कधीकधी आम्हालाही वाटतं राव... विडंबन जत्रेत सामील व्हावं असं.
चला. प्रेरणा
ती पहा पडली गझल साबू सटकल्यासारखी
मनाची अंघोळही लवकर उरकल्यासारखी
शॉवराचे थेंब विरले काय आणि मी लिहू
शब्द शोधी भावना पंचा हुडकल्यासारखी
शृंखला विडंबनांची गाजते बोर्डावरी
भर मीही घालतो दाणे बुचकल्यासारखी
हो, जरा साशंक होतो नळ फिरवतानाच मी
धारही ती अडखळे श्रीमुख विचकल्यासारखी
हाय तो पडला नवीन साबू संडासामधे
'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी
-टुबुकजित
प्रतिक्रिया
16 May 2017 - 3:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
हाय तो पडला नवीन साबू संडासामधे
'टुबुक' त्याची हाक ती अजुनि अडकल्यासारखी
-टुबुकजित
त्याच साबणाने हात धुतलेत वाटत नंतर?
(डुबुकजित)पैजारबुवा,
16 May 2017 - 3:40 pm | वेल्लाभट
नाही; तो पडला ना ;))
मग नवीन काढला.
16 May 2017 - 3:41 pm | खेडूत
जब्रा रचना..! आवडली.
अता अन्य कवींकडे लक्ष्य द्यावे असे सुचवितो.
(उगा या कवींना वाटायचं आपल्याला लक्ष्य करतायत.)
16 May 2017 - 3:44 pm | टवाळ कार्टा
=))
16 May 2017 - 4:58 pm | सूड
हा हा!
16 May 2017 - 8:08 pm | दशानन
हा हा हा ! मस्त!
16 May 2017 - 8:20 pm | पिलीयन रायडर
शब्द शोधी भावना पंचा हुडकल्यासारखी
=))
कहर!