वसुबारसेनिमित्त मी केलेली कविता...

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
16 Oct 2017 - 11:17 am

वसुबारस आजि असे करुया
प्रेमभरे गाईचे पूजन
सवत्स धेनू दारी आली
सांभाळू आपण आपले गोधन

श्रीकृष्ण सांभाळी गोमातेला
दत्ताचरणी आश्रय दिधला
कामधेनू म्हणती भक्त तिजला
पुरवी सर्वांच्या मनोकामनेला

गोमूत्राची महती वर्णितो
आयुर्वेद घ्यावे पंचगव्य हो
धार्मिक कारणे रोग निवारणे
प्यावे शरीर शुद्धी हो

नैवेद्य दाखवू आरती करुया
गाई वासराचे महत्त्व सांगू
वसुबारसेचे महत्त्व जाणून
गोवत्सांचे रक्षण करु

-- शब्दांकित (वैभव दातार )

कविता

प्रतिक्रिया

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 12:49 pm | पगला गजोधर

कविता छानच आहे आपली ....

पण प्रशांत दामलेंवरून एकदम वसुबारस ??? त्यामुळे थोडा दचकलो ...
फक्त गोधन ऐवजी, गो म्हैस बकरी इ इ वैगरे सगळ्या प्राण्याच्या उपयुक्ततेविषयी ममत्व वाढायला हवं...

वैभवदातार's picture

16 Oct 2017 - 7:19 pm | वैभवदातार

पगला गजोधर सप्रेम नमस्कार ,
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद . हो सर्व प्राणिमात्रांविषयी कृतज्ञतेची भावना ठेवली पाहिजे . माझी आजची कविता फक्त वसुबारसेविषयी लिहिली असल्याने त्यात फक्त गाय आणि वासरू यांचा उल्लेख केला आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Oct 2017 - 1:08 pm | ज्ञानोबाचे पैजार

दिवाळीच्या प्रत्येक दिवसावर कविता केली आहे का? रोज एक टाका...
तसेच मागचा ब्याललॉगही लवकर भरुन काढा. कमीत कमी अक्टोबर महिन्याचा तरी काढाच. प्रसंग खालील प्रमाणे
दि. १ - मोहरम दि. २ म गांधी जयंती. दि. ५ कोजागिरी पोर्णिमा, दि. ८ संकष्टी चतुर्थी, दि. १२ कालाष्टमी, दि. १५ रमा एकादशी
वरील कवितांच्या प्रतिक्षेत
पैजारबुवा,

सूड's picture

16 Oct 2017 - 7:52 pm | सूड

__/\__

वैभवदातार's picture

16 Oct 2017 - 7:16 pm | वैभवदातार

पैजारबुवा सप्रेम नमस्कार ,

बॅक लॉग भरून काढण्यासाठी कविता मी करत नाही. जर एखाद्या विशेष दिवसासाठी सुचली तर मी लिहितो.

पूर्वी एक चतुर चाणक्य नावाचे गृहस्थ होते इथे. तेही तुमच्या कवितांसारख्याच सरस कविता लिहीत असत.

पद्मावति's picture

16 Oct 2017 - 8:11 pm | पद्मावति

समयोचित. आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2017 - 11:35 pm | अत्रुप्त आत्मा

रोज एकेक कविता करा ना गडे! ;)

पगला गजोधर's picture

16 Oct 2017 - 11:54 pm | पगला गजोधर

कपडे घालून केली तरी चालेल...

वैभवदातार's picture

17 Oct 2017 - 12:21 pm | वैभवदातार

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मी आपला आभारी आहे.