आई

शर्मीला's picture
शर्मीला in जे न देखे रवी...
10 Oct 2008 - 8:37 pm

आई
जगात सगळीकडे जिचा निवास
देवापुढे जिला आद्य स्थान
प्रसिद्ध आहे जी जगाची राणी
ती म्हणजे तुमची -माझी आई

कधी डोळयातील अश्र होऊन भिजुन जाईल.
कधी तलवारीची धार बनून चमकून जाईल.
कधी ढगातून वीज होऊन गरजेल.
तर कधी चंदन होऊन झिजेल.
पण आपल्या पिल्ल्याच्या सुखासाठी झटेल
अशी तुमची-माझी आई..........

तिची माया व्यापणार नाही सागरातील पाणी .
तिची सर नाही अंधारातुन प्रकाशाकडे नेण्यार्‍या ज्योतीला
तिच्या हदयाची उपमा नाही झाडावर उमललेल्या फुलाला

ती जवळी नसते तेव्हा मोल वाटत तिच्या नसण्याचं
सागरतील अमर्याद लाटांची गणना होईल
पण आईचे ऋण ना फेडता येईल.

अशी धन्य धन्य ती तुमची -माझी आई............................

कविता

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

10 Oct 2008 - 11:09 pm | प्रमोद देव

छान आहे कविता!

रुपा's picture

11 Oct 2008 - 10:04 am | रुपा

स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

श्रेया देसाई's picture

11 Oct 2008 - 10:05 am | श्रेया देसाई

कविता खुप अप्रतिम आहे.

मदनबाण's picture

11 Oct 2008 - 10:18 am | मदनबाण

व्वा..कविता आवडली..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

शर्मीला's picture

11 Oct 2008 - 10:57 am | शर्मीला

आई ही कविता मी लिहिली .
खर सांगु आई कविता लिहिण्यामागचे भाव माझे मनापासून आहेत.
त्याच्यातला अश्रु हा शब्द चूकला आहे. त्याबद्द्ल माफी असावी.

शर्मीला..........................

राम दादा's picture

12 Oct 2008 - 6:11 am | राम दादा

मला खुप आवडली ही कविता...

राम दादा..

श्रीकृष्ण सामंत's picture

12 Oct 2008 - 9:06 am | श्रीकृष्ण सामंत

आई वर कुणीही आणि कितीही वेळा कविता लिहिली तरी ती नेहमीच सुंदर असणारच
आपली कविता पण तशीच सुंदर आहे. आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

12 Oct 2008 - 9:46 am | विसोबा खेचर

अतिशय सुरेख कविता...

आपला,
(मातृभक्त) तात्या.