हल्ली शेकडा ९९% पेपर आणि वृत्तवाहिन्यांवर केवळ आणि केवळ राजकारणाशी संबंधित बातम्यांचा रतीब पहायला मिळतो. पेपरात पहिलं पान राजकारण . . . टीव्हीवर बातम्या लावल्या की राजकारण . . . . अतिरेक झालाय असं नाही का वाटत ? मी तर अतिशय उबगलोय बुवा . . . राजकारण हा जीवनाचा एक भाग असू शकतो पण तो इतका महत्वाचा आहे का की त्याचा इतका उदो उदो करावा ? जो प्रकार भारतात क्रिकेटचा तोच देशाच्या राजकारणाचा . . . . गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळी, राज्य पातळी, देश पातळी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चालणारं राजकारण हेच सामान्य माणसाचं आयुष्य आहे का ? ते सोडून दुसरं काही महत्वाचं नसतं का ? राजकारणाचा नक्की उगम केव्हा आणि कशासाठी झाला असावा ?
काही लोकांना नाही समजत ह्या घडामोडी आणि त्यांचं महत्व . . . . मग ते जगात रहायच्या योग्यतेचे नाहीत का ? मागे कोणी कोणाला कसा शह दिला आणि काय घडलं ह्या वायफळ गोष्टी आपल्या आधीच कमी साठवणूक क्षमता असलेल्या मेंदूत साठवून ठेवून वेळी अवेळी दुसऱ्या माणसाच्या तोंडावर घडाघडा बोलता आलं म्हणजे आपण काही फार मोठा तीर मारला असं काही असतं का ? मिठाने जेवण चविष्ट होतं म्हणून कोणी मिठाचीच भाजी आमटी करुन खात नाही तसंच राजकारण नाही का ?
प्रतिक्रिया
20 Aug 2017 - 6:19 pm | अत्रे
मला तर वाटते मीडियामध्ये केवळ वरवरच्या बातम्या देतात. राजकारण प्रत्यक्षात कसे चालते हे दाखवण्याचे पत्रकारांची हिम्मत नसते.
20 Aug 2017 - 6:29 pm | पगला गजोधर
मानव समाजशील प्राणी आहे, समजकारण व राजकारण यांच्या एकमेकात तंगडया गुंतलेल्या आहेत. समुहाबाहेर राहणाऱ्या व्यक्ति कदाचित राजकारणापासुन अलिप्त राहतीलही....
बहूतकरुंन जिथे मनुष्य समूह असतो, तिथे तिथे राजकारण असतेच ....
20 Aug 2017 - 8:46 pm | chintamani1969
हे मात्र खरं आहे.आजकाल ३ c (crime,cricket,cinema)ला फारच महत्व यायला लागल आहे.आणि स्पर्धेत उतरल्याने जवळपास प्रत्येक वृतपत्र वा वाहिनी एक सारखेच वाटायला लागले आहेत .
20 Aug 2017 - 9:48 pm | अमरेंद्र बाहुबली
सहमत
21 Aug 2017 - 9:50 am | पगला गजोधर
बाकी, कुक्कुटशर्विलक-प्रतिपालक भक्तांनी, राजकारणाच्या नावाने नाके मुरड़ताना पाहणे, म्हणजे शाहजोगपणा हैटट आहे...
21 Aug 2017 - 10:19 am | बोका-ए-आझम
सहिष्णू वातावरण होतं, सगळे आपापली कामं करत होते, अतिरेकी येऊन निमूटपणे हल्ले करुन जात नव्हते, रेल्वे अपघात होत नव्हते, इन्सेफॅलायटीसचा शोध पण लागलेला नव्हता, देशात लोकशाही होती, एका अत्यंत सेवाभावी घराण्याची तितकीच सेवाभावी सत्ता होती. त्यामुळे लोकांना बातम्या नाही कळल्या तरी फरक पडत नव्हता. पण मे २०१४ मध्ये देशावर अंतर्गत परचक्र आलं. असहिष्णुता वाढली, एका ठराविक धर्माच्या लोकांना जगणं मुश्किल झालं. त्यामुळे आता वर्तमानपत्रांत आणि इतर ठिकाणी येणाऱ्या बातम्या हाच काय तो आधार राहिलेला आहे.
21 Aug 2017 - 11:17 am | मी-सौरभ
भाजपा मुळेच ही अवस्था आलीये देशावर
21 Aug 2017 - 1:31 pm | मोदक
+१
२०१४ पूर्वी असहिष्णुता नव्हती.
लोकांना मोदीभक्त, मोदीरूग्ण असे विनाकारण संबोधून त्यांचा अपमान करण्याची गरज भासत नव्हती.
समोरच्याचा मुद्दा बरोबर असला आणि आपल्याकडे उत्तर नसले की "तू भक्तच आहेस" अशी पळवाट काढावी लागत नव्हती.
महत्वाचे म्हणजे अशा फालतू प्रकाराला वैतागून समोरच्या प्रत्युत्तर दिले की "बघ बघ म्हणजे तू भक्तच आहेस" असे शेपूट घालण्याचीही आवश्यकता भासत नव्हती.
समोरच्याला उचकवताना (आपण ओवेसीची औलाद असल्याच्या थाटात) तुमचे पंतप्रधान, तुमचे मोदी अशा लेव्हलला संभाषण न्यावे लागत नव्हते.
सगळे सुशेगात होते. :))
21 Aug 2017 - 1:15 pm | सुखीमाणूस
पेपरवाले सध्याच्या सरकारच्या मागे लागलेत.
एवढे आधीच्या सरकारच्या मागे लागले नव्हते
आता निवडणूका जवळ येतायत तेव्हा अजून वाढेल हे सगळे
पण सरकार वरचा असा अंकुश चांगला आहे की कारण भाजपा मधे आयात फार वाढली आहे. आणि सत्तधारी माजायला वेळ लागत नाही
मला स्वताला २०१९ मधे भाजपा सत्तेवर आणि त्यांच्यावर media चा अंकूश हेच model चांगले वाटते आहे.
इतर कोणतेही सरकार आले तर माझ्या खापर पणत्या नक्की बुरख्यात आणि बिच्चार्या असतील.
मला भाजपा सरकारमुळे हिंदू प्रतिगामित्व वाढण्याची तेवढी भीती वाटत नाही कारण अंकूश ठेवणारे खूप आहेत
21 Aug 2017 - 1:30 pm | पगला गजोधर
म्हणजे नक्की काय ?
"मीडियाचा अंकुश" म्हणजे नक्की काय ?
30 Aug 2017 - 9:50 am | भंकस बाबा
हाणला च्यामायला
21 Aug 2017 - 10:42 am | मी-सौरभ
तुम्ही हे सगळं सोडा आणि कविता लिहायला लागा. मग तुम्हाला जग रंगीबेरंगी दिसू लागेल.
टीव्ही वर न्यूज लावू नका, पेपर घेणं बंद करा. आयुष्यात मजा परतून येईल आणि उबग पळून जाईल.
21 Aug 2017 - 10:58 am | अमरेंद्र बाहुबली
खरय! जळी स्थळी काष्ठी पाषाणी तेच राजकारण आणी तेच फालतू क्रिकेट. त्यांची च चर्चा. आग लागो....!
ईतक बरं मुलींना या दोन्ही गोष्टी समजत नाही. तरी त्यांच्या ईतक्या गप्पा चालतात. समजलं असतं तर.......!
21 Aug 2017 - 11:02 am | बोका-ए-आझम
बरखा दत्त आणि मायंती लँगर यांनी काय करावे ब्रे?;)
21 Aug 2017 - 11:07 am | कपिलमुनी
लँगर बाईंना काय बोलायचं काम नाय !
बेष्ट हैत !
म्याच मध्ये दुसरा काय बी बघण्या सारखा नाय
21 Aug 2017 - 1:20 pm | मोदक
लँगर बाईंना काय बोलायचं काम नाय !
बेष्ट हैत !
प्राडॉ वेगळा पुरूष विभाग यासाठी मागत होते तर..
21 Aug 2017 - 11:13 am | पगला गजोधर
बरखा दत्त आणि मायंती लँगर यांनासुद्धा अनाहिता सदस्यत्व देण्यात यावे..…
21 Aug 2017 - 12:29 pm | अमरेंद्र बाहुबली
बरखा दत्त?? ती नक्की बाई आहे का??
21 Aug 2017 - 1:00 pm | अत्रे
डाउट का यावा?
21 Aug 2017 - 11:05 am | अभ्या..
बघा की राव, आजकाल साहित्य, टुकार गाण्याचे विडंबन असल्या गोष्टीत पण लोक राजकारण आणतात, गचाळ धंदे नुसते.
3 Sep 2017 - 7:32 pm | पगला गजोधर
व्हॉट्सअॅप चाणक्य उवाच . . .
गॅस सिलिंडरच्या किंमती वाढविणे हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे .
आतंकवादी महाग गॅस विकत घेऊ शकणार नाहीत , त्यामुळे चुलीवर स्वयंपाक करतील . दूरवरून दिसणारा धूर पाहून भारत ताबडतोब सर्जिकल स्ट्राईक करेल .
नोटबंदीच्या अपार यशानंतर गॅस सिलिंडर च्या किंमती वाढविणे हे आतंकवाद निर्मूलनाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे .