विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला
तिला कि मला स्वतःला ?
विचारांच्या गर्दीत शोधातोय मी कुणाला
तिला कि मला स्वतःला ?
ती पण आता पुसट वाटू लागलीय
अवती भवति तिच्या विचारांची गर्दी झालीय
स्वतः शोधतोयं त्या मनाला
ज्याने साद दिली होती पूर्वी तिच्या भावनांना
आढे वेढे घेवून लग्नाचे पेढे वाटले
कमी होते कि काय म्हणून
राहत्या घराचे दरवाजे पण छाटले
छाटून सर्व खिडक्या अन दारें
एक सुंदर घरकुल थाटले
टाकली भिंत मध्ये उभी
पल्याड ते सर्व नातलग
अल्याड माझे दोन छकुले जीवलग
त्यांनाच घेउनि पुढे जायचे
त्यांनाच बघुनी स्वतःशी लढायचे
अन लढता लढता कायमचे जायचे
सिद्धेश्वर विलास पाटणकर C