मी एकटाच आहे
मज एकटाच राहू दे
काय मागणे असे ते
मी तुजसी देतो रे
स्तुतिसुमनांचा वर्षाव
जरी करिसी मजवरी
तरी संतोष बहुत मज
परी जवळीक न साधी रे
तू वेगळा मी वेगळा
पडू नको गळी रे
देवत्व कठिण आहे रे
तुज पेलणार नाही रे
अंतर राखणे बरे रे
तुज अंतरी थारा नको रे
तू मम सौंदर्यात
लिप्त होउन राही रे
सर्वस्व मजला वाहुनी
कवटाळिशी दारिद्र्य रे
सुखी होउनी संसारी
राहशील तर बरे रे
तू संत ना महंत
ना बुद्ध ना भदंत
नर नारायण जोडी
एकदाच झाली रे
लीला माझी पठण करी
कीर्तने प्रवचने करी
मज जवळी येताची
होशील निर्माल्य तू रे