मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरवाईच्या गप्पा - भाग २

डॉ सुहास म्हात्रे · · कृषी
हिरवाईच्या गप्पा - भाग १ हिरवाईच्या गप्पा - भाग १ बराच मोठा झाल्याने हा दुसरा भाग सुरू करत आहे. काही दिवसांपूर्वी पडून गेलेल्या पावसामुळे मिरचीला नवीन फुलोरा सुरु झाला आहे. वर्षभर फुले येणे चालूच असते पण मधूनच एकदम अशी भरपूर फुले येतात...

पिवळी जास्वंदही बहरली आहे...

दोन आठवड्यांपूर्वी लावलेल्या पुदिन्याच्या काड्यांनाही छान फुटवा फुट्ला आहे...

हे वरचे सगळे मी काही दिवसांपूर्वी खरडफळ्यावर टाकले होते. पण निसर्गाला बहुतेक हे सगळे पाहवले नाही. आज दुपारी विजांच्या गडगडाटासकट पावसाने चांगलेच झोडपले. मोठमोठ्या झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. टेरेसवरची गरीबबिचारी फुलझाडे अश्या निसर्गापुढे किस झाडकी पत्ती ! त्यांच्या पडझडीचे फोटो काढू शकलो नाही. नेहमी ताठ मानेने सूर्याकडे पाहत असलेली जास्वंदीची फुले निसर्गाच्या कोपापुढे मान खाली खालून जमिनीकडे पाहत होती. तरीही, त्यांच्यावर जमलेल्या पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशात चमकवित ती लक्ष वेधून घेत होती...

वाचन 94790 प्रतिक्रिया 37