या भल्या पहाटे थोडे
मी तुझेच गाणे गावे
अन गात्रा मधले कोडे
अलगद सुटून जावे
ती वीण मखमली मनाची
अन श्वास समर्पित व्हावा
त्या जगनियंत्यासाठी
हा देहच निमित्त व्हावा
विरघळून जावे अलगद
मी पण माझे नुरावे
त्या अक्षय सुखामध्ये मी
अवचित भान हरावे
ते नकोच लौकिक जगणे
अन श्वासही संकोचावा
तू माझा अन मी तुझाच
हा भोगच अक्षय व्हावा
मी भरून पावलो अवघा
ही तुझीच मिठी अवखळ
मी विरून हलका होतो
अक्षय अविरत निर्मळ
- बंगलोर , १ ऑगस्ट २०१७, ०६.३६ वाजता
प्रतिक्रिया
3 Aug 2017 - 11:11 pm | नीलमोहर
'मी विरून हलका होतो
अक्षय अविरत निर्मळ'
सुंदर..
4 Aug 2017 - 1:23 am | पैसा
आवडली
4 Aug 2017 - 5:29 am | यशोधरा
सुरेख!
4 Aug 2017 - 10:19 am | ज्ञानोबाचे पैजार
कविता प्रचंड आवडली आहे...विशेषतः
पैजारबुवा,
4 Aug 2017 - 12:06 pm | पद्मावति
सुरेख!
4 Aug 2017 - 1:40 pm | चांदणे संदीप
मस्त कविता! आवडलीच!
Sandy
4 Aug 2017 - 4:36 pm | अभ्या..
विटूकाका, नुरावेसारखे थोडे प्राचीन शब्द सोडता कविता/मुक्तक्/प्रकटन प्रचंड आवडलेली आहे.
तुम्ही खूप लिहावे अशी प्रार्थना.
4 Aug 2017 - 10:07 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह व्वा! बहुत सुंदर!
4 Aug 2017 - 11:16 pm | रुपी
सुंदर!
7 Aug 2017 - 1:54 pm | हृषीकेश पतकी
कविता उत्तम जमली आहे!!
8 Aug 2017 - 3:29 pm | विटेकर
सर्वांचे मनःपूर्वक आभार !
मी पहिल्यान्दा कविता लिहिण्याचा प्रयत्न केला , पूर्वी विडम्बने पुष्कळ केली ..
पाहतो पुढे कसे जमते ते !