वेबसाईट तयार करण्याबद्दल

Primary tabs

बाप्पू's picture
बाप्पू in जनातलं, मनातलं
19 Sep 2017 - 1:02 pm

वेबसाईट तयार करण्याबद्दल माहिती हवी आहे

मी नुकताच एक व्यवसाय सुरु केला असून माझे प्रॉडक्ट मला पुण्यामध्ये ऑनलाईन विकायचे आहे.
त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्याचा प्लॅन आहे. वेबसाईटवरच पेमेंट करण्याची सुविधा त्यावर असेल. एकदा ऑर्डर आली कि मग प्रॉडक्ट घरपोच मिळेल असं काहीसे प्लँनिंग आहे. फ्लिपकार्ट आणि ऍमेझॉन सारख्या पोर्टल वर देखील अशीच सुविधा असते परंतु मला स्वतःचे Aaplication तयार करायचे आहे. मला HTML आणि वेब डिझाईन चे ज्ञान आहे पण कोणताही व्यवसायिक अनुभव नाहीये त्यामुळे एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून हे काम करून घ्यायचे आहे.
कोणी मिपाकर वेब डिझायनिंग आणि वेब होस्टिंग मध्ये मदत करू शकेल का ?

तंत्रचौकशी

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

19 Sep 2017 - 1:47 pm | कपिलमुनी

व्यनि पहा

निनाद थत्ते's picture

19 Sep 2017 - 1:57 pm | निनाद थत्ते

नमस्कार, मी निनाद थत्ते. माझी ही मिपा वरची पहिलीच पोस्ट आहे. तरी टंकण्यातल्या चुका समजून घ्याव्यात.
मी "मेगो टेक्नॉलॉजी" या कंपनीत काम करतो(माझ्या मित्राचा स्टार्टअप आहे). आमचा "झॉनकॉन" नावाचा प्लॅटफॉर्म आहे जो आम्हीच तयार केलेला आहे. आपण वर जी गरज सांगितलीत त्यासाठी अत्यंत उपयुक्त असा हा प्लॅटफॉर्म आहे. याद्वारे आपण विविध फ्रंट एंड ना एकाच ठिकाणी नियंत्रित करू शकता (जसे अॅंड्रॉईड, आयओएस, वेबसाईट इ.) . यात ई-कॉमर्स संबंधीची सगळी "फीचर्स" उपलब्ध आहेत. हा प्लॅटफॉर्म वापरून आम्ही अॅंड्रॉईड अॅप, आयओएस अॅप आणि वेबसाईट तयार करून देतो. आपण zoncon.com आणि megotechnologies.कॉम या वेबसाईट्स जरूर पहा. आणि व्य. नि. वरून संपर्क साधा.