उपोषण

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जे न देखे रवी...
14 Sep 2017 - 3:42 pm

उपोषण

(कविता कालावधी 1996)

घुसमटणारी वेदना
धुमसणार छत
दाबायला जातो मी
होत ज्वालामुखीच तोंड

ज्वालानदी ही चिरडत वाहते
सर्व घर ती वाहुन नेते
बसतो मी मग उपोषणास
एकटा सदैव एकटा

तीन मंत्री घेऊन येतात
हातात ग्लास त्यात रस
तीन संत्रांचा असतो
पण वाटत नाही

मी तो नाकारतो
कारण त्याच्यावर माझा
विश्वासच नसतो

येतात तसे जातात
तीन मंत्री
धूळ चढते गर्दी हटते
राहते उजाड स्थळ

त्या ठिकाणी दिसते एक
निराश खिन्न वीराण शव

ते असते माझे
सतत पेटणार्याचे

राहते तसेच कारण मी
उपोषणाला बसलेला असतो

मुक्तक