हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण

Dr prajakta joshi's picture
Dr prajakta joshi in जनातलं, मनातलं
17 Apr 2017 - 4:51 pm

"हाॅटेलमधील आरोग्यदायी जेवण"

"रोगी चिरप्रवासी परान्न .भोजी परावसथशायी।
यज्जिवती तन्मरणं यन्मरणं सो स्य विश्राम:।"

अर्थ - आजारी व्यक्ती,नेहमी हिंडणारा ,बाहेरचे खाणारा,दुसर्याच्या आश्रयाने राहणारा यांचे जीवन मृत्युसमान असते.(आरोग्यास हानिकारक)

आजच्या काळात मात्र फिरतीवर असणे व बाहेरचे खाणे ही जीवनशैली बनली असून ती अनिवार्य आहे.
हाॅटेल मधील जेवण,फास्ट फुड,शीतपेय हे सारं नकळत तुमच्या -माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग होवून गेले आहेत. हाॅटेलमधील जेवण हे आजकाल बहुतांशवेळा स्वच्छतेच्या दृष्टीने काटेकोर असते. पण टिकाऊपणासाठी वापरलेली रसायने, आकर्षकतेसाठी शरीरास अहितकर गोष्टीदेखील वापरल्या जातात. खर तर हे टाळणे अशक्य नाहीये.. पण जरा कठीण वाटते. त्यामुळे बाहेर जेवताना थोडा विचार केलेला बरा. म्हणूनच आज आपण घराबाहेर जेवताना काय आरोग्यदायी बदल करू शकतो, यावर चर्चा करूया.

सर्वात महत्वाचे म्हणजे शक्यतो रात्री बाहेर जेवण टाळावे, किंवा जेवणानंतर किमान दोन ते अडीच तासांनी झोपावे.

महिन्यातून फार फार तर 2वेळा बाहेरचे जेवण घ्यावे.

वारंवार बाहेर जेवण होत असेल तर किमान व्यायाम नियमीत आणि भरपूर करावा.जीवनशैली सक्रिय ठेवावी. शक्य होईल तेवढे चालावे. बाहेर खाल्ल्यावर पुन्हा घरी काही खाऊ नये.

आता बाहेर जेवताना घ्यावयाचा आहार यावर बोलू या. बाहेर जेवताना भारतात शक्यतो पंजाबी ,उत्तर भारतीय प्रकारचे जेवण मागवले जाते .त्याच अनुशंगाने विचार करूया.

१) जेवणाची सुरूवात नेहमीच सलाडने करावी.रशीयन सलाड,ग्रीन सलाड हे छान पर्याय आहेत.तसेच भाजलेले पापडही चांगला पर्याय आहे.

२) भाज्या मागवताना त्या आमटी (करी) प्रकारातील मागवाव्यात. कारण त्यातील तेलाचे प्रमाण मर्यादीत असतेच. शिवाय मसाल्याचा वापर योग्य असल्याने ते शरीराला जास्त हानी पोचवत नाही.

३) जेवणाचे समाधान हा आहारातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण त्यावरच आपल्या पचनाशी निगडीत जीवद्रवांची(enzymes) निर्मीती अवलंबून असते.

४) वजन कमी करताना भाज्यांचे; भुना, टिक्का, तंदुर असे रस्सा नसलेल्या भाज्याही उपयुक्त ठरतात. मसाला,पसंदा या प्रकारच्या भाज्या रस्सायुक्त (थिक ग्रेवी) असतात. त्यातील ग्रेवी सुकामेवा (काजु, बदाम) व साय (cream) यापासून बनलेली असते. त्यामुळे असे पदार्थ अहितकर असतात.

५) मांसाहार सर्व भाजलेल्या (grilled/roasted) / आमटी (curry) स्वरूपात मागवा.

६) सलाड, स्टार्टर्स आणि त्यानंतर खिचडी / दालचावल हाही चांगला विकल्प ठरेल.

७) जेवताना जेवढे मागवू इच्छिता त्याच्या निम्मेच मागवा व सेवन करा. (पोट तुडुंब होईपर्यंत जेवणे टाळा)

८) हळूहळू जेवण करा. म्हणजे जे खाता त्याचा आनंद तर मिळेलच. पण लाळेची योग्य निर्मिती होवून पचन व्यवस्थित होईल.

९) जेवणाचा शेवट ताकाने करावा. (buttermilk/masala chaas)

आता संक्षेपात बोलुया बाहेरचा नाश्ता (snacks)आणि शितपेयांबद्दल.

बाहेर नाश्ता घेताना शक्य होईल तितके कमी तेल, मसाल्याचे, ताजे आणि भारतीय पदार्थ घ्यावेत.
उदा. उपमा, दाक्षिणात्य नाश्ता, सँडविच - चिज /बटाटा नसलेले किंवा भाजलेले.

शितपेयांना, कोकम, लिंबुसरबत, ताजा फळांचा रस, (संत्री/मोसंबी), ऊसाचा रस हे उत्तम पर्याय आहेत.

या सर्व बाबी ध्यानात घेवून जर आपण बाहेर जेवण केले तर शारीरीक अपायांचे प्रमाण कमी होईल.

आरोग्यलेखआरोग्य

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

17 Apr 2017 - 7:19 pm | श्रीगुरुजी

उत्तम माहिती!

Dr prajakta joshi's picture

17 Apr 2017 - 9:04 pm | Dr prajakta joshi

धन्यवाद

जेवणाची सुरूवात नेहमीच सलाडने करावी.

यामागचे कारण काय?

भाजलेले पापडही चांगला पर्याय आहे.

कशामुळे?

सलाड (काकडी,गाजर ई.)यांचे सुरूवातीस सेवन केल्यास आहारात तंतुमय पदार्थांचा (fibers)समावेश होवुनपुढील अन्नपचनास मदत होते.तसेच सलाड, जलयुक्त पदार्थाचे सेवन केल्यास अतिखाणे(overeating)होत नाही. calorie intakeजवळपास 12% ने कमी होवू शकतो..
तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे.त्यातील ऊष्ण,तिक्ष्ण,लवण रसाने जाठराग्नि प्रदिप्त होवून पचनास मदत होते.व सर्व दाळीनी बनलेला असल्याने त्यात पोषकांश असतात.

अत्रे's picture

18 Apr 2017 - 11:22 am | अत्रे

माहितीसाठी धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

18 Apr 2017 - 7:40 am | चित्रगुप्त

कालच बाबा रामदेव यांनी उपहारगृहे सुरू केल्याची बातमी ऐकली. यात पतंजली उत्पादनातून बनवलेले सकस शाकाहारी भोजन मिळते म्हणे. म्याक्डोनाल्ड, पिझाहट्ट, केयफशी वगैरेंच्या पेकाटात लाथ मारणारा कुणी भारतीय हवाच होता. हे कार्य रामदेव बाबांनी शिरी घेतले हे फार चांगले केले.

रोजच बाहेरचे जेवण असेल तर खानावळच हवी. हल्लीचे मेन्युकार्ड पाहून मागवलेले चमचमित पदार्थ याबद्दल काय बोलणार?

हेमंत८२'s picture

18 Apr 2017 - 2:16 pm | हेमंत८२

उत्तम माहिती!
माझे काही प्रश्न
१) आपण जेवताना सूप मागवतो ते कसे असावे आणि त्याची खरोखरच गरज असते का? त्याने काही फायदा होतो का तोटा?
२) आपण ऑफिस मध्ये असताना भूक लागली तर काय खावे? कारण कॅन्टीन मध्ये किंवा गाड्यावर मिळणारे पदार्थ अंबर-चबर असतात.

Dr prajakta joshi's picture

18 Apr 2017 - 3:08 pm | Dr prajakta joshi

जेवणातील सुपचेही कार्य सलाड प्रमाणेच आहे.पाचनक्षमता वाढवणे आणि 20%callorie cutting.तुम्ही Tomatosoup,vegitable soup,cabbage soupमागवु शकतो.मक्याचे soup मागवु नयेत.ते वजन वाढवतात.मात्र बर्याचवेळा दाटसरपणा येण्यासाठी सर्व soup मध्ये मैदा वापरला जातो..त्यामुळे प्रमाण मर्यादित ठेवावे.

पण मला सूप पिल्यानांत ऍसिडिटी चा त्रास होतो हा सगळ्यांनाच होतो का? कि काही विशेष सूप पिल्यानंतर होतो? ( मला शेजवान किव्हा टोमॅटो ला परेफेरंन्स असतो)

Dr prajakta joshi's picture

18 Apr 2017 - 4:16 pm | Dr prajakta joshi

पित्त प्राधान्य असणार्या व्यक्तीना सुपचा त्रास होतो..कारण ते ऊष्ण गुणात्मक असते.त्याऐवजी अधिक प्रमाणात सलाड घ्या.

अमर विश्वास's picture

18 Apr 2017 - 2:49 pm | अमर विश्वास

हेमंतदा
तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो ...

हा प्रश्न मलाही बरेच दिवस भेडसावत होता .. त्यावर मी शोधलेला उपाय :

स्वतः: पदार्थ कॅरी करणे .. यात संध्याकाळी खाण्यासाठी मी खालील गोष्टी बरोबर ठेवतो (आलटून पालटून)
१. फळे : विशेतः: सफरचंद
२. सुकामेवा : बदाम / मनुका / खजूर
३. साळीच्या लाह्या .. या माझ्या ड्रॉवर मध्ये असतात. काहीच नसेल तेंव्हा खातो
४. रोजचा संध्याकाळचा नाश्ता : सिरल्स / मुसेली .. कॉफी मशिन मध्ये दुध मिळते
५. Boiled Eggs : डाएटिंग वर असेल तर फक्त एग व्हाईट

या सर्वांसाठी फार तयारी करावी लागत नाही

अर्थात कामाच्या स्वरूपानुसार सर्वांना असे करणे शक्य नसेल ... पण शक्य असेल तर जरूर असे पदार्थ खावेत. व कॅन्टीन टाळावे

हेमंत८२'s picture

18 Apr 2017 - 3:18 pm | हेमंत८२

थँक्स या लॉट अमर...
मी १, २ आणि 3 try करेन.

नितिन थत्ते's picture

18 Apr 2017 - 3:35 pm | नितिन थत्ते

लेख आवडला. मुळात हॉटेलात जेवणे टाळता येणार नाही हे प्रिमाइस घेतले हे चांगले.

>>शितपेयांना, कोकम, लिंबुसरबत, ताजा फळांचा रस, (संत्री/मोसंबी), ऊसाचा रस हे उत्तम पर्याय आहेत.

शीतपेयाला उसाचा रस हा पर्याय मुळीच नाही. उसाच्या रसाच्या एका ग्लासात ७० ग्रॅम साखर असते. आपण शीतपेयातल्या ३०-४० ग्रॅम साखरेबाबत बोंबलत असतो.

अप्पा जोगळेकर's picture

18 Apr 2017 - 4:14 pm | अप्पा जोगळेकर

उसात बरीच खनिजे आणि कॅल्शियम असते. त्यामुळे बहुधा उस आणि शीतपेय ही तुलना होऊ शकत नाही. मी तज्ञ नाही.

Dr prajakta joshi's picture

18 Apr 2017 - 4:20 pm | Dr prajakta joshi

ऊसाच्या रसामध्ये sucrose असते जीचे glucoseमध्ये सहज विलयन होते..मात्र शितपेयामधील साखरेचे विलयन glucose मध्ये सहज होत नाही

सुबोध खरे's picture

18 Apr 2017 - 8:48 pm | सुबोध खरे

शितपेयामधील साखरेचे विलयन glucose मध्ये सहज होत नाही
याला काय शास्त्राधार आहे?

Dr prajakta joshi's picture

19 Apr 2017 - 7:05 pm | Dr prajakta joshi

ऊसाच्या रसाचा glycemic index(effect of carbohydrate on blood glucose level)हा 43आहे.पण बहुतांश शितपेयाचा 60 पेक्षा अधिक आहे.
त्यामुळे तो शरीर चयापचय क्रियेस(metabolism)
मदत करतो.
तसेच आयुर्वेदानुसार तो बल्य द्रव्यात येतो.म्हणजेच lean body mass वाढवण्यास मदत करतो.मुत्रल(Diuretic)हेही त्याचे कार्य सांगितले आहे .जे चयापचयास मदत करणारे आहे.
तसेच कामला(काविळ) या व्याधितही ऊपचार सांगितला आहे.कारण तो यकृताचे निर्विशीकरण (detoxification)करण्यास मदत करतो..शास्त्रशुद्ध आधार आहेत.मात्र upload करता येत नाहीत

उलट परिस्थिती आहे. शीतपेयातील साखर( सुक्रोज) हि पटकन शरीरात शोषली जाते त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. जगभर सर्वत्र सुदृढपण वाढीस लागण्याचे ते एक मुख्य कारण आहे.
उसाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने त्यातील साखर थोडी कमी वेगाने शरीरात शोषली जाते एवढाच फरक आहे. शीतपेयापेक्षा उसाचा रस जास्त चांगला परंतु त्यात असणारी भरपूर साखर हि अगोदरच वजनदार असणाऱ्या माणसाला चांगली नाही. lean body mass वाढवण्यासाठी दोन्हीचा काहीच उपयोग होत नाही.
काविळीत उसाचा रस देण्याचे कारण त्यात असलेली भरपूर साखर. साखर पचवण्यासाठी यकृताला कोणतेच काम करावे लागत नाही. याउलट प्रथिने किंवा चरबी पचवण्यासाठी यकृताला "काम" करावे लागते. काविळीत यकृताला सूज आलेली असल्याने त्याला विश्रांती देण्यासाठी शर्करायुक्त पदार्थ दिले जातात
नुसते साखरेचे पाणी दिले तरी चालेल परंतु अगोदरच खाण्यावरील वासना उडालेल्या किंवा मळमळ होत असलेल्या माणसाला साखर दिली तर उलटी येते
त्यापेक्षा उसाचा रस त्यातील इतर खनिजांमुळे तेवढी मळमळ करत नाही आणि हा घेण्यासाठी जास्त सोपा आहे एवढेच कारण.

सुबोध खरे's picture

19 Apr 2017 - 10:42 am | सुबोध खरे

"बाहेर" जेवणाऱ्यांसाठी सर्वात उत्तम पेय म्हणजे नारळाचे पाणी -- स्वच्छ शुद्ध आणि आरोग्यदायक असते. मी तर म्हणेन १५ रुपयाच्या बिसलेरी ऐवजी ३५ रुपयाचे नारळाचे पाणी प्यावे.
शिवाय रस काढण्यासाठी हाताचा वापर कुठेही होत नसल्यामुळे जंतुसंसर्ग सारख्या गोष्टी टाळल्या जातात. सर्वात समतोल प्रमाणात खनिजे असणारे हे पेय सर्वोत्तम आहे. मधुमेही, मूत्रपिंडाचे रोग असणारे, वजनदार/ सुदृढ लोक या पैकी कोणालाही हे पेय पिता येते.
यानंतर क्रमांक येतो तो मोसंबीच्या रसाचा. (साखर न घातलेला) यात "क" जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. शिवाय इतर खनिजेही बऱ्यापैकी असतात.
लिंबू सरबत कोकम सरबत -- बाहेर मिळणारे बहुतांशी सॅकरिन घातलेले असते शिवाय कोणत्या पाण्यात आणि कोणी तयार केले आहे हा एक संशयास्पद मुद्दा असतो. घरी तयार केलेले असेल तर उत्तम.
कोकम सरबतापेक्षा सोलकढी ताक घालून केलेली जास्त चांगली (नारळाचे दूध असेल तर अधिक उत्तम पण तशी हॉटेलात मिळत नाही)
उसाचा रस हा त्यात मोठ्या प्रमाणावर कॅलरी असल्याने सुदृढ लोकांनी आणि मधुमेही लोकांनी टाळावा. पण तहान आणि भूक दोन्ही लागले असतील तर रस हा उत्तम. सुदृढ लोकांनी वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणा "ऐवजी" एक ग्लास उसाचा रस प्यावा. जेवणा "आधी किंवा नंतर" नाही.
उसाच्या रसात लोह मोठ्या प्रमाणावर असते ४ mg/ १०० ml. तेवढे सोडले तर इतर खनिजे थोड्या प्रमाणावर असतात.
आरोग्याचा विचार करायचा असेल तर शीतपेये मुळीच पिऊ नयेत.

अनुप ढेरे's picture

19 Apr 2017 - 10:52 am | अनुप ढेरे

साखर नसलेल्या शीतपेयांबद्दल काय मत आहे डाक्टरसाहेब? डाएट कोक/कोक झीरो वगैरे?

सुबोध खरे's picture

19 Apr 2017 - 11:35 am | सुबोध खरे

डाएट कोक मध्ये साखरे ऐवजी ऍस्पार्टेम नावाचे द्रव्य असते. बाकी त्यात असणारी पदार्थ टिकवणारी रसायने (प्रिझर्व्हेटिव्ह) असतातच. मुळात शीतपेये पिऊन आरोग्याला फायदा असा काहीच नाही( झालेच तर नुकसानच) केवळ जिभेचे चोचले आहेत. तेवढ्यासाठीच आणि ते समजून पीत असाल तर ठीक आहे.
बाकी आपण भारतीय लोक दांभिक आहोत. पनीर बटर मसाला आणि शाही चिकन -बटर नान बरोबर खाल्ल्यावर कॅलरी "बॅलन्स"करायला "डाएट कोक" पितो.

अनुप ढेरे's picture

19 Apr 2017 - 11:38 am | अनुप ढेरे

चोचले म्हणूनच पितो कंदीमंदी. ऍस्पार्टेमचा असा अपाय असतो का?

आणि अजून एक. प्रिझर्वेटिव असणं याचा नक्की अपाय काय असतो? आणि लोणच्यातलं तेल/मीठ हे देखील प्रिझर्वेटिव्ह आहे राइट?

सुबोध खरे's picture

19 Apr 2017 - 12:10 pm | सुबोध खरे

पदार्थ टिकून राहण्यासाठी वापरलेली द्रव्ये म्हणजे "प्रिझर्वेटिव्ह". यात नैसर्गिक आणि कृत्रिम असा मूळ फरक आहे.
करडई, सूर्यफूल तीळ आदी तेलांमध्ये 'इ" जीवनसत्त्व हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह आहे तसेच फळात सायट्रिक आम्ल किंवा "क" जीवनसत्त्व(ऍस्कॉर्बिक आम्ल) हे नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळे ते पदार्थ सहजासहजी खराब होत नाहीत. हि निसर्गाची किमया आहे.
बेंझॉइक आम्ल किंवा सोडियम बेन्झोएट सारखी रसायने दहा हजारात एक किंवा पन्नास हजारात एक अशा प्रमाणात वापरलेली असतात. आजपर्यंत हातात असलेल्या माहिती नुसार बरीचशी "प्रमाणित" कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह हि शरीराला अपाय करीत नाहीत असे आढळलेले आहे. परंतु आपला हा अनुभव काही दशकांचा आहे. या उलट नैसर्गिक प्रिझर्वेटिव्हचा अनुभव काही शतकांचा/ सहस्रकांचा आहे. त्यामुळे सात पिढ्यांवर त्यांचा वाईट परिणाम होत नाही हे आपल्याला( मानवजातीला) अनुभवातून आलेले शहाणपण आहे.
सरसकट कोणताही नैसर्गिक पदार्थ सुरक्षित आहे हा मूळ गैरसमज आहे. उदा तंबाखू, अफू चरस हि सुद्धा वनस्पतीजन्य द्रव्येच आहेत.
काही कालावधी नंतर कृत्रिम प्रिझर्वेटिव्ह बद्दल हि संपूर्ण पणे सुरक्षित आहेत असे म्हणता येईल.
राहिली गोष्ट मीठ किंवा तेल हेही अति प्रमाणात वाईटच. लोणचे तुम्ही लोणच्याच्या प्रमाणात न खाता भाजी सारखे मोठ्या प्रमाणात खाल्ले तर त्याचाही वाईट परिणाम होईलच.
FDA officials describe aspartame as "one of the most thoroughly tested and studied food additives the agency has ever approved" and its safety as "clear cut." The weight of existing scientific evidence indicates that aspartame is safe as a non-nutritive sweetener.
https://en.wikipedia.org/wiki/Aspartame_controversy

अनुप ढेरे's picture

19 Apr 2017 - 12:18 pm | अनुप ढेरे

शंकांना उत्तरं दिल्याबद्दल आभार!

इष्टुर फाकडा's picture

20 Apr 2017 - 2:04 am | इष्टुर फाकडा

बेंझॉइक आम्ल किंवा सोडियम बेन्झोएट सारखी रसायने दहा हजारात एक किंवा पन्नास हजारात एक अशा प्रमाणात वापरलेली असतात.

दहा लाखात एक भाग (ppm) म्हणायचे आहे का? सोडिअम बेन्झोएट चे USFDA प्रमाणे शीतपेयांमधील प्रमाण १००० ppm (१ग्राम/लिटर) पेक्षा कमी असणे बंधनकारक आहे जे युरोप मध्ये १५० ppm आहे.

सुबोध खरे's picture

20 Apr 2017 - 4:01 pm | सुबोध खरे

दहा हजारात एक म्हणजेच १०० ppm.
एखादी वस्तू जास्त दिवस टिकवायची असेल तर त्यात थोडा अधिक अंश घालावा लागतो.

वेल्लाभट's picture

19 Apr 2017 - 1:05 pm | वेल्लाभट

आपण भारतीय लोक दांभिक आहोत. पनीर बटर मसाला आणि शाही चिकन -बटर नान बरोबर खाल्ल्यावर कॅलरी "बॅलन्स"करायला "डाएट कोक" पितो.

या वाक्याला दणकून अनुमोदन आणि टाळ्या !

अभ्या..'s picture

19 Apr 2017 - 6:37 pm | अभ्या..

डॉक, एवढाच नै दांभिकपणा. त्याआधी ढोसायसाठी डायेट व्हिस्की पण आहे.

सुबोध खरे's picture

19 Apr 2017 - 6:17 pm | सुबोध खरे

वजन कमी करते
मधुमेहास उपयोगी
कोलेस्टिरॉल कमी करते सारखी भंपक विधाने केलेली आहेत.
उत्साहाच्या भरात काहींच्या काही लिहिलेला पत्रकारितेचा नमुना यापेक्षा या लेखाची लायकी नाही.
मुद्दा ५ -- Alpha Hydroxy Acids (AHAs) पोटात घेतल्यावर नव्हे तर तोंडाला लावले तर मुरुमे कमी होतात.
तस्मात रद्दीची लायकी असलेला लेख.

राही's picture

20 Apr 2017 - 9:31 am | राही

मलाही असेच वाटलेले. या लेखातली माहिती सर्वसाधारण आहे. बहुतेकांना आधीच ठाऊक असलेली. जसे की केळे थंड/ऊष्ण असते. बर्फ ऊष्ण असतो. आयुर्वेदातल्या संज्ञा वापरून कोलेस्टेरॉल, मेटॅबॉलिझम वगैरे प्रक्रिया समजावण्याचा प्रयत्न पटला नाही.
ता.क. लेखावर नव्हे, पण माझी एक शंका : जवळच्या एका नेफ्रोपथीच्या पेशंटना उसाचा रस, शहाळ्याचे पाणी वर्ज्य किंवा कमी करायला सांगितले आहे. त्याचे कारण 'के'चे प्रमाण वाढते हे असेल का?

सुबोध खरे's picture

20 Apr 2017 - 7:06 pm | सुबोध खरे

बरोबर
मूत्रपिंडाचा आजार असणाऱ्या रुग्णांना शरीरातील पोटॅशियम बाहेर टाकणे कठीण जाते म्हणून पोटॅशियम असणारे पदार्थ कमी/वर्ज्य करा असे तज्ज्ञ सांगतात.

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2017 - 4:10 pm | इरसाल कार्टं

ज्यांना सतत बाहेर फिरावे लागते त्यांच्यासाठी खासच.

सर्वांचे आभार

देशपांडेमामा's picture

18 Apr 2017 - 4:53 pm | देशपांडेमामा

ह्यावर प्रकाश टाकु शकाल काय ? हॉटेलच्या नान, तंदुरी रोटी किवा पराठा ह्यात सर्रास वापरतात

देश

मैदा बनवताना गव्हाच्या ओंबीची साल काढलेली असते.त्यामुळे त्यात तंतुमय पदार्थ(fibres) व प्रथिने यांचे प्रमाण खुप कमी असते .व gluten बाहुल्य असते. तो आंत्रास चिकटून पचनास वेळ लागतो.
उत्तर भारतात तापमान कमी व आरोग्यदायी असते.तसेच तेथील लोकांचे शरीर मका,मैदा असे पदार्थ पचवण्यास बर्यापैकी सक्षम असते.
पण आपणास तो पचनास कठीण जातो.त्यामुळे गहु,ज्वारी,बाजरी यांचाच वापर करावा

नाश्त्याचं म्हणालात त्याबद्दल एक प्रश्न

मेदूवडा, इडली, डोसा हे खरोखर कितपत आरोग्यदायी म्हणावेत? मेदुवडे तळलेले असतात, बाकी डोसे उत्तप्पे इडली आंबवलेले. त्याने अ‍ॅसिडिटी होते असं निरीक्षण आहे. याबद्दल काय लिहाल? पोहे, धिरडे, कटलेट (शॅलो फ्राय) पराठा हे सरस पर्याय नव्हेत का?

Dr prajakta joshi's picture

18 Apr 2017 - 5:29 pm | Dr prajakta joshi

दाक्षिणात्य पदार्थ योग्य रितीने बनवलेले असल्यास त्यांच fermentation मधुन पचनास ऊपयुक्त bacteriaची निर्मिती होते.व विशेष म्हणजे हा नाष्ता ईडली सांबार,मसाला डोसा असे कार्बोदके व प्रथिने यांचे पुरक प्रमाण असलेला असतो.मेदुवड्याच्या तेलाचे म्हणाल तर तेल पोहे,धिरडी यात ही असते.तेही पर्याय चांगलेच आहेत.यावर उपाय एवढाच सांगता येईल कि नाष्ट्यात वैविध्य ठेवा.पोहे पचनास जड असतात .त्यामुळे प्रमाणात खावेत.सर्व भाज्या घालून ऊपमा हे जास्त हितकर राहील.

दाक्षिणात्य पदार्थ तांदळाचे, आंबवलेले आणि तेल वापरून केलेलेच असतात. त्यामुळे इथे कॅलरी वाचत असतील असे वाटत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Apr 2017 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माहितिपूर्ण लेखनाबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

मनिमौ's picture

18 Apr 2017 - 8:36 pm | मनिमौ

धन्यवाद. याच नाश्त्याच्या पदार्थामधे तांदुळाची /ज्वारीची /नाचणीची ऊकड आणी आंबिल हे पदार्थ पण चालु शकतील.

यशोधरा's picture

18 Apr 2017 - 8:42 pm | यशोधरा

छान लेख!

मी रोज आंबील + थंड ताक घेतो(500ml), प्लस रोज 4 लीटर पाणी, 10000 पाऊले चालणे आणि इतर कोणते ही शीतपेय घेत नाही. बाकी शरीर एकदम व्यवस्थीत आणि शीतल!

फारएन्ड's picture

19 Apr 2017 - 5:23 am | फारएन्ड

खूप प्रवास करणार्‍या मित्रांबरोबर ही लिन्क शेअर करत आहे.

रुपी's picture

19 Apr 2017 - 5:36 am | रुपी

छान माहिती.

आजकाल ऑफिसमध्ये बर्‍याच कलिग्सचा कल बाहेर खाण्यावर असतो. शिवाय, ठराविक रक्कम भरुन हवे तितके खाण्याचा पर्याय असेल तर पैसे 'वसूल' करण्यावरही असतो, त्यासाठी काहीजण दुपारी असे वसूल करायचे म्हणून सकाळचा नाश्ताही खात नाहीत. त्याउलट, काहींचा फक्त सॅलड खाण्यावर असतो.

लाइफस्टाइलच का बदलू नये? सकाळी ६/ संध्याकाळी ६ ला जेवण.

ravpil's picture

19 Apr 2017 - 8:10 am | ravpil

अारोग्यम धन संपदा हा whatsapp ग्रुप तयार केलेला आहे. आरोग्य या विषयावर वाहिलेला. Join करायचं असेल तर या क्रमांकावर. Whatsapp message करा. ७०१९१४३३०३

सूड's picture

19 Apr 2017 - 11:47 am | सूड

वाचतोय.

मराठी_माणूस's picture

19 Apr 2017 - 11:47 am | मराठी_माणूस

एक शंका: खाण्याच्या आणि पिण्याच्या पदार्थां मधे पौष्टीक आणि हानिकारक असे भेद केले जातात. यामधे प्रत्येक पदार्थ (पौष्टीक अथवा हानिकारक ) शरीरा मधे गेल्यावर प्रत्येक स्टेज मधे त्याचे कसे विघटन होते , शरीरावर त्याचा काय परीणाम होतो ह्याचा सुक्ष्म अभ्यास केला गेलेला आहे का ? का फक्त त्या पदार्थांमधल्या घटकावर ठरवले जाते. जसे की एखाद्या पदर्था मधे अमुक एक प्रथिन आहे मग ते आरोग्यास चांगले असे ढोबळ मानाने ठरवले जाते

सुबोध खरे's picture

19 Apr 2017 - 12:26 pm | सुबोध खरे

नियम १ -- अति सर्वत्र वर्जयेत.
बदाम हे आरोग्याला चांगले आणि पौष्टिक कारण त्यात असणारी उच्च दर्जाची प्रथिने. पण तुमची रोजची प्रथिनांची गरज जर ६० ग्राम असेल( बैठे काम करणारा माणूस) आणि तुमच्या आहारात तुम्ही पाव किलो बदाम खाऊ लागलात तर या अतिरिक्त प्रथिनांची विल्हेवाट लावण्यासाठी तुमच्या यकृत आणि मूत्रपिंडावर ताण येईल. या उलट एखादा कुस्ती खेळणारा पैलवान असेल तर हेच पाव किलो बदाम त्याला अतिशय उपयुक्त ठरतील.
तंबाखू हा नैसर्गिक पदार्थ असा आहे कि कितीही कमी सेवन केले तरी त्याचा शरीरावर वाईटच परिणाम होतो. पण त्याचा वापर जनावरांच्या गोचीडी वर उत्तम तर्हेने होऊ शकतो.
प्रत्येक पदार्थ संपूर्ण चांगला( पौष्टिक) आणि संपूर्ण वाईट( हानिकारक) या दोन्ही टोकाच्या मध्ये असतो तेंव्हा प्रत्येकाच्या वयोमान आणि प्रकृतिमानाप्रमाणे त्याचे सेवन केले पाहिजे.
आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो आणि त्यावरच तो पदार्थ उपयुक्त कि हानिकारक हे ठरवले जाते.
जुन्या औषध पद्धतीमध्ये असे काटेकोर प्रयोग न आकारात फक्त निरीक्षणावर किंवा अनुभवावर अनुमान काढले जाते आणि म्हणून ते आधुनिक रसायन/ भौतिक शास्त्राच्या कसोट्यांवर टिकत नाही. उदा बर्फ हा उष्ण कसा याचे शास्त्रीय कारण देता येत नाही. किंवा एखादा पदार्थ विरळ केला तर तो जास्त शक्तीचा होतो.

Dr prajakta joshi's picture

19 Apr 2017 - 1:40 pm | Dr prajakta joshi

अगदी योग्र

मराठी_माणूस's picture

19 Apr 2017 - 12:49 pm | मराठी_माणूस

उत्तराबद्दल धन्यवाद.

आधुनिक वैद्यकशास्त्रात बहुसंख्य खाद्यपदार्थांचे प्रयोगशाळेत रासायनिक पृथक्करण करून त्यातील घटकांचाआणि शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो

ह्या बद्दल अजुन माहीती कुठे मिळेल ?

(अवांतरः मधुमेहा साठी एका डॉ. नी शुगर फ्री वापरावे असे सांगातले दुसर्‍या डॉ. नी ते वापरु नये असे सांगीतले )

इष्टुर फाकडा's picture

20 Apr 2017 - 2:09 am | इष्टुर फाकडा

नक्की काय माहिती हवी आहे? असेल तर देईन :)

मराठी_माणूस's picture

20 Apr 2017 - 10:51 am | मराठी_माणूस

तो प्रश्न डॉ. साठी होता

सुबोध खरे's picture

20 Apr 2017 - 7:03 pm | सुबोध खरे

साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही.
काही डॉक्टर ते वापरू नका असे सांगतात याचे कारण फार वेगळे आहे. काही लठ्ठ माणसे अन्न केवळ चवीला चांगले लागत नाही म्हणून म्हणून कमी खातात अशा माणसांना शुगर फ्री बिनधास्त वापरा म्हणून सांगितले तर त्यांच्या आहारात "सुधारणा" होते आणि याने मधुमेह नियंत्रणाबाहेर जातो. हा अनुभव सर्रास सगळ्या डॉक्टरांना आलेला असतो. एक कॅलरी मग ती साखरेतून येवो किंवा दुसऱ्या पदार्थातून शेवटी तुमच्या साखरेचं प्रमाणावर परिणाम करणारच. शुगरफ्री वापरून केलेला भरपूर खवा घातलेला गाजर हलवा मला आग्रहाने खाऊ घालणारे(आणि त्याच बरोबर स्वतः दुप्पट खाणारे) रुग्ण माझ्या परिचयात आहेत
९५% वजनदार मधुमेही लोक आपला आहार कमीच आहे/ आम्ही काहीच खात नाही म्हणून सांगत असतात.(denial) त्यामुळे डॉक्टर शुगरफ्री वापरू नका असे सांगताना मी सुद्धा पहिले आहे.
हे बरोबर कि चूक यावर मी भाष्य करीत नाही.

मराठी_माणूस's picture

21 Apr 2017 - 10:02 am | मराठी_माणूस

मुळ शंका अशी आहे की , त्यात (शुगर फ्री) काही "केमिकल्स' आहेत ज्याचा दिर्घ वापर हानीकारक ठरु शकतो असे काही आहे का ?

आनंदी गोपाळ's picture

21 Apr 2017 - 8:04 pm | आनंदी गोपाळ

एक गम्मत अशी आहे, की ज्याच्या बदल्यात आपण शुगरफ्री वापरणार आहोत तेही मुळात C12H22O11 नामक केमिकलच आहे की.

अनुप ढेरे's picture

22 Apr 2017 - 12:00 am | अनुप ढेरे

अगदी! केमिकल आहेत म्हणजे नक्की काय आहे ते समजत नाही. ही मीम आठवली.

a

पैसा's picture

19 Apr 2017 - 2:47 pm | पैसा

उत्तम माहिती

कबीरा's picture

20 Apr 2017 - 10:58 am | कबीरा

१-२ महिन्यापूर्वी एक खास सल्ला ऐकला होता काय खावे काय नाही ह्या बाबत... "साधारण हॉटेल मध्ये गेल्यावर ऑर्डर द्यायच्या आधी किंवा घरी एखादी फर्माईश सोडायच्या आधी आपले मन आपल्याला अगदी व्यवस्थित बजावत असते आपल्या शरीरासाठी काय उत्तम काय अपायकारक / काय खावे काय नाही.. तेवढी ४-५ सेकंद जिभेवर ताबा ठेऊन मनाचं ऐकावं".. ..हा सल्ला आणि रोजच अर्धा तास जॉगिंग ह्यावर २ महिन्यात 4kg वजन कमी करू शकलो.

मोदक's picture

20 Apr 2017 - 12:06 pm | मोदक

रोचक आहे.

आमच्या मनाबद्दल बोलायचे झाले तर भरपूर कोंबड्या, लोण्याची थप्पी आणि थम्सअपचा समुद्र. बास्स..! :(

आणि थोडे मासे आणि मस्त पैकी झोपायला शांत जागा!

अभ्या..'s picture

20 Apr 2017 - 6:26 pm | अभ्या..

.

राघवेंद्र's picture

20 Apr 2017 - 7:25 pm | राघवेंद्र

काही भारी मित्रा ??

धागा ...
प्रतिसाद ...
लोकांचे कुतुहलात्मक प्रश्न ...
लोकांचे खाण्याची पद्धती ....

नुसता . मुळे काही समजायला मार्ग नाही.

अभ्या..'s picture

22 Apr 2017 - 12:08 am | अभ्या..

अरे ते लोण्याची थप्पी, थम्सापचा समुंदरला भारीच म्हणायचे होते.
प्रतिसादाने लिंक सोडली.
णंटर लक्शात आले पण जाऊ दे म्हणले. असं ना तसं माझ्झा प्रतिसाद काय डॉक खरेंच्या प्रतिसादासारखा अभ्यासू नसणार. कोण वाचणारे? ;)

तसेच पापड हे ऊत्तम पाचक आहे.त्यातील ऊष्ण,तिक्ष्ण,लवण रसाने जाठराग्नि प्रदिप्त होवून पचनास मदत होते.व सर्व दाळीनी बनलेला असल्याने त्यात पोषकांश असतात.

पापडातला पापडखार म्हणजे केमिकल आहे, जो सगळ्या कथित फायद्यांवर पाणी फिरवतो.

हेम's picture

20 Apr 2017 - 9:03 pm | हेम

साखरेऐवजी शुगर फ्री वापरणे सुरक्षित आहे या बद्दल शंका नाही.
शुगर फ्री कशी बनते ते जरा इत्यंभूत माहित आहे कांय कुणाला? माहित असेल तर कृपया समग्र सांगा म्हणजे ठरवता येईल वापरायची की नाही ते..

Dr prajakta joshi's picture

21 Apr 2017 - 9:38 am | Dr prajakta joshi

 § Health effects

Eating natural sugars like glucose and sucrose instead of a sugar substitute can have negative health effects. The consumption of added sugars has been positively associated with multiple measures known to increase cardiovascular disease risk amongst adolescents as well as adults.[41]The calories contained in sugar-sweetened beverages contribute to increases in body weight and body fat, and replacement of sugar by artificial sweeteners reduces weight.[42] Obesity contributes to diabetes and cardiovascular disease. Glucose has a high glycemic index, sucrose medium, and fructose low. There is evidence that sugar-sweetened beverages "may increase the risk of metabolic syndrome and type 2 diabetes not only through obesity but also by increasing dietary glycemic load, leading to insulin resistance, β-cell dysfunction, and inflammation," according to a 2010 meta-analysis.[43]

There is "convincing evidence from human intervention studies, epidemiological studies, animal studies and experimental studies, for an association between the amount and frequency of free sugars intake and dental caries" while other sugar (complex carbohydrate) consumption is normally associated with a lower rate of dental caries, according to the World Health Organization.[44]

A 2013 review found that there is insufficient evidence to suggest that replacing dietary sugar with non-caloric sweeteners alone is beneficial for energy balance, weight loss, or diabetes risk factors. The review found that restricting calories is more important than avoidance of sugar for weight management. However, the review concluded that replacing dietary sugar with non-caloric sweeteners is useful for managing blood sugar in diabetes patients. The review recommends that all sweeteners be consumed in moderation