तव्या वरून डायरेक्ट ताटात

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Jul 2017 - 12:20 pm

एम आय डी सी ला असताना माझा एक मारवाडी उद्योजक मित्र होता …
एकदा गप्पात विषय निघाला अन तो म्हणाला "आमच्या कडे सकाळ संध्याकाळ गरम पोळ्या लागतात सर्वाना.. आणी गरम म्हणजे डब्यातली ताजी पोळी पण कुणाला चालत नाही..तव्या वरून डायरेक्ट ताटात पोळी आली पाहिजे "
अर्थात तो मालदार होता घरात पोळ्या करायला बाई असल्याने त्याला शक्य होत असावे …
पण काही घरात सकाळ संध्याकाळच्या पोळ्या एकदमच केल्या जातात..तर काही घरात दोनी वेळा ताज्या गरम …
अर्थात घरात किती माणसे आहेत..नोकरी वा व्यवसायाचे स्वरूप यावर पण ते अवलंबुन असावे…
आम्ही दोघेच असल्याने हि सकाळीच पोळ्या करून ठेवते..रात्री लहर आली तर ओव्हन मध्ये गरम करून घेतो..
पण काही असले तरी "तव्या वरून डायरेक्ट ताटात पोळी ची मजा औरच आहे साजूक तूप वरून घ्यायचे व एका एका पदर उकलत पोळी खाणे म्हणजे भोजनाचा स्वर्गीय आनंद

जीवनमान

प्रतिक्रिया

तव्यावरुन डायरेक्ट ताटात गरमागरम पोळी
पोळी झाली रे झाली की तीन तास लोळी
लोळीनंतर मिपा उघडून खरडाव्या चार ओळी
हिच अकुकाकांच्या सुखी जीवनाची गोळी

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2017 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा

=))
तांब्यातून डायरेक कढईत!

जव्हेरगंज's picture

8 Jul 2017 - 9:07 pm | जव्हेरगंज

=))

पोळी रे पोळी तव्यावरची पोळी
अकुकाका तिला थोडं तुपात घोळी
तोडुन तोडुन खाते तिला मिपाची टोळी
काय मग अकुकाका कश्या वाटल्या ओळी ?? :P :D

जव्हेरगंज's picture

8 Jul 2017 - 9:07 pm | जव्हेरगंज

:D

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 6:10 pm | मुक्त विहारि

आवडले...

(अकू कथा फॅन) मुवि

सप्तरंगी's picture

7 Jul 2017 - 9:21 pm | सप्तरंगी

आम्ही दोघेच असल्याने हि सकाळीच पोळ्या करून ठेवते

बायकोची complaint मिपावर !

सप्तरंगी's picture

7 Jul 2017 - 9:22 pm | सप्तरंगी

आम्ही दोघेच असल्याने हि सकाळीच पोळ्या करून ठेवते

बायकोची complaint मिपावर !

मुक्त विहारि's picture

7 Jul 2017 - 9:24 pm | मुक्त विहारि

गॅस आणि वेळ दोन्ही वाचतो.

उलट भारताच्या इंधन समस्येवर हा पण एक उपाय आहे.

पण लक्षांत घेतो कोण?

सप्तरंगी's picture

7 Jul 2017 - 9:30 pm | सप्तरंगी

गॅस आणि वेळ? तो तर स्वयंपाक नाही केला तर जास्त वाचतो. पण लक्षांत घेतो कोण?

आपले म्हणणे खरे आहे पण... ते ३-१३-१७६० ग्रहावरच शक्य आहे... ह्या पृथ्वीवर नाही....

जेम्स वांड's picture

8 Jul 2017 - 1:03 pm | जेम्स वांड

एकाच वेळी १० चपात्या करणे अन दोनवेळी पाच पाच करणे ह्यात गॅस कमी जास्त कसा वापरला जाणार ? दोन्ही प्रकारात समसमान गॅस वापरला गेला पाहिजे, कसे?

उगा आपलं हे एक किलो कापूस एक किलो लोकांडापेक्षा हलका आहे म्हणल्यासारखे वाटले.

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 1:22 pm | मुक्त विहारि

सुरुवातीला तवा तापतांना वेळ लागतो....

असो,

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 1:50 pm | मुक्त विहारि

तुमचे आणि आमचे संबंध बरेच जुने दिसतात आणि तुम्हाला जरी हकनाक वाद घालायची इच्छा असली तरी मला नाही.....

त्यामुळे,

असोच....

अ कु च्या तव्यावर इतरांनीच आपापल्या पोळ्या भाजून घेतल्यात. गरमा-गरम पोळ्या उत्तम लागतात पण ही चैन नोकरदारांना तरी परवडण्यासारखी नाही. अनेक ठिकाणी बाकी सगळं साग्रसंगीत घरी करून पोळ्या बाहेरून मागवायची पद्धत आहे. कितीही उत्तम पदार्थ केले तरी पोळी चांगली नसेल तर मजा येत नाही. अश्या लोकांना सांगावसं वाटतं कि १-२ पदार्थ कमी केले आणि स्वीट बाहेरून आणलं तरी हरकत नाही, पण पोळ्या घरच्या असुद्या बुआ.

हो ना

काय करणार?

आमचे मिपा आहेच तसे....

"नव्या बाटलीतील जूनी दारू

परत खेळ हा झाला सूरू

फुकाचे ते वाद घालणे

अन उगाच ते तोंडघशी पडणे

आय.डी. उडाला तरी न घाबरणे

नविन आय.डी,ने धूमाकूळ घालणे"

असो,

जेम्स वांड's picture

9 Jul 2017 - 11:22 am | जेम्स वांड

वांझ धागे काढत धुमाकूळ कोण घालतंय ते स्पष्ट आहे.... नथीआडून तीर मारायची पद्धत डोंबोलीकरांच्या अंगी बरीच मुरलेली दिसते.

मुक्त विहारि's picture

9 Jul 2017 - 11:39 pm | मुक्त विहारि

आम्हाला तशी शंका होतीच....

असो,

सुबोध खरे's picture

8 Jul 2017 - 7:33 pm | सुबोध खरे

पोळ्या गरम हव्या असतील तर सकाळी केलेल्या पोळ्यांना थोडेसे तूप लावा आणि मायक्रो वेव्ह ओव्हन मध्ये पूर्ण शक्ती( FULL POWER) वर १० सेकंद ठेवा. पोळी गरम होऊन फुगून येते. लगेचच खायला घ्या. पोळ्या अगदी तव्यावरुन काढल्यासारख्या लागतात.
गॅस वर गरम केल्यास गरम होईस्तोवर त्यातील पाणी उडून जाऊन पोळ्या कडक होतात. याउलट मायक्रो वेव्ह च्या तंत्रज्ञानात पाण्याचेच रेणू गरम होत असल्याने पोळीतील आर्द्रता तशीच राहते आणि बाहेरून तूप लावल्याने ती बाहेरही पडत नाही.
करुन पहा.

अभिजीत अवलिया's picture

9 Jul 2017 - 12:14 pm | अभिजीत अवलिया

मायक्रोव्हेव्ह मध्ये बनवलेले/गरम केलेले अन्न आरोग्याला चांगले असते का?
मायक्रोव्हेव्ह मधल्या अन्नाने अमुकतमुक होते ह्याला काही शास्त्रीय आधार आहे का हे देखील एक फालतू whatsup फॉरवर्ड आहे ?