'उषःकाल होता होता' हे सुरेश भटांचे गीत मी 'आठवणीतली गाणी' या संस्थळावर वाचले व ऐकले.
मूळ गाण्यात ६ कडवी आहेत पण, त्याच्यारेडिओवरील ध्वनीमुद्रिकेत मात्र ४ च कडवी आहेत. गाळलेली २ कडवीही सुंदर आहेत हे लक्षात आले.
तसेच हे गाणे 'सिंहासन' चित्रपटात असल्याचे तेथे लिहीले आहे. माझी शंका अशी आहे की हे गीत या चित्रपटाच्या खूप पूर्वीच लिहीले होते का व नंतर या चित्रपटासाठी घेण्यात आले? म्हणून ती २ कडवी वगळली आहेत का ?
प्रतिक्रिया
3 Aug 2017 - 7:29 pm | एस
गीत आधी लिहिले होते. चित्रपटात ते नंतर घेण्यात आले. अशी उदाहरणे इतरही अनेक कवींच्या कवितांबाबत पहायला मिळतात. उदा. आरती प्रभू, ग्रेस इत्यादी.
3 Aug 2017 - 8:26 pm | गामा पैलवान
अवांतर :
भटसाहेबांच्या 'तरुण आहे रात्र अजुनी' या गीतातही एक अतिरिक्त कडवं आहे. आशाबाईंच्या गाण्यात येत नाही ते.
-गा.पै.
3 Aug 2017 - 8:27 pm | कुमार१
आभार, एस.
ज्यांना हे गीत आवडते त्यांनी ती २ कडवी जरूर वाचावीत.
5 Aug 2017 - 11:06 am | कुमार१
'उषःकाल होता होता' चे गजानन कागलकर यांनी केलेले 'सायंकाळ होता होता पुन्हा वीज गेली' हे विडंबन छान आहे.