रच्याक्ने कच्ची पोळी हाकानाका

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
21 Apr 2017 - 8:31 pm

चित्तचोरी त्यांची म्हणे फेल झाली
वाचकांची फालतू घालमेल झाली

ना हिशेब जमला ना उधळपट्टी जमली
डोकी नकोत्यात रिकामी खपली

दिखाऊ प्रेमबाजांचा गुंताच नुसता
कामाचे काम सोडून कशाला वाचता

नै सुचत जिलबीसाठी चार ओळी
कच्चीच र्‍हैली आमची विडंबनाची पोळी.

विडंबन

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

22 Apr 2017 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या ... हक्क!

माहितगार's picture

22 Apr 2017 - 9:13 pm | माहितगार

आम्हाला भूछत्री जिलबीसाठी चार ओळीपण पूर्ण करता नाही आल्या म्हणून हसताय का :) हसून घ्या हसून घ्या :)

प्रतिसाद संख्या दोन दिसल्यामुळे अजून दोनचार डोकावतील आणि हायला इथे काहीच नाही म्हणून डोक्याला हात लावतील. साहित्य संपादकांना या रिकाम्या धाग्याला पंख का लावू नयेत असे होत असेल , तरी सोशिक आहेत मिपा संपादक मंडळी बिचारी. मिपा संपादक मंडळींच्या दर्द मध्ये आम्ही सहभागी आहोत !

पैसा's picture

22 Apr 2017 - 9:52 pm | पैसा

=))

अभ्या..'s picture

22 Apr 2017 - 10:01 pm | अभ्या..

अप्रतिम, जबरदस्त.
सुंदर. वास्तववादी शब्द, प्रत्ययकारी पारदर्शकता अन कमालीचा प्रामाणिकपणा ओतप्रोत भरलेली कविता.
दिखाऊ प्रेमाच्या जगातून बाहेर पडून कामे करायला प्रवृत्त करणारे शब्दशिल्प.
मिपासाहित्यात गोल्डन फॉन्टस वापरुन जतन करावी अशी कविता.
पुलेशु