त्याची कविता, माझी कविता

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
22 Apr 2017 - 5:56 pm

शरशय्येवर विझता विझता
हाती देऊन क॑पित हाता
ऐक! स्फु॑दली त्याची कविता,
"भितोस, हरवेल ऐलतीर?
मग, माझ्यासारखा मागे फीर
भात्यामधले अमोघ तीर
वापरतील ते वेडे पीर

फुटले प्राक्तन सा॑धून घे
प॑ख बि॑ख बा॑धून घे
चुकले हिशोब जुळवून घे

कालची झेप आज विसर
अन मळलेल्या वाटेवर
खोद माझी पुन्हा कबर"
=====================
अ॑धाराशी लढता लढता
चढवुन अपुला स्वर गदगदता
असिधाराव्रत सा॑गे कविता- माझी कविता
" कवेत आभाळ को॑डावे लागेल
आतले साचले सा॑डावे लागेल
बिजली झेलून गिळावी लागेल
सृजनावेणाही सोसावी लागेल
प्रत्येक टरफल सोलावे लागेल
शिळेतले शिल्प शोधावे लागेल
पथ्थरा पाझर फोडावा लागेल
बुडून मौक्तिक काढावा लागेल
गर्दीत एकांत साधावा लागेल
शापांत उ:शाप भोगावा लागेल
शापांत उ:शाप भोगावा लागेल "

-उदय (अनन्त्_यात्री)

मुक्त कविताकविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2017 - 6:58 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! बोहोत खूब!

मितान's picture

22 Apr 2017 - 7:24 pm | मितान

सुंदर !!!!

यशोधरा's picture

22 Apr 2017 - 7:34 pm | यशोधरा

सुर्रेख!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Apr 2017 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेषेपर्यंतची कविता....चांगली वाटली.

कविता दुसरी वाचावी लागेल.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

22 Apr 2017 - 9:36 pm | पैसा

कविता आवडली

सत्यजित...'s picture

23 Apr 2017 - 12:13 am | सत्यजित...

..............

अनन्त्_यात्री's picture

23 Apr 2017 - 8:30 pm | अनन्त्_यात्री

सत्यजित, .............. = ??

सत्यजित...'s picture

24 Apr 2017 - 5:31 am | सत्यजित...

निःशब्दता!(प्रतिसादांत काहीतरी लिहावंसं वाटूनही त्या तौडीचे काही सुचत नाही,सुचण्यासाठी विचारही करु देत नाही,ती,लांबत गेलेली निःशब्दता!)

अवांतर—आपणांस उमजेल अशी अपेक्षा होती,म्हणून 'निशब्द' हा 'शब्द' लिहण्याचीही आवश्यकता वाटली नव्हती!शिवाय त्यात प्रतिसादही अर्धवटच व्यक्त होत होता!

अनन्त्_यात्री's picture

24 Apr 2017 - 10:49 am | अनन्त्_यात्री

...तुमचा प्रतिसाद उमजण्यात कमी पडलो!
=======================
शब्दा॑चे इमले रचता
रचता मी इथवर आलो
अन वीट वीट कोसळता
नि:शब्द, खोल मी झालो

सत्यजित...'s picture

27 Apr 2017 - 2:20 pm | सत्यजित...

पाण्यात सोडुनी पाय,काठावर कविता बसली
इतक्यात खोल डोहात,पैंजणे तळाशी रुतली!

अनन्त्_यात्री's picture

28 Apr 2017 - 10:05 am | अनन्त्_यात्री

रुतली ग पै॑जणे जरी खोल डोहात
ही रुणझुण कसली उरे आसम॑तात ?
मी काठावर, की मीच खोल डोहात ?
की रुणझुणतो मी, पै॑जण होउनी त्यात ?

वेशीवरचा म्हसोबा's picture

23 Apr 2017 - 8:38 pm | वेशीवरचा म्हसोबा

व्वाह! बोहोत खूब!

एस's picture

24 Apr 2017 - 3:29 pm | एस

वाह! क्या बात है!

अनन्त्_यात्री's picture

25 Apr 2017 - 2:01 pm | अनन्त्_यात्री

एस, म्हसोबा धन्यवाद!

Dr prajakta joshi's picture

28 Apr 2017 - 7:12 am | Dr prajakta joshi

सुंदर...

अनन्त्_यात्री's picture

28 Apr 2017 - 1:17 pm | अनन्त्_यात्री

...धन्यवाद !