जीवन एक अर्थ!

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जे न देखे रवी...
8 May 2017 - 9:55 am

आयुष्य अर्ध संपलं तरी
जगण्यातला अर्थ संपला नाही
खूप जगले म्हंटल तरी
जगण्यातला मोह संपला नाही

खूप काही बाकी आहे
जगून सारंच घ्यावं ... वाटत
एकटं... दुकटं... सर्वांबरोबर...
आयुष्य वाटून घ्यावं... वाटत!

जवानी मनाची अवस्था आहे
तिला पूर्ण भोगावं वाटत!
समाज... बंधन... झुगारून देऊन
मुक्त स्वच्छंद जगावं वाटत!!

मात्र स्वप्नातून जाग येताच
आयुष्याचं वास्तव पुढे असतं
जवानी... मुक्त... स्वच्छंद.. एकटं..
विसरून कामाला लागावं लागत!!!

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

8 May 2017 - 9:56 am | ज्योति अळवणी

नमस्कार, गेले दोन महिने थोडी busy होते त्यामुळे मिपा वर येऊ शकले नही. क्षमस्व!पण आता परत वाचक म्हणून आणि जमेल तसं लेखन करण्यासाठी रुजू होते आहे

विशाल कुलकर्णी's picture

8 May 2017 - 10:25 am | विशाल कुलकर्णी

वाह.., मस्तच !
फक्त वाटत, लागत यातल्या 'त'वर अनुस्वार द्या. वाटतं, लागतं !

ज्योति अळवणी's picture

9 May 2017 - 10:07 am | ज्योति अळवणी

धन्यवाद! नक्की लक्षात ठेवेन

पद्मावति's picture

8 May 2017 - 2:24 pm | पद्मावति

वाह..आवडले.

संदीप-लेले's picture

8 May 2017 - 7:10 pm | संदीप-लेले

आवडली

पैसा's picture

8 May 2017 - 11:01 pm | पैसा

योगायोगाने आज बा सी मर्ढेकरांची ही कविता आठवत होती.

शिशिरर्तुच्या पुनरागमें,
एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे
न कळे उगाच रडावया.

पानांत जीं निजलीं इथे
इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे?
निष्पर्ण झाडिंत कांपरे !

ज्योति अळवणी's picture

9 May 2017 - 9:52 am | ज्योति अळवणी

धन्यवाद. ही खूप मोठी कंमेन्ट आहे माझ्या कवितेसाठी.