हिरवाईच्या गप्पा - भाग २

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in कृषी
29 Sep 2017 - 10:21 pm

हिरवाईच्या गप्पा - भाग १

हिरवाईच्या गप्पा - भाग १ बराच मोठा झाल्याने हा दुसरा भाग सुरू करत आहे.

काही दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे मिरचीला नवीन फुलोरा सुरु झाला आहे. वर्षभर फुले येणे चालूच असते पण मधूनच एकदम अशी भरपूर फुले येतात...पिवळी जास्वंदही बहरली आहे...दोन आठवड्यांपूर्वी लावलेल्या पुदिन्याच्या काड्यांनाही छान फुटवा फुट्ला आहे...हे वरचे सगळे मी काही दिवसांपूर्वी खरडफळ्यावर टाकले होते. पण निसर्गाला बहुतेक हे सगळे पाहवले नाही. आज दुपारी विजांच्या गडगडाटासकट पावसाने चांगलेच झोडपले. मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. टेरेसवरची गरीबबिचारी फुलझाडे अश्या निसर्गापुढे किस झाडकी पत्ती ! त्यांच्या पडझडीचे फोटो काढू शकलो नाही. नेहमी ताठ मानेने सूर्याकडे पाहत असलेली जास्वंदीची फुले निसर्गाच्या कोपापुढे मान खाली खालून जमिनीकडे पाहत होती. तरीही, त्यांच्यावर जमलेल्या पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात चमकवित ती लक्ष वेधून घेत होती...

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

30 Sep 2017 - 6:17 am | पिलीयन रायडर

काका, पहिले तीन फोटो दिसले. पण शेवटचे दोन दिसत नाहीत.
चला नवा धागा सुरु झाला. माझी शेती जरा मागे पडलीये. भरपूर गडबडीत आहे सध्या. पण तरीही मला मुगाचे लांब लांब मोड काढून पहायचेत. चायनीज लोक वापरतात तसे. फारच छान लागतात ते. कोरीयन पदार्थात दिसतात.
(साधारणपणे मुगाला आपण १-२ दिवसात मोड काढून वापरतो. ह्यात ६ दिवस ठेवायचे आहे.)

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2017 - 3:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता दिसतात का ?

चिनी मंडळी मुगाचे स्प्राऊट्स वापरतात व कोरियन सोयाबीनचे.

इथे एक झटपट स्प्राऊट पाकृ मिळेल.

दसर्‍यासाठी घरची झेंडूची फुले...

पिलीयन रायडर's picture

30 Sep 2017 - 6:57 pm | पिलीयन रायडर

अप्रतिम फोटो आहे काका!!

सोयाबीनचे असतात का ते?! ओके! मी काल एक कोरियन बाईचा व्हिडीओ पहिला. ती म्हणे की माझी आजी सोयाबीनचे करायची. पण तिने मुगाचेच दाखवले. मी जे खाल्ले ते कोणते होते काय माहिती...

पाकृ साठी धन्स!

योगविवेक's picture

22 Dec 2019 - 4:56 pm | योगविवेक

जुन्या आठवणी जाग्या झाल्या. गोल गोबऱ्या झेंडूचे ढीगच्याढीग पाहून या नाजुक जातीच्या झेंडूच्या आठवणी गुदमरून गेल्या होत्या. त्या जाग्या झाल्या. धन्यवाद.

कंजूस's picture

2 Oct 2017 - 5:35 am | कंजूस

फोटो आवडले.
जपानी लोक मिरिन,साके आणि मुगाचे मोड वापरून सॅलड करतात

आमच्या कारल्याच्या वेलाला कारली लागली आहेत. एक कारलं मोठं झालं होतं, पण त्याला कीड लागली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Oct 2017 - 9:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो टाका फोटो... "एस" आणि फोटो नाही म्हणजे घोर फाऊल ! ;)

फोटो काढायला कारली मोठी होऊ द्यावीत म्हणून थांबलो होतो. पण कारली मोठी होईनात. गळून पडतात. अधिक शोध घेता बोटभर लांबीची होताच कारली किडत आहेत असे दिसले. काय करता येईल? रासायनिक कीडनाशक फवारण्याचा इरादा नाही. नाहीतर मग हा वेल काढून टाकेन. तसाही आपोआप, मुद्दाम न लावता आला आहे तो.

१) परागीभवन झालेलं नसल्यास २) मुळांशी पाणी तुंबणे ३)वेल वाढताना अगोदर ओला कचरा तळाशी टाकावा. ही कारणे आहेत का पाहा.
क्र १ साठी ब्रशने पुकेसर फुलावर दुपारी बाराच्या आत पसरवा.
हल्ली नपाकडून डासांसाठी धूर मारण्यात येतो त्याने चांगले किटकमात्र मरतात.
( चांगल्या पोसल्या गेलेल्या वेलाची पाने काळसर हिरवी दिसतात.)

कारली लागतात, पण मोठी व्हायच्या आधीच कीड पडतेय.

फळमाशी असते ती फुलातच अंडी घालते. घराच्या भाजीपाल्यावर फवारा मारण्यापेक्षा बाहेरचीच भाजी बरी नाही का?
१५ फेब्रुवारी/महाशिवरात्रीनंतरचे वेल वाढवावेत - उन्हाळी भाज्या. यावेळी कीड फार कमी पडते.

ओके. मग हा वेल काढून टाकतो. नेक्ष्ट टैम.

मनिमौ's picture

27 Oct 2017 - 2:22 pm | मनिमौ

फवारा.

तंबाखू अर्क बनवला होता एकदा. चांगली किलोभर तंबाखू आणली विकत. एका मोठ्या अंघोळीच्या पातेल्यात पाणी उकळायला लावून त्यात तंबाखू खळखळून उकळवली. पण नंतर त्या पातेल्याचा वास जाईना! ;-) मग परत बनवला नाही. :-D

त्या पातेल्यात पुदीना लावा.

रामपुरी's picture

28 Oct 2017 - 2:29 am | रामपुरी

मग पुदिन्याचा वास कसा घालवणार? :)

कपिलमुनी's picture

27 Oct 2017 - 2:24 pm | कपिलमुनी

माझ्या गॅलरीसमोर ११ माळ्यांच्या इमारतीचे काम चालू आहे त्याची सीमेंतची धूळ गॅलरीमधे येते आणि त्यामुळे झाडे मरत आहेत अगदी तुळससुद्धा टिकत नाही.
दिवसातून ३ वेळा तुषार सिन्चनाचा प्रयोग करून पाने धुण्याचा कार्यक्रम केला पण उप्योग झाला नाही. नेट बसवले तरी धूळ आत येते आणि प्लाटिक टकला तर वारा, उजेड अडतो आहे.

काय करावे ?

काचा लावल्या तर वारा अडतो पण धुळ बंद होते. झाडे येतात.

कपिलमुनी's picture

1 Nov 2017 - 5:37 pm | कपिलमुनी

गॅलरीला काचा लवून बन्द करणे महापालिकेच्या नियमाच्य विरुद्ध आहे.

कंजूस's picture

2 Nov 2017 - 9:52 pm | कंजूस

टॅक्स वाढवत असतील.

एकूण पाच बोन्सायची माती बदलणे, रूट ट्रिमिंग आणि फॉलिएज ट्रिमिंग ही कामे केली. त्यातले एक फिग ट्रीचे रुट्स ओव्हर रॉक पद्धतीचे बोन्साय आणि एक वडाचे बोन्साय आता छान ट्रेन झाल्यासारखी वाटत आहेत. अजून दोनेक वर्षांनी पहिल्याचे फॉलिएज डेरेदार बनेल आणि दुसऱ्याच्या पारंब्या अजून येतील. सध्या साताठ पारंब्या आल्या आहेत. जरा दोनेक महिन्यांनी पाने चांगली फुटली की फोटो टाकतो.

अनिंद्य's picture

3 Apr 2018 - 11:21 am | अनिंद्य

५ -५ बोन्साय !
You are a rich man!

स्नेहांकिता's picture

3 Apr 2018 - 11:09 am | स्नेहांकिता

बांधकामामुळे सध्या आठ दहा कुंड्यातील सगळी झाडे मरगळली आहेत. तुळस आणि पाम मेली. पण ब्रह्मकमळ , झिपरे आणि दोन तीन शोभेची झाडे आता पुन्हा फुटू लागलीयेत. मोगऱ्यालाही फुटवे आले आहेत. फुले लागुदेत मग फोटू टाकते.

गच्चीवरील बागेत मिरच्या आणि गोकर्णची फुले लागलेली आहेत. नंतर फोटू टाकतो.
२०० लिटर वेस्ट डिकांपोजर द्रावण तयार केले आहे. कुणाला हवे असल्यास घेऊन जाणे.