सगळ्यांच्या जखमा भरणारी हळद,
तिला मात्र जखमी करून जाते...
आजही ती कोणाच्या हळदीला जायचं
अट्टाहासाने टाळते...
जखमेवर हळद भरायची म्हटलं की
तिचे डोळे येतात भरून...
आजही.. हरितालिका पुजताना,
वटपौर्णिमेला मागणं मागताना,
कातर होते ती...
अंगाला लागलेली हळद
कोणाची..
कळेनासं होतं..
वेडावून जाते ती..
त्याने विनोद पाठवला
जखम होण्याआधी फक्त लग्नातच हळद लागते
तिचे डोळे भरून आले...
हळदीच्या विनोदानेच
जखमेवरची खपली काढली...
हळदीनेच होणाऱ्या जखमेवर उपाय काय.....
प्रतिक्रिया
26 May 2017 - 1:45 pm | चांदणे संदीप
सावन जो अगन लगाये.... वगैरे आठवलं!
Sandy
26 May 2017 - 5:17 pm | ज्ञानोबाचे पैजार
मुंगी वरची कविता आवडली
(मुंगळा) पैजारबुवा,
27 May 2017 - 12:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या चार ओळी आणि नंतरच्या चार ओळी खासच.
आवडली कविता. लिखते रहो.
-दिलीप बिरुटे
28 May 2017 - 6:54 pm | बाजीगर
खूप सुंंदर,खूप आवडली
पण why ह्या प्रश्नाचे मिळत नाही,
भूतकाळ/ कार्यकारणभाव वगैरेच्या स्पष्टीकरणासाठी,
pls अजून एक तरी अंंतरा लिहा.
29 May 2017 - 11:48 am | पुंबा
आवडली..