Antikythera आर्किमीडिज चे अन्तरिक्षयंत्र

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in काथ्याकूट
17 May 2017 - 9:51 pm
गाभा: 

आज दिनांक १७/मे/२०१७ चे गूगल डूडल Antikythera Mechanism - The 2000 Year-Old Computer या विषयाला वाहिलेले आहे. सहज उत्सुकता म्हणून सर्च केले तर अद्भुत माहितीचा खजिनाच हाती आला ...

Antikythera mechanism
BBC

१७ मे १९०१ रोजी ग्रीसच्या एका बेटाजवळ पाणबुड्याना सापडलेल्या अवशेषांचा सखोल अभ्यास करून आणी ३डी एक्स-रे इमेजिंग चा वापर करून केलेल्या अथक संशोधना अंती हे यंत्र म्हणजे २००० वर्षांपूर्वीचा अद्भुत कॉम्प्युटर असून त्यायोगे दर चार वर्षानी होणार्‍या ऑलिम्पिक्स ची वेळ , सूर्यचंद्र आणि नवग्रहांच्या गती व स्थाने आणि ग्रहणे यांच्या तारीख व वेळा यांचे तंतोतंत ज्ञान होत असे .
mechanism

recreation

प्रतिक्रिया

मंदार कात्रे's picture

17 May 2017 - 9:54 pm | मंदार कात्रे

BBC

बीबीसी डॉक्युमेन्टरी

अत्रे's picture

19 May 2017 - 9:47 am | अत्रे

धन्यवाद!

दीपक११७७'s picture

18 May 2017 - 10:17 pm | दीपक११७७

भारी माहीती मंदार जी.

धन्यवाद. लक्ष वेधल्याबद्दल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 May 2017 - 10:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

रोचक माहिती !

एस's picture

18 May 2017 - 11:51 pm | एस

रोचक आहे.

बादवे, तेव्हा नऊ ग्रह ज्ञात होते का?

नाही. नऊपैकी पाच (मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनी) ज्ञात होते. परंतु या यंत्राने त्यांची स्थिती सांगता येत असावी असा पुरावा नाही.

अँटिकिथिरा मेकॅनिझमचे अवशेष अथेन्सला नॅशनल आर्किओलोजीला म्युझिअममधे ठेवलेले आहेत. या म्युझिअमला भेट दिली तेव्हा दुर्दैवाने ते अवशेष असलेला भाग बंद होता. पण या मेकॅनिझमची प्रतिकृती दुसर्‍या एका ठिकाणी बघता आली. प्राचीन ग्रीक तंत्रज्ञानाविषयी एक, बहुधा खासगी, संग्रहालय आहे. त्याचं अथेन्सला प्रदर्शन होतं. तिथे ठेवलेली प्रतिकृती आणि मेकॅनिझमची माहिती:

. .

"दशमग्रह होणे" हा वाक्प्रचार कधी बरे अस्तित्वात आला असावा?
(ह्याचा मला माहीत असेलेला अर्थ- वेगळेपणा उघड होणे.. पण लिटरली ज्याने हा वाक्प्रचार शोधला तेव्हा ९ ग्रहांचा शोध लागला होता काय...?)

- श

टवाळ कार्टा's picture

23 May 2017 - 4:06 pm | टवाळ कार्टा

त्या नवग्रहांत सुर्य आणि चंद्र सुद्धा होते बहुतेक

ज्याने वाक्प्रचार पहिल्यांदी वापरला त्याला माहीत होते की नौ ग्रह्च आहेत..!?

-श

रवि, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहु, केतू.

सतिश गावडे's picture

23 May 2017 - 5:12 pm | सतिश गावडे

राहू आणि केतू हे ग्रह नैत कै. मी ज्योतिष्याविषयी वाचलेल्या इंग्रजी पुस्तकांमध्ये ते वेगळंच होतं.

Astronomically, Rahu and Ketu denote the points of intersection of the paths of the Sun and the Moon as they move on the celestial sphere. Therefore, Rahu and Ketu are respectively called the north and the south lunar nodes.

शरभ's picture

23 May 2017 - 6:17 pm | शरभ

@पैसा, प्रतिसाद प्रकाशित केल्यावर ट्यूब पेटली..राहू आणि केतू बद्दल..
पैसा आणि धणाजीरावांचा असे दोन्ही प्रतिसाद बरोबर वाटतात..धनाजीराव जुन्या काळी कदाचित दोघांना ग्रह समजत असावेत?

-श

पैसा's picture

23 May 2017 - 3:25 pm | पैसा

चांगली माहिती