शिवसेना..... ???

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
11 Jul 2017 - 8:03 pm
गाभा: 

शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्‍या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

15 Jul 2017 - 4:14 pm | अभ्या..

आणि एक, मुख्य प्रश्न आपण विचारलात सेनेने काय केले?
लहानपणापासून आठवतेय रुग्णवाहिका म्हणली तर सेनेचीच असायची, वेळेला धाऊन येणारा माणूस सेनेचा असायचा. आता इस्पितळे अन रुग्ण्वाहीका हे दोन्ही व्यवसाय काय लेव्हलला पोहोचलेत ह्याची चर्चा करण्यापेक्षा एखाद्या पक्षाने जनतेसाठी अशा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे दुसरे उदाहरण आठवत नाही.
अगदी ह्या वर्षभरातले उदाहरण घ्यायचे झाले तर (ह्यात निम्मा कालावधी तर इलेक्शनांतच गुंतलेला असला तरी) सेनेची साताठ आंदोलने तरी माझ्या डोळ्यासमोर झाली, गटारी, पाणी, शौचालये, ट्राफिक आदी लोकल प्रश्नांपासून ते आयसिसचे निषेध करण्यापर्यंत. आंदोलने सोडून काही नियोजनबध्द म्हणाल तर आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना आपला निधी सेनेतर्फे दिला गेला. प्रचंड संख्येने झालेली रक्तदान शिबिरे ह्यांना तुम्ही सामाजिक कार्यात मोजणार की नाही? विद्यापीठात कर्मचार्‍यांवर झालेल्या अन्यायाशी निडरपणे लढणे हे सामाजिक कार्य नव्हे काय? विद्यार्थ्यांना इंजिनिअरींग आणि मेडीकल प्रवेशपरीक्षांचे फॉर्म्याट देऊन ते सराव सोडवून घ्यायची कल्पना तर मला प्रचंड आवडली. अगदी शिस्तीत अन नियोजनाने केलेली मोहीम होती ती. अशी कार्ये सोलापूरसारख्या शहरात नव्हे तर खेडोपाडी चालत असतात आणि त्याची प्रसिध्दी तुम्हाला वेबसाईटवर सापडणार नाही.
आणि एक सामान्य नागरिक म्हणून इतर पक्षांशी तुलना करता सेनेकडे पाहतो तेंव्हा प्रत्येक आंदोलनात, कार्यात सेना दिसते, त्यांचे कार्यकर्ते दिसतात. हाण मार बडीव ही संस्कृती फक्त सेनेला चिकटवण्यासाठी नाहीये. आजकाल राजकारणी अन पैशेवाल्या मस्तवालांचा तो स्थायीभाव झालाय. कुणा सेनेच्या कार्यकर्त्यांने विनाकारण कुणाला मारलेय असे मला तरी इतक्या वर्षात दिसलेले नाही. विरोधी पक्षांच्या कार्यालयावर हल्ले अन मारहाण असे विषय घेतले तर हे गुन्हे सर्व पक्षानी अगदी हिरीरीने केलेले आहेत. एकटी सेना तेवढी मारहाण करत फिरते हे अति वाटते.

अमर विश्वास's picture

13 Jul 2017 - 3:50 pm | अमर विश्वास

प्रतिसादांच्या गदारोळात लेखातला मूळ मुद्दा बाजूला पडला ..

डिसेंबर १९१९२ ला सुरु झालेली दंगल ही बाबरी मशीद पडल्याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लिम समाजाने सुरु केली.. जसे आधी लिहिले आहे त्याप्रमाणे पोलीस प्रमुख श्रीकांत बापट व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कठोरपणे ही दंगल आटोक्यात आणली ..

याउलट जानेवारी १९९३ च्या दंगलीची (भाग २) सुरुवात ताडदेव येथील मुस्लिम वस्तीला आग लावून व धारावी येथे दोन मुस्लिम हातगाडीवाल्यांची हत्या करून झाली ..
ही अर्थातच हिंदू समाजाने केली ... ही दंगल पूर्वनियोजित व पूर्ण तयारीनिशी केली असा ठपका अहवालात आहे .. ही पूर्वतयारी कोणी केली ते समजुन घ्या

याच काळात रस्त्यांवर महाआरती करून (अजान च्या विरोधात) वातावरण पद्धतशीरपणे तापवले गेले होते ..

दुरदैवी गोष्ट म्हणजे या दोनही दंगलीत पोलिसांची हानी मोठ्या प्रमाणावर झाली .

सध्या एव्हडेच पुरे

गामा पैलवान's picture

13 Jul 2017 - 6:36 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

शिवसेनेने गेल्या पन्नासेक वर्षांत काय केलं असं तुम्ही विचारता. मग शिवाजीमहाराजांनी तरी काय काम केलं होतं पस्तीस वर्षांत? लढाया तर सगळे जण सदैव लढंतच होते. किल्ले बांधले हे खरंय, पण तेही स्वत:ची सत्ता वाढवण्यासाठीच ना? शिवाजीमहाराजांनी जनतेचा फुटक्या कवडीइतुकाही फायदा करवून दिला नाही. उलट महाराष्ट्रावर अफझलखान, शायिस्तेखान वगैरे आक्रमणं मात्र कितीतरी झाली. मग लोकं का शिवाजीचा जयजयकार करतात?

हाच न्याय राणाप्रतापांनाही लावता येतो. जनतेचं नेमकं असं काय भलं केलं राणाप्रतापांनी?

आ.न.,
-गा.पै.

जेम्स वांड's picture

16 Jul 2017 - 12:07 pm | जेम्स वांड

त्याहून पुढे जाऊन, प्रभू रामचंद्रांनी तरी काय केलं जनतेसाठी? बाललीला झाल्यावर लग्न, मग वनवास अन मग पत्नी पळवून नेणाऱ्या विरुद्ध युद्ध!

(गैरसमज नसावा मंडळी उपरोध-उपहास आहे हा, श्रीराम राम रणकर्कश राम राम कायम आमच्या मनात कायम असतातच)

वरुण मोहिते's picture

13 Jul 2017 - 7:37 pm | वरुण मोहिते

ते भाजप समर्थकांची आपापसात मॅच चालू असते . बाकी जगात कोणाचे काही योगदान नाही असे वाटत असते त्यांना . दुर्लक्ष एकच उपाय त्यांच्याकडे .

वरुण मोहिते's picture

13 Jul 2017 - 7:37 pm | वरुण मोहिते

ते भाजप समर्थकांची आपापसात मॅच चालू असते . बाकी जगात कोणाचे काही योगदान नाही असे वाटत असते त्यांना . दुर्लक्ष एकच उपाय त्यांच्याकडे .

प्रतापराव's picture

13 Jul 2017 - 8:05 pm | प्रतापराव

शिवसेनेचा बहुसंख्य मध्यमवर्गिय व गरीब लोकांना आधार वाटतो हे तथ्य नाकारण्यात अर्थ नाही.जोपर्यत शिवसेना मराठी माणुस ह्या विषयावर लढत होती तोपर्यत आवडायची नंतर मात्र त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तेव्हापासुन शिवसेनेपासुन चार हात लांब रहाणेच पसंत केले.

अभिदेश's picture

13 Jul 2017 - 9:14 pm | अभिदेश

अचानक २०१४ नंतरच कशी काय बाहेर पडायला लागली ? जोपर्यंत गरज होती तोपर्यंत हा प्रश्न कसा काय नाही पडला कोणाला ? आणि २०१९ ला परत गरज लागली तर हे प्रश्न बाद होतील का ? भाजप चे आत्तापर्यंतचा इतिहास पाहता ज्यांच्या खांद्यावर वाढायचं त्यांच्याच कानात *** .

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 10:29 pm | श्रीगुरुजी

जरा विचार केलात आणि इतिहास बघितलात तर या चे उत्तर आपोआप मिळेल.

बादवे, भाजप सेनेच्या खांद्यावर वाढलेला नसून सेनाच भाजपच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात वाढली. शेवटी सेना भाजपचे उपकार विसरून भाजपच्या डोक्यावर बसून भाजपच्या डोक्यावर मिरे वाटायला लागली, तेव्हा भाजपला सेनेला जमिनीवर आदळावेच लागले.

अभिदेश's picture

13 Jul 2017 - 11:01 pm | अभिदेश

हास्यास्पद प्रतिसाद...जरा नाही थोडासाच विचार केला तरी हे वास्तव समोर येते. भाजप सेनेच्या खांद्यावर वाढलेला नसून सेनाच भाजपच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात वाढली. ...२०१४ पर्यंत शिवसेना महाराष्ट्रात मोठा भाऊ असे भाजपचं म्हणणं होत , विस्मरण झालं वाटत. २०१४ची लॉटरी लागली नसती तर हे जमिनीवर आपटणे वगैरे झाले नसते. आणि माझया २०१९च्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले.

श्रीगुरुजी's picture

13 Jul 2017 - 11:20 pm | श्रीगुरुजी

>>> २०१४ पर्यंत शिवसेना महाराष्ट्रात मोठा भाऊ असे भाजपचं म्हणणं होत , विस्मरण झालं वाटत.

असे भाजपचे म्हणणे नसून सेनेचाच तसा गोड गैरसमज होता. अजूनही सेना त्याच भ्रमात आहे.

>>> २०१४ची लॉटरी लागली नसती तर हे जमिनीवर आपटणे वगैरे झाले नसते. आणि माझया २०१९च्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले.

लॉटरी नशीबाने आणि कधीतरी एकदा लागते. भाजपचा २०१४ चा विजय हा त्या पक्षाने केलेल्या परीश्रमाचा व योजनाबद्ध प्रचाराचा विजय होता. तो एकमेव विजय नसून त्यानंतरही बऱ्याच निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.

२०१९ ला भाजपला सेनेची अजिबात गरज लागणार नाही. त्यामुळे काळजी नसावी व भ्रमात राहू नये. खरं तर पक्ष जिवंत ठेवण्यासाठी सेनेलाच भाजपची गरज आहे व पुढेही लागेल.

अभिदेश's picture

13 Jul 2017 - 11:23 pm | अभिदेश

सेव्ह करून ठेवत आहे , २०१९ ला वापरून पाहू.

सुज्ञ's picture

14 Jul 2017 - 10:57 am | सुज्ञ

आपण मिपावर नवीन दिसता अन्यथा सेना मोठा भाऊ असे अज्ञानजनक वाक्य आपण वापरले नसते

सेनेविरुद्ध गरळ ओकत आहेत असे म्हणणाऱ्यांसाठी : गरळ लोक ओकत नसून ती त्यांनी स्वतःच स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्यावर घेतली आहे . मी वर म्हटल्याप्रमाणे असलेच तर मुंबईतील दंगलीत लोकांना चोप देणे हे या पक्षाने आत्तापर्यंत केलेले महत्तम कार्य आहे. बाकी मराठी हिंदुत्व इत्यादी करून गलका करणे हे दुसरे कार्य . विकास , काही ठोस योजना , लोकाभिमुख कामे इत्यादींपासून सेना कोसो हात दूर आहे. वास्तविक मुंबई ठाणे महानगरपालिका हातात असून आणि विकासाचे उत्तम मॉडेल संपूर्ण देशासमोर ठेवायची संधी आणि त्यातून पक्ष वाढवायची संधी असतानाही हे आजून मोदींना शिव्या घालण्यात आणि ढाल तलवरी ,औरंगजेब मराठी माणूस मनगटातील ताकद वगैरे फुटकळ आणि अडगळीत गेलेल्या मुद्यांवर चिटकून आहेत . इथेही सेनेचे काम अथवा त्यांच्या योजना विचारल्यावर लोक शिवजलक्रांती वगैरे सारख्या कॉप्या मारलेल्या काही तकलादू आणि धड राबवल्याही न गेलेल्या योजना सांगत आहेत . अर्थात शिवसेनेचे त् धोरण आणि पक्ष्याची विचारसारसारणीच पहिल्यापासून हाण मार बडीव ही असल्याने ते त्यातून बाहेर येतील आणि सद्यस्थितीत लोकांना काय हवे हे पाहतील हे होणार नाही . यातूनच हा पक्ष संपत जाईल . ( जसे आता यांचे चुलत घराणे अस्थितवासाठी झगडत आहे) त्याची सुरवात सुरवात 2014 आणि आत्ताच्या महानगर पालिका निवडणुकांतून झालीच आहे.

आम्ही हे केले ते केले आमच्या मनगटात ताकद व अंगात रग आहे वगैरे बाष्कळ बाता न मारता यांनी व यांच्या समर्थकांनी आधी जमिनीवर यावे व आपण आता सोळाव्या नासुन एकविसाव्या शतकात आहोत हे ध्यानात घ्यावें. ते होणे मुश्किल दिसते

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jul 2017 - 11:51 am | हतोळकरांचा प्रसाद

मला वाटतं गल्लत होतेय! "शिवसेना कसल्या फुकाच्या डरकाळ्या फोडते" आणि "शिवसेना काय काम करते/केले" या दोन गोष्टींची गल्लत होतेय. पहिली गोष्ट उघड आहे, फक्त अंध शिवसेना समर्थक त्याला दुर्लक्ष करू शकतात. पण पहिले खरे आहे म्हणून दुसरे शून्य आहे हे असलं तार्किक पटत नाही.

मला मुळात हे "शिवसेनेने काय काम केले ते सांगा" वगैरे पूर्वग्रहदूषित प्रश्नामागचं प्रयोजनच कळत नाही. जर असे काही प्रश्न खरंच पडत असतील तर गुगल करून पहिले तरी त्यांनी काय काम केले साधारणपणे समजू शकते. गेलाबाजार त्यांची स्वतःची वेबसाईट तरी नक्की धुंडाळता येते. तिथे त्यांनी त्यांची कामे खोटी टाकली असतील तर त्यांना पुराव्यानिशी उघडे पडत येते. हे सर्व न करता त्यांचे सध्याचे आमदार/खासदार काहीतरी मनगटात दम वगैरे भाषणं करून निवडून येतात आणि मग पाच वर्षे भाषणे करतात आणि परत निवडणूक आल्या कि अशीच भाषणे करतात आणि निवडून येतात अशा अर्थाची सरसकट विधाने करणे तार्किक वाटते का? हि अशी सरसकट विधाने तर काँग्रेस/राष्ट्रवादीला देखील लागू होत नाहीत. मग शिवसेनेवर आसूड का? म्हणजे भाजप ची चांगली कामे पुढे करून भाजप मला आवडते हे म्हणताना मला शिवसेनेची अडचण अजिबात होत नाही. त्यांच्या फुकाच्या धमक्या आणि आजकाल सरकारच्या आतून विरोधी भूमिका बजावणं मलाही नाही पटत पण त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे. भाजपच्या विरोधात प्रचार करून त्यांचे उमेदवार निवडून येतात हे विसरून चालता येत नाही.

याउपर क्षणभर शिवसेनेने काहीच कामे केली नाहीत हे गृहीत धरून चला आणि भाजप ने कोणती कामे केली ते सांगा म्हणजे तशीच काही कामे शिवसेनेने केली आहेत का हे पाहता येईल. असे वर चिचारले तर यादी जलयुक्त शिवार आणि एक दोन नेत्यांना अटक याच्या पुढे गेली नाही, ते एक असोच. हे असेच असते. एखाद्या पक्षाने कोणती कामे केली हे असे सहज नोंदवता येत नाही पण माहिती जरूर काढता येते. आज भाजप मोठा भाऊ आहे म्हणून सरकारमधील मोठे निर्णय भाजपच्या नावावर जातात. ९५-९९ शिवसेना मोठा भाऊ होता आणि शिवाय बाळासाहेब होते तेव्हाचे निर्णय त्यांनी घेतले असे गृहीत धरून त्यांनी ९५-९९ काय कामे केली हे शोधता येऊच शकते.

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2017 - 2:15 pm | श्रीगुरुजी

मला मुळात हे "शिवसेनेने काय काम केले ते सांगा" वगैरे पूर्वग्रहदूषित प्रश्नामागचं प्रयोजनच कळत नाही. जर असे काही प्रश्न खरंच पडत असतील तर गुगल करून पहिले तरी त्यांनी काय काम केले साधारणपणे समजू शकते. गेलाबाजार त्यांची स्वतःची वेबसाईट तरी नक्की धुंडाळता येते. तिथे त्यांनी त्यांची कामे खोटी टाकली असतील तर त्यांना पुराव्यानिशी उघडे पडत येते.

शोधून काहीच सापडलं नाही म्हणूनच विचारलं. विचारून २ दोन दिवस लोटले तरी गेल्या ५१ वर्षात १९९३ मध्ये कोणाला तरी बडवून काढलं याशिवाय दुसरं काम सांगता आलेलं नाही. शिवजलक्रांती वगैरे जलयुक्त शिवारचंच काम आहे. वेबसाईटवर तर संपूर्ण थापा असणार. 'सामना'तून जिथे रोज गरळ ओकण्याशिवाय दुसरं काही नसतं, तसंच वेबसाईटवर पण असणार.

हे सर्व न करता त्यांचे सध्याचे आमदार/खासदार काहीतरी मनगटात दम वगैरे भाषणं करून निवडून येतात आणि मग पाच वर्षे भाषणे करतात आणि परत निवडणूक आल्या कि अशीच भाषणे करतात आणि निवडून येतात अशा अर्थाची सरसकट विधाने करणे तार्किक वाटते का? हि अशी सरसकट विधाने तर काँग्रेस/राष्ट्रवादीला देखील लागू होत नाहीत. मग शिवसेनेवर आसूड का? म्हणजे भाजप ची चांगली कामे पुढे करून भाजप मला आवडते हे म्हणताना मला शिवसेनेची अडचण अजिबात होत नाही. त्यांच्या फुकाच्या धमक्या आणि आजकाल सरकारच्या आतून विरोधी भूमिका बजावणं मलाही नाही पटत पण त्यांची ती स्ट्रॅटेजी आहे. भाजपच्या विरोधात प्रचार करून त्यांचे उमेदवार निवडून येतात हे विसरून चालता येत नाही.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी सेना एखादा भावनिक बागुलबुवा निर्माण करून मते मिळवितात. तो बागुलबुवा कधी दाक्षिणात्यांच्या स्वरूपात असतो तर कधी मुस्लिमांच्या स्वरूपात तर कधी उत्तर भारतीय, बिहारींच्या स्वरूपात तर कधी गुजरात्यांच्या स्वरूपात असतो. याव्यतिरिक्त, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, महाराष्ट्र तोडण्याचा डाव आहे, महाराष्ट्रातले उद्योगधंदे बाहेर नेण्याचा डाव आहे असा प्रत्येक निवडणुकीत प्रोपागंडा असतोच.

याउपर क्षणभर शिवसेनेने काहीच कामे केली नाहीत हे गृहीत धरून चला आणि भाजप ने कोणती कामे केली ते सांगा म्हणजे तशीच काही कामे शिवसेनेने केली आहेत का हे पाहता येईल. असे वर चिचारले तर यादी जलयुक्त शिवार आणि एक दोन नेत्यांना अटक याच्या पुढे गेली नाही, ते एक असोच. हे असेच असते. एखाद्या पक्षाने कोणती कामे केली हे असे सहज नोंदवता येत नाही पण माहिती जरूर काढता येते. आज भाजप मोठा भाऊ आहे म्हणून सरकारमधील मोठे निर्णय भाजपच्या नावावर जातात. ९५-९९ शिवसेना मोठा भाऊ होता आणि शिवाय बाळासाहेब होते तेव्हाचे निर्णय त्यांनी घेतले असे गृहीत धरून त्यांनी ९५-९९ काय कामे केली हे शोधता येऊच शकते.

हा धागा सेनेवर आहे,भाजपवर नाही. त्यामुळे भाजपच्या कामांची चर्चा इथे करण्याची गरज नाही. सेनेची कामे दाखवा म्हटले की आधी भाजपची दाखवा असे म्हणणे हीच सेनेने काहीही न केल्याची कबुली आहे. भाजपच्या कामावर इतर अनेक धागे निघाले आहेत. अजूनही निघतील. त्यात भाजपबद्दल लिहिता येईल. ९५-९९ या काळात मंत्रीमंडळात भाजप कनिष्ठ भागीदार होता. खरं तर भाजपच्या जन्मापासून भाजपचा जनाधार महाराष्ट्रात सेनेच्या तुलनेत खूप जास्त होता. त्याविषयी इतर ३-४ धाग्यांवर भरपूर आकडेवारी देऊन सविस्तर लिहिले आहे. इथे परत लिहिण्याचा कंटाळा आला आहे. जनाधार जास्त असूनसुद्धा भाजपने कनिष्ठ भूमिका का स्वीकारली हे एक गूढ आहे. सेनेच्या तुलनेत खूप जास्त जनाधार असूनसुद्धा मंत्रीमंडळात कनिष्ठ भूमिका घ्यावी लागली तरी भाजपचे त्याबद्दल चडफडाट न करता, न कुरकुरता मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला. नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना अतिशय धडाडीने काम करून त्यांनी मेळघाटात प्रथमच डांबरी रस्ते बांधले. मुंबईत ५५ उड्डाणपूल, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग असे अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबविले. पंढरपूर यात्रेच्या मार्गावर अनेक वर्षे मागणी होत असलेला एका नदीवरील पूल त्यांच्या खात्याने ३८ दिवसांत बांधून पूर्ण केला होता. आपल्या कामाचे श्रेय कोणाला जाईल याचा विचार न करता त्यांनी इतके धडाडीने काम केले की हे खाते त्यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले.

आज परिस्थिती पूर्ण वेगळी आहे. मंत्रीमंडळात दुय्यम भूमिका स्वीकारावी लागल्याचे सेनेला सहन झालेले नाही. त्यामुळे पहिल्या दिवसापासून चडफडाट, असहकार, सरकारच्या प्रत्येक निर्णयावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत संमती व बाहेर आल्यावर सडकून टीका, प्रत्येक कामात अडथळे, अत्यंत अर्वाच्य भाषेत भाजप नेत्यांचा उद्धार, पोकळ बढाया यापलिकडे त्यांनी काहीही केलेले नाही. केजरीवाल मागील दोनअडीच वर्षे जे करीत आहेत, तेच सेना इथे करीत आहे. हातात जी खाती आहेत, त्यात चांगले काम करून आपल्या कामाचा ठसा उमटविण्याऐवजी सातत्याने नकारात्मक भूमिका घेत राहिल्याने सेनेबद्दल संताप व तिरस्कार वाढत आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jul 2017 - 2:54 pm | हतोळकरांचा प्रसाद

अपेक्षित प्रतिसाद (खरंतर शब्दांचा किस, जो वरच्या अनेक प्रतिसादात आधीच पाडला गेला होता)! असो, ज्या कारणासाठी तो प्रतिसाद लिहिला गेला होता ते तुम्ही या प्रतिसादाने सिद्ध केलंत! (नेहमीप्रमाणे) प्रतिसाद नीट वाचण्याची विनंती करतो! किंवा मग शिवसेनेला किंवा अजून कुठल्याही भाजपेतर पक्षाला न अभ्यास करता हासडून काढण्याचा छंद कोणाला जोपासायचा असेल तर आपण काय करू शकतो?

बाकी खरोखर कोणाला काय केले वगैरे शोधायचे असेल किंवा कमीत कमी तुलना करायची असेल तर, आवडत्या पक्षाने केलेली (५१ वर्षातील सोडा, ३७ वर्षातील) कामे अधोरेखित करा म्हणजे तशी काही कामे शिवसेनेची आहेत का ते बघता येईल. बाकी शिवसेनेची वायफळ वक्त्यवे आणि शिवसेनेच्या विरोधातील किंवा त्याच अनुषंगाने इतर पक्षांच्या विरोधात केलेली सरसकट वक्त्यवे यात मला तरी काही फरक वाटत नाही. त्यामुळे...चालुद्या!

राजाभाऊ's picture

14 Jul 2017 - 7:29 pm | राजाभाऊ

>>नितीन गडकरी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना अतिशय धडाडीने काम करून त्यांनी मेळघाटात प्रथमच डांबरी रस्ते बांधले. मुंबईत ५५ उड्डाणपूल, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग असे अनेक मोठे प्रकल्प यशस्वीपणे राबविले. पंढरपूर यात्रेच्या मार्गावर अनेक वर्षे मागणी होत असलेला एका नदीवरील पूल त्यांच्या खात्याने ३८ दिवसांत बांधून पूर्ण केला होता. <<

हे घ्या, यांनी गुगलवरुन हि बातमी स्वतःच शोधुन काढली पण नेहेमीच्या सवयीनुसार त्या कामाचे श्रेय फक्त गडकरींना देऊन मोकळे झाले. हि कामं युती सरकारात झाली होती (मुंबई-पुणे फ्रीवे सकट) याचा उल्लेख सोयिस्कररित्या टाळला. आता युती सरकारात सेनेचं योगदान काहिच नव्हतं, सगळी कामं बिजेपीनेच केली हा जावईशोध यांनी लावला तर आश्चर्य्चकित होऊ नका. :)

थोडक्यात काय तर सेनेने केली ती गुंडगिरी आणि बीजेपीचे कार्यकर्ते गोरक्षणाच्या नांवाखाली मॉब लिंचिंग करतायत ते संस्कृतीरक्षण. बरोबर ना?

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2017 - 1:57 pm | श्रीगुरुजी

+ १

प्रतिसादातील प्रत्येक शब्दाशी सहमत!

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2017 - 1:58 pm | श्रीगुरुजी

हा प्रतिसाद 'सुज्ञ' यांच्या प्रतिसादासाठी आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2017 - 2:35 pm | श्रीगुरुजी

आम्ही हे केले ते केले आमच्या मनगटात ताकद व अंगात रग आहे वगैरे बाष्कळ बाता न मारता यांनी व यांच्या समर्थकांनी आधी जमिनीवर यावे व आपण आता सोळाव्या नासुन एकविसाव्या शतकात आहोत हे ध्यानात घ्यावें. ते होणे मुश्किल दिसते

रस्त्याने एखादा वेड लागलेला माणूस हातवारे करीत, तोंडाने मोठ्याने बडबडत जात असताना काही जण त्याच्याकडे वेडा समजून दुर्लक्ष करतात तर काही जण त्याचा सदरा ओढ, त्याच्या मागून जाऊन त्याला टप्पल मारून पळून जा, त्याच्यासमोर त्याला वेडावून दाखविणे अशी खिल्ली उडवून त्याला काव आणत असतात.

सध्या उधोजी, राऊत, कदम अशा सेना नेत्यांची अवस्था रस्त्याने हातवारे करीत, बडबडत जाणार्‍या वेड्यासारखी झाली आहे. बहुतेक पक्ष त्यांच्या बरळण्याकडे, धमक्यांकडे व फुशारक्यांकडे दुर्लक्ष करतात. आशिष शेलार, सोमय्या इ. नेते मात्र त्यांची टिंगल उडवितात. विशेषतः सामाजिक माध्यमांवर सेना नेत्यांच्या टिंगलीचा महापूर आला आहे. आपल्याला मूर्ख समजले जात आहे व आपल्याला कोणीही जमेस धरत नाही हे यांच्या लक्षात आलेले नाही. आम्ही भूकंप करू, आम्ही राजीनामे खिशात ठेवून हिंडत आहोत, यांच्या कंबरड्यात आम्ही लाथा घालत राहिल्यामुळे यांना शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यावी लागली, सर्जिकल स्ट्राईक करा असे आम्हीच सांगत होतो, जलयुक्त शिवार योजना आमचीच आहे अशा हास्यास्पद बढाया वाचून आता यांची कीवही येत नाही.

अभिदेश's picture

14 Jul 2017 - 7:52 pm | अभिदेश

आपण मिपावर नवीन दिसता अन्यथा सेना मोठा भाऊ असे अज्ञानजनक वाक्य आपण वापरले नसते

ह्याचा आणि मिपावर किती दिवस असण्याचा काय संबंध आहे? निदान प्रतिसाद तरी नावाप्रमाणे सुज्ञतेने द्यावा . मी आधीच म्हटल्याप्रमाणे , शिवसेनेविषयी सगळी जळजळ २०१४ च्या निवडणुकी नंतर बाहेर पडली , इतकी वर्ष (जवळ जवळ ३० वर्ष) हे सगळे कसे काय चालत होते? तेव्हा गळ्यात गळे घालून फिरताना शिवसेनेचे धोरण खटकले नाही का ?? ह्याचा करता आलातर सुज्ञपणे आणि तुम्ही सुज्ञ असलाच तर विचार करा.

गॅरी ट्रुमन's picture

15 Jul 2017 - 10:00 am | गॅरी ट्रुमन

शिवसेनेविषयी सगळी जळजळ २०१४ च्या निवडणुकी नंतर बाहेर पडली , इतकी वर्ष (जवळ जवळ ३० वर्ष) हे सगळे कसे काय चालत होते? तेव्हा गळ्यात गळे घालून फिरताना शिवसेनेचे धोरण खटकले नाही का ??

हाच प्रश्न शिवसेनेला विचारायला हवा खरं तर. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेमुळेच महाराष्ट्रात महायुतीला इतके यश मिळाले हे अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांमधील यशानंतर शिवसेनेने १९९६ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघ असाच आपल्यासाठी मागून घेतला होता. त्याच न्यायाने२०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने जास्त जागा मागणे क्रमप्राप्तच होते. पण शिवसेना मात्र त्याला तयार नव्हती. भाजपने सुरवातीला अर्ध्या जागांची मागणी केली असली तरी शेवटी १३०-१३५ पर्यंत भाजप खाली यायला तयार झाला होता हे पण वाचल्याचे आठवते. पण शिवसेना मात्र अगदी एकही जास्त जागा द्यायला तयार नव्हती. ठिक आहे. स्वतंत्रपणे लढू, आपापली स्वतंत्र ताकद जोखू आणि निवडणुकीनंतर एकत्र यायची वेळ आल्यावर झालेगेले विसरून जाऊ असा दृष्टीकोन असता तरी त्यात तक्रार करण्यासारखे नव्हते. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी ज्या भाजपबरोबर इतकी वर्षे एकत्र होते त्या पक्षावर किती गरळ ओकली होती हे पण तपासून बघा. नरेंद्र मोदींचे मंत्रीमंडळ म्हणजे अफजलखानाचे सैन्य (त्याच सैन्यात आपला एक मावळाही आहे याचा सोयीस्करपणे विसर पाडून), आदिलशहा-कुतुबशहा तसे अमित शहा इत्यादी इत्यादी तर उद्धव ठाकरे बोललेच. पण प्रचारात नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांचाही उल्लेख त्यांनी केला. वास्तविकपणे कुणाही दिवंगत व्यक्तीचा उल्लेख करायचाच असेल तर तो आदरयुक्तच करावा अन्यथा करू नये अशीच आपली संस्कृती ना? आणि तसाही नरेंद्र मोदींच्या वडिलांचा राजकारणाशी काय संबंध होता? त्यांचा उल्लेख करायचे कारण काय? २०१४ च्या प्रचारात सर्वोच्च पातळीवर भाजपने शिवसेनेविषयी अजिबात एकही शब्दही उच्चारला नव्हता. कदाचित स्थानिक नेत्यांनी काही ठिकाणी तो प्रकार केला असेलही. वास्तविक २०१४ च्या विधानसभा निवडणुक प्रचारात आघाडी सरकारच्या १५ वर्षाच्या अनागोंदीविरूध्द आवाज उठवायचा. ते सोडून उधोजीराव भाजपवरच तुटून पडले होते.

बरं सत्तेत आल्यानंतरही शिवसेनेची वर्तणूक सत्ताधारी पक्षाप्रमाणे होती का? ज्या सरकारमध्ये सत्तेत राहायचे त्यावरच टिका करायची, मधूनमधून सामनातून भाजपला टोले लगावायचे, गोव्यात भाजपमधून बाहेर पडलेल्या गटाबरोबरच युती करायची (कल्पना करा १९९५ मध्ये भुजबळ काँग्रेसमध्ये न जाता स्वतंत्र गटातर्फे लढले असते आणि भाजपने त्यांच्याबरोबर हातमिळवणी केली असती तर शिवसेनेची प्रतिक्रिया कशी असती?), केजरीवालांचा दिल्लीत विजय झाल्यानंतर मुद्दामून फोन करून अभिनंदन करायचे इत्यादी इत्यादी अनेक गोष्टी शिवसेनेने केल्या तेव्हा 'इतकी वर्षे बरोबर असलेल्या पक्षाविषयी अचानक गरळ ओकायचे कारण काय' हा प्रश्न नाही तो पडला तुम्हाला.

म्हणजे उधोजीराव या गोष्टीची सुरवात करत असतील तर भाजपने मात्र शांतपणे सगळे बघत राहावे ही तुमची अपेक्षा असेल तर ती साफ चुकीची आहे. हे स्वतःला शिवाजी महाराजांचे अवतार समजत असतीलही. लोकशाही आहे. कोणीही स्वतःविषयी कोणत्याही कल्पना करून घेऊ शकतो. काहीच आडकाठी नाही. पण यांच्या कल्पना इतरांनीही मान्य कराव्यात अशी अपेक्षा करू लागले तर ते साफ चुकीचे आहे.

अनुप ढेरे's picture

15 Jul 2017 - 1:34 pm | अनुप ढेरे

इतकी वर्षे बरोबर असलेल्या पक्षाविषयी अचानक गरळ ओकायचे कारण काय

अगदी सहमत. गेले तीन वर्ष चाललेला प्रकार पाहुनदेखील "शिवसेनेवर भाजपा समर्थक उगाच चिडतात" असं म्हणण्याबद्दल खूप आश्चर्य वाटतं.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Jul 2017 - 8:09 pm | हतोळकरांचा प्रसाद

शिवसेनेच्या तीन वर्षांतील धोरणांवरून त्यांना घेरणे किंवा त्यांच्यावर टीका करणे रास्त असू शकते पण कुठलाही अभ्यास न करता ५१ वर्षात काहीही केले नाही असले पोकळ दावे करणं म्हणजेच साधारणपणे पूर्वग्रहदूषित जळजळ बाहेर काढणे नसावे का? यावर चर्चा केली जाऊ नये का?

भाजप सेनेच्या खांद्यावर वाढलेला नसून सेनाच भाजपच्या खांद्यावर बसून महाराष्ट्रात वाढली.

खम्प्लीट असहमत.

सेना महाराष्ट्रात मोठा भाऊ होता. मात्र २०१४ ला भाजपाचे पारडे जड झाले जे उधोजीरावांना समजले नसावे किंवा इतके दिवस आपल्या हातात असलेले नेतेपद भाजपाकडे कसे सोपवायचे अशा विचाराने त्यावेळी सुरू झालेली आदळापट अजूनही सुरू आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jul 2017 - 4:07 pm | हतोळकरांचा प्रसाद

या मताशी सहमत! भाजप वरचढ ठरतोय याला योग्य प्रकारे रिऍक्ट करण्यात आलेले अपयश वायफळ वक्तयांद्वारे बाहेर येत आहे असे वाटते. किंवा भाजपविरोधी लोकांना जवळ खेचण्याचा प्रयत्न असावा, साधारणपणे दिल्लीत उदयास आलेल्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे!

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2017 - 5:04 pm | श्रीगुरुजी

>>> खम्प्लीट असहमत.

>>> सेना महाराष्ट्रात मोठा भाऊ होता. मात्र २०१४ ला भाजपाचे पारडे जड झाले जे . . .

http://www.misalpav.com/node/38674

गॅरी ट्रुमन's picture

14 Jul 2017 - 5:21 pm | गॅरी ट्रुमन

सेना महाराष्ट्रात मोठा भाऊ होता.

असहमतीशी असहमती. याविषयी http://www.misalpav.com/comment/915633#comment-915633 हा प्रतिसाद लिहिला होता. तो जसाच्या तसा इथे देत आहे.

उद्धव ठाकरे म्हणत आहेत की युतीमुळे शिवसेनेची २५ वर्षे सडली. म्हणजे त्यांच्या म्हणण्याचा मतीतार्थ हा की युती झाली त्यावेळी शिवसेनेपेक्षा भाजपचे अस्तित्व नगण्य होते आणि शिवसेनेमुळेच भाजप महाराष्ट्रात फोफावला. हे म्हणणे अर्धसत्य नसून पूर्णच असत्य आहे.या उधोजीरावांच्या समर्थकांना काहीही वाटत असले तरी आकडे काहीतरी वेगळेच बोलत आहेत.

१९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती?

१९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती?

इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा दिला.इतकी वर्षे भाजपने शिवसेनेला इतके मोठे स्थान का दिले हे कोडेच आहे. शिवसेनेचा ट्रॅक रेकॉर्ड कसा होता? युतीच्या काळातही प्रत्येक वेळी भाजपचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त होता.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांमध्ये २००२ चा अपवाद वगळता प्रत्येक वेळी शिवसेने भाजपने उभ्या केलेल्या उमेदवाराविरोधात मत दिले आहे.शरद पवार जर पंतप्रधान होणार असते तर मराठीपणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पवारांनाही पाठिंबा दिला असता यात अजिबात शंका नाही.पुण्यातील शिवाजीनगरसारखा भाजपचा हक्काचा मतदारसंघ युतीत असताना शिवसेनेने दादागिरी करून इतकी वर्षे स्वतःच्या ताब्यात ठेवला होता.पण २०१४ मध्ये युती तुटल्यानंतर या मतदारसंघात भाजपने अगदी आरामात विजय मिळवला.

इतकी वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत १९९५ मध्ये शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागा मिळविल्या या कारणावरून लगेचच १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितला.रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे ज्या मतदारसंघातून निवडून येत असत तो मतदारसंघ भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या 'राजहट्टाखातर' सोडून द्यावा लागला होता.तसे असेल तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदीलाटेमुळेच इतके मोठे यश मिळाले होते हे अगदी कोणीच नाकारू शकत नाही.तरीही शिवसेना भाजपला विधानसभा निवडणुकांमध्ये ४ जागाही जास्त द्यायला तयार नव्हती.भाजपने यांची दादागिरी का सहन केली हा प्रश्नच आहे.

१९९० मध्ये विधानसभेच्या १७४ जागा शिवसेनेने तर उरलेल्या ११४ जागा भाजपने लढविल्या होत्या. अगदी २००९ पर्यंत भाजपने लढविलेल्या जागांचे प्रमाण जवळपास तितकेच राहिले. फार तर ३-४ जागा जास्त मिळाल्या. तर लोकसभेत मात्र शिवसेनेला मिळालेल्या जागांचे प्रमाण लक्षणीय वाढले. १९८९ मध्ये शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना तर धनुष्यबाण हे चिन्हही मिळालेले नव्हते. १९८९ पासून २०१४ पर्यंत शिवसेनेला लोकसभेच्या जागा मात्र वाढवून मिळाल्या पण भाजपच्या विधानसभेच्या जागा मात्र फार वाढल्या नाहीत.

काल उद्धव ठाकरे म्हणाले की १९९८-९९ मध्ये जयललिता आणि ममता बॅनर्जी वाजपेयींना त्रास देत असताना शिवसेना मात्र वाजपेयींच्या पाठीशी खंबीरपणे होती आणि शिवसेनेने कधीच वाजपेयींना त्रास दिला नाही. उलट आपल्या कोट्यातली मंत्रीपदे जयललितांना द्यायची तयारीही बाळासाहेबांनी दाखवली होती. हे बोलताना उध्दव एक गोष्ट सोयीस्करपणे विसरले.आणि ती म्हणजे त्यावेळी महाराष्ट्रातले मनोहर जोशींचे सरकार भाजपबरोबर होते आणि दिल्लीत वाजपेयींना त्रास दिला असता तर त्याचे परिणाम मुंबईत भोगावे लागले असते. मुंबईतील सत्ता गेल्यावर शिवसेना तितकी सज्जन राहिली होती का? वाजपेयींची १९९९ नंतरची टर्म त्यापूर्वीच्या टर्मपेक्षा बरीच जास्त स्थिर होती. तरीही केंद्राच्या 'जागतिकीकरणाच्या' धोरणामुळे कामगारांपुढच्या अडचणी वाढत आहेत असे म्हणत त्याविरूध्द एप्रिल २००१ मध्ये शिवसेनेने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्याचवेळी मनोहर जोशी अवजड उद्योगमंत्री होते याकडे त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. सुरेश प्रभू हे वाजपेयींच्या मर्जीतले मंत्री होते. त्यांना बाळासाहेबांनी राजीनामा द्यायला लावला होता.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपने जास्त जागांची मागणी केली (ज्या आधारावर १९९६ मध्ये शिवसेनेने ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेतला होता) तेव्हा शिवसेना अजिबात तडजोड करायला तयार नव्हती. मग प्रचारात "नरेंद्र मोदींचे मंत्रीमंडळ म्हणजे अफझलखानाचे सैन्य","जसे आदिलशहा, कुतुबशहा तसे अमित शहा" असे मोती त्याच उध्दव ठाकरेंनी काढले होते. नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांचा उल्लेख प्रचारसभेत करून खास शिवसेना स्टाईल असंस्कृतपणाचे प्रत्यंतर आणून दिले. त्यानंतर सत्तेत असून शिवसेना विरोधी पक्षांपेक्षाही वाईट पध्दतीने वागत आलेली आहे. दिल्लीत केजरीवाल जिंकल्यावर मुद्दामून केजरीवालांचे अभिनंदन करायचा फोन उध्दव ठाकरेंनी केला. आता गोव्यामध्ये भाजपमधून बाहेर पडलेल्या गटाबरोबर युती करून भाजपचा पराभव करायची कारस्थाने चालू आहेत.

असला बेजबाबदार मित्रपक्ष दूर झाला हे चांगलेच झाले. असे म्हणतात की पाठीत खंजीर खुपसणार्‍या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला.शिवसेनेविषयी नेमके हेच मलाही वाटत आहे. ही गोष्ट बरीच आधी व्हायला हवी होती ती आता झाली आहे. अपेक्षा एकच की शिवसेना बाहेर पडल्यावर त्याजागेवर राष्ट्रवादी काँग्रेस नको. तसे झाले तर विधानसभा निवडणुकांमध्ये तरी माझे मत भाजपला नक्कीच नाही.गरज पडल्यास सत्ता गेली तरी हरकत नाही पण शिवसेना नको आणि राष्ट्रवादीही नको.

इतके असूनही भाजपनेच शिवसेनेला विनाकारण मोठ्या भावाचा दर्जा दिला.

हेच म्हणायचे आहे. विनाकारण का असेना पण दर्जा होता जो २०१४ ला सेनेकडून भाजपाकडे गेला.

श्रीगुरुजी's picture

15 Jul 2017 - 8:28 am | श्रीगुरुजी

पण त्यामुळे आपण खरोखरच मोठा भाऊ आहोत, भाजपपेक्षा आपल्याला खूप जास्त जनाधार होता व आहे, भाजप महाराष्ट्रात शून्य होता व आपल्यामुळेच भाजप महाराष्ट्रात वाढला असा भ्रम सेनेला झाला व अजूनही सेना त्याच भ्रमात वावरते.

मोदक's picture

15 Jul 2017 - 9:33 am | मोदक

गुरूजी.. आता असे आहे..

अटलजी आणि अडवाणी या धुरीणांनी त्यावेळी जी भूमीका घेतली ती आपण आत्ता नाकारू शकत नाही. कोणतेही कारण का असेना पण सेनेला वरचढ दर्जा होता ही वस्तुस्थिती आहे.

आता उधोजीरावांना काय वाटते आणि आदूबाळ काय विचार करतात हे वेगळेच मुद्दे आहेत. ते विचार करत असतील हे समजणेही धाडसाचे आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Jul 2017 - 2:16 pm | श्रीगुरुजी

सेनेला अडवाणी/महाजन यांच्या काळात वरचा दर्जा दिला गेला होता हे कोणीच नाकारलेले नाही. फक्त एवढाच मुद्दा आहे की भाजपच्या तुलनेत शिवसेनेचा जनाधार पुष्कळ कमी असताना भाजपने विनाकारण पडती भूमिका का घेतली असावी व इतके दिवस सेनेची दादागिरी का सहन केली असावी हे अनाकलनीय आहे हेच मी सांगितले आहे. गॅरी ट्रुमनने देखील हेच लिहिले आहे.

माझ्या मते यामागे २-३ कारणे असावीत. हे माझे फक्त अंदाज आहेत. यामागे सबळ पुरावे वगैरे नाहीत.

भाजपमध्ये सुरवातीपासून आजतगायत सेनेविषयी सॉफ्ट कॉर्नर असलेले काही जण आहेत. पूर्वी महाजन, मुंडे गडकरी यांना सेनेबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे आपली ताकद जास्त असूनसुद्धा ते सेनेची दादागिरी मान्य करीत होते. आताच्या काळात त्यांची जागा चंद्रकांत पाटील, मुनगंटीवार, गडकरी यांनी घेतली आहे. मागील महिन्यात कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू असताना, एखाद्या आरोपीने रोज पोलिस ठाण्यावर हजेरी द्यावी त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील रोज मातोश्रीवर हजेरी लावून उधोजींची भेट घेत होते. एका बाजूला उधोजी, राऊत हे रोज भाजपला लाथा घालत होते आणि दुसरीकडे पाटील रोज मातोश्रीवर हजेरी लावून उधोजींचे पाय चेपून यायचे. मागच्याच आठवड्यात जीएसटी लागू झाल्यानंतर जकात बंद झाल्याने राज्य सरकार महापालिकेला रोख भरपाई देणार आहे त्याचा चेक महापालिकेला देण्याचा एक मोठा समारंभ करण्यात आला. मुनगंटीवार यांनी जाहीर समारंभात उधोजींना बोलावून त्यांच्या हातात भरपाईचा चेक दिला. तिथे भाजप व सेना कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध व धक्काबुक्की झाली. मोदी चोर है अशा घोषणा देण्यात आल्या. मुळात हा चेक उधोजींच्या हातात द्यायचे कारणच काय? उधोजी साधे नगरसेवक सुद्धा नाहीत. ते महापालिकेत कोणत्याही अधिकारपदावर नाहीत. त्यांचा महापालिकेशी अधिकृत कोणताही संबंध नाही. चेक द्यायचा तर तो थेट महापालिकेच्या खात्यात जमा करायला हवा होता किंवा आयुक्तांकडे द्यायला हवा होता. पण उधोजींचे पाय चेपण्याची सवय असल्याने मुनगंटीवारांनी मुद्दाम समारंभपूर्वक तो चेक उधोजींच्या हातात दिला व मोदी चोर है असल्या घोषणांमुळे स्वत:चे व स्वतःच्या पक्षाचे तोंड काळे करून घेतले. या असल्या सहानुभूतीदारांमुळेच सेनेला फारसा जनाधार नसताना भाजपमधील सेना सहानुभूतीदारांनी सेनेला मोठ्या भावाचा दर्जा दिला असावा.

अजून एक वेगळी शक्यता वाटते. १९८० मध्ये भाजप जनता पक्षातून फुटुन वेगळा झाल्यानंतर भाजपचे जेमतेम मूठभर खासदार होते. १९८० पासून भाजपने नव्याने पक्षबांधणी सुरू केली. त्यामुळे १९८२-८३ या काळात भाजपची बर्‍यापैकी वाढ होऊ लागली. मध्यप्रदेश मध्ये भाजपचे ३२० पैकी ६० च्या आसपास आमदार निवडून आले. हिमाचल प्रदेश मध्ये ६८ पैकी २० पेक्षा जास्त आमदार भाजपचे होते. १९८० मध्ये महाराष्ट्रात भाजपचे १२ आमदार निवडून आले (सेनेचे शून्य आमदार निवडून आले). कर्नाटकात १९८३ मध्ये प्रथमच भाजपचे १८ आमदार निवडून आले. १९८० ते १९८४ या काळात झालेल्या लोकसभेच्या काही पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे खासदार निवडून आले होते. एकंदरीत भाजपची बर्‍यापैकी वाढ व्हायला सुरूवात झाली होती. परंतु इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या लाटेत भाजपचे सर्व परीश्रम नष्ट झाले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे फक्त २ खासदार निवडून येऊन ४ वर्षांचे परीश्रम मातीमोल झाले. याचवेळी १९८६ मध्ये अडवाणी अध्यक्षपदी आल्यानंतर भाजपचा विस्तार करण्यासाठी त्यांनी प्रादेशिक पक्षांशी युती करण्याचे ठरविले. १९८७ मध्ये देवीलाल यांच्या पक्षाशी हरयानात युती केल्यावर हरयानात ९० पैकी देवीलालांच्या पक्षाचे ६८ व भाजपचे १५ आमदार निवडून येऊन घवघवीत यश मिळाले. हाच फॉर्म्युला त्यांनी महाराष्ट्रात वापरायचे ठरविले. परंतु इथे एक मोठा फरक होता. हरयानात देवीलाल हे सुरवातीपासूनच बडे प्रस्थ होते. त्यामुळे तिथे देवीलालांचा पक्ष मोठा भाऊ असणे स्वाभाविक होते. परंतु महाराष्ट्रात विधानसभेत सेनेला जवळपास शून्य अस्तित्व असतानासुद्धा भाजपने तिथे धाकट्या भावाची भूमिका का स्वीकारली हे एक गूढ आहे. कदाचित अडवाणींना राज्यांपेक्षा केंद्रावर जास्त लक्ष द्यायचे असावे, म्हणून त्यांनी महाराष्ट्रात स्थानिक नेत्यांवर अन्याय करून सेनेसमोर दुय्यम भूमिका स्वीकारली असावी.

मोदी-शहांना अर्थातच भाजप व सेना यांच्या एकून जनाधाराची चांगलीच माहिती होती. म्हणूनच २०१४ मध्ये त्यांनी जुना फॉर्म्युला वापरायला नकार देण्याचा व निवडणुक स्वबळावर लढविण्याचा योग्य तो निर्णय घेतला. सेना हा युती होण्यापूर्वी, युतीच्या काळात व युती तुटल्यानंतरही भाजपच्या तुलनेत लहान पक्षच होता व आहे.

श्रीगुरुजी's picture

15 Jul 2017 - 2:31 pm | श्रीगुरुजी

१९८० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला राज्यात ९.४% मते होती तर २८८ पैकी १४ जागा मिळाल्या होत्या.त्यावेळी शिवसेना कुठे होती? १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्येही शिवसेनेच्या तथाकथित बालेकिल्ल्यात-- गिरणगावात शिवसेनेचे वामनराव महाडिक तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते.शिवसेनेचा तथाकथित दुसरा बालेकिल्ला म्हणजे ठाणे.तिथे निवडून कोण आले? तर पूर्वाश्रमीचे जनसंघाचे (आणि जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुक लढविणारे) रामभाऊ म्हाळगी आणि शिवसेनेचे सतीश प्रधान ८% मते मिळवून आपले डिपॉझिट गमावून बसले. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पक्षाचे राज्यातून ८ उमेदवार विजयी झाले. त्यापैकी रामभाऊ म्हाळगींव्यतिरिक्त राम जेठमलानी आणि सुब्रमण्यम स्वामी हे जनसंघाची पार्श्वभूमी असलेले होते. या सगळ्यात शिवसेना कुठे होती?

शिवसेनेने १९७८ च्या विधानसभा निवडणुकीतही ३५ उमेदवार उभे केले होते. त्यातील एकही निवडून आला नव्हता. वास्तविक पाहता १९७८ मध्ये जनता पक्ष, समाजवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेस या ३ प्रमुख पक्षात मते विभागली गेली होती. अशावेळी सेनेला निदान आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात (म्हणजे मुंबई-ठाण्यात) तरी काही जागा मिळायला हव्या होत्या कारण सेनाविरोधी मते ३ पक्षात विभागली गेली होती. परंतु सेनेला भोपळाच मिळाला होता.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात व महाराष्ट्रात इंदिरा कॉंग्रेसची प्रचंड लाट होती. इंदिरा कॉंग्रेसला देशात एकूण ३५५ व महाराष्ट्रात ४६ पैकी (२ जागा त्यांनी सेनेला सोडल्या होत्या) ३९ जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीत सेनेने इंदिरा काँग्रेसशी युती करून आपल्या तथाकथित बालेकिल्ल्यात २ जागा लढविल्या होत्या. एकतर हा भाग म्हणजे यांचा बालेकिल्ला (असा यांचा गैरसमज) व त्यातून सर्वत्र प्रचंड लाट असलेल्या इंदिरा काँग्रेसबरोबर युती यामुळे खरं तर या दोन्ही जागा सेनेसाठी केकवॉक ठरायला हव्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी यांचा पराभव झाला. मुंबई-ठाणे हा भाग सेनेचा बालेकिल्ला आहे हा भ्रम खरं तर तेव्हाच उघडकीला आला होता. मुंबई-ठाण्यातील काही प्रभाग वगळले तर इतरत्र सेनेला स्थान नाही हे तेव्हाच सिद्ध झाले होते.

१९८४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप युती होती.पण त्यावेळी इंदिरा हत्येनंतरच्या सहानुभूतीच्या लाटेत सगळेच वाहून गेले. १९८५ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.त्यावेळी भाजपला ७.३% मते आणि १६ जागा तर शिवसेनेला छगन भुजबळांची माझगाव ही एकमेव जागा मिळाली होती.या काळात भाजपकडे राम नाईक यांची बोरीवली, राम कापसे यांची कल्याण, कोकणात श्रीधर नातूंची गुहागर, अप्पासाहेब गोगट्यांची देवगड इत्यादी हक्काच्या जागा होत्या.शिवसेनेकडे हक्काच्या अशा नक्की कोणत्या जागा होत्या आणि किती?

वर लिहिलेल्या भाजपच्या हक्काच्या जागा सेनेने घशात घातल्याच, पण त्याबरोबरीने पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघही सेनेने जबरदस्तीने बळकावला. शिवाजीनगरमधून याआधी भाजपने सलग दोन वेळा विजय मिळविला होता. भाजपने बांधलेला हा मतदारसंघ सेनेने आयत्या बिळावर नागोबाप्रमाणे हिसकावून घेतला. सेनेकडे स्वतःचा बांधलेला एकही मतदारसंघ नसताना त्यांना २८८ मधील १८३ जागा देणे व स्वतःकडे फक्त १०५ जागा ठेवणे हा मूर्खपणा होता.

असला बेजबाबदार मित्रपक्ष दूर झाला हे चांगलेच झाले. असे म्हणतात की पाठीत खंजीर खुपसणार्‍या मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला.शिवसेनेविषयी नेमके हेच मलाही वाटत आहे. ही गोष्ट बरीच आधी व्हायला हवी होती ती आता झाली आहे. अपेक्षा एकच की शिवसेना बाहेर पडल्यावर त्याजागेवर राष्ट्रवादी काँग्रेस नको. तसे झाले तर विधानसभा निवडणुकांमध्ये तरी माझे मत भाजपला नक्कीच नाही.गरज पडल्यास सत्ता गेली तरी हरकत नाही पण शिवसेना नको आणि राष्ट्रवादीही नको.

+१

श्रीगुरुजी's picture

14 Jul 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

सेनेची अजून एक नवीन भोंदूगिरी उघडकीला आली. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला नेहमीप्रमाणे सेनेने कडाडून विरोध केला आहे (कारण ही योजना भाजप नेत्यांची आहे आणि भाजपने आणलेल्या प्रत्येक योजनेला मंत्रीमंडळात राहून विरोध करणे हेच या मर्दमराठ्यांचे काम आहे). उधोजींना काही दिवसांपूर्वी प्रकल्पासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांची भेट घेऊन एक सभा घेतली व प्रकल्पासाठी एक इंचही जमीन देणार नाही अशी डरकाळी फोडली. आम्ही शेतकर्‍यांच्या बाजूने आहोत आणि त्यामुळे एकाही शेतकर्‍याची जमीन घेऊन देणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. सार्वजनिक बांधकाम खाते सेनेकडे आहे, पण दुसरीच माणसे 'खात' आहेत असा त्यांनी टोमणा मारला होता. त्यावेळी सार्वजनिक खात्याचे मंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते.

आता खालील बातमी वाचा.

http://indianexpress.com/article/india/land-acquisition-begins-for-nagpu...

कालच समृद्धी महामार्गासाठी ६ शेतकर्‍यांनी आपली एकूण १४ एकर जमीन सरकारच्या स्वाधीन केली. त्याचा मोबदला एकूण २.५९ कोटी रूपये शेतकर्‍यांना काल जाहीर समारंभात देण्यात आले. याप्रसंगी सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यांनी स्वाक्षरी केलेली करारपत्रे त्यांच्याच हस्ते शेतकर्‍यांना देण्यात आली.

उधोजी विरोध करताहेत आणि त्यांचेच मंत्री त्या निर्णयाला पाठिंबा देताहेत हा भोंदूपणा शिवसेनेच्या नसानसात भरलेला आहे. एकीकडे मराठी-मराठी गजर करायचा आणि त्याचवेळी जेठमलानी, चंद्रिका केनिया, मुकेश पटेल, संजय निरूपम, प्रितीश नंदी इ. अमराठी व्यक्तींना राज्यसभेची तिकिटे विकून त्याचे समर्थन करायचे ही भोंदूगिरी फक्त सेनेलाच जमते. एकीकडे गुजरात्यांना शिव्या द्यायच्या आणि दुसरीकडे हार्दिक पटेलला 'मातोश्री'वर बोलावून त्याचा सत्कार करून गुजराती मतांसाठी त्याचा पाठिंबा मिळवायचा; एकीकडे मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रत्येक निर्णयाला पाठिंबा द्यायचा आणि बाहेर आल्यावर निर्णयाला कडाडून विरोध करायचा; एकीकडे भाजपला कडाडून विरोध करायचा आणि दुसरीकडे सत्ता सोडायची नाही . . . अशीच भोंदूगिरी सेनेने जन्मापासून केलेली आहे. सेनेने आजतगायत कम्युनिस्ट, समाजवादी, मुस्लीम लीग, काँग्रेस, भाजप, शेकाप इ. वेगवेगळ्या पक्षांबरोबर वेळोवेळी युती केलेली आहे व त्याबद्दल त्यांना कधीही खंत वाटलेली नाही.

सुज्ञ's picture

14 Jul 2017 - 3:48 pm | सुज्ञ

दुटप्पी भूमिका घेण्यात यांचा हात आजून कोणी धरणार नाही . त्या हार्दिक पटेल ला मातोश्री वर न्हाऊ माखू घालताना यांच्या समर्थकांचा लंगडा बचाव पाहून 'जाऊद्या ना बाळासाहेब' असेच म्हणावेसे वाटले.

म्हणजे जे बाळासाहेब देशद्रोही ,अमराठी यांच्याविरुद्ध बोलुन दमले त्यांच्या फोटोपुढे यांच्या चिरंजीवांना त्या पटेल ला मिठ्या मारताना थोडीतरी .. वाटायला हवी होती.
बाकी धागा शिवसेना आणि त्यांचा दंगलीतील सहभाग यावर आहे आणि मग त्या अनुषंगाने शिवसेनेवरच चर्चा होणार आणि त्यांचीच कार्यकर्तुत्वे बाहेर पडणार .

सेनेने काम काय केले असे विचारल्यावर भाजप किंवा अन्य लोकांनी काय केले असे विचारणे म्हणजेच सेनेने काहीही ठोस न केल्याचे लक्षण आहे .

बाकीच्या विशेषतः भाजप च्या कार्यकर्तृत्वावर अनेक धागे आणि त्या अनुषंगाने तिथे चर्चाही झाल्यात. आत्ताच मोदी सरकार ची 3 वर्षे हा धागा अजून जिवंत आहे. तो तर अत्यंत एकांगी धागा आहे पण तिथे कोणीही म्हटले नाही की भाजप वर गरळ ओकण्यासाठी हा धागा चालू केला . कारण चर्चा करायला कामाची उदाहरणे द्यायला अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत .
हा धागाच मुळात सेनेवर असल्याने इथे त्यांचा दंगलीतील सहभाग व झोडपलेली माणसे( चुकलो: त्यांनी आत्तापर्यंत केलेले प्रमुख काम) आणि मग त्या अनुषंगाने त्यांची धोरणे
व त्यांची वाटचाल यावरच चर्चा होणार .
एकच म्हणेन सेनेची सत्यपरिस्थिती स्वीकार व जमिनीवर या

इथे उद्धव ठाकरे आदींचा सतत वेडा वगैरे म्हणून अपमानजनक उल्लेख येत आहे. हे अती वाटते. नुसती द्वेशाने आंधळी टीका करून शिवसेना संपेल असे वाटत नाही.
टीपः शिवसेनेबद्दल काडीमात्र आदर नाही तरी देखिल भाषा योग्य वाटली नाही.

सुज्ञ's picture

14 Jul 2017 - 3:51 pm | सुज्ञ

कुठे झाला ? वाचला नाही . झाला असल्यास नक्कीच चुकीचे आहे

हतोळकरांचा प्रसाद's picture

14 Jul 2017 - 4:04 pm | हतोळकरांचा प्रसाद

या गोष्टीशी प्रचंड सहमत! शिवसेनेच्या ज्या चुकीच्या गोष्टी खोदून खोदून इथे मांडल्या जात आहेत आणि त्यासाठी जी भाषा वापरले जातेय त्यावरून अभ्यास कमी जळजळ जास्त असेच वाटते. हे असले यू टूर्न, दुटप्पीपणा, दंडेलशाही हि या ना त्या कारणाने सगळे पक्ष करतात आणि तीच भारतीय राजकारणाची खासियत आहे. पण मुद्दे सोडून झोडपायचे ठरवले तर मला वाटते नळावरची भांडणे बरी वाटतील.

विशुमित's picture

14 Jul 2017 - 4:50 pm | विशुमित

मुद्दे सोडून झोडपायचे भाजप पक्षा बाबत फक्त करू नका.

सुज्ञ's picture

14 Jul 2017 - 5:00 pm | सुज्ञ

उत्तरे नसली की असले भाषा वगैरे मुद्दे चालू होतात. सगळेच पक्ष करतात, सगळेच सारखे वगैर कातडीबचाव वाक्ये आहेत . दंगलीत लोकांना झोडपताना , हणामाऱ्या करताना अंगात , मनगटात रग धमक असताना मात्र बाकीचे चड्यावाले वगैरे असतात आणि लपून बसतात. त्यावेळी सगळे सारखे नसतात.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Jul 2017 - 10:56 am | हतोळकरांचा प्रसाद

तुमचे "मुद्दे" वर समजले आहेतच. सरसकट वक्तव्ये करण्याआधी काय अभ्यास केला आहे ते मांडले तर चर्चा शक्य होऊ शकते. ते मनगटात दम वगैरे पोखळ गफ्फा आणाव्या लागत नाहीत. स्वतः काहीही अभ्यास न करता कामे केली आहेत ना मग सांगा बरं थाटाचे प्रश्न फेकणे खूप सोपे असते असे मला वाटते. नेमके हेच मोदीविरोधक केंद्रात करताना दिसतात.

स्वतःला कसली कामे अपेक्षित आहेत ते आपण ज्या पक्षाची पाठराखण करतोय त्या संदर्भात सांगावीत म्हणजे सरळ सरळ तुलना करता येते. बाकी ५१ वर्षे गफ्फा दिवसभर हाणता येतात.

परत एकदा शिवसेनेचा सध्याची वायफळ वक्तव्ये आणि = ५१ वर्षात काहीच कामे नाहीत याला आक्षेप आहे.

प्रसाद_१९८२'s picture

15 Jul 2017 - 11:17 am | प्रसाद_१९८२

भाजपाने काय काम केले वगैरे विचारुन, मुळ विषयाला फाटे फोडण्यापेक्षा,
मागील ५१ वर्षात शिवसेनेने काही भरिव काम केले असेल, तर एकाद-दुसर्‍या कामाचे उदाहरण देऊन विरोधकांचे तोंड गप्प का नाही करत तुम्ही ?

श्रीगुरुजी's picture

15 Jul 2017 - 1:52 pm | श्रीगुरुजी

मी सुरवातीपासूनच ते विचारत आहे. शिवसेनेने मागील ५१ वर्षात केलेली भरीव कामे विचारल्यानंतर शिवजलक्रांती योजना (जलयुक्त शिवार या फडणविसांच्या योजनेचे शिवसेनेने स्वतःपुरते केलेले बारसे), लोकाधिकार समिती नेमून काही लोकांना ८० च्या दशकात नोकर्‍या दिल्या आणि ९३ च्या दंगलीत एका इमारतीत दंगलखोरांना बदडले इतकीच भरीव (!) कामे सांगता आली. मुळात मुद्दलातच फारसे काही नसल्याने भाजपची कामे सांगा, सगळे पक्ष सारखेच अशा पळवाटा काढायला सुरूवात झाली. भाजपने काय केले यावर मिपावर अनेक धागे आहेत. हा धागा फक्त शिवसेनेवर असल्याने शिवसेनेने काय केले हे विचारणे योग्य आहे. परंतु तेवढे मात्र सांगता येत नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Jul 2017 - 7:58 pm | हतोळकरांचा प्रसाद

तेच तर सांगायचा प्रयत्न चालला आहे साहेब! सांगितले तर ऐकायची तयारी नसते आणि त्याला फाटे फोडले जातात. ज्यांची ऐकायची तयारी असते असे लोक फाटे न फोडता सरळ सर्च करून माहिती घेऊ शकतात. नाहीतर मग कसे होते की शिवजलक्रांती कशी कुरघोडी करण्यासाठी काढली किंवा ५५ उड्डाणपूल कसे भाजपची योजना होती अशा पोकळ गफ्फा पुढे येतात. जर तेव्हाचे काम गडकरींचे होते तर मग इतर मंत्र्यांची कामे शिवसेनेची नसतील का? किंवा मग आजची सामाजिक बांधकामाची कामे, परिवहनची कामे, उद्योगाची कामे इ. शिवसेनेची नसतील का? मुद्दा साधा आहे हो, जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर! तुम्ही कोणत्या कामांना भाजपची कामे म्हणता किंवा भाजपने कामे केली म्हणता ते सांगा म्हणजे समांतर कामे शोधता येतील आणि तुम्हीच सांगितलेली कामे असल्यामुळे फाटे फुटणार नाहीत, कसे? आधीची तुमची यादी जलयुक्त शिवार आणि एक दोन लोकांवर कारवाई सुरू करणे (कारवाई करणे नव्हे) यापुढे गेलेली नाही ते एक असोच! भाजपने कामे केली नाहीत असा तुमच्यासारखा माझा पोकळ दावा नाही, पण कसल्या कामांना तुम्ही कामे म्हणता हे तरी कळू द्या? उदा. शिवसेना हिंदुत्वाच्या वायफळ बाता करते आणि त्यांनी हिंदुत्वाची भाजपसारखी अमुक कामे केली नाहीत असं मांडून तुम्ही तुमचा मुद्दा सिद्ध करू शकत नाही का?

सुरुवात शिवसेनेच्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेल्या कामांपासून होऊ शकते. बाकी ९५-९९ च्या सरकारमधील शिवसेनेचे झुणका भाकरी योजना, ५ जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांचे उत्तम व्यवस्थापन, महागाईवर नियंत्रण, कामधेनू योजना, महाराष्ट्र छात्र सेना, सैनिकी शाळा (मुलींसाठीही), सेतू योजना, क्रीडापीठ, आदिवासींसाठी पाडासेवक (बहुतेक हेच नाव असावं), निवृत्ती वय कमी करून काही अंशी का होईना नौकऱ्या उपलब्ध करणे इ. कामे थोडावेळ बाजूला ठेवू!

श्रीगुरुजी's picture

15 Jul 2017 - 8:48 pm | श्रीगुरुजी

जर तेव्हाचे काम गडकरींचे होते तर मग इतर मंत्र्यांची कामे शिवसेनेची नसतील का? किंवा मग आजची सामाजिक बांधकामाची कामे, परिवहनची कामे, उद्योगाची कामे इ. शिवसेनेची नसतील का?

हे सर्व सब्जेक्टिव्ह आहे. नक्की टँगिबल कामे आहेत का? सामाजिक बांधकामाचं कोणतं काम सेनेने केले आहे? परिवहन, उद्योग या क्षेत्रात सेनेने नक्की कोणती कामे केली आहेत?

आधीची तुमची यादी जलयुक्त शिवार आणि एक दोन लोकांवर कारवाई सुरू करणे (कारवाई करणे नव्हे) यापुढे गेलेली नाही ते एक असोच!

हा धागा शिवसेनेवर आहे, भाजपवर नाही. त्यामुळे मी भाजपने केलेली फक्त एकदोन उदाहरणे दिली. भाजपची कामे पहायची असतील तर भाजपवर काढलेले धागे वाचा.

सुरुवात शिवसेनेच्या वेबसाईटवर त्यांनी टाकलेल्या कामांपासून होऊ शकते. बाकी ९५-९९ च्या सरकारमधील शिवसेनेचे झुणका भाकरी योजना, ५ जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांचे उत्तम व्यवस्थापन, महागाईवर नियंत्रण, कामधेनू योजना, महाराष्ट्र छात्र सेना, सैनिकी शाळा (मुलींसाठीही), सेतू योजना, क्रीडापीठ, आदिवासींसाठी पाडासेवक (बहुतेक हेच नाव असावं), निवृत्ती वय कमी करून काही अंशी का होईना नौकऱ्या उपलब्ध करणे इ. कामे थोडावेळ बाजूला ठेवू!

झुणकाभाकर केंद्र म्हणजे लोकांना कोपर्‍याकोपर्‍यावर बेकायदेशीर टपर्‍या टाकून दिल्या. माझ्या घराजवळही अशी एक टपरी कोपर्‍यावर होती. या टपर्‍यात झुणकाभाकरी ऐवजी पेप्सी, बिसलेरी, गुटख्याच्या पुड्या असल्या गोष्टी विकायला असायच्या. यथावकाश यातील बरीचशी केंद्रे बंद पडली. बाकी हे ५ जीवनावश्यक वस्तूंच्या भाव स्थिर ठेवणे, स्वस्त धान्य दुकानांचे उत्तम व्यवस्थापन, महागाईवर नियंत्रण, कामधेनू योजना, महाराष्ट्र छात्र सेना, सैनिकी शाळा (मुलींसाठीही), सेतू योजना, क्रीडापीठ, आदिवासींसाठी पाडासेवक (बहुतेक हेच नाव असावं) हे नक्की काय आहे, हे कधी सुरू झालं, त्याचा जनतेला काय फायदा झाला याविषयी जरा सविस्तर सांगा. मुख्य म्हणजे शिवसेनेच्या वेबसाईटवरून कॉपीपेस्ट करू नका. कोणत्याही पक्षाच्या मुखपत्रात व वेबसाईटवर फक्त स्वतःचेच ढोल बडविलेले असतात. त्यामुळे कोणत्यातरी दुसर्‍या स्त्रोतातून माहिती सांगा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

15 Jul 2017 - 9:27 pm | हतोळकरांचा प्रसाद

तुमच्या पूर्वग्रहदोषीत विचारांना बदलणे माझ्या आवाक्यात नसल्या कारणाने मला नाही वाटत आता कि शिवसेनेने तुम्हाला आवडण्यासारखे काही केले आहे. अंध भक्त आणि अंध विरोधक हा प्रकार भारतातील राजकारण नेहमीच ड्राईव्ह करत असतो यात नवल नाही. नाहीतरी मी म्हणालोच वर कि फाटे फोडले जाणारच त्याला पर्याय नाही, पूर्वग्रह दुसरं काय? मी कुठल्याही साईटवरून कॉपी करतोय याच्याशी काहीही संबंध नसावा त्यामुळे त्याचा उल्लेख तुम्हाला ह्या योजना काय होत्या याची माहिती नकोच आहे त्यामुळे तुम्ही फाटे फोडता या मताकडे घेऊन जातो. चला मान्य करू कि शिवसेनेने कामे केलेली नाहीत. आता हा भाजपचा धागा नाहीये वगैरे पळपुटेपण तुम्ही करणारच नाहीत, त्यामुळे सांगा बरं पटापट कि कुठली भाजपची कामे तुम्हाला आवडतात.

बाकी तुम्ही कॉम्पुटर लिटेरेट असालच असा माझा कयास आहे त्यामुळे उगाचच वायफळ (अज्ञानमुलक) फाटे फोडण्यापेक्षा त्या योजनांबद्दल माहिती तुम्ही काढू शकालच याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाहीये. त्यामुळे माहिती शिवसेनेच्या साईटवर आहे म्हणून खोटी वगैरे अंध विरोधकांची लक्षणे पण तुम्ही दाखवणार नाहीत याबद्दल खात्री आहेच.

फक्त एक निरीक्षण नोंदवतो आणि रजा घेतो, तुमच्यासारख्या अभ्यासू आयडीचा ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यास कमी पडतोय. ते झुणका भाकरी योजनेचा अभ्यास करणे तर फार गरजेचं आहे. काय आहे एखाद्या पक्षाचा विरोध करणं वेगळं आणि त्या पक्षाच्या एखाद्या चांगल्या योजनेचा विरोध करणं वेगळं! अशातूनच लोकं मागच्या सरकारच्या 108 योजनेचा पण अंधपणे विरोध करतात.

बाकी तुम्ही सुज्ञ आहातच, उगाचच प्रतिसादांचा किस पाडून धागा वर ठेवण्याचं पातक नको लागायला!

गॅरी ट्रुमन's picture

15 Jul 2017 - 10:59 pm | गॅरी ट्रुमन

१९९५ ते १९९९ दरम्यानचे युतीचे सरकार म्हणजे बर्‍यापैकी सावळागोंधळ होता. एक तर विधानसभेची मुदत मार्च २००० पर्यंत असताना लोकसभेच्या निवडणुकांबरोबर सप्टेंबर-ऑक्टोबर १९९९ मध्ये निवडणुक घ्यायचे कारण हे की युती सरकारला आपण परत निवडून येऊ याची खात्री नव्हती. नुकतेच झालेले कारगील युध्द आणि वाजपेयींची प्रतिमा यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल त्यातच विधानसभा निवडणुका उरकलेल्या बर्‍या असा काहीसा दृष्टीकोन होता. किंबहुना प्रचारातही भर लोकसभेसाठीचा प्रचार करण्यावरच होता. राज्य सरकारने त्यापूर्वी साडेचार वर्षात नक्की काय काम केले याविषयी फारसे कोणी बोलत नव्हते. त्यातल्या त्यात नितीन गडकरींनी बांधलेले रस्ते आणि पूल सोडून युती सरकारकडे लोकांपुढे दाखविण्यासारखे फार काही होते असे वाटत नाही.

एकतर एनरॉन प्रकरणात प्रचंड घोळ युती सरकारने घातला होता. एकतर मनोहर जोशींचा मुख्यमंत्री म्हणून फार प्रभाव कधीच नव्हता. गोपीनाथ मुंडे 'एनरॉन करार अरबी समुद्रात बुडवू' असे बोलले होते. कोणताही करार असा एकाएकी रद्द करता येत नाही. पूर्वी सही केलेल्या करारातच तो करार नक्की कोणत्या पध्दतीने आणि कोणत्या परिस्थितीत रद्द करता येईल याचा उल्लेख असतो. त्या पध्दतीप्रमाणे करार रद्द केला गेला नाही तर दुसरा पक्ष आर्बिट्रेशनसाठी जाऊ शकतो याचा पत्ता तरी युती सरकारला होता कुणास ठाऊक. युती सरकारने एकाएकी करार रद्द करायचा निर्णय जाहिर केला. मग एनरॉनने महाराष्ट्र सरकारला लवादापुढे खेचल्यावर लंडनमध्ये लवादाच्या कारवाईसाठीचा खर्च आलाच. पुढे तोच करार परत मान्य करून घ्यावा लागला. त्या कराराला ३१ मे १९९६ पर्यंत केंद्र सरकारची काऊंटर गॅरंटी देणे गरजेचे होते. त्यावेळी वाजपेयींनी १३ दिवसांच्या सरकारचा राजीनामा देण्यापूर्वी काही तास ती काऊंटर गॅरंटी दिली होती. केंद्रात कोणतेही सरकार असते तरी ती काऊंटर गॅरंटी देणे गरजेचेच झाले असते. एनरॉनच्या रिबेका मार्क करारासंबंधीच्या वाटाघाटींसाठी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना न भेटता परस्पर बाळासाहेब ठाकर्‍यांना भेटायला गेल्या होत्या. कॉर्पोरेटवाल्यांना आपले काम होण्याशी मतलब आणि ते काम कोणाच्या माध्यमातून होईल हे त्यांना चांगले समजते म्हणून परस्पर बाळासाहेबांची भेट घेतली. त्याविरोधात मनोहर जोशींनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बाळासाहेब संतापले होते. दुसर्‍या दिवशी मटामधील हेडलाईन "बाळासाहेबांच्या संतापामुळे युतीचे सरकार हादरले" अजूनही लक्षात आहे.

गोपीनाथ मुंडेंनीही गृहमंत्री म्हणून फार काही केल्याचे ऐकिवात नाही. शरद पवारांच्या मंत्रीमंडळातील मदन बाफना आणि इतर काही मंत्र्यांच्या कार्यालयातून दुबईला फोन केले गेले होते असे आरोप त्यांनी केले होतेच आणि त्या कॉलचे तपशील मोठा गाजावाजा करून जाहिर केले पण तो एक फुसका बारच निघाला. मटक्यावर बंदीचाही असाच फुसका बार निघाला. दाऊदला फरफटत आणू हा पण असलाच फुसका बार. मान्य आहे की राज्य सरकारला तसे करता येणे कठिण नाही तर अशक्य होते. पण तसे असेल तर मग असे काहीतरी आश्वासन तरी का द्यावे?

रमेश किणी प्रकरणात चौकशी नुकतीच सुरू झालेली असताना मुख्यमंत्री मनोहर जोशींनी विधानसभेत 'राज ठाकरे निर्दोष आहेत' अशी क्लीन चीट देणे कितपत योग्य होते? शशीकांत सुतार आणि दौलतराव आहेर या मंत्र्यांविरूध्द भ्रष्टाचाराचे आरोप होतेच. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करून अण्णा हजारे १२ दिवस उपोषणाला बसले होते. बबनराव घोलप हे दारूबंदी प्रचारमंत्री. त्यांनीच स्वतः भर श्रावण महिन्यात दारूच्या बारचे उद्घाटन केले होते असे वाचल्याचे आठवते.

मधूनमधून बाळासाहेबांनी बेताल वक्तव्ये चालूच असत. मग पु.ल.देशपांडेंना 'मोडका पूल' म्हणणे असो की १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठीच्या विशेष न्यायालयाचे न्यायाशीश जयनारायण पटेल यांच्यावर विनाकारण उखडणे असो.

एक रूपयात झुणकाभाकर योजना मोठा गाजावाजा करून चालू केली पण १९९९ च्या अर्थसंकल्पातच सरकार या योजनेला कोणतेही अनुदान देणार नाही असे जाहिर करून ती योजना गुंडाळण्यात आली. प्रथमच सत्ता आल्याच्या आनंदात (की पूर्वी प्रशासनाचा अनुभव नसल्यामुळे असेल) वेगवेगळे मंत्री वेगवेगळी आश्वासने देत सुटले होते. 'या कामासाठी सरकार पैसा कमी पडू देणार नाही' हे मनोहर जोशींचे नेहमीचे पालुपद असायचे. त्यावेळी वर्तमानपत्रात आले होते की विविध मंत्र्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करायची असतील तर महाराष्ट्र सरकारने इतर सगळे खर्च बंद करून नुसत्या या आश्वासनांवर खर्च केला असता तरी ती पूर्ण करायला २०२० साल उजाडेल!!

एकूणच युती सरकारच्या काळात कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता असेच चित्र होते. त्यातल्या त्यात नितीन गडकरींचे काम सोडून लोकांपुढे सादर करण्यासारखे काही होते असे वाटत नाही.

शिवसेनेने ५१ वर्षात काहीच केले नाही असे मी तरी म्हणणार नाही. अभ्याच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे रूग्णवाहिका, रक्तदान शिबीरे, १० वी साठीच्या प्रिलीम परीक्षा इत्यादी कामे शिवसेनेनी केली होती. मी शाळेत असताना ठाण्यात राहायला होतो. आनंद दिघे यांनी ठाण्यातील अनेकांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत केली होती हे पण ठाण्यातले लोक जाणतात. किंबहुना शिवसेनेची इतर शहरांमध्ये महापालिका निवडणुकांमध्ये पिछेहाट होत असताना ठाण्यात मात्र चांगला विजय मिळवला यात आनंद दिघेंची पुण्याई आहे असे म्हटले तरी चालेल. त्यांचे नाव श्रीधर खोपकर खून प्रकरणी आले होते. ते त्याबद्दल काही दिवस तुरूंगातही जाऊन आले होते (त्यांना काँग्रेसचे वकिल जगन्नाथ हेगडेंनी वकिली शक्कल लढवून सोडवले होते). जे काही असेल ते पण सामान्य माणसाला त्यांच्यापासून त्रास कधीच नव्हता तर त्यांनी सामान्यांना मदतच केली हे चित्र मी तरी त्यावेळी बघितले आहे. अर्थात आमच्यासारखे सुशिक्षित मध्यमवर्गीय लोक कधी त्यांच्याकडे जायचे नाहीत पण शहरात त्यांची प्रतिमा नक्की कशी होती हे तर नक्कीच समजून यायचे.

तरीही जेव्हा खरोखरच काही करून दाखवता आले असते अशावेळी म्हणजे युतीचे सरकार असताना फार काही करता आले नव्हते हे सत्यही नाकारून अर्थ नाही. आणि ठाण्यात आनंद दिघेंच्या नावाचा प्रभाव असला तरी महापालिकेत सत्ता असताना फार काही केले असेही म्हणता येणार नाही.

गॅरी ट्रुमन's picture

15 Jul 2017 - 11:30 pm | गॅरी ट्रुमन

युती सरकारसंदर्भात एक राहिलेला मुद्दा:

इंडिअन स्कूल ऑफ बिझनेस हे अनुभवी प्रोफेशनल्ससाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बी-स्कूल भारतात चालू करायचे प्रयत्न १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात सुरू होते. अर्थातच महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे आघाडीचे राज्य असल्यामुळे ते बी-स्कूल महाराष्ट्रात यावे हा प्रयत्न होता. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी त्या बी-स्कूलमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण ठेवावे अशी अजब मागणी त्यांनी केली . आंतरराष्ट्रीय बी-स्कूलमध्ये त्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हवे ही मागणी किती हास्यास्पद होती. हार्वर्ड बी-स्कूलमध्ये मॅसॅच्युसेट्सच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवाव्यात ही मागणी कशी वाटेल? त्याचवेळी चंद्रबाबू नायडू टपून बसलेले होतेच. त्यांनी पुढाकार घेऊन आय.एस.बी हैद्राबादला नेले.

अशी एखादी शैक्षणिक संस्था महाराष्ट्रात येणार असेल तर त्या संस्थेला अशा अटी ठेवायचे कारण काय? प्रत्येक ठिकाणी असले मराठी बाणे ठेऊन कसे चालेल? आंतरराष्ट्रीय दर्जाचे बी-स्कूल म्हणजे काय महापालिकेतल्या नोकर्‍या होत्या का की त्यासाठी स्थानिकांसाठी राखीव जागा ठेवाव्यात?

हायला हे माहीत नव्हतं! जबरी ष्टोरी आहे!

गॅरी ट्रुमन's picture

17 Jul 2017 - 11:51 am | गॅरी ट्रुमन

एकूणच शिवसेना नेतृत्वाच्या समजेला आणि जागतिक आकलनाला साजेसाच प्रकार होता तो. आय.एस.बी लगेच हार्वर्ड किंवा व्हार्टन होणार्‍यातले नसले (तसे ते अजूनही नाही) पण तरीही कॉर्पोरेट जगतातील आघाडीचे लोक ती महत्वाकांक्षा धरून महाराष्ट्रात अशी संस्था काढत असतील तर त्यात असा मोडता घालायचे कारण समजत नाही. मुंबईत आय.आय.टी ची स्थापना झाली तेव्हा नशीब यांचे सरकार सत्तेत नव्हते. नाहीतर तिथेही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवाव्यात अशी अट त्यांनी ठेवली असती.

नुसते गुजरात्यांच्या नावाने खडे फोडून काही उपयोग नाही. खरं तर गुजराती समाज हा शिक्षण क्षेत्रासाठी फार नावाजलेला नाही. तो समाज व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये पुढे. पण त्यामुळे आपला फायदा कशात हे त्यांना बरोबर कळते. त्यामुळेच अहमदाबादमध्ये आय.आय.एम आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन यासारख्या संस्था सुरू केल्या आणि त्यात पुढाकार होता विक्रम साराभाई आणि कस्तुरभाई लालभाई यांचा. विक्रम साराभाई स्वतः शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व समजत होते. पण कस्तुरभाई लालभाई हे तर पक्के व्यापारी. तरीही त्यांना अशा संस्था गुजरातमध्ये आणायचे महत्व समजले. हे दोघे गेल्यानंतर इतरांनीही मायकासारखी कम्युनिकेशन आणि अ‍ॅडव्हर्टायझिंगमधील तर इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेन्ट ही ग्रामीण व्यवस्थापनावरील भारतातील प्रथम क्रमांकावरील संस्था अहमदाबादमध्येच आणली. अशा संस्था त्या राज्यांच्या मानबिंदू असतात. या सगळ्या गोष्टींची जाण शिवसेना नेतृत्वाकडे होती किंबहुना हे मुळात समजून घ्यायची कुवत त्यांच्याकडे होती असे वाटत नाही.

अनुप ढेरे's picture

17 Jul 2017 - 12:12 pm | अनुप ढेरे

आता आयायटी गांधिनगर पण आहे गुजरातेत.

गॅरी ट्रुमन's picture

17 Jul 2017 - 12:36 pm | गॅरी ट्रुमन

आता आयायटी गांधिनगर पण आहे गुजरातेत.

हो गेल्या काही वर्षात अनेक राज्यांमध्ये नव्या आय.आय.टींची स्थापना झाली आहे. या यादीमध्ये त्यांचा समावेश मुद्दामून केला नाही कारण (माझ्या माहितीप्रमाणे) ती आय.आय.टी गुजरातमध्ये यावी यासाठी गुजरातच्या राज्यकर्त्यांनी किंवा उद्योजकांनी विशेष प्रयत्न केले नव्हते. केंद्र सरकारच्या अनेक नव्या आय.आय.टी स्थापन करायच्या धोरणात गुजरातलाही आय.आय.टी मिळाली. तसेच सुरतमध्ये एन.आय.टी (पूर्वीचे रिजनल इंजिनिअरींग कॉलेज) आहे. त्याचा पण समावेश त्या यादीत केला नाही कारण केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक राज्यात एक एन.आय.टी आहे. महाराष्ट्रातही नागपूरला, मध्य प्रदेशात भोपाळला, कर्नाटकात सुरथकलला इत्यादी ठिकाणी अशा एन.आय.टी आहेत. ते कॉलेज गुजरातमध्ये यावे यासाठी गुजरातच्या राज्यकर्त्यांनी किंवा उद्योजकांनी विशेष प्रयत्न केल्याचे मला तरी माहित नाही.

श्रीगुरुजी's picture

16 Jul 2017 - 2:17 pm | श्रीगुरुजी

मी कुठल्याही साईटवरून कॉपी करतोय याच्याशी काहीही संबंध नसावा त्यामुळे त्याचा उल्लेख तुम्हाला ह्या योजना काय होत्या याची माहिती नकोच आहे त्यामुळे तुम्ही फाटे फोडता या मताकडे घेऊन जातो.

संबंध आहे. शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचलून इथे जे लिहिले आहे त्याच्यावर मी किंवा इतरांनी डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी अपेक्षा आहे का? मी कोणत्याच पक्षाच्या संकेतस्थळावर/मुखपत्रात काय लिहिले आहे त्यावर डोळे झाकीन विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुम्ही इथे शिवसेनेच्या संकेतस्थळावरून उचललेली शिवसेनेच्या भरीव (!) कामांची यादी इथे टाकली आहे त्यावर आंधळेपणाने निदान मी तरी विश्वास ठेवणार नाही.

शिवसेनेची एक गंमत तुम्हाला माहिती नसावी. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात (चुकलो. वचननाम्यात असा शिवसेनेचा शब्द होता. जसे सेनेने जलयुक्त शिवार या योजनेचे आपल्यापुरते शिवजलक्रांती असे नामांतर केले आहे, तसेच इतर पक्ष ज्याला जाहीरनामा म्हणतात त्याला शिवसेना वचननामा असे संबोधते) आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ८०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. नंतर २००४ च्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या वचननाम्यात आपल्या सरकारने १९९५-९९ या काळात १९९५ मधील वचननाम्यात दिलेली ९०% आश्वासने पूर्ण केली आहेत असा दावा केला होता. हे १९९९-२००४ या काळात सत्तेवर नसताना ही जास्तीची १०% आश्वासने कशी काय पूर्ण केली हे खुदा जाने. सांगायचा मुद्दा असा की राजकीय पक्षाने स्वत: केलेल्या दाव्यांवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये.

चला मान्य करू कि शिवसेनेने कामे केलेली नाहीत. आता हा भाजपचा धागा नाहीये वगैरे पळपुटेपण तुम्ही करणारच नाहीत, त्यामुळे सांगा बरं पटापट कि कुठली भाजपची कामे तुम्हाला आवडतात.

अजून किती वेळा सांगायचं की हा धागा भाजपवर नसून शिवसेनेवर आहे. भाजपच्या कामासंदर्भात मिपावर अनेक धागे निघाले आहेत व काही अजूनही जिवंत आहेत. तिथे भाजपच्या कामगिरीवर प्रचंड दळण दळले गेले आहे. वाटल्यास त्या धाग्यांच्या उरल देतो, पण इथे ते पुन्हा टाकणे योग्य होणार नाही. त्यामुळे धाग्याचा शिवसेना हा विषय भरकटून भाजप हा विषय चघळला जाईल.

बाकी तुम्ही कॉम्पुटर लिटेरेट असालच असा माझा कयास आहे त्यामुळे उगाचच वायफळ (अज्ञानमुलक) फाटे फोडण्यापेक्षा त्या योजनांबद्दल माहिती तुम्ही काढू शकालच याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाहीये. त्यामुळे माहिती शिवसेनेच्या साईटवर आहे म्हणून खोटी वगैरे अंध विरोधकांची लक्षणे पण तुम्ही दाखवणार नाहीत याबद्दल खात्री आहेच.

मी वर दिलेल्या शिवसेनेच्या भरीव (!) कामांची माहिती काढायचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ "क्रीडापीठ" हे नक्की काय आहे हे बराच वेळ गुगलून पाहिल्यावर त्याबद्दल काहीच मिळाले नाही. तुम्ही शिवजलक्रांती या योजनेची दिलेली चित्रफीत सुद्धा २-३ वेळा पाहिली. शिवसेनेने केलेल्या भरीव (!) कामांची माहिती कोठे मिळेल (शिवसेनेचे संकेतस्थळ व वचननामा सोडून इतरत्र) ते सांगा.

फक्त एक निरीक्षण नोंदवतो आणि रजा घेतो, तुमच्यासारख्या अभ्यासू आयडीचा ग्रामीण महाराष्ट्रातील अभ्यास कमी पडतोय. ते झुणका भाकरी योजनेचा अभ्यास करणे तर फार गरजेचं आहे. काय आहे एखाद्या पक्षाचा विरोध करणं वेगळं आणि त्या पक्षाच्या एखाद्या चांगल्या योजनेचा विरोध करणं वेगळं! अशातूनच लोकं मागच्या सरकारच्या 108 योजनेचा पण अंधपणे विरोध करतात.

झुणका भाकरी योजना किंवा वडापावच्या गाड्या (दोन्ही गोष्टी बेकायदेशीर जागेत) ही सेनेच्या रोजगारनिर्मितीची सर्वोच्च कल्पना. असल्या गोष्टी करण्याऐवजी सेना नेत्यांनी सहकारी कारखाने, महाविद्यालये, डेअर्‍या अशा गोष्टी सुरू केल्या असत्या तर कितीतरी जास्त प्रमाणात स्थायी स्वरूपाची रोजगार निर्मिती झाली असती. झुणका भाकरी केंद्रात आधी लिहिल्याप्रमाणे झूणका भाकरी ऐवजी बिसलेरीच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्यांची माळ, बिस्किटांचे पुडे अशा गोष्टी दिसायच्या. यातली बहुसंख्य केंद्रे १९९९ नंतर बंद झाली. बाबा आढावांनी १९७५ मध्ये सुरू केलेले मंडईतील मूळ झुणकाभाकरी केंद्र अनेक दशके सुरू होते (ते बहुतेक अजूनही सुरू आहे). त्याचीच नक्कल करून कोपर्‍याकोपर्‍यावर उभी केलेली बेकायदेशीर झुणकाभाकर केंद्रे केव्हाच बंद झाली.

सुज्ञ's picture

17 Jul 2017 - 11:16 am | सुज्ञ

हेच म्हणायचे होते .

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 12:40 pm | हतोळकरांचा प्रसाद

पुरावे नसताना बेछूट विधाने करणे हा बऱ्याच लोकांचा हातखंडा असतो त्यामुळे त्यात काही नवल नाही ते एक असोच! प्रतिसाद नीट वाचत चला हि वारंवार केलेली विनंती धुडकावून भारंभार शब्दाचे ढीग ओतणे आवडत असल्यास काय करणार? मी कुठेही तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास सांगितले नाही तरी तुमचा पोकळ दावा चालूच आहे. मी तुम्हाला मुद्दे सांगितले, तेही तुम्ही स्वतःहून कुठलाही अभ्यास न करता पूर्वग्रहदूषित मते मांडत आहात म्हणून. यावरून मला ती गुरु शिष्याची गोष्ट आठवली, पालीची. पाल खायचीच आहे, मग ती परतून खायची आहे मग ती अर्धी करून खायची आहे वगैरे!

वचननामा: थोडक्यात काय वचननामा म्हणा किंवा जाहीरनामा म्हणा तुम्ही काटेकोरपणे पाहता तर आणि त्यानुसार कोणत्या पक्षावर टीका करायची ते ठरवता! सामान्य नागरिकांनी हे करणं कौतुकास्पदच आहे. मग काढायचे काय जाहीरनामे मागचे सगळ्यांचे (हा शिवसेनेचा धागा आहे वगैरे कारणे द्यायची असतील दुसरा धागा काढा किंवा कुठल्याही राजकीय धाग्यावर जिथे या विषयाशी संबंधित चर्चा होईल तेव्हा टाका नाहीतर उगाच एकांगी टीका काय कोणीही करतं)?

क्रीडापीठ: १९९५ सालच्या किती गोष्टी आंतरजालावर आधारित आहेत हो? हि योजना बदलत बदलत आजच्या सरकारच्या क्रीडा खात्यात आहे काय कि बंद पडली किंवा दुसऱ्या नावाने सुरुच आहे याची कुठे माहिती मिळतेय का बघा, मला वाटते माहिती मिळत नाही नाही म्हणून एखादी गोष्टच खोटी वगैरे असले पोकळ दवे सहज करता येतात. म्हणजे मी तरी तसंच करतो माहिती मिळत नाही म्हणजे दोनही बाजू असू शकतात, चालली नाही योजना किंवा चालली. दोन्हीची शक्यता गृहीत धरायला अडचण कसली? बाकी इतर बाकीच्या योजनांची माहिती मिळाली कि नाही?

झुणका भाकरी आणि शिवसेनेचे सहकारी कारखाने वगैरे - पुरावे कशाचेही नाहीत, स्वतःच्या घराबाजूची कुठली टपरी बेकायदा होती वगैरे पुरावे तर नसतीलच वरून महाराष्ट्रभर तहसील कार्यालयाच्या आत उघडण्यात आलेली झुणका भाकर केंद्रे सुद्धा बेकायदेशीरच, दुर्दैवाने तुमच्या गल्लीच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे! टपरी आणि गुटख्याच्या माळा! त्या टपरीचालकाने काय ठेवावे हे सरकारच्या योजनेत लिहायला हवं होतं? हास्यास्पद पूर्वग्रहदूषित मते! एखाद्या पक्षाच्या नेत्याने स्वतःच्या फायद्यासाठी काढलेल्या संस्था म्हणजे त्या पक्षाचे रोजगारनिर्मितीचे धोरण? महाराष्ट्रातल्या कोणत्या डेअऱ्या, कारखाने कोणत्या नेत्याचे आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा अभ्यास असेल तर तो टाका इथे. नाही म्हणजे हा भाजपचा धागा आहे वगैरे पळपुटेपणा तुम्ही करणार नाहीत असे वाटले होते पण शेवटी तुम्ही फाटा फोडलातच. जरा भाजपच्या किंवा इतर दोन मुख्य पक्षांच्या आतापर्यंतच्या ५-५० वर्षाच्या कामगिरीचा कोणता धागा तुम्ही संदर्भासाठी वापरात आहेत त्याची लिंक द्याल का प्लिज? वाचून घेतो. आणि हो, झुणका भाकर योजनेचा अभ्यासही राहिला आहे. झुणका भाकर आणि रोजगार निर्मिती? झुणका भाकरी केंद्रे का बंद झाली १९९९ नंतर याचा अभ्यासही गरजेचा आहेच, त्यामुळे अभ्यास वाढवा!

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2017 - 3:31 pm | श्रीगुरुजी

मी तुम्हाला मुद्दे सांगितले, तेही तुम्ही स्वतःहून कुठलाही अभ्यास न करता पूर्वग्रहदूषित मते मांडत आहात म्हणून.

मी आधीच सांगितलंय की शिवसेनेच्या भरीव कामांचे जे दावे केले जात आहेत ते मी तपासून त्यातील सत्यता तपासायचा प्रयत्न केलेला आहे. उगाच हवेत बाण मारलेले नाहीत.

मग काढायचे काय जाहीरनामे मागचे सगळ्यांचे (हा शिवसेनेचा धागा आहे वगैरे कारणे द्यायची असतील दुसरा धागा काढा किंवा कुठल्याही राजकीय धाग्यावर जिथे या विषयाशी संबंधित चर्चा होईल तेव्हा टाका नाहीतर उगाच एकांगी टीका काय कोणीही करतं)?

काढा की सगळ्यांचे जाहीरनामे. मी कधी त्याला विरोध केलाय? हा शिवसेनेचा धागा आहे हे सत्यच आहे. इथे भाजपची कामगिरी, शेकापची कामगिरी, अद्रमुकची कामगिरी, मनसेची कामगिरी इ. गोष्टी दळायला सुरूवात केली तर धागा त्या दिशेने भरकटत जाईल.

क्रीडापीठ: १९९५ सालच्या किती गोष्टी आंतरजालावर आधारित आहेत हो? हि योजना बदलत बदलत आजच्या सरकारच्या क्रीडा खात्यात आहे काय कि बंद पडली किंवा दुसऱ्या नावाने सुरुच आहे याची कुठे माहिती मिळतेय का बघा, मला वाटते माहिती मिळत नाही नाही म्हणून एखादी गोष्टच खोटी वगैरे असले पोकळ दवे सहज करता येतात. म्हणजे मी तरी तसंच करतो माहिती मिळत नाही म्हणजे दोनही बाजू असू शकतात, चालली नाही योजना किंवा चालली. दोन्हीची शक्यता गृहीत धरायला अडचण कसली? बाकी इतर बाकीच्या योजनांची माहिती मिळाली कि नाही?

१९९५ च्या बर्‍याचश्या गोष्टी आंतरजालावर नाहीत हे सत्य आहे. परंतु त्या काळात घडलेल्या (किंवा त्यापूर्वीची घडलेल्या) महत्त्वाच्या घटनांबद्दल किंवा त्या काळात सुरू झालेल्या व अद्यापही सुरु असलेल्या योजनांबद्दल आंतरजालावर वाचायला मिळते. आता ही क्रीडापीठ नावाची योजना तितकी महत्त्वाची नसेल, किंवा त्या योजनेमुळे फारसे काही घडलेच नसेल किंवा काही काळानंतर त्या योजनेचा बोजवारा उडून ती लगेचच संपुष्टात आली असेल तर आजच्या काळात त्या योजनेविषयी वाचायला मिळणे अवघड आहे. ज्या योजनेबद्दल शिवसेनेच्या संकेतस्थळाशिवाय इतरत्र उल्लेख नाहीत ती योजना खरोखरच अस्तित्वात होती किंवा शिवसेनेने केलेले ते एक भरीव काम होते यावर कसा विश्वास ठेवायचा?

झुणका भाकरी आणि शिवसेनेचे सहकारी कारखाने वगैरे - पुरावे कशाचेही नाहीत, स्वतःच्या घराबाजूची कुठली टपरी बेकायदा होती वगैरे पुरावे तर नसतीलच वरून महाराष्ट्रभर तहसील कार्यालयाच्या आत उघडण्यात आलेली झुणका भाकर केंद्रे सुद्धा बेकायदेशीरच, दुर्दैवाने तुमच्या गल्लीच्या पलीकडेही महाराष्ट्र आहे! टपरी आणि गुटख्याच्या माळा! त्या टपरीचालकाने काय ठेवावे हे सरकारच्या योजनेत लिहायला हवं होतं? हास्यास्पद पूर्वग्रहदूषित मते! एखाद्या पक्षाच्या नेत्याने स्वतःच्या फायद्यासाठी काढलेल्या संस्था म्हणजे त्या पक्षाचे रोजगारनिर्मितीचे धोरण? महाराष्ट्रातल्या कोणत्या डेअऱ्या, कारखाने कोणत्या नेत्याचे आहेत, ते कोणत्या पक्षाचे आहेत याचा अभ्यास असेल तर तो टाका इथे. नाही म्हणजे हा भाजपचा धागा आहे वगैरे पळपुटेपणा तुम्ही करणार नाहीत असे वाटले होते पण शेवटी तुम्ही फाटा फोडलातच. जरा भाजपच्या किंवा इतर दोन मुख्य पक्षांच्या आतापर्यंतच्या ५-५० वर्षाच्या कामगिरीचा कोणता धागा तुम्ही संदर्भासाठी वापरात आहेत त्याची लिंक द्याल का प्लिज? वाचून घेतो. आणि हो, झुणका भाकर योजनेचा अभ्यासही राहिला आहे. झुणका भाकर आणि रोजगार निर्मिती? झुणका भाकरी केंद्रे का बंद झाली १९९९ नंतर याचा अभ्यासही गरजेचा आहेच, त्यामुळे अभ्यास वाढवा!

झुणका भाकर केंद्राचे निमित्त करून कोपर्‍याकोपर्‍यावरील सार्वजनिक जागा ढापल्या गेल्या होत्या. या केंद्राचा मूळ उद्देश १ रूपयात झुणकाभाकरीचे पोटभर जेवण देणे हा होता. प्रत्यक्षात काही काळातच या केंद्रांचे रूपांतर इतर गोष्टी विकणार्‍या टपरींमध्ये झाले. कोणत्याही नेत्याने स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी डेअरी, कारखाना, शिक्षणसंस्था काढली तरी त्याचा इतरांना फायदा होतोच. पुण्यात येऊन पंतगराव कदमांनी भारती विद्यापीठ सुरू करून आपल्या गावाकडच्या अनेकांना तिथे नोकर्‍या दिल्या. पुण्यातील देखील अनेकांना तिथे नोकर्‍या मिळालेल्या आहेत. पंतगरावांनी तिथे बक्कळ कमावले ही गोष्ट खरी आहे, पण इतरांना देखील त्याचा फायदा झाला हे नाकारता येईल का? शिवसेनेने निदान स्वतःच्या स्वार्थासाठी असे काही केले का? झुणका भाकर केंद्रे, वडापावच्या गाड्या जागा दिसेल तिथे उभे करणे व त्याला स्थानिक नेत्यांचे पाठबळ असल्याने कारवाईची भीति यातून काय साध्य झाले? सरकार बदलले अशा गाड्यांवर/केंद्रांवर कारवाई सुरू होते. पोलिसांची, स्थानिक दादांची खंडणी तर असतेच.

बाकी भाजपच्या कामगिरीविषयी वाचायचं असेल तर अगदी अलिकडेच "मोदी सरकारची ३ वर्षे" या शीर्षकाचा धागा निघाला आहे. तिथून वाचायला सुरूवात करा. नंतर नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचा संप, तुकाराम मुंढे, करण जोहरच्या सिनेमावरील बंदी इ. विषयांवर अनेक धागे आहेत. ते नजरेखालून घाला. मोदींच्या पहिल्या वर्षानंतर मीच एक धागा काढला होता. तो धागा तब्बल १ वर्षे वाहत होता. त्यात केंद्र सरकारबरोबर राज्य सरकारच्या कामगिरीवरही प्रतिसाद आहेत. भाजपच्या बरोबरीने इतर पक्षांच्या संदर्भातही दळण दळले गेले आहे. तेही वाचा.

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 4:04 pm | हतोळकरांचा प्रसाद

अर्थातच, असहमतीवर सहमती! मला मोदींचे आणि भाजपचे तीन वर्षातील कामे माहिती आहेत, त्यामुळे बिनबुडाचे प्रश्न पडत नाहीत! अभ्यासासाठी, शुभेच्छा!

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2017 - 4:47 pm | श्रीगुरुजी

मलासुद्धा सेनेची ५१ वर्षातील भरीव (!) कामगिरी माहिती आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 5:21 pm | हतोळकरांचा प्रसाद

हायला भाजपने तीन वर्षे कामे केली नाहीयेत असे म्हणत आहात कि काय? नाही सरकास्टिक प्रतिक्रिया टाकली आहे म्हणून म्हणालो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 12:53 pm | हतोळकरांचा प्रसाद

बाकी तुमचं मत पक्कं असल्यामुळे यावरही तुमचे काही मुद्दे येतीलच पण उगाच अभ्यास न करता मुद्दे टाकून प्रतिसाद वाढवण्यात अर्थ नाही. मी आधीच मान्य केलेले आहे कि शिवसेनेने तुम्हाला आवडण्यासारखी काहीच कामे केलेली नाहीत. शिवसेनेचे सध्याचे धोरण बोगस वाटणे आणि शिवसेनेने काहीच काम केले नाही वाटणे यावर आपली सहमती होणार नाही असे वाटत असल्यामुळे असहमतीवर सहमती करण्यास हरकत नसावी!

जेम्स वांड's picture

17 Jul 2017 - 2:12 pm | जेम्स वांड

तुमचे सगळे प्रतिसाद वाचले हातोळकर साहेब, तुमचा समतोल दृष्टिकोन आवडला हे वेगळं सांगत नाही, तसे तुमच्या संयमाचे कौतुक करतो मी.

ह्याच धाग्यात श्रीगुरुजी ह्यांनी 'बाळासाहेब/शिवसेनेनं' १९८४ च्या शीख नरसंहाराच्या वेळी मुंबईतल्या शिखांना 'खंडणी घेऊन' अभयदान दिल्याचे एक प्रचंड मोठं विधान सुचक रित्या केलं आहे, त्याचे पुरावे मागूनही अद्याप इतक्या मोठ्या आरोपाला सिद्ध करणारा एकही पुरावा त्यांनी सादर केलेला नाही, त्यामुळे त्यांचा अजेंडा काय ते स्पष्ट होते पुरेसे.

सुबोध खरे's picture

17 Jul 2017 - 7:43 pm | सुबोध खरे

पुरावा देऊन आरोप सिद्ध होणे हे राजकारणात होत नाही. बोफोर्सचं लफडं अजूनही डोकं वर काढतंय. बाकी बोफोर्स किंवा गेला बाजार सिंचनात घोटाळा झालाच नाही असे आपण म्हणणार का?
जाता जाता -- बाळासाहेबांची एक आठवण.
बाळासाहेबांचा बायपास डॉ नीतू मांडके यांनी केला. घरी( मातोश्री) गेल्यानंतर त्यांच्या डॉक्टरांची टीम बाळासाहेबांना मातोश्री वर जाऊन सल्ला आणि उपचार देत असत. त्यातील एक डॉक्टर माझे अत्यंत जवळचे आहेत. त्यांनी सांगितलेला हा किस्सा.
एक दिवस बाळासाहेबांनी याना विचारले डॉक्टर वाईन मध्ये रेड वाईन चांगली कि व्हाईट? यावर डॉकटर म्हणाले कि तुमचा बायपास झाला आहे कुठलीच दारू तुम्ही पिऊ नये. बाळासाहेब आपल्या स्टाईल मध्ये म्हणाले कि दारू चांगली कि वाईट हा मुद्दा नाहीच रेड वाईन कि व्हाइट एवढंच सांगा.
डॉक्टर यावर म्हणाले व्हाईट वाईन पेक्षा रेड वाईन चांगली. कारण त्यात रेसव्हेरेट्रोल नावाचे द्रव्य असते ज्यामुळे हृदय विकाराला थोडा प्रतिबंध होतो.
बाळासाहेब त्यांना "म्हणाले" डॉक्टर आजपासून बाहेरच्या लोकांना व्हाईट वाईन"च" चांगली "असेच सांगायचे"
याचा "पुरावा" मागू नका.
आमचे वडील बाळासाहेबांना बऱ्यापैकी ओळखत होते आणि त्यांची काही वेळेस भेटही झाली होती. त्यांचे राजकारण वडिलांना चांगले माहित होते आणि पटतही नव्हते तरी माणूस "उमदा आणि हिमतीचा आहे/ होता" असेच त्यांचे आजही मत आहे.

जेम्स वांड's picture

18 Jul 2017 - 8:28 am | जेम्स वांड

गल्लत होते आहे का डॉक्टर काका?

तुम्ही दिलेलं व्हाइट वाईन/रेड वाईनचं उदाहरण, किंवा तुमच्या पिताजींची असलेली बाळासाहेबांशी ओळख, हे 'वैयक्तिक डोमेन' झालं हो, त्याचे पुरावे मागणाऱ्याचे डोके ठिकाणावर नाही हे मी स्वतः म्हणेल ह्याची खात्री बाळगा खरे काका.

पण, 'खंडणी मागून अभयदान दिले' म्हणणे हे पब्लिक डोमेन मध्ये येणारे आरोप/दावे होत. ह्याला समर्थनार्थ पुरावे द्यायलाच हवेत, नुसता हवेत गोळीबार उपयोगी नाही. उरता उरला बोफोर्स अन सिंचनाचा प्रश्न, तर ते न्यायप्रविष्ट आहेत न? खंडणीच्या मोबदल्यात अभयदान ह्या आरोपाखाली बाळासाहेब ठाकरेंवर काही केस आहेत का? होत्या का? आजवर युती करताना हे सगळे दिसले नाही का भाजप ला?

बाकी, तुम्ही सैनिक माणसे , तुम्ही म्हणाल ते प्रमाण अन ग्राह्य , तुमचा आदर नाही करणार तर कोणाचा करणार.......

सुबोध खरे's picture

18 Jul 2017 - 9:23 am | सुबोध खरे

मी सैनिक होतो किंवा डॉक्टर आहे म्हणून एखादी गोष्ट सकृतदर्शनी स्वीकारावी असे मुळीच नाही.
परंतु काही गोष्टींना पुरावे मागता किंवा देता येत नाहीत. मुंबईच्या राजकारणात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या माणसांना हे माहित आहे कि मातोश्री कडे जाणारा ओघ कशा कशाचा आणि का असतो?
एन्रॉनची कहाणी वाचून पहा.
https://www.outlookindia.com/magazine/story/the-real-story-of-dabhol/211469
याचे पुरावे देता येणार नाहीत. पण आज १०५०० कोटीच्या तोट्यासह हि कंपनी कुठे आहे तेही पाहून घ्या.

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2017 - 2:48 pm | श्रीगुरुजी

आपल्यामुळे १९८४ मध्ये मुंबईतील शीख वाचले असा दावा करणार्‍या बाळासाहेब ठाकर्‍यांनीच १९८८ मध्ये पत्रकार परीषदेत खालील इशारा दिला होता.

Bombay's one lakh Sikhs will face a crisis unless they accede to the demands of Shiv Sena Pramukh, Bal Thackeray. At a bizarre press conference on March 19, which was a virtual inquisition, the Shiv Sena chief gave them a one-month ultimatum. Within this time, he said, they should send a delegation to Amritsar instructing the high priests to issue a hukumnama against the extremists; else he would enforce a social and economic boycott of them.

http://indiatoday.intoday.in/story/shiv-sena-chief-bal-thackeray-targets...

खालील वृत्तात असे लिहिले आहे की
- 1988: Thackeray's 'boycott of Sikhs businesses' idea is quietly abandoned after extorting crores from Sikhs in Mumbai.

https://www.outlookindia.com/magazine/story/tooth-and-claw/283066

खालील ठिकाणी १९८४ चा संदर्भ आहे.

http://neetakolhatkar.com/index.php/uncategorized/a-roar-that-isnt.html

मराठी_माणूस's picture

18 Jul 2017 - 3:18 pm | मराठी_माणूस

डॉक्टर आजपासून बाहेरच्या लोकांना व्हाईट वाईन"च" चांगली "असेच सांगायचे

बाहेरचे म्हणजे कोण ? आणि असे का सांगायचे ? हे काही कळले नाही.

बाहेरचे म्हणजे बाळासाहेबांचे हुजरे आणि मुजरे

मराठी_माणूस's picture

19 Jul 2017 - 10:49 am | मराठी_माणूस

आणि तसे सांगण्याचे कारण ?

सुबोध खरे's picture

19 Jul 2017 - 11:28 am | सुबोध खरे

आतले आणि बाहेरचे यातील फरक.

मराठी_माणूस's picture

19 Jul 2017 - 12:06 pm | मराठी_माणूस

प्रश्न डॉक्टरांनी रेड सजेस्ट केली असताना व्हाईट चांगली असे सांगायचे कारण काय ?

सुबोध खरे's picture

19 Jul 2017 - 12:09 pm | सुबोध खरे

कारण साहेबाना व्हाईट वाईन आवडत असे आणि ते "तीच" पीत असत

हतोळकरांचा प्रसाद's picture

19 Jul 2017 - 12:18 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला या प्रसंगात सांगण्यासारखे काय आहे तेच कळले नाही! तुम्ही साधारण असं सांगण्याचा प्रयत्न करत आहात का कि बाळासाहेबांनी धमकी दिली कि इथून पुढे व्हाईट वाईन सांगायचं? मला तरी तो परिस्थितीजन्य विनोद असेल असे वाटते. नितु मांडके आणि बाळासाहेबांचे संबंध साधारणपणे सर्वश्रुत आहेत.

सुबोध खरे's picture

19 Jul 2017 - 12:19 pm | सुबोध खरे

साहेब हे दैवत होतं
आणि
साहेब करतात ते बरोबरच असतं हे जगाला दिसलं पाहिजे.
राजकीय अपरिहार्यता (political compulsion) हि वैद्यकीय सल्ल्याचा वरची असते.
उद्धव ठाकरे यांनी बायपास करण्याऐवजी अँजियो प्लास्टी केली आणि पाच (कदाचित सात) स्टेंट बसवले.
साधारण तीन पेक्षा जास्त स्टेण्ट लागणार असतील तर बायपासचा सुचवलं जातो. कारण तीन चार पैकी एक किंवा अधिक स्टेण्ट परत ब्लॉक होण्याची शक्यता असते.
http://www.hindustantimes.com/mumbai/uddhav-thackeray-undergoes-angiopla...
इतरही अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. पण त्या जालावर नको.

विशुमित's picture

19 Jul 2017 - 1:58 pm | विशुमित

<<<इतरही अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत. पण त्या जालावर नको.>>

==>> का ?

चौकटराजा's picture

14 Jul 2017 - 6:22 pm | चौकटराजा

हे सगळं वाचून मला मात्र २०१९ कधी येते आहे असं झालं आहे. माझा असा अंदाज आहे की भाजपा फार मोठी चूक अशी करणार नाहीत की लोकांनी आतापर्यंत
डेस्परेटली पर्याय म्हणून पुन्हा कॉंग्रेस वा समाजवादी पक्षांकडे परत सत्ता द्यावी. ज्या प्रमाणे राज हा फुसका बार ठरला त्याप्रमाणे उद्धव ही ठरेल पण शिवसेना मनसे इतकी तळाला मात्र जाणार नाही.

श्रीगुरुजी's picture

15 Jul 2017 - 1:47 pm | श्रीगुरुजी

२०१९ मध्ये लोकसभेसाठी भाजप व शिवसेना पुन्हा एकदा युती करण्याची बरीच शक्यता आहे. परंतु विधानसभेसाठी युती होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.

रमेश आठवले's picture

14 Jul 2017 - 9:11 pm | रमेश आठवले

वरील चर्चेत श्रीगुरुजी यांनी मांडलेल्या मतांशी मी बहुतांशी सहमत आहे.

सचु कुळकर्णी's picture

14 Jul 2017 - 10:41 pm | सचु कुळकर्णी

भेदरने. धास्ती खाने. झोल खाने/ मारने. पाचातले तीन जाणे. वग्रै.
किंवा गळपटणे.
वाक्यात कसा उपयोग करता येईल ?

*** न च्या जागि न आणि ण च्या जागि ण आहे.

सचु कुळकर्णी's picture

14 Jul 2017 - 10:47 pm | सचु कुळकर्णी

:)

सचु कुळकर्णी's picture

14 Jul 2017 - 11:00 pm | सचु कुळकर्णी

सक्काडि सक्काडि चाल्लो हाव रे भाव मिंया-मार च्या यँम्बेशित ईचारतो त्याईले का तुमचा जनरल हिकड काह्याले धाडला...
बाप्पा काहुन माय मले माईती चा अधिकार नाय ?

पिल्लमपोया

सचु कुळकर्णी's picture

14 Jul 2017 - 11:20 pm | सचु कुळकर्णी

भाजपा फार मोठी चूक अशी करणार नाहीत की लोकांनी आतापर्यंत
डेस्परेटली पर्याय म्हणून पुन्हा कॉंग्रेस वा समाजवादी पक्षांकडे परत सत्ता द्यावी. ज्या प्रमाणे राज हा फुसका बार ठरला त्याप्रमाणे उद्धव ही ठरेल पण शिवसेना मनसे इतकी तळाला मात्र जाणार नाही.

चौरा काका भाजप आता मोठ्ठा मगर / देवमासा झालाय.
आता त्यांना त्यांच्या कडुन ह्यापुढे जर झालिच तर ति चुकच हरवु शकते बाकि कोणि सध्या दुर दुर पर्यंत दिसत नाहि. Actually भाजपा किंवा मोदि अजिंक्य नाहि झालेत पण विरोधिपक्ष (?) कोता झालाय जो फक्त त्यांच्या प्रवक्ते किंवा निवडक न्युज च्यानेल पुरता मर्यादित झालाय. 2017 अर्ध झालय पण ह्यांना अजुनहि भान नाहि आलय कि भाजप सोडुन जो मोठा पक्ष आहे तो फक्त 44 वर आहे. असो बापडे.

इरसाल's picture

15 Jul 2017 - 10:25 pm | इरसाल

मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ?
एकहाती सत्ता.....मग पुढे काय?
असं तर नाही ना की मोदींना सत्ता यशोदाबेनच्या हातात सोपवायची आहे ???????? (टिपीकल राजकारणीय घराणेशाही)

अनुप ढेरे's picture

15 Jul 2017 - 10:55 pm | अनुप ढेरे

शिवसेना समर्थक दुसर्‍यांवर घराणेशाहीचा आरोप करतायत =))

चौकटराजा's picture

16 Jul 2017 - 5:53 am | चौकटराजा

हुकुमशाहीचे फायदे लोकशाही पेक्षा ऐहिक सुख येण्यासाठी कितीतरी अधिक असतात. जगाचा इतिहास असा आहे की हुकुमशहा " जनतेसाठी हुकुमशहा " रहात नाही. त्यामुळे शराब को शराबीयोने बदनाम किया या चालीवर हुकुमशाही बदनाम होत रहाते. लोकशाही नसेल तर किती वेगाने प्रगति होउ शकते याची चीन हे उदाहरण आहेच.. आणि आपली लोकशाही तरी कशी ६५ टक्के सताधार्‍याने खायचे व ३५ टक्क्के विरोधकाने . फक्त जनतेसमोर भांडणाचा फार्स करीत पडद्यामागे
एकाच प्याल्यात दारू प्यायची.

जेम्स वांड's picture

16 Jul 2017 - 12:15 pm | जेम्स वांड

हो ना हो! पण एक आहे हं, लोकशाही कोणालाही त्याला अक्कल नसेल त्या क्षेत्रात बोलायची सूट देते! भरपूर उदाहरणे इथे मिपावरच सापडतील, काय म्हणता?

श्रीगुरुजी's picture

16 Jul 2017 - 2:23 pm | श्रीगुरुजी

मित्र पक्षांना संपवुन मग पुढे काय ?

मित्रपक्षांना संपविण्याची गरज नाही. ते स्वतःहूनच आत्मघात करून घेत आहेत. मित्रपक्षांना जिवंत रहायचे असेल तर त्यांनी आंधळा मोदीद्वेष सोडून, मोदींना विरोधासाठी विरोध करणे सोडून, मोदींना अपशकुन करण्यासाठी देशाच्या शत्रूंबरोबर हातमिळवणी करणे सोडून विधायक भूमिका घेणे व स्वतःची विश्वासार्हता वाढविणे आवश्यक आहे.

एकहाती सत्ता.....मग पुढे काय?

सर्व विरोधी पक्ष स्वतःहून आत्मघात करीत असल्यामुळे सत्ता एकहातीच राहणार.

दिल्लीच्या शिंव्हासणातच ही दिफौल्ट भाषा दिसते.
एकेकाळी औरंग्याने हेच ऐकवले होते. अगदी सेम डायलॉग.

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2017 - 8:03 am | श्रीगुरुजी

औरंग्या, अफजुल्या, आदिलशहा, मोगलांची फौज . . . परत सुरू झालेलं दिसतंय. आता कोथळा, थडगं, छाताड, वज्रमूठ इ. सुरू होईल.

गामा पैलवान's picture

16 Jul 2017 - 2:48 pm | गामा पैलवान

जेम्स वांड,

त्याहून पुढे जाऊन, प्रभू रामचंद्रांनी तरी काय केलं जनतेसाठी? बाललीला झाल्यावर लग्न, मग वनवास अन मग पत्नी पळवून नेणाऱ्या विरुद्ध युद्ध!

खर आणि दूषण या राक्षसांची नावं ऐकली असतील तुम्ही. वसिष्ठ आणि विश्वामित्र दोघांनीही रामलक्ष्मणांना शिक्षणासाठी विश्वामित्रांच्या आश्रमात जाऊ देण्याचा सल्ला दिला होता. त्यांचा विश्वास सार्थ करीत या दोघांनी आश्रम क्षेत्रे राक्षसी पीडेपासून मुक्त केली.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

16 Jul 2017 - 6:33 pm | श्रीगुरुजी

विशुमित's picture

17 Jul 2017 - 11:02 am | विशुमित

गुरुजी तुम्ही आता निलेश राणेंना जवळ केलाय का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 12:44 pm | हतोळकरांचा प्रसाद

दुशमन का दुशमन दोस्त होत्या हय!! डायलयाग नही सुन्या क्या? नितेश राणे व्यंगचित्र मस्त काढतात हे माहिती नव्हतं पण! सध्याच्या परिस्थितीवर भारी जमलंय!

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2017 - 3:34 pm | श्रीगुरुजी

जरा हलकेच घ्या हो. मलिष्काचे विडंबन रॅप पाहिल्यानंतर सेना नेते भडकले तसे करू नका. विनोद, व्यंगचित्रे याचा आनंद घ्या. इथे दुश्मन, दोस्त याचा काही संबंध नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 4:01 pm | हतोळकरांचा प्रसाद

हाहाहा! भडकतंय कोण, मी तर स्तुती केली त्या व्यंगचित्राची! तुम्हीच सिरिअसली घेताय :) हे आसंच असतं बगा तुमचं, मलिष्का प्रकरणावर भाष्य करायचं म्हणून मी रागात, कैच्या कै! येवडा इनोद मारला आन तुमी आमालाच रागात मना! जरा विनोद, स्नॅपचॅट याचा आनंद घेत चला! नेते म्हणलं की भडकणं वगैरे आलंच, परवा ते स्नॅपचॅटवरून नेते भडकल्याचंही वाचण्यात आलं!

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2017 - 4:42 pm | श्रीगुरुजी

रागावला नाहीत ना. मग ठीक आहे. परवा ती पेडणेकर बाई मलिष्काला मूर्ख वगैरे म्हणाली. ढिंगटांग मध्येही बऱ्याचदा उधोजींची खेचली जात असल्याने सेना समर्थक चिडलेले असतात. म्हणून वाटलं की हे व्यंगचित्र पाहून तुम्हालाही राग आला की काय.

हतोळकरांचा प्रसाद's picture

17 Jul 2017 - 5:26 pm | हतोळकरांचा प्रसाद

तिथेच गडबड आहे गुरुजी, सेना समर्थक चिडत असतील हो! काय आहे मी काही नेता नाहीये. शिवाय मी अंध भक्त किंवा अंध विरोधक ही नाहीये. मग कशाला येईल राग?

ज्याला आला राग, त्याला चावला वाघ
=))

सचु कुळकर्णी's picture

17 Jul 2017 - 7:45 pm | सचु कुळकर्णी

वाघ चावायला लागल्यापासुनच तर राग येवुन र्हायला भौ.
:)

श्रीगुरुजी's picture

17 Jul 2017 - 10:13 pm | श्रीगुरुजी

जो नाही कावला, त्याला वाघ चावला।

अभ्या..'s picture

17 Jul 2017 - 10:49 pm | अभ्या..

विनंतीला उध्दवदेव पावला, म्हणून मातोश्रीला फोन लावला.

रामदास२९'s picture

17 Jul 2017 - 11:31 am | रामदास२९

निरा आता व्यन्गचित्राकार केव्हापासून झाले. का धापले कुठून? :) .. सगळेच आजकाल बाळासाहेब होउ बघतात

गामा पैलवान's picture

18 Jul 2017 - 9:58 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

Within this time, he said, they should send a delegation to Amritsar instructing the high priests to issue a hukumnama against the extremists; else he would enforce a social and economic boycott of them.

यालाच ठाकरी पद्धत म्हणतात. ही खूपश्या मराठ्यांना आवडते. भारतातल्या अनेकांना ती आवडू लागलीये. मात्र सगळ्यांना आवडावी असा आग्रह नाही.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2017 - 4:15 pm | श्रीगुरुजी

ठाकरी पद्धत, ठाकरी भाषा, राडा संस्कृती, शिवसेनेच्या पद्धतीने प्रश्न सोडवू, वाघाचा पंजा इ. शब्द आता हास्यास्पद झाले आहेत. मातोश्रीवर सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वातानुकुलीत खोलीत बसून वाईनचे घुटके घेत आणि पाईप चोखत काहीही बरळायचं आणि त्याचं ठाकरी भाषा म्हणून कौतुक करायचं हा विनोदी प्रकार आहे. २०१२ ला बाळ ठाकरे गेल्यानंतर १८-१९ वर्षांच्या दोन मुलींना धमकावण्यात या वाघांना मर्दुमकी वाटली होती. आता हे वाघ मलिष्काच्या मागे लागले आहेत.

मलिष्काच्या घराची तपासणी करून तिथे डेंगूच्या अळ्या वगैर सापडल्या हे सेनेने जाहीर करणे अपेक्षितच होते. शिवसेना किती खालच्या थराला जाऊ शकेल याला मर्यादा नाही. अशीच तपासणी मातोश्रीची केली तर तिथे डेंगूच्या अळ्यांच्या बरोबरीने मेंदूत वळवळणार्‍या अळ्या आणि किडे सुद्धा सापडतील. मलिष्काच्या एका साध्या विडंबन रॅपचा शिवसेनेला प्रचंड धसका बसलेला दिसतो. बाळ ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रातून उपहास दाखविणे, हसतखेळत टीका करणे हे व्यंगचित्रकाराचे काम असते. उधोजींना ती समज दिसत नाही. मलिष्काच्या गाण्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला दिसतोय. तिने जर हे रॅप तयार केले नसते तर तिच्या घरी बंदुका आणि बाँब असते तरी ते ह्यांना सापडले नसते. पण तिने हे गाणे प्रसिद्ध केल्यामुळे यांची सटकली आणि लगेच तिच्या घराची तपासणी झाली. हे दिवसरात्र मोदी व फडणविसांच्या नावाने अत्यंत असभ्य भाषेत शंख करीत असतात. पण यांना एक शाकाहारी विडंबन गीत चालत नाही.

एकंदरीत भारतामध्ये नाटकीपणाला व ढोंगीपणाला सीमा नाही हे केजरीवालांवरून दिसून येते. भारतामध्ये पोरकटपणाला सीमा नाही हे राहुलवरून समजते. भारतात आचरटपणाला सीमा नाही हे दिग्विजय सिंग वरून समजते. तसेच भारतात मूर्खपणाला सीमा नाही हे टी-गँग वरून समजते.

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2017 - 10:45 pm | श्रीगुरुजी

श्रीगुरुजी's picture

18 Jul 2017 - 10:50 pm | श्रीगुरुजी

'उठा'ला विनोद नावडे,
सेनेला चेष्टेचे वावडे।

मुंबईचे नागरिक सव्वाशे कोटी??
काहीच्च्या काही..
अक्कलशुन्यपणा आहे हे असलं काही करणं..

विजुभाऊ's picture

20 Jul 2017 - 10:27 pm | विजुभाऊ

सेना नेत्याना प्रत्येक गोष्टीत "डाव " का दिसतो?
एकुणच या सरवणकर महोदयांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
बाकी ते " मैद्याचं पोतं , बारामतीचा पैलवान , खंडोजी खोपडे , नारोबा ," या पदव्यांना काय म्हणायचे?
तुम करे तो रासलीला हम करे तो कॅरेक्टर ढीला.....

सुज्ञ's picture

19 Jul 2017 - 2:38 pm | सुज्ञ

आत्ता च वाचलेल्या बातमीनुसार या RJ च्या घरी महानगरपालिकेच्या लोकांनी जाऊन झडती घेतली व तिथे डास अळ्या वगैरे शोधल्या म्हणे . म्हणजे ज्या गाण्यात साधं शिवसेनेचं नावही घेतल नाही व विनोदाने जे गाणे तयार केले त्यातही आता हे चिवसैनिक घाणेरडे राजकारण करत आहेत. म्हणजे महानगरपालिकेविरुद्ध काहीही बोलण्याची कुणाला परवानगी नाही नाहीतर ह्यांचे गुंड तयार आहेतच .

यातूनच शि(व)सेना हा बौद्धिक व राजकीय दृष्ट्या किती नीच पातळीला पोचलेला पक्ष आहे हे दिसून आले.
सैनिकांनी आता RJ किंवा महानगपालिकेविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हे काम सेनेने केलेल्या कामच्या यादीत टाकण्यास हरकत नाही

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2017 - 3:30 pm | श्रीगुरुजी

सैनिकांनी आता RJ किंवा महानगपालिकेविरुद्ध बोलणार्याला धमकवणे हे काम सेनेने केलेल्या कामच्या यादीत टाकण्यास हरकत नाही

सेनेचे अजून एक भरीव काम!

इरसाल's picture

19 Jul 2017 - 6:34 pm | इरसाल

भाजप+शिवसेना वि. कॉन्ग्रेस मधुन कॉन्ग्रेस बाजुला होवुन जेव्हा भाजप आणी शिवसेना असा प्रकार झाला तेव्हा एकत्रित युतीला नाव ठेवणारे आता फक्त आणी फक्त भाजपला दुषणं देत आहेत.
कमाल है भाई (और बहन भी) !

सुज्ञ's picture

19 Jul 2017 - 9:02 pm | सुज्ञ

'बीएमसीवर भरवसा नाय काय' या झी २४ तासच्या विशेष कार्यक्रमात आज आमदार नितेश राणे, मनसेचे संदीप देशपांडे आणि भाजपचे केशव उपाध्ये यांनी अत्यंत मुद्देसूद आपले विचार मांडले. शिवसेनेच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकरने झी २४ तासच्या चर्चेतून पळ काढला. नक्की येतो सांगितलेल्या पेडणेकर बाईंची खुर्ची शो संपेपर्यंत संपादक उदय निरगुडकर यांनी रिकामी ठेवली. आणि यांचा पळपुटेपणा जनतेसमोर आणला. खरंतर या बाईंना आजवर मी कधी मुद्द्यावर बोलताना बघितलं नाही. समोरच्याना अरेतुरे करून हमरीतुमरीवर येऊन शो मध्ये वाद घालायचे हीच या बाईंची आजवरची प्रवक्तेगिरी. दुसरीकडे म्हणे या पेडणेकर बाईंनी मलिष्काला उत्तर द्यायला गाणे रचले. आम्ही पाहिले ते गाणे. धड गाणं पण बनवता येत नाही या बाईंना. ना सूर, ना ताल, ना कुठले यमक जुळले. ते गाणं पण मुंबईतल्या नालेसफाई सारखं आणि खड्ड्यांसारख खडबडीत...

ह्यावेळी सेनेचे चुकलेच राव, त्या आरजेची काय राजकारणाची समज असणारे, बरं ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला तरी एफएम चॅनलने राजकीय भाष्ये करू नयेत, निदान मनोरंजनाच्या चॅनेल्स नी तरी , हा अलिखित संकेत तिला माहीत नसावा. शिवाय चॅनेल डीबी ग्रुपचे, मग तर बोलायलाच नको. एकवेळ प्रहार परवडला पण डीबी नको असा प्रकार आहे. बरं हाये क्रियेटीव्हीती तिच्यात तर तिलाच सुपारी देऊन "मोदी, तुमचा पब्लिक वर भरोसा नाय काय" अशीही व्हर्जन काढून एटीम, बँका, पंप, ग्यास एजंसया अशा ठिकाणी रेग्युलरली वाजवता आली असती.
अवघड आहे राव.

अनुप ढेरे's picture

20 Jul 2017 - 10:40 am | अनुप ढेरे

आयला, खराब रस्त्यांबद्दल एका गाण्याच्यामार्फत तक्रार करणे हे राजकीय भाष्य?? बर या आख्या गाण्यात शिवसेनेचं कुठेही नाव देखील नव्हतं घेतलं.

मोदक's picture

20 Jul 2017 - 2:08 pm | मोदक

+११

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची शिवसेनेची व्याख्या काय आहे..?

विजुभाऊ's picture

20 Jul 2017 - 10:46 pm | विजुभाऊ

अभिव्यक्तीस्वातंत्र्याची शिवसेनेची व्याख्या काय आहे..?

लोकाना खंडोजी खोपडे , लखोबा लोखंडे , नार्‍या , अफझलखान म्हणणे , लोकाना शाई फासणे म्हणजे अभिव्यक्ती स्वतन्त्र्य असे त्याना म्हणायचे असेल.

इरसाल's picture

21 Jul 2017 - 12:37 pm | इरसाल

तलवार, वाघनखे, दांडपट्टा, बिचवे, गद्दार, पिसाळ झालच तर बांबु, पोकळ बांबु गुप्त्या, कोयता हे राहिले काय ??????????????????????

अर्थात, रुल किंवा नियम नाहीये तसा आणि आहे तो इतका अंधुक आहे की त्यातून पळवाटा काढणे खुप सोपे आहे. कम्युनिटी रेडीओजवर आणि एफेमचॅनेल्सवर ट्राफिक सोडून न्युज म्हणूनच अलाऊड नाहीयेत. ते चॅनेल सुरु करताना एज्युकेशनल अथवा मनोरंजन अशा पध्दतीनेच चालवावे अशी अपेक्षा असते. एजुकेशनलवाल्यांना जाहीराती न घेण्याचे बंधन आहे. कारण कमर्शिअल व्ह्यु असु नये म्हणून. पोलिटिकल पार्टीज ना पण अलाऊड नाहीये चॅनेल चालवणे. सोशल इश्श्युज रेज करणे चालतेच पण बीएमसी हे कोण चालवते ते सर्वाना माहीतीये. रस्त्यात झोल हा सरळ आरोप झाला. ऑथॉरीटीजची पोलखोल करा हे आवाहन मनोरंजनाच्या नावाखाली ब्रॉडकास्ट करणे, एंटरटॅनमेंट लिसनरचा आधार घेऊन सर्वत्र करणे हे पटत नाही. प्रुव्ह करा रस्त्यात बीएमसीने झोल केला मग गाणे काय श्रुतिका पण चालेल. हेच गाणे एखाद्या चित्रपटात सेन्सॉर चालू देईल का ह्याचा विचार करा. मग ब्रॉडकास्टिंग फॅसिलिटी आहे म्हणून त्याचा वापर असा करणे पटत नाही. एखाद्या ग्रुपने ते बनवून युट्युबवर टाकणे वेगळे आणि चॅनेलच्या एम्प्लॉयी आरजेने ते एंंटरटेनमेंट चॅनेलथ्रु ब्रॉडकास्ट करणे ह्यात निश्चितच फरक आहे.

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 3:10 pm | श्रीगुरुजी

तसं असेल तर मग सेनेने रडीचा डाव खेळणे सोडून आणि बालिशपणा सोडून रेड एफएम विरूद्ध रीतसर पोलिसात किंवा न्यायालयात तक्रार करावी.

प्रुव्ह करा रस्त्यात बीएमसीने झोल केला

कृष्णा देसाई / रमेश किणी प्रकरण , बोफोर्स ही सुद्धा कधीच प्रुव्ह झाले नाही

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 2:03 pm | श्रीगुरुजी

ब्रॉडकास्टिंगचा अधिकार असला तरी एफएम चॅनलने राजकीय भाष्ये करू नयेत, निदान मनोरंजनाच्या चॅनेल्स नी तरी , हा अलिखित संकेत तिला माहीत नसावा.

अलिखित संकेत म्हणजे कायदा नव्हे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार मनोरंजनाच्या वाहिन्यांनी राजकीय भाष्य करायला बंदी घातली आहे ते सांगता का जरा? मुळात मलिष्काच्या त्या विडंबन गीतात राजकीय भाष्य नव्हतेच. असले तर कोणत्या ओळीत राजकीय भाष्य आहे ते सांगा. मुंबईतील रस्ते, वाहतूक इ. च्या दुरावस्थेवर तिने विंडबन केले होते. या गीतावर शिवसेना इतकी का चवताळली आहे हे अनाकलनीय आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

20 Jul 2017 - 2:10 pm | हतोळकरांचा प्रसाद

अत्यंत बालिश प्रकार! या प्रकारावर खरंतर सेनेच्या नेतृत्वाने त्यांच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना समज देणे गरजेचे होते, तिथे हे नेतृत्व स्वतःही तेच करत आहे. काहीही कारणच नव्हते मुळी त्या विडिओवर/गाण्यावर बोलण्याचे! त्याच गाण्यात मुंबईच्या लोकल व्यवस्थेवर आणि पर्यायाने भाजपच्या अखत्यारीतील रेल्वे खात्यावर पण टीका आहेच ना. कुठली गोष्ट दुर्लक्ष करण्यात फायदा आहे ही साधी गोष्ट कळू नये? वरून कायदेशीर कारवाई करण्याचे ते पत्र हास्यास्पद प्रकार आहे.

सुज्ञ's picture

19 Jul 2017 - 9:05 pm | सुज्ञ

थोडक्यात शिवसेना या पक्षाची बौद्धिक कुवत आज दिसून आली. एका मलिश्काने अक्खी शिवसेना गार केली..... असे म्हणायला हरकत नाही. वाघ डरकाळ्या वाघनखे वगैरे यांचीच यांच्या.. ... . असो .

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2017 - 9:21 pm | श्रीगुरुजी

हे वाघबिघ नसून दुगाण्या झाडणारी आणि भेसूर रेकणारी गाढवे आहेत. हे कायम शेपटीला लवंगीचा सर लागल्यासारखे दुगाण्या झाडत, भेसूर रेकत सैरावैरा धावत असतात.

अभिदेश's picture

19 Jul 2017 - 9:24 pm | अभिदेश

तरी ह्यांच्या पाय पकडायला काही दिवसांपूर्वी अमित शाह आले होते. बहुदा लाथा खायला आवडतात त्यांना .....

श्रीगुरुजी's picture

19 Jul 2017 - 10:31 pm | श्रीगुरुजी

"अडला नारायण . . ." ही म्हण ऐकली असेलच.

जोक्स अपार्ट, अडेलतट्टू गाढवाला पाठीत रट्टा घालूनच उठवावे लागते. शहांनी मातोश्रीवर जाउन वाघोबांच्या पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले.

हिहीहीही, भलतेच कॉमेडी ब्वा तुम्ही.

अभिदेश's picture

19 Jul 2017 - 11:14 pm | अभिदेश

शहांनी मातोश्रीवर जाउन वाघोबांच्या पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले. .... आतापर्यंत तुम्ही लिहिलेल्या मेगाबायटी , गिगाबायटी प्रतिसादात हा सगळ्यात विनोदी प्रतिसाद. अख्या महाराष्ट्रात फक्त तुमच्याच कानात शहांनी हे सांगितलेले दिसतंय. मदतीच्या याचनेला तुमच्या भाषेत पाठीत रट्टा घालणे म्हणतात वाटत.

"अडला नारायण . . ." ही म्हण ऐकली असेलच. ... पण तुमच्या सगळ्या मेगाबायटी , गिगाबायटी प्रतिसादा नुसार , तुम्ही अडलेले नाही आहात ना? मग कशाला पाय धरताय ? आणि एकदा पाय धरण्याचेही म्हणताय आणि लगेच पाठीत रट्टा घालून त्याला सुतासारखे सरळ केले , असंही म्हणताय . नक्की काय बोलायचे ते एकदा शहांना विचारा बुवा. नाहीतरी तुमची हॉट लाईन आहेच .

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 12:00 am | श्रीगुरुजी

पाय धरलेच नव्हते. हिसका दाखवायला गेले होते. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे दगाबाजी करायचा विचार होता. मनाला येईल ती नावे सुचवित होते. आधी प्रणव मुखर्जींंनाच परत राष्ट्रपती करा म्हणत होते. नंतर मोहन भागवतांचं नाव आणलं. नंतर स्वामीनाथन् यांचं नाव आणलं. नंतर म्हणायला लागले की आधी नाव सांगा. त्यानंतर पाठिंब्याचं ठरवू. जेव्हा रामविलास पास्वान म्हणाले की हे नाव ठरविण्याचे सर्वाधिकार मोदींना द्यावेत, तेव्हा यांनी विरोध केला आणि आम्ही आमच्या मताप्रमाणे कोणाला पाठिंबा द्यायचा ते नंतर ठरवू असे म्हणाले.

नंतर शहांच्या भेटीनंतर लगेच कोणतीही खळखळ न करता विनाअट आपला पाठिंबा जाहीर केला. महिनाभर फुशारक्या मारणारा अडेलतट्टू एका भेटीत वठणीवर आला.

अभिदेश's picture

20 Jul 2017 - 12:11 am | अभिदेश

गुर्जी , तुम्हाला वाटत नाही का तुमचे प्रतिसाद हास्यास्पद होत चालले आहेत ? नाव आधी सांगा ही मागणी चुकीची नाही ? नंतर शहांच्या भेटीनंतर लगेच कोणतीही खळखळ न करता विनाअट आपला पाठिंबा जाहीर केला. लगेच ? मला तरी असे काही वाचल्याचे आठवत नाही.राष्ट्रपतिपदाचा उमेदवाराचे नाव जाहीर झाल्यावरच पाठिंबा दिला ना? आणि शहांनी त्यांना उमेदवाराचे नाव सांगितले नसेलच हे कशावरून ?

गुर्जी, नका हो इतकी डिटेल माहिती ठेवू सेनेची.
इतकी विरोधीभक्ती तुम्हाला पुढचा जन्म कट्टर शिवसैनिकांचा मिळेल बरे.
आदित्यसाहेबांच्या मुलाची युवासेना अशाच एका कट्टर प्रवक्त्याची वाट बघतेय. ;)

अभिदेश's picture

20 Jul 2017 - 12:29 am | अभिदेश

असल्यामुळे शिवसेनेची नाळ जुळलेली आहेच , पण पुढच्या पिढीचे काही खरं नाही. आदूबाळाला सांभाळायला आई भवानी शक्ती देवो ही तिच्या चरणी प्रार्थना. :-) जगदंब जगदंब !!

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 2:27 pm | श्रीगुरुजी

शिवसेना सांभाळायची वेळ आदूबाळावर येणारच नाही. त्यामुळे काळजी नसावी.

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 2:34 pm | श्रीगुरुजी

सेनेला माझ्यासारख्या प्रवक्त्याची गरज नाही. इथे मिपावरच काही जण सेनेचे कडवे प्रवक्ते आहेत. ते या कामासाठी जास्त योग्य ठरतील.

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 2:24 pm | श्रीगुरुजी

माझे प्रतिसाद हास्यास्पद नाहीत हो. शिवसेना हा पक्ष, त्या पक्षातील नेत्यांच्या फुशारक्या आणि या पक्षाच्या समर्थकांचे प्रतिसाद हेच हास्यास्पद आहेत. राष्ट्रपतीपद निवडणुक संदर्भात मागील काही महिन्यात शिवसेनेने घेतलेल्या भूमिका, वारंवार बदललेया भूमिका आणि कोलांट्या उड्या याबद्दल वाचा. सर्व गोष्टी स्पष्ट होतील. प्रणव मुखर्जींपासून नंतर मोहन भागवत आणि स्वामीनाथन् यांच्यानंतर सेनेचा प्रवास वळणे घेत, यूटर्न घेत कोविंद यांच्यापाशी कसा येऊन थांबला ते वाचा. "भाजप दलित मतपेढीचे राजकारण करीत आहे. कोविंद दलित आहेत म्हणून त्यांचे नाव पुढे आणले असेल तर आमचा त्यांना विरोध असेल." असे जाहीर करून २४ तासांच्या आत "आमचा पाठिंबा कोविंद यांनाच आहे" हे वळण सेनेने कसे घेतले तेही वाचा. म्हणजे "भाजप दलित मतपेढीचे राजकारण करीत नाही आणि कोविंद दलित आहेत म्हणून त्यांचे नाव पुढे आणले नसून ते योग्य उमेदवार आहेत म्हणून त्यांचे नाव भाजपने पुढे आणले आहे" याची ही कबुलीच समजायची का?

आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, मार्चमध्ये भूकंप होईल, एप्रिलमधील विधानसभेचे अधिवेशन अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत आम्ही चालून देणार नाही अशा हास्यास्पद घोषण कोणी केल्या तेही वाचा. फेब्रुवारी २०१७ मध्ये १० महापालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर ९-१० मार्चच्या सुमारास लक्ष्मीरस्त्याच्या बाजूला बेडेकर मिसळीच्या जवळ शिवसेनेच्या कोणीतरी एक मोठा फलक लावला होता. त्यावर तो कार्यकर्ता, उधोजी इ. चित्रे होती व त्यावर "जाशील, परत वाघाच्या वाटेला जाशील?" असे काहीतरी हास्यास्पद लिहिले होते. फलकावर फडणवीसांचे अर्कचित्र होते. तो फलक बघून हसू आवरले नाही. पुण्यात सेनेच्या आमदारांची संख्या १५ वरून ९ वर आली, तर भाजपची संख्या २६ वरून ९८ पर्यंत पोहोचली. इतकी मानहानी होऊन सुद्धा यांचा माज कायम. अगदी मुंबईचा निकाल पाहिला तरी निकालाच्या दिवशी काही वेळाने सेना ९३ प्रभागांमध्ये व भाजप ५१ प्रभागांमध्ये आघाडीवर आल्याच्या बातम्या येत होत्या. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत थांबण्याची सुद्धा यांची तयारी नव्हती. सेना कार्यकर्त्यांंनी भाजपला खिजविण्याकरीता पुण्यातील भाजप कार्यालयासमोर दहादहा हजारांच्या माळा लावून विजयाच्या घोषणा द्यायला सुरूवात केली. काही वेळातच चित्र पालटले. सेनेचा विजयरथ ९३ वरच रूतला व मागे यायला लागला. भाजपचा रथ पुढे जाऊ लागला. शेवटी ८२ वि. ८४ असा निसटता फरक राहिला. आता या निकालाला वाघाच्या पंजाचा तडाखा असे सेनावाले समजत असतील तर त्यांच्या अकलेची कीव कराविशी वाटेल.

यांच्यावर इतर पक्षांनी टीका केली तर यांना दमदाटी करता येत नाही. म्हणून हे इतरांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन अर्वाच्य टीका करतात. पण एखाद्या सामान्य नागरिकाने यांच्यावर टीका केली तर यांना ते अफझलखानाच्या फौजेतले सैनिकच वाटतात. यांच्या संतापाचा भडका उडतो आणि मग त्या नागरिकाला हे यांचा "ठाकरी हिसका" दाखवितात. २०१२ मध्ये पालघरमधील दोन तरूण मुलींना फेबु पोस्टवरून यांनी असाच हिसका दाखविला होता. आता हे मलिष्काच्या मागे लागले आहेत. या अख्ख्या वाघांच्या कळपाला मलिष्काने एका गाण्यात गारद केले. पालघरमधील दोन तरूणींविरूद्ध दंगाधोपा करून पोलिसात तक्रार दाखल करून त्यांना अटक करून त्यांना एक रात्र पोलिस कस्टडीत घालवायला लावणे, एका तरूणीच्या औषधाच्या दुकानाची मोडतोड करणे, मलिष्काविरूद्ध ५०० कोटींचा दावा दाखल करण्याची मागणी करणे, तिच्या घरी तपासाला महापालिकेचे कर्मचारी पाठविणे असे रडीचे डाव खेळणे हेच या वाघोबांचे शौर्य आणि हीच शिवसेनेची भरीव कामे!

गुरूजी.. नका असले काहीतरी लिहू.

प्रसाद_१९८२'s picture

20 Jul 2017 - 11:46 am | प्रसाद_१९८२

Rokhthok | BMCvar Bharosa Nai Kay | 19th July 2017

https://www.youtube.com/watch?v=u1LPcGz8ync

ह्या कार्यक्रमातील नितेश राणे, ह्यांची शिवसेनेबद्दलची मते ऐकण्यासारखी आहेत. :))

प्रसाद_१९८२'s picture

20 Jul 2017 - 11:48 am | प्रसाद_१९८२
विशुमित's picture

20 Jul 2017 - 12:51 pm | विशुमित

नितेश राणे यांची मते कधी पासून श्रवणीय झाली आहेत?

श्रीगुरुजी's picture

20 Jul 2017 - 12:56 pm | श्रीगुरुजी

+ १

अनुप ढेरे's picture

20 Jul 2017 - 1:39 pm | अनुप ढेरे

जबरदस्त आहे! यांना मराठीत ऐकवायला हवे पण, जास्त बोचेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jul 2017 - 2:53 pm | डॉ सुहास म्हात्रे

खणखणीत !!!

जेव्हा बहुतांश नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव असते आणि जरूर तेव्हा ते अशा स्पष्ट शब्दांत राजकारण्यांना/नोकरशहांना जाणीव करून द्यायला घाबरत नाहीत, तेव्हाच लोकशाहीचे सर्वोत्तम रूप... सहभागी लोकशाही (participatory democracy)... आस्तित्वात येते. मग असे राष्ट्र, विकसित राष्ट्र बनायला फार वेळ लागत नाही.

नेता/पक्ष/खाजगी हितसंबध यांच्या वर उठून भारतातल्या सर्व गावा/शहरा/राज्यांतल्या नागरिकांना हे करण्याची सुबुद्धी व्हावी, अशी तीव्र इच्छा आहे

पुंबा's picture

21 Jul 2017 - 12:27 pm | पुंबा

अप्रतीम.. जबरदस्त..
मलिष्का खरोखर भारी आहे.. ह्या गाण्यामुळे 'ऑथोरिटीची पोल खोल' करणे ट्रेंडी व्हावे. व्हायरल झाले की समस्या सुटण्यास मदत होते.

गॅरी ट्रुमन's picture

20 Jul 2017 - 1:59 pm | गॅरी ट्रुमन

मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये मोठे मराठी बाणे जपायला शिवसेनेला मते दिलेल्यांनाच या रस्त्यावरील खड्ड्यांचा आणि तुंबलेल्या पाण्याचा त्रास झाला असता तरच त्यांना खरा धडा मिळाला असता. पण दुर्दैवाने तसे होत नाही. यांचा मराठी बाणा जपायला अत्यंत बेजबाबदार आणि अकार्यक्षम लोकांना निवडून दिल्याचा त्रास सगळ्यांनाच होतो.

कालपरवा उद्धव ठाकरे म्हणाले की मुंबईत पाऊस किती पडणार हे त्यांच्या हातात नाही. पण बांधलेल्या रस्त्यांचा दर्जा चांगला ठेवणे, नालेसफाई वेळेत पूर्ण करणे, कचरा वेळच्यावेळी साफ करणे या गोष्टी तरी यांच्या हातात आहेत की नाही? तेवढे केले तरी मुंबईतल्या बर्‍याच समस्या कमी होतील. पण होते कसे की या शिवसेनेने वर्षानुवर्षे 'मराठी बाणा' ही अफूची गोळी लोकांना देऊन ठेवली आहे. ती गोळी एकदा घेतली की महापालिकेचे खरे काम काय आहे, काय करणे अपेक्षित आहे, ते काम योग्य पध्दतीने केले जात आहे का वगैरे प्रश्न म्हणून पडत नाहीत लोकांना. मुंबईच्या अनेक भागात या अफूच्या गोळीचा प्रभाव अजूनही आहे पण इतर बर्‍याच भागातून कमी झाला आहे हेच त्यातल्या त्यात समाधान.

विशुमित's picture

20 Jul 2017 - 2:13 pm | विशुमित

यांचा मराठी बाणा, अजेंडा वगैरे जपायला अत्यंत बेजबाबदार आणि अकार्यक्षम लोकांना निवडून दिल्याचा त्रास सगळ्यांनाच होतो. याच्याशी १००% सहमत

मुंबई ठाण्यामध्ये जसे नाले तुंबतात तसे नवी मुंबई मध्ये तुंबत नाहीत असे आमचे दादा पर्वा म्हणत होते.
नवी मुंबईला पाऊस कमी पडतो का मुंबई पेक्षा ?

अप्पा जोगळेकर's picture

20 Jul 2017 - 3:31 pm | अप्पा जोगळेकर

नवी मुंबई हे वसवलेले शहर आहे. जुनी मुंबई वाढत गेलेले शहर आहे.
म्हणजे ब्रिटिशांनी वसवले हे खरे पण गेली १५०-२०० वर्षे ते नुसतेच वाढते आहे.
१०० वर्षांनी झोपड्यांनी आणि बेकायदा बांधकामांनी भरुन गेले की नवी मुंबई पण असेच असेल.

हतोळकरांचा प्रसाद's picture

20 Jul 2017 - 2:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला एक प्रश्न पडतोय कि नालेसफाई किंवा त्या त्या भागातील रस्ते व्यवस्थित ठेवणे हे एकूणच महापालिकेचे काम असते कि त्या भागातील नगरसेवकाचे? म्हणजे हे जर महापालिकेचे काम असेल तर मग सत्ताधाऱ्यांना झोडपायला हरकत नाही. पण नगरसेवकांचे असेल तर ज्यांना आपण झोडपत नाही त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भागातील नाले स्वच्छ असणार, रस्ते गुळगुळीत असायला हवेत नाही का?

शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईतील सरसकट सगळे रस्ते महापालिकेच्या ताब्यात नाहीयेत असे माध्यमे दाखवत होती, मग नेहमी टीका महापालिकेवरच का होते? याचा अर्थ फक्त महानगरपालिकेच्या ताब्यातील रस्ते खराब आहेत का? आणि इतर संस्था (MMRDA वगैरे) यावर टीका का होत नाही? कोणी मुंबईकर यावर प्रकाश टाकू शकेल का?

अप्पा जोगळेकर's picture

20 Jul 2017 - 3:45 pm | अप्पा जोगळेकर

एकूण २००० किमी चे रस्ते आहेत. पैकी १९०० किमीचे म्हणजे ९५% रस्ते बीएमसी च्या अखत्यारीत येतात. म्हणून बीएमसीवर ९५% टीका होते. बाकीच्यांवर ५%.
रस्ते दुरुस्तीचे टेंडर स्थायी समितीत पास होते. खरे तर ते बंगल्यावरच पास होते तो भाग वेगळा.
त्यामुळे जबाबदारी महापालिकेचीच असते. नगरसेवक अलॉटेड निधीतून प्रभागातला रस्ता दुरुस्त करु शकतो. पण असे क्वचितच होते.

हतोळकरांचा प्रसाद's picture

20 Jul 2017 - 2:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला एक प्रश्न पडतोय कि नालेसफाई किंवा त्या त्या भागातील रस्ते व्यवस्थित ठेवणे हे एकूणच महापालिकेचे काम असते कि त्या भागातील नगरसेवकाचे? म्हणजे हे जर महापालिकेचे काम असेल तर मग सत्ताधाऱ्यांना झोडपायला हरकत नाही. पण नगरसेवकांचे असेल तर ज्यांना आपण झोडपत नाही त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भागातील नाले स्वच्छ असणार, रस्ते गुळगुळीत असायला हवेत नाही का?

शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईतील सरसकट सगळे रस्ते महापालिकेच्या ताब्यात नाहीयेत असे माध्यमे दाखवत होती, मग नेहमी टीका महापालिकेवरच का होते? याचा अर्थ फक्त महानगरपालिकेच्या ताब्यातील रस्ते खराब आहेत का? आणि इतर संस्था (MMRDA वगैरे) यावर टीका का होत नाही? कोणी मुंबईकर यावर प्रकाश टाकू शकेल का?

हतोळकरांचा प्रसाद's picture

20 Jul 2017 - 2:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला एक प्रश्न पडतोय कि नालेसफाई किंवा त्या त्या भागातील रस्ते व्यवस्थित ठेवणे हे एकूणच महापालिकेचे काम असते कि त्या भागातील नगरसेवकाचे? म्हणजे हे जर महापालिकेचे काम असेल तर मग सत्ताधाऱ्यांना झोडपायला हरकत नाही. पण नगरसेवकांचे असेल तर ज्यांना आपण झोडपत नाही त्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भागातील नाले स्वच्छ असणार, रस्ते गुळगुळीत असायला हवेत नाही का?

शिवाय दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईतील सरसकट सगळे रस्ते महापालिकेच्या ताब्यात नाहीयेत असे माध्यमे दाखवत होती, मग नेहमी टीका महापालिकेवरच का होते? याचा अर्थ फक्त महानगरपालिकेच्या ताब्यातील रस्ते खराब आहेत का? आणि इतर संस्था (MMRDA वगैरे) यावर टीका का होत नाही? कोणी मुंबईकर यावर प्रकाश टाकू शकेल का?