प्रशांत दामले यांच्यावर केलेली कविता ..

वैभवदातार's picture
वैभवदातार in जे न देखे रवी...
13 Oct 2017 - 12:56 pm

|| गौरवगीत ||

'टूरटूर' पासून सुरुवात केली मागे वळून नाही पाहिले
'मोरूच्या मावशी' नंतर 'ब्रह्मचारी' केले
भट साहेबांच्या साथीने नाटकात पाऊल ठेवले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले

'लिम्का बुकात' नाव तुमचे 'गेला माधव कुणीकडे'
रवींद्र नाट्य मंदिरात एक आगळे नाट्य घडे
'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' जागतिक विक्रम तुम्ही केले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले

गाणे असते श्रवणीय तुमचे गळा तुमचा गोड
सूर असती तुमचे पक्के मिळे तालाचीही जोड
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं' गाण्याने मनावर गारूड केले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले

खाण्याची तुम्हा भारी हौस चाखता पदार्थ तुम्ही चवीने
'खवय्ये' गिरी तुमची हि अनुभवली संपूर्ण महाराष्ट्राने
पाककृती करताना लोकांच्या सुख दुःखा तुम्ही जाणले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले

अचूक फेक संवादाची शब्द रुजती मना मना
अंतिम रांगेतील प्रेक्षकालाही कळतात तुमच्या भावना
कर्तृत्व वृक्ष बहरत जावो हाती पडोत नाट्यफुले
नटांमध्ये श्रेष्ठ तुम्ही प्रशांत दामले

--- शब्दांकित (वैभव दातार )
१ मे २०१७

कविता

प्रतिक्रिया

एस's picture

13 Oct 2017 - 1:04 pm | एस

कविता आवडली.

आनन्दा's picture

13 Oct 2017 - 1:54 pm | आनन्दा

मस्त आहे, फक्त ते प्रशांत दामले आहे ते श्री प्रशांत दामले करा, वृत्तात मस्त बसेल

सिरुसेरि's picture

13 Oct 2017 - 3:50 pm | सिरुसेरि

छान कविता . अरे हाय काय नाय काय ...

कविता नै कै..ती फक्त लाडांची!
ही आरती म्हणता येईल! :)

पगला गजोधर's picture

13 Oct 2017 - 5:30 pm | पगला गजोधर

हिंदी कारकिर्दीबद्दल उल्लेख नाही ???
फिल्मीचक्कर, चंद्रकांत सिढी बंबावाला ??

एमी's picture

13 Oct 2017 - 6:33 pm | एमी

ईक्स :(

सुखीमाणूस's picture

14 Oct 2017 - 9:03 am | सुखीमाणूस

आरती करायला हरकत नाही इतके प्रशान्तजीनी हसवले आहे