ताज्या घडामोडी - ९

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
7 Aug 2017 - 11:23 pm

१५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.

प्रतिक्रिया

अभिजीत अवलिया's picture

18 Aug 2017 - 3:51 pm | अभिजीत अवलिया

ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४ पासून) इन्फोसिसमध्ये कार्यरत नाहीत. ते आता फक्त एक भागधारक आहेत, जसे इतर अनेक जण आहेत. ते संचालक मंडळ किंवा सल्लागार अशा कोणत्याही भूमिकेत नाहीत

मूर्ती Additional Director ह्या पदावर आहेत ना. AD ला किती अधिकार असतात हे माहित नाही.

गामा पैलवान's picture

18 Aug 2017 - 12:35 pm | गामा पैलवान

अमितदादा,

जे पुष्पक विमानाचे दावे करतायत त्यांनी ते ग्रंथ वाचून हे विमान बनवून दाखवावं,

आज इसरोने अंतराळात मंगळयान सोडलं आहे. कोणतंही एक पुस्तक वा चित्रं (=ड्रॉईंग) वाचून मंगळयान बनवणं शक्य नाही. म्हणून मंगळयान अस्तित्वातच नाही असं म्हणणार का?

सांगायचा मुद्दा काये की प्राचीन पुस्तक ही पहिली पायरी आहे. तिथपासून सुरुवात करून गाळलेल्या जागा स्वत:च्या बुद्धीने भरून काढून प्रत्यक्ष निर्मिती केली पाहिजे. तुमच्यासारख्या विज्ञानाविषयी सजग असलेल्या माणसाने विनोदी व्याख्यान वगैरे शेरे मारू नयेत, असं मलातरी वाटतं.

आता विषय निघालाच आहे तर प्राचीन भारतीय विमानविद्येविषयी एक निरीक्षण नोंदवावतो. यासंबंधी जिज्ञासूंना सर्वात जास्त रस विमानं उडवण्यात नसून तदानुषंगिक धातुशास्त्रात आहे (संदर्भास इंग्रजी दुवा : http://vaimanika.com/VymanikaShastraRediscovered/VSR.html#CHAPTER14 ). माझ्या मते प्राचीन विमानं उडवण्यात बाह्याकारापेक्षा धातुसिद्धी अधिक महत्त्वाची आहे. याउलट आजच्या विमानात बाह्याकार जास्त महत्वाचा आहे.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Aug 2017 - 6:38 pm | गामा पैलवान

ता.घ. - १० नामे नवीन धागा खोलला आहे. कृपया तिथे लिहिणे.

धन्यवाद!

-गा.पै.

सिद्धार्थ ४'s picture

29 Aug 2017 - 5:29 pm | सिद्धार्थ ४

आशा आहे मुंबईत असणारे सगळे मिपाकर ठीक आहेत