आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
युवराजांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
युवराज उठतील, ट्रिपलसिट बाईक वर बसतिल
निलाजरे ते फोटो काढुनि देशी थाई ते पळतिल
जो कोण ह्यांना अडवील, जो कोण ह्यांना रडवील
अडवणूक त्या करणार्यांची हे चिन्यांकडे करतिल फिर्याद
संघर्ष यात्रेचि फौज निघे, हातात त्यांच्या लाडु पेढे
अतिव गाति बारबालेचे अन चरस्याचे गुणगान
पडुन राहु निपचित आता २०१९ ला खाउ लाथा
नाहितर मांडु चिनि-पाकड्यांसोबत ठाण
गुरूवर्य साने गुरुजिंचि माफि मागुन. ____/\___
रा.रा. युवराज ह्यांच्या चरणि हे आयुष्यातले पहिले काव्यकमल सादर.
प्रतिक्रिया
15 Aug 2017 - 3:55 pm | धर्मराजमुटके
छान जमले आहे विडंबन ! अजुन येऊद्या..