वचन

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
22 Apr 2017 - 8:31 pm

भंगलेल्या रात्री, किती जागवाव्या लागल्या
संवेदना हळव्या, किती चुरडाव्या लागल्या
प्राणांतिक वेदना, किती सोसायला लागल्या
अस्तित्वाच्या खुणा, किती जपाव्या लागल्या
तळहाताच्या रेषा, किती बदलाव्या लागल्या
हृदयातल्या जखमा, किती उघड्या कराव्या लागल्या
शब्द शब्दांना दिला, किती कविता कराव्या लागल्या

कविता