शब्दतुला

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
13 Apr 2017 - 10:42 am

बहरून येती अलगद कधी मनीचे भाव अनामिक
निःशब्द होती ओठ कधी मौनाच्या लाख तर्‍हा
मनपाखरू शोधत फिरते मौनाच्या अन शब्दकळा
सगळेच कसे गं उलगडुनी सांगायाचे सांग तुला?

कधी अचानक येई भरते झरतो हलके शब्दझरा
हळवी होते कधी कविता बांध फोडुनी अस्तित्वाचा
कधी घुटमळते ओठी, मौनाची होऊन चंद्रकला
कधी मनाच्या उंबरठ्यावर झुलत राहते मौनझुला

या डोळ्यातून स्वप्न तुझे हातात लाजरा हात तुझा
क्षुब्धता कधी, कधी तृप्तता, आवेग अन मिलनाचा
काय-काय अन कसे किती सांगायाचे सांग तुला?
मन होई बावरे झुलताना स्वप्नांचा तो चांदणझुला

तू लाजून हंसता गाली, जीव होतसे अधीर असा
या जगण्याचे होते अत्तर मृदगंधही होतसे फिका
मी सांगत फिरतो पाना-पाना ऐक तूही प्रितफुला
या हंसण्याखातर केली होती स्वप्नांची मी शब्दतुला

© विशाल कुलकर्णी

कविता माझीकविता

प्रतिक्रिया

पैसा's picture

13 Apr 2017 - 10:54 am | पैसा

सुंदर!!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Apr 2017 - 4:47 pm | अत्रुप्त आत्मा

वाह.. .! शेवटची लैन येकच नंबर!

शार्दुल_हातोळकर's picture

15 Apr 2017 - 2:02 pm | शार्दुल_हातोळकर

सुरेख कविता विशालभौ !!

सत्यजित...'s picture

17 Apr 2017 - 12:20 am | सत्यजित...

>>>कधी अचानक येई भरते झरतो हलके शब्दझरा
हळवी होते कधी कविता बांध फोडुनी अस्तित्वाचा
कधी घुटमळते ओठी, मौनाची होऊन चंद्रकला
कधी मनाच्या उंबरठ्यावर झुलत राहते मौनझुला>>>खयाल लाजवाब!प्रतिमा नितांत सुंदर!

विशाल कुलकर्णी's picture

19 Apr 2017 - 11:34 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद मंडळी !

मंजूताई's picture

19 Apr 2017 - 1:56 pm | मंजूताई

सुंदर!