शिवसेना..... ???

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
11 Jul 2017 - 8:03 pm
गाभा: 

शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 2:41 pm | श्रीगुरुजी

पण होते कसे की या शिवसेनेने वर्षानुवर्षे 'मराठी बाणा' ही अफूची गोळी लोकांना देऊन ठेवली आहे. ती गोळी एकदा घेतली की महापालिकेचे खरे काम काय आहे, काय करणे अपेक्षित आहे, ते काम योग्य पध्दतीने केले जात आहे का वगैरे प्रश्न म्हणून पडत नाहीत लोकांना. मुंबईच्या अनेक भागात या अफूच्या गोळीचा प्रभाव अजूनही आहे पण इतर बर्‍याच भागातून कमी झाला आहे हेच त्यातल्या त्यात समाधान.

'मराठी बाणा' ही एकमेव अफूची गोळी शिवसेना देत नाही. 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे', 'विदर्भ वेगळा करण्याचा डाव आहे', 'महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कारस्थान आहे', 'महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला हलविण्याचे कारस्थान शिजत आहे', 'मुंबईत मराठी माणसाला अल्पसंख्य करण्याचा कट आहे', 'दिल्लीत महाराष्ट्राला किंमत नाही', 'मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा डाव आहे' अशा अनेक अफूच्या गोळ्या शिवसेना वेळोवेळी देत असते.

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 2:33 pm | श्रीगुरुजी

पेडणेकर बाईंनी आज अजून एक नवीन ओळ रचली. "मलिष्का, तुझ्या घरात सापडल्या अळ्या . . . अळ्या" अशी ओळ पेडणेकर बाई व तिच्या मागचे ४-५ जण म्हणताना दाखवित होते. ताल, सूर, यमक इ. गोष्टींचा पत्ताच नव्हता. मलिष्काला रोज लक्ष्य करून आपणच लाफिंग स्टॉक बनलेलो आहोत हे समजण्याइतकी यांच्या बुद्धीची पातळी नाही.

प्रसाद_१९८२'s picture

20 Jul 2017 - 3:11 pm | प्रसाद_१९८२

ह्या पेडणेकर बाईंना, त्या मलिष्काचे धड नाव म्हणता येत नाही ! आणि चाललेत गाणे म्हणायला.
अक्षरश: मुर्खांचा बाझार झालाय शिवसेना पक्ष, कोण कधी काय विधान करेल, हे त्यांच्या त्यांना कळत नाही.

सुज्ञ's picture

20 Jul 2017 - 6:02 pm | सुज्ञ

एकुणात शिवसैनिक आणि सेना या नावाला साजेशी सर्व वर्तणूक चालू आहे. . मागे याच सेना खासदाराने एअर इंडिया कर्मचाऱ्याला हणल्यावर यात एअर इंडिया च काशी चुकीची आहे अशा आशयाचे प्रतिसाद यांच्या समर्थकांकडून त्या धाग्यावर आले होते. असल्याही गोष्टीना समर्थन देणाऱ्या लोकांची कीव वाटली पण सेनासमर्थक म्हटल्यावर त्याचे काही विशेष वाटले नाही कारण दुसऱ्याला झापडणे, फोडणे ,शाई फेकणे ,आक्रस्ताळे पणा करणे , आपल्याविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हीच यांची संस्कृती आहे आणि हेच शिवसेनेने केलेले आत्तापर्यंतचे ठळक काम आहे. . आताच्या मालिष्का प्रकरणाने हे पुनश्च अधोरेखित झाले.

सुज्ञ's picture

20 Jul 2017 - 6:14 pm | सुज्ञ

व्यंगचित्र ही यांची खास कला

तर फडणवीस दोन बैलांच्या पाठीवर हलकेच थाप मारून आपले शेत नांगरून घेत आहेत असे व्यंगचित्र डोळ्यासमोर आले. बैलांच्या पाठीवर अर्थातच कोणत्या पक्षाचे नाव लिहिले असावे बरं ?

अभ्या..'s picture

20 Jul 2017 - 6:48 pm | अभ्या..

एएमायएम आणि गोरक्षक?

गोरक्षक नावाचा पक्षही तयार झाला का..?

काही कल्पना नाही, कुठला पक्ष, कुठली संघटना, कुठला आश्रम, कुठली परिषद अन कुठला परिवार ह्यात फरकच कळेणासा झालाय. कधी तेच आम्ही म्हणतात कधी शिव्या देतात.

याच कारणासाठी नेत्याने आपला आणि पक्षाचा प्रभाव टिकवून ठेवण्याची गरज असते. सोबत लोकांचे पाठबळ असो की नसो..

सुबोध खरे's picture

20 Jul 2017 - 7:27 pm | सुबोध खरे

एम आय एम आणि भाजप ला पाठिंबा
म्हणजेच अच्छे दिन आ गये हे नक्की

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 7:34 pm | श्रीगुरुजी

शिवसेनेबद्दल आता जास्त बोलण्यासारखे काहीही नाही. शिवसेनेसंबंधी जवळपास सर्व गोष्टी इथे आलेल्या आहेत. जर सेनेबद्दल नवीन काही माहिती आली तर त्यावर लिहीन. अन्यथा या धाग्याला अखेरचा जय महाराष्ट्र!

अरेरेरेरेरे, गुर्जी तुस्सी ना जाओ.
तुम्हीच नाही मग काय उपेग इथे येऊन? चांगला टाईमपास धागा होता हो.
.
असो. जय महाराष्ट्र तर जय महाराष्ट्र.

वरुण मोहिते's picture

20 Jul 2017 - 7:59 pm | वरुण मोहिते

आपल्याकडे सगळ्या पक्षांच्या इत्यंभूत माहित्या असतात . त्यामुळे सेनेसाठी धागा पेटवत राहा . हे बावळट प्रकार ,वैचारिक फालतूपणा , अक्कलशून्य निर्णय तर भाजप ने कित्येक दा घेतले आहेत .
राहता राहिला मुद्दा मलिष्काचा तर त्याला काही लक्ष देण्याची गरज नव्हती . अशी गाणे पेड असतात . पावसाळा आला कि चालू . कुठले शहर दाखवा कि जिथे इतके ट्रॅफिक ,इतकी लोकसंख्या ,इतका ताण असून नीट चालते हो . ट्रॅफिक चा अंदाज आहे का मुंबईच्या ???त्यात ३ भागात कार्यकारणी निर्णय झालेत एमएमआरडीए कडे अर्धी सूत्रे आहेत . जेवढी लोक बोलता आहेत त्यांनी कधी स्टॉर्म वॉटर चे अजस्त्र प्रोजेक्ट पाहिलेत का सध्याचे ?? नसतील पहिले तर या मी स्व खर्चाने घेऊन जातो .दंगलीवर नावे ठेवणे तर हाहाहा . जे मूळ मुंबईत राहतात ना त्यांना विचारा. पेपरात वाचून आणि मोठं मोठे प्रतिसाद देऊन काहीच कळत नाही . त्यामुळे दुर्लक्ष केलेलंच ह्या धाग्यावर . ती भाषा आणि ते लोकांचे बोलणे ऐकून . असो . मलिष्का सारख्या मुलीकडे लक्ष द्यायचे कारण नव्हते म्हणून हा प्रतिसाद . बाकी चालुद्या .
मुलुंड पासून व्हीटी पर्यंत इस्टर्न वेस्टर्न हायवे ला खड्डे किती हे माहित नसून पोकळ बाता मारत राहणाऱ्यांसाठी शुभेच्छा . कुठले रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे माहित नसून पेपर वाचणार्यांना शुभेच्छा . नालेसफाई च्या ऐवजी राज्य सरकार कडे मागे लागा झोपड्या उठवा. कसला नाही अंदाज आणि लागली लोक बोलायला .

हतोळकरांचा प्रसाद's picture

20 Jul 2017 - 10:00 pm | हतोळकरांचा प्रसाद

एकाच पक्षाशी नाळ जोडून घेतली की करावं लागतं असं! उरलेल्या पक्षांचे वाभाडे काढताना आपण जे मुद्दे वापरत आहोत तेच मुद्दे स्वतःच्या आवडत्या पक्षाला लागू होतात एवढा साधा सारासार विचारही न करता स्वतःचा दांभिकपणा उघड होतोय याकडे दुर्लक्ष करायचे. मुंबईचा खड्डा दिसला की त्यात हळूच दगड टाकून किती खोल आहे ते बघायचे आणि पुण्याचा दिसला की हळूच खड्ड्यावरून ढांग टाकून निघून जायचे! चालायचेच!

हळूच खड्ड्यावरून ढांग टाकून निघून जायचे!

==>> जबरा..!!

सुज्ञ's picture

20 Jul 2017 - 10:26 pm | सुज्ञ

बोलण्यासारखे नसले की एकाच पक्षाला बांधील , पेड ट्रोल , धागा पेटवत रहा वगैरे बाष्कळ आणि खवचट बोलले आपण शहाणे ठरत नसतो . असो . गुरुजींनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेनेची जवळपास बरीचशी लक्तरे आता इथे टांगली गेली आहेत. आता ढाल ,तलवारी , केलीच नसलेली फुटकळ कामे , दुसर्यांना टोमणे मारणे इत्यादींवर सेनासमर्थकांनी हा धागा त्यांना हवा असल्यास पुढे न्यावा व सेना नावाच्या बेडकीला अजून फुगवत ठेवावे .

सेनेचे भविष्य काय हे मात्र या धाग्याने नक्कीच दिसून आले .

जय महाराष्ट्र

हतोळकरांचा प्रसाद's picture

21 Jul 2017 - 1:38 pm | हतोळकरांचा प्रसाद

प्रतिसाद नीट न वाचता, त्यात मांडलेल्या मुद्द्यांपैकी आपल्याला उत्तर देता येईल किंवा सोयीस्कर असेल तो मुद्दा उचलायचा आणि परत आपलाच मुद्दा खरा करायचा याने कोणाची लक्तरे टांगली जातात हे उघडच आहे.

बाकी सेनासमर्थक वगैरे ओढून ताणून आणलेले शब्द दुर्लक्ष कारण्याजोगेच आहेत म्हणा! बाकी ते दुसर्यांना टोमणे मारणे वगैरेतला विरोधाभास दिसत नसतोच म्हणा! बाकी खाली गेलेला धागा कोणत्या प्रतिसादांनी वर आला हे पहिले तर कोणाला काय फुगवत ठेवायचे आहे ते सहज कळते!

गॅरी ट्रुमन's picture

21 Jul 2017 - 1:52 pm | गॅरी ट्रुमन

एकूणच हे खड्डे प्रकरण जितक्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे सगळ्या सेनासमर्थकांना झोंबले आहे त्यावरून त्यासाठी महापालिकाच जबाबदार आहे असे म्हणायला नक्कीच वाव आहे. शिवसेनेचे बर्‍याच अंशी केजरीवालटाईप झाले आहे. थोडेसे काही केले की त्याचे श्रेय घ्यायला सगळ्यात पुढे आणि एखादी गोष्ट करता आली नाही की मग त्यामागे राज्य सरकारने घेतलेले, एम.एम.आर.डी.ए ने घेतलेले निर्णय जबाबदार, इतरांना काहीही माहित नाही वगैरे वगैरे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

21 Jul 2017 - 2:08 pm | हतोळकरांचा प्रसाद

वाव कशाला त्यांचीच जबाबदारी आहे ती! म्हणजे त्या गाण्यावर रस्त्यात खड्डे नाहीयेत किंवा बऱ्याच अंशी कमी झाले आहेत किंवा तुम्हाला जिथे दिसतील त्या भागातल्या नगरसेवकाला (किंवा महापालिकेला) कळवा अशी काही प्रतिक्रिया यायला हवी होती. ते सोडून त्या आरजेवर वक्तव्य करणे हे अत्यंत चुकीचे आणि अपरिपक्वतेचे वाटले. बाकी रस्ते खरेच खूप वाईट अवस्थेत आहेत का यावर कुणी मुंबईकर प्रकाश टाकू शकतील.

बाकी रस्ते खरेच खूप वाईट अवस्थेत आहेत का

हा लेख वाचा

Scumbag millionaires: The men who've made a bloody mess of Mumbai's roads
http://www.mid-day.com/articles/scumbag-millionaires-the-men-whove-made-...

थिटे मास्तर's picture

24 Jul 2017 - 9:52 am | थिटे मास्तर

अफजुल खान, पाठीत खंजिर, मावळा, वाघाचा पंजा, Bla...Bla...
आपला पगार किति आपण बोलतो किती

चिऊसेना ;)

मार्मिक गोडसे's picture

24 Jul 2017 - 12:36 pm | मार्मिक गोडसे

त्यात ३ भागात कार्यकारणी निर्णय झालेत एमएमआरडीए कडे अर्धी सूत्रे आहेत . जेवढी लोक बोलता आहेत त्यांनी कधी स्टॉर्म वॉटर चे अजस्त्र प्रोजेक्ट पाहिलेत का सध्याचे ??

करेक्ट. ह्याचबरोबर गेल्यावर्षी २००० कोटीची भुयारी पाणी योजना पुर्ण झाली ह्याची शिवसेनेलातरी माहीती आहे कि नाही कोण जाणे. कारण नुकत्याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या, निवडणूक प्रचारात शिवसेनेनेने मुंबईकरांसमोर ह्या कामाचा उल्लेख केल्याचे आठवत नाही. खरंतर ह्या योजनेमुळे मुंबईकरांना विनाअडथळा पाणी उपलब्ध होणार आहे, पाणी चोरी, पाणी गळती थांबणार आहे. मुंबई महानगरपालीकेला 'ब्रिमस्टोवॅड' योजनेत अनेक अडथळे येत आहेत. भविष्याच्या विचार करुन ब्रिमस्टोवॅडची कार्यक्षमता दुप्पट केली जाणार आहे.

जेवढी लोक बोलता आहेत त्यांनी कधी स्टॉर्म वॉटर चे अजस्त्र प्रोजेक्ट पाहिलेत का सध्याचे ?? नसतील पहिले तर या मी स्व खर्चाने घेऊन जातो

मला असे प्रोजेक्ट बघायला खूप खूप आवडेल. हवे तर जो काही खर्च असेल तोही करायलाही तयार आहे. पण हे बघण्याची संधी असेल तर मला प्लीज कळवा.

थिटे मास्तर's picture

27 Jul 2017 - 4:48 am | थिटे मास्तर

मला पण असे प्रोजेक्ट बघायला आवडणार हवे तर माझा जो काही खर्च असेल तोही करायलाही तयार आहे. प्लीज कळवा.

श्रीगुरुजी's picture

24 Jul 2017 - 2:40 pm | श्रीगुरुजी

धागा परत जिवंत झालेला दिसतोय.

प्रसाद_१९८२'s picture

24 Jul 2017 - 2:45 pm | प्रसाद_१९८२

कार्याध्यक्ष सध्या सामनातून स्वत:च, स्वत:ची मुलाखत घेण्यात मग्न आहेत. स्वत:ला प्रश्न तेच विचारतायत व त्या प्रश्नाची उत्तरे देखिल ते स्वत:च देत आहेत.
शिवाय हि मुलाखत इतकी हास्यस्पद आहे की वाचवत देखिल नाही.
--

टोकाचं भांडण होऊनही भाजपसोबत आम्ही सत्तेत आहोत ते केवळ महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठीच मी कमीपणा घेतला असं समजा असं सांगत उद्धव यांनी शिवसेनेचे नाराजी उघड केली.

--
महाराष्ट्रासाठी कमीपणा घेतला होता मग ह्यांचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन कश्याला फिरत होते.

विजुभाऊ's picture

10 Feb 2020 - 6:39 am | विजुभाऊ

परिस्थिती फारशी बदलेली आहे असे दिसत नाही.
सेना हतबल झालेली दिसते इतकेच. त्यांना थोडेसेही शहाणपण आलंय असे ही दिसत नाही

गेल्या साडे चार वर्षात सेनेचा आलेख उतरताच राहिलाय.
आता तर बाळासाहेबांची सेना ऐवजी राउतांची आणि परबांची सेना, बारामतीच्या काकांची अंकीत सेना असे चित्र दिसायला लागलेय

मुक्त विहारि's picture

11 Feb 2022 - 7:19 pm | मुक्त विहारि

वसंतराव नाईक ते सोनिया गांधी, असा आहे ....