बोब्बी..एक लोककथा

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
10 Jul 2017 - 6:11 pm

बोब्बी..एक लोककथा
एका गावात एक ब्राह्मण रहात असतो..त्याला ३ सुंदर कन्या असतात.पण त्या तिघित पण वाचा दोष असतो म्हणजे तिघिहि बोबड्या बोलायच्या..
मुली लग्नाला आलेल्या असतात..
मुलाकडचे मुलिस पसंत करायचे पण ्ति बोबडे बोलायला लागली कि नकार द्यायचे.
नकार घंटा ऐकुन बिचारा पिता दुखी होत असे..
त्या गावात एक लग्नाळु ब्राह्मण येतो..
वधुपिता ब्राहमण त्याला हेरतो व त्याची आपुलकिने चौकशी करतो..
व त्याला सांगतो कि मला ३ लग्नाळु मुली आहेत ..दिसायला सुंदर ग्रुहकृत्य दक्ष आदी आहेत
तिघी पण पाठच्या आहेत आपणास जी पसंत असेल तिच्याशी मी आपले लग्न लाऊन देईल..
लग्नाळु ब्राह्मण त्या प्रस्तावाला होकार देतो...
आनंदित झालेला वधुपिता त्याला भोजनाचे निमंत्रण देतो..
घरी आल्यावर तो मुलिना ही वार्ता सांगतो..
व मुलिना तंबी भरतो की काहि झाले तरी तुम्हि बोलण्या साठी अजिबात तोंड उघडु नका..
मुली बडबड्या असतात..पण बाबा ना "अजिबात तोंड उघडणार नाहि" असे सांगतात....
पहाण्या च्या दिवशी तिनही कन्या छान स्वयंपाक बनवतात..
मुगाच्या डाळीची खिचडी,,पोळ्या .भरले वांगे ..गोळे घातलेली कढी शिरा आदी साग्र संगीत बेत असतो
जुजबी गप्पा झाल्यावर वधुपिता म्हणतो.." भुक लागली असेल ना?..आधी भोजन करु मग बाकिच्या गप्पा शांत पणे मारु..
जेवण तयारच होते मुलींनी पाने वाढली
लग्नाळु बेत पाहुन खुश होतो..त्याने "गोळ्याची आमटी" हा प्रकार प्रथमच चाखला असतो..
पित्या कडे बघत व मुलिना ऐकु जाइल अश्या स्वरात तो म्हणतो.."स्वयंपाक छान झाला आहे..खास करुन "कढी गोळे...कसे बनवतात हे कढी गोळे घरी ट्राय मारिन.."
हे ऐकताच पहिली कन्या म्हणाली
पोप्प हाय,,हिंग जीये मसाला ..कयी गोये कराया...(हिंग जीरे मसाला कढी गोळे कराया)
त्यावर २ नं कन्या म्हणाली..कय गे मी नाय बोय्यी तु का बोय्यी..(काय ग? मी नाहि बोलली तु का बोलली?)
त्यावर तिसरी कन्या म्हणाली..बग ना बोय्यी तर बोय्यी .वर बोब्ब बोय्यी.( बघ ना बोलली तर बोलली वर बोबड बोलली
तिघीं चे बोबडे बोल ऐकताच लग्नाळु च्या घशात कढी गोळे आडकतात.
जेेण संपल्वयावर व हात धुतल्यावर पित्याने लग्नाळुस विचारले..काय निर्णय झाला??
घाबरलेला लग्नाळु म्हणाला " १ महिन्या नंतर आइ बाबा येणार आहे त्यांच्याशी चर्चा झाली की कळवतो..असे सांगुन त्याने सु बाल्या करत आपली सुटका करुन घेतली

बालकथा

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Jul 2017 - 6:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अले व्वा. चान चान.

तेजस आठवले's picture

10 Jul 2017 - 7:00 pm | तेजस आठवले

त्यापेक्षा कढी गोळ्यांची पाकृ टाका.नाही म्हणजे आम्हाला पाकृ माहित नाही असे नाही पण अक्कुमसाला घालून कशी करायची त्यासाठी

प्रसाद_१९८२'s picture

10 Jul 2017 - 7:27 pm | प्रसाद_१९८२

कथेला शेवटी जी कलाटणी मिळालेय,
ती अगदी जबरी आहे.

अगदी अगदी.. हेच लिहिणार होते.

काका. त्याला "कलाटणी मिळाली " नाय काय म्हणत. "कलटी मारली " म्हणतात

माम्लेदारचा पन्खा's picture

10 Jul 2017 - 10:57 pm | माम्लेदारचा पन्खा

एक ब्राह्मणच दुसऱ्या ब्राह्मणाला शेंडी लावू शकतो !

किसन शिंदे's picture

10 Jul 2017 - 11:38 pm | किसन शिंदे

काका, खरं सांगा एवढ्यात इंदुरीकराचे किर्तन एेकलेत ना? ;)

कढी गोळे घरी ट्राय मारिन.

चान चान!!

ज्योति अळवणी's picture

11 Jul 2017 - 2:40 pm | ज्योति अळवणी

खर तर ब्राम्हणाला अजून एक मुलगी होती. ती देखील बोबडीच होती. तिसरी बोलली पण चौथी गप होती. लग्नाळू ब्राम्हणाला वाटलं चला, किमान चौथी बोबडी नाही. टीवमुळे त्याने तिला होकार द्यायचे ठरवले. जेवण झाल्यावर हात धुवून झाल्यावर लग्नाळू ब्राम्हण गालात हसत वडिलांना म्हणाला तुमची चौथी मुलगी शांत आहे. कमी बोलते वाटतं. त्याचे बोलणे ऐकून चौथी खुश झाली आपलं लग्न होणार या विचाराने आणि इतर तिघींना मोठ्याने म्हणाली,"तुमि सग्या बोय्या. मीच नाई बोय्यी." (तुम्ही सगळ्या बोलल्या. मीच नाही बोलली.) तिचे बोल ऐकून लग्नाळू ब्राम्हणाने पोबारा केला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Jul 2017 - 3:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

तो लग्नाळू ब्राम्हण पोबारा करतो आहे असे वाटल्यावर ब्राम्हण त्याचा पाठलाग करतो. त्याला परत एकटा गाठुन म्हणतो "शेजारच्या गावात माझे अजून एक कुटूंब आहे. त्या कुटूंबापासुन देखील मला चार मुली आहेत. त्या चौघीही दिसायला सुंदर ग्रुहकृत्य दक्ष आदी आहेत चौघीजणी पण पाठच्या आहेत त्यांच्या पैकी आपणास जी पसंत असेल तिच्याशी मी आपले लग्न लाऊन देईन.

फक्त तिकडे गेल्यावर इकडल्या कुटूंबाची वाच्यता करायची नाही. लग्नाळू ब्राम्हण याला तयार होतो आणि दुसर्‍या घरी जेवायला जातो.

तिकडले जेवणही त्याला भयंकर म्हणजे भयंकरच आवडते. तसेच त्याला चौघी मुली सुध्दा भयंकर आवडतात आणि त्याला ठरवता येत नाही की कोणशी लग्न करु.

म्हणुन तो त्यांची परीक्षा घ्यायचे ठरवतो पहिलांदा मोठ्या मुलीच्या हातात तो दहा दहा रुपये देतो आणि म्हणतो की, या दहा रुपयांमधे असे काही खरेदी करा ज्याने सगळी खोली भरुन जाईल. मोठी बाजारातून गवत घेउन येते आणि खोलीभर पसरवते. त्याला काही ते आवडत नाही.

मग तो दुसर्‍या मुलीला दहा रुपये देतो आणि खोली भरवायला संगतो. दुसरी मुलगी दहा रुपयांची रद्दी घेउन येते. ते ही त्याला आवडत नाही.

तिसरी मुलगी जरा हुशार असते. तिने या आधी बिरबलाच्या वगेरे गोष्टी वाचलेल्या असतात. ती दुकानातुन दिवा तेल आणि काड्यापेटी आणते आणि प्रकाशाने खोली उजळवुन टाकते.

खरेतर त्या ब्राम्हणाने इथे थांबायला पाहिजे होते. पण त्याच्या अंगात फार किडे असतात. म्हणुन तो धाकटीच्या हातातही दहा रुपये देतो.

धाकटी ते १० रुपये आधी पर्स मधे ठेवते आणि मग त्या ब्राम्हणाच्या कानाखाली जोरात आवाज काढते. व म्हणते "या महागाईच्या जमान्यात तुझ्या बापाने तरी १० रुपयात खोली भरली होती का कधी? चल निघ इकडुन भिकारड्या"

तो ब्राम्हण बिचारा मान खाली घालुन निमुट पणे तिकडून निघून जातो.

पैजारबुवा,

शिव कन्या's picture

11 Jul 2017 - 8:45 pm | शिव कन्या

हीहीही ची स्मायली

थरारक... क्येसं उभी राह्यली..