by mayu4u
चिकित्सा आहे हो ती!!!
In reply to चिकित्सा आहे हो ती!!! by arunjoshi123
अजिबात न चिडता...
In reply to चिकित्सा आहे हो ती!!! by arunjoshi123
एवढे सहज चिडू नये
व्यवसाय-धंद्यात प्रत्येक
श्रद्धा ठेवणे हे दास्य
नोटबंदी आणि अंधश्रद्धा
धैर्य आणि धाडस
In reply to धैर्य आणि धाडस by राही
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
अगदी अगदी
In reply to धैर्य आणि धाडस by राही
मस्त प्रतिसाद
In reply to धैर्य आणि धाडस by राही
प्रतिसाद आवडला.
In reply to धैर्य आणि धाडस by राही
सहमत आहे.
In reply to सहमत आहे. by तर्राट जोकर
सहमत!
In reply to सहमत आहे. by तर्राट जोकर
ज्यांच्या शेपटावर पाय पडतोय
In reply to धैर्य आणि धाडस by राही
प्रतिसाद आवडला.
In reply to धैर्य आणि धाडस by राही
सहमत.
In reply to सहमत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनःपूर्वक धन्यवाद
In reply to मनःपूर्वक धन्यवाद by यनावाला
प्रतिसादांमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं....
In reply to धैर्य आणि धाडस by राही
@राही
In reply to @राही by यनावाला
लेखनावरून लिहिणार्याची
In reply to @राही by यनावाला
... लेखनावरून लिहिणार्याची
In reply to धैर्य आणि धाडस by राही
प्रतिसाद आवडला. विशेषतः आज
In reply to प्रतिसाद आवडला. विशेषतः आज by एस
सहमत
In reply to सहमत by राही
सहमत
In reply to धैर्य आणि धाडस by राही
पुर्ण सहमत..
In reply to धैर्य आणि धाडस by राही
यनावालांचा लेख तर उत्तम आणि
In reply to यनावालांचा लेख तर उत्तम आणि by सुचिता१
उत्तम आणि आशयपूर्ण लेखात
In reply to धैर्य आणि धाडस by राही
यनावालांची भाषा चांगली नाही.
In reply to धैर्य आणि धाडस by राही
-१
In reply to धैर्य आणि धाडस by राही
साशंकता
In reply to धैर्य आणि धाडस by राही
य.ना.वाला यांचे लेख गेली अनेक
लेखाची चिकित्सा न करता येत
श्रद्धा निर्मुलनाचे वर्ग ?
एखाद्या माणसाला तू फारच जाडा
In reply to एखाद्या माणसाला तू फारच जाडा by सुबोध खरे
अगदी सहमत आहे! सुबोधजी http:/
एखाद्या माणसाला तू फारच जाडा
आस्तिकांची जालीम नस
In reply to आस्तिकांची जालीम नस by गामा पैलवान
व्यापक स्वरूप...
गापै, पळपुटी कारणे आहेत ही.
In reply to गापै, पळपुटी कारणे आहेत ही. by तर्राट जोकर
सर्व चुकीचं?
संमिश्र भावना..
In reply to संमिश्र भावना.. by चौकटराजा
स्मशानात मोठा विधी करावयाचा
In reply to स्मशानात मोठा विधी करावयाचा by nishapari
यनावालांच्या मते संत तुकाराम
In reply to यनावालांच्या मते संत तुकाराम by arunjoshi123
धार्मिक व आध्यात्मिक, यात आपण
In reply to यनावालांच्या मते संत तुकाराम by arunjoshi123
संत परंपरा ...
In reply to स्मशानात मोठा विधी करावयाचा by nishapari
साधू ....
In reply to संमिश्र भावना.. by चौकटराजा
जगात केवल (अबसॉल्यूट) असं
मुळात अंधश्रद्धा असं काही
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा.
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही नाही. असते ती फक्त श्रद्धा. by mayu4u
एकमेव
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
+१
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील
In reply to श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील by सुबोध खरे
आता प्रश्न असा आहे कि अशा
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
हरेक मनुष्य दोन्हीचा संगम..
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
विश्वास-श्रद्धा-निष्ठा
In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
यनावाला सर
या सर्व भावनांच्या समुच्चयाला मन म्हणायचेइथेच तर सगळं स्पष्टीकरण फसलं. एखाद्या मानवाला मेंदू, फुफ्फुसं, हृदय ईई अवयव असतात तसं मन कुठे असतं हे कोणी दाखवू शकेल काय? मनाला वस्तुरूप अस्तित्व नसतं म्हणताय पण तरी ते मानायचं मग आत्म्यालाही वस्तुरूप अस्तित्व नसतं मग आत्मा का नाही मानायचा? सगळ्या मानवी भावना लिहिल्यात आणि श्रद्धा ही पण एक भावना आहे म्हणताय, मग सगळ्या माणसांत सगळ्या भावना सारख्याच प्रमाणात असाव्यात हा अट्टाहास का? एखादी व्यक्ती जशी सतत चिडकी असते तर काही आनंदी असतात. तसंच काही व्यक्ती श्रद्धाळू असतात हे का मान्य होत नाही? या सर्व भावना सतत कमी जास्त होत असतात. एखादी श्रद्धाळू व्यक्ती काही कारणाने अश्रद्ध होऊ शकते आणि उलटही होऊ शकतं. भलेभले डॉक्टर सुद्धा एखाद्या क्रिटिकल पेशंटसाठी सर्व प्रयत्न करून झाल्यावर आता सर्व देवाच्या हातात आहे म्हणतात. अश्या पेशंटचे आयुष्यभर देवाला नावं ठेवणारे वडील सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा देवापुढे हात जोडताना दिसतात. वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे अतिशय अडचणीत असताना देव माझ्या पाठीशी आहे ही भावनाच कित्येकांना विपरीत परिस्थितीतून तारून नेते. माझ्याकडे माझे स्वतःचे असे काही अनुभव आहेत की जे कुठल्याही स्पष्टीकरणापलीकडचे आहेत. दुर्दैवाने त्यावेळेला कॅमेरा असण्याएवढी ऐपत नसल्याने तुम्ही ज्याला प्रूफ मानाल असं काही नाहीये. पण अनुभव म्हणून सांगू शकतो. आणि हो त्यातले काही अनुभव जसे प्रूफ न दाखवता येण्यासारखे आहेत तसेच काही (सोय असती तर) प्रूफ दाखवता आले असते असे आहेत. वर तुम्ही ज्याचे उदाहरण दिले आहे त्यातला बाबा म्हणजे एक भामटा आहे आणि त्याला फासलेला एक लोभी मूर्ख मनुष्य आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे त्याने माणसावर श्रद्धा ठेवली आहे देवावर नव्हे. नेहमीप्रमाणे या प्रतिसादाला तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा नाही पण निदान वाचाल तरी अशी अपेक्षा ठेवतो.In reply to विश्वास-श्रद्धा-निष्ठा by यनावाला
देव अस्तित्वात आहे...
In reply to मुळात अंधश्रद्धा असं काही by सतिश गावडे
यनावाला म्हणतातच श्रद्धा व
In reply to यनावाला म्हणतातच श्रद्धा व by प्रकाश घाटपांडे
मराठीत आपण अंधश्रद्धा...
In reply to यनावाला म्हणतातच श्रद्धा व by प्रकाश घाटपांडे
अवांतर...
In reply to अवांतर... by अर्धवटराव
तर्कबुद्धीला उगाच स्ट्रेच
In reply to अवांतर... by अर्धवटराव
भावना विश्व (इन्क्लुडींग
भावना विश्व (इन्क्लुडींग श्रद्धा) हे जगण्याचं मेकॅनीझम आहे व तर्कबुद्धी जगण्यातली चैन आहे.वाह ! जोरदार टाळ्या !!!इतके पैसे गेल्यावर आतां मंदार
एक वेगळी बाजु.............
In reply to एक वेगळी बाजु............. by दीपक११७७
dipak ji
In reply to dipak ji by विशुमित
श्रद्धाळू लोक हवाला व्यवहार
In reply to dipak ji by विशुमित
एकमत ...
सागरबुवाचं टॅलेंट कौतुकास्पद
In reply to सागरबुवाचं टॅलेंट कौतुकास्पद by मालोजीराव
बिंगो!
In reply to बिंगो! by चांदणे संदीप
हा हा.
यनावाला यांना एक प्रश्न
In reply to यनावाला यांना एक प्रश्न by गामा पैलवान
नाही. पुनर्जन्मावर माझा
In reply to नाही. पुनर्जन्मावर माझा by यनावाला
पुनर्जन्माची आठवण असलेली बालकं
In reply to पुनर्जन्माची आठवण असलेली बालकं by गामा पैलवान
जर एखादी घटना
In reply to जर एखादी घटना by अनन्त्_यात्री
घटना स्वयंसिद्ध असली तरी दिसली पाहिजे ना.
लेखातल्या काही गोष्टी पाटल्या
In reply to लेखातल्या काही गोष्टी पाटल्या by वीणा३
कधी भुरळ तर कधी अज्ञात
इथे यनावाला आणि अनेक वाचकांनी
मिपावरील विडंबनकारांना आवाहन
In reply to मिपावरील विडंबनकारांना आवाहन by धर्मराजमुटके
+१
इंटर सब्जेक्टीव रियालिटी
In reply to इंटर सब्जेक्टीव रियालिटी by स्वधर्म
अंग आश्शी...
In reply to इंटर सब्जेक्टीव रियालिटी by स्वधर्म
स्वधर्म सहमत आहे. आमचे मित्र
+१००
१) पारंपरिक श्रद्धा. (उदा.
In reply to १) पारंपरिक श्रद्धा. (उदा. by Duishen
| Duishen जी ..
धर्म आणि उपासना
In reply to धर्म आणि उपासना by गामा पैलवान
इतर क्षेत्रांतल्या...
In reply to इतर क्षेत्रांतल्या... by Duishen
एक साधा सरळ विचार आहे, तो
In reply to एक साधा सरळ विचार आहे, तो by आनन्दा
जो गुरू आपले
जो गुरू आपले फोटो स्वतः विकतो
विभाजक
In reply to विभाजक by गामा पैलवान
मला वाटल यासाठी चिकित्सा
In reply to मला वाटल यासाठी चिकित्सा by प्रकाश घाटपांडे
खरा वैज्ञानिक कोण व
खरा वैज्ञानिक कोण व छद्मवैज्ञानिक कोण हे ओळखता आलच पाहिजे+१०० छद्मवैज्ञानिकी म्हणजे वैज्ञानिक बुरख्याआडची बुवाबाजीच !In reply to खरा वैज्ञानिक कोण व by डॉ सुहास म्हात्रे
छद्मवैज्ञानिकी नक्की काय ?
In reply to छद्मवैज्ञानिकी नक्की काय ? by गामा पैलवान
मी छद्मविज्ञान शब्द
सायंटॉलॉजी
श्रद्धा आणि विश्वास याचं उत्तम विश्लेषण
खरे साहेब यांचि प्रतिक्रिया