वादळ...

हर्षदा विनया's picture
हर्षदा विनया in जे न देखे रवी...
18 Oct 2008 - 3:41 pm

वादळ,घोंघावणारे, पूढेच सरसावणारं,
अश्रूच्या थारोळ्यात हळूच डोकावणारं!
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?

वादळ बाहेरेंच,वेगाने त्वेषात येणारं,
सगळंच उध्वस्त करून सोडणारं,
कि वादळ आतलं,अलगद येणारं,
कूरवाळणा-या हातांनीच ओरबाड्णारं !
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?

वादळ,तूझ्यापूढे जगाला ठाकणारं,
लक्तरे उडवून,मग तमाशा पाहणारं,
कि वादळ,तूलाच तूझ्यासमोर ठाकणारं,
आत्मपाशांच्या गूंत्यातच गूंतवणारं,
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?

वादळ, तूला नकळत उडवून नेणारं,
वाहवत-वाहवत,रानात नेऊन सोडणारं,
कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व,
स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं,
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?

वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?
तूझं-तूझं की माझे आणि तूझे??

हर्षदा (६ ओक्टो. '०८)

या अनूभवानंतर लिहीलेली कविता.. http://karadyaachhata.blogspot.com/2008/10/blog-post.html इथे आहे..

कविता

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

18 Oct 2008 - 3:47 pm | ऋषिकेश

कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व,
स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं,
वादळ कोणते ते, आतलं की बाहेरंचं?

खल्लास! मस्त ओळी
कविताही वेगळी आणि बरंच काहि सांगणारी आहे.. आवडली

-(वादळी) ऋषिकेश

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Oct 2008 - 4:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इथलं कवितारुपी आणि ब्लॉगावरचं स्फुटरुपी वादळ, दोन्हीही मस्तच पकडली आहेत शब्दांत.

अदिती

हर्षदा विनया's picture

18 Oct 2008 - 6:22 pm | हर्षदा विनया

धन्यवाद

फटू's picture

18 Oct 2008 - 10:53 pm | फटू

कि वादळ,नेस्तनाबूत करून तूझं सर्व,
स्पर्शही न करता तूला, "एकटं" सोडणारं,

या ओळी तर मस्तच आहेत !!!!!!!!

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

हर्षदा विनया's picture

19 Oct 2008 - 11:28 am | हर्षदा विनया

धन्यवाद.. तूमच्या ब्लोग वरंचं चित्र आवडले हो प्रचंड.. आधीच वाचला होता... बहूतेक तसं लिहूनही ठेवलय तूमच्या ब्लोग वर..

फटू's picture

20 Oct 2008 - 5:41 am | फटू

तो माझा भाचा आहे...

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

A ship in a harbour is safe, but that is not what ships are built for.
मुलगी बापाच्या घरी सुरक्षीत असते पण मुलींचा जन्म त्यासाठी झालेला नसतो.

विसोबा खेचर's picture

19 Oct 2008 - 4:00 pm | विसोबा खेचर

साला, लै भारी कविता आहे!

आपला,
(वादळी व्यक्तिमत्वाचा) तात्या.

हर्षदा विनया's picture

20 Oct 2008 - 9:24 am | हर्षदा विनया

>>तो माझा भाचा आहे...

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

फार गोड आहे मग.. आणि खरच शोधतोय काहीतरी असे वाटते..
आणि धन्यवाद विसोबा