या वेड्याला न कसला लोभ , ना कुणाचा राग

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture
सिद्धेश्वर विला... in जे न देखे रवी...
12 Jul 2017 - 2:29 pm

या वेड्याला

न कसला लोभ , ना कुणाचा राग

नको इस्टेट , नकोय कसला वाद

हवाय तो फक्त आणि फक्त

वाचकांचा आशीर्वाद

भावनांच काय ते

त्या तर येतचं असतात

काही उमटतात पत्रावर

तर काही

पंचतत्त्वी विलीन होतात

या मनातील लाव्हास जर मिळेल

आपुल्या प्रेमाचे इंधन

शब्दांचा वणवा मग भडकेल असा काही

नसेल त्याला कुठलेच बंधन

पर्वणीची त्या वाट पाही

सरस्वती ती उभीच राही

चारी दिशा बघत राही

साद तरी येत नाही

साद तुम्ही द्याल तर

पेटून उठेन मी

अन नाही दिलीत साद तर

आतल्या आत मिटेन मी

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

कविता

प्रतिक्रिया

जेनी...'s picture

12 Jul 2017 - 5:04 pm | जेनी...

ह्म्म...

खरं सांगायचं तर तुमच्या मिटण्याकडेच सगळे डोळे लावुन बसलेत :D

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

12 Jul 2017 - 5:22 pm | सिद्धेश्वर विला...

तुझ्यासारख्या मायाळू ? बहिणी आहेत

लाडक्या दादाला सांभाळायला

कुणाच्यात ती हिम्मत आहे

जन्माला यायचाय आपल्याला मिटवायला

करून पाहिलं साऱ्यांनी

हाती काय नाय लागलं

ह्ये येगळंच हाय पाणी

समजलं कि नाय ,, ताय जेनी

सुज्ञ's picture

13 Jul 2017 - 12:57 pm | सुज्ञ

कधी मिटताय . सोडवा आम्हाला

सिद्धेश्वर विलास पाटणकर's picture

17 Jul 2017 - 1:59 pm | सिद्धेश्वर विला...

वाह रे वाह सुज्ञ

आम्ही चार दिवस गोवाभ्रमणावर

म्हणून अनभिज्ञ

आजच आलो परतुनी

नाळ निसर्गाशी जोडुनी

करू शकता परत चालू आपण

अभिप्रायाचा यज्ञ

सुदैवाने आम्ही आहोत

या विभागात तज्ज्ञ