सॅंडविचमधल्या टोमॅटोला
काय वाटत असेल?
कांदा बीट भेटले म्हणून
स्वत:शीच हसेल
की ब्रेडमधे दबलो म्हणून
रडत कुढत बसेल?
काकडीच्या कोंडाळ्यात
लपून बसेल,
की हिरव्यागार ढब्बूच्या
मोहात फसेल?
चिकटलेले बटर
गुपचुप पुसेल,
की चटणी झोंबली
म्हणून एकटाच रुसेल?
... पण आपण कसं ओळखायचं?
सॅंडविचमधला टोमॅटो
आपल्याला कसा दिसेल??
प्रतिक्रिया
20 Sep 2017 - 8:25 pm | माहितगार
उत्तम
20 Sep 2017 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
आपण डोक्याला
शॉट नाही लावायचा
गट्टम केल्यावर पोटात
टोमॅटोच ठरवेल, काय ते !
20 Sep 2017 - 8:36 pm | तृप्ति २३
खूप छान कविता आहे. मला खूप आवडली.
तृप्ती
http://www.truptiskavita.com
20 Sep 2017 - 8:40 pm | अनन्न्या
तुम्हीच दिलीय का