मी....

ओ's picture
in जे न देखे रवी...
10 May 2017 - 7:16 pm

माझ्यात मी ,तुझ्यात मी
तरी उरुनी राहिलो शेष मी

बंदिस्त मी ,अन मुक्त मी
कैदेतले ही स्वातंत्र्य मी

शांत मी ,उद्विग्न मी
ह्या भावनांचे काहूर मी

आरंभ मी, अन अंत मी
पोहोचायचे ते गंतव्य मी

त्या गंतव्या पल्याड मी
त्याचा ठाव घेणारा शोध मी

शून्य मी ,संपूर्ण मी
राहतो पुन्हा अपूर्ण मी

अनादी मी ,अनंत मी
सचित्तातला आनंद मी

असलो सर्वत्र विखुरलेला
तरीही माझ्यात पूर्ण मी

नादात घुमतो झंकार मी
अनाहत नाद ओंकार मी

----© ओंकार जोशी

कविता