मी प्रेमपुरीचा विठ्ठल
माझी वेगळीच रखमाई
तुझं जमणार नाही माझयासंगं
का करते उगा तू घाई ? II
तू सुखी राहा तुझी बाई
लांबच बरी तू वाटते
उगा तंगड्या घालू नको मधी
सात जन्मात मिळायचो नाही II
माझी येगळीच तर्हा
तिऱ्हेवाईक मी येगळा
रखमा शिवराळ असली तरी
तिच्यासंगेचं मी बरा II
मला ठावं तुझे डाव
नको तिथे डोकं लाव
भोळा ढंगाने जरी मी
नको मला आजमाव II
आत आवाज मज येई
तुझया नाटकी शाळेचा
नेहेमी दुर्लक्ष करितो
धन्य माझी ती रखमाई II
सिद्धेश्वर विलास पाटणकर C