क्रृष्णमेघ
प्रणयी बरसून गेला
तो क्रृष्णमेघ होता.
. राधेच्या सांजशेल्याशी
हितगुज करूनी आला
म्रृद् गंधी चाहूल त्याची
मनात पसरूनी गेला.
अंग शहारून गेला
तो क्रृष्णमेघ होता.
घनगंभीर गर्जत आला
घनःश्यामाचा पांचजन्य जणू
जलप्रपाती मोहरली ती
तप्त धरेची अधीर तनू
मन वेडावून गेला
तो क्रृष्णमेघ होता.
मुक्त पणे बरसला
बरसुनी निमाला
प्रसवेल ही प्रृथा- स्रृजा
सोसूनी (त्याची) क्षणभंगुरता
क्षणांची एकतानता
ह्रृदयी भरून गेला
प्रणयी बरसून गेला
तो क्रृष्णमेघ होता.
प्रतिक्रिया
6 Jun 2017 - 2:24 pm | प्राची अश्विनी
छान!
6 Jun 2017 - 4:38 pm | आदूबाळ
झकास आहे कविता!
6 Jun 2017 - 4:51 pm | अत्रुप्त आत्मा
छान.
7 Jun 2017 - 8:14 am | माहितगार
कल्याणमस्तू