सचिनचे अभिनंदन !!
कसोटी क्रिकेट मधे सर्वाधीक धावांचा ब्रायन लाराचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिनने आज आपल्या नावावर केला आहे.
मोहालीत आज आपल्या १५२ व्या कसोटी सामन्यात खेळताना सचिनने सर्वोच्च धावसंख्या केली . यावेळी प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असणे ही पण एक विशेष गोष्ट.
सचिनचे अभिनंदन तसेच या कसोटीत शतक झळकवण्यासाठी त्याला शुभेच्छा !!
प्रतिक्रिया
17 Oct 2008 - 4:50 pm | जैनाचं कार्ट (not verified)
अभिनंदन !
सचीन अभिनंदन !
पण शतक पुर्ण केलं असतंस तर बरं वाटलं असतं !
हरकत नाही .. तु खेळत राहा हेच महत्वाचे !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
17 Oct 2008 - 4:51 pm | नंदन
१२,००० धावांचा टप्पाही ओलांडला, दुर्दैवाने ४० व्या शतकासाठी १२ धावा कमी पडल्या. पीटर रोबकने लिहिलेला एज मधला हा लेखही वाचनीय.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
17 Oct 2008 - 6:26 pm | विसोबा खेचर
सचिनचे मनापासून अभिनंदन...!
एक मराठी माणूस म्हणून आम्हाला सचिनचा अभिमान वाटतो..!
तात्या.
17 Oct 2008 - 7:07 pm | संदीप चित्रे
एक भारतीय म्हणून तर सचिनचा खूपच अभिमान वाटतो; त्यातही कसोटी क्रिकेटमधे एका मराठी माणसाच्या पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट जगाचा सम्राट होणार्या ह्या दुसर्या मराठी माणसाचा विलक्षण अभिमान वाटतो :)
17 Oct 2008 - 8:43 pm | कोलबेर
एक भारतीय म्हणून तर सचिनचा खूपच अभिमान वाटतो
--------------------------------------------------
cricket is an Indian game accidentally invented by the British.