वेबसाईट तयार करण्याविषयी मदत हवीये

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in तंत्रजगत
10 Apr 2017 - 3:03 pm

डिअर ऑल,

अध्यात्मिक लेखनाचं पुस्तक करण्यापेक्षा स्वतःची वेबसाइट करायचं प्रयोजन आहे. Step-By-Step to Enlightenment असं साईटचं नांव असेल.

वेब डिझाईन, माझा ग्राफिक डिझायनर मुलगा करेल. लोकांचे अध्यात्मिक गैरसमज दूर करुन जीवन सर्वांग सुंदर करणारा एक विषय त्यांच्याप्रत पोहोचावा असा उद्देश आहे.

यात माझं आतापर्यंत झालेलं लेखन, लेखावरच्या लोकांच्या वॅलीड प्रतिसादांना वेळोवेळी दिलेली उत्तरं, नव्यानं होणारं लेखन आणि साईटच्या माध्यमातून लोकांशी ऑनलाईन संवाद, असं साईटचं स्वरुप असेल. साईटला अर्थात नाममात्र वार्षिक सदस्य शुल्क (से, पाचशे रुपये) असेल त्यातून साईट अ‍ॅड मिनिस्ट्रेशनचा खर्च भागेल. सदस्यांना स्वतःचं नांव न डिसक्लोज करता आयुष्यातला कोणताही प्रश्न विचारता येईल (त्यासाठी प्रश्नाला शंभर रुपये शुल्क असेल, ज्यामुळे लोक फक्त वॅलीड आणि नेमके प्रश्न विचारतील, शिवाय उत्तरं शांतपणे वाचतील) आणि त्यांचा इतरांनाही उपयोग होईल.

साईट बाय-लिंग्विअल (मराठी आणि इंग्रजी) अशी असेल त्यामुळे साईटला व्यापक वाचकवर्ग लाभू शकेल.

जर खालील बाबतीत कुणी सल्ला देऊ शकेल तर आभारी होईन :

१) डोमेन कुणाकडून घ्यावा आणि त्यासाठी अंदाजे किती खर्च येतो ? (वन टाईम प्लस वार्षिक)

२) जवळजवळ सर्व डेटा टेक्स्ट्युअल असेल तर डेटाबेस किती असावा ?

३) साईट प्रोटेक्ट करण्यासाठी नॉर्मली काय खबरदारी घ्यावी लागते ? आणि साईटचा डेटा बॅक-अप कसा घ्यावा ?

४) त्या अनुषंगानं आणखी काही माहिती असेल तर ती कृपया शेअर करावी.

प्रतिक्रिया

कंजूस's picture

29 May 2020 - 8:23 pm | कंजूस

मराठी साइट्सपैकी
१) https://avakashvedh.com/

२) app हिंदू क्यालिंडर,
( https://play.google.com/store/apps/details?id=com.alokmandavgane.hinduca... )
आणि त्यांचेच
३) इंडिअन स्काइ म्याप ( app )
( https://play.google.com/store/apps/details?id=com.alokm.android.stardroid )

फार आवडतात.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2020 - 9:49 pm | संजय क्षीरसागर

मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या.

एक अत्यंत जवळचा मित्र जो या कामासाठी सतत माझा पाठपुरावा करत होता तो गेला. त्यामुळे हे काम मागे पडलं.
दुसरा एक मित्र जो स्वतःची वेबसाईट चालवतो त्याचं काम बघून माझा वेबसाईटमधला इंटरेस्ट जवळजवळ संपला.

आता पुन्हा मूड आला की अध्यात्मावर एक सरळ आणि सोपं पुस्तक लिहून प्रकाशित करीन.
हे पिओडी (प्रिंट ऑन डिमांड) पुस्तक असेल.
साधारण दहाएक ऑर्डर्स बुक झाल्यावर एक बॅच प्रिंट होऊन ती कस्टमर्सना घरपोच पाठवली जाईल.
या प्रकारात प्रिंटींगचा खर्च थोडा जास्त असला तरी स्टोरेजची भानगड रहात नाही.

मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या.
काळ ? कोणता काळ ? कोणाचा काळ ?
पण जगातल्या कोणत्याही व्यक्तीनं (पार नोबेल लॉरेटपासून कुणीही), वाट्टेल त्या फोरमवर काल वास्तविक आहे हे सिद्ध करुन दाखवावं !
हे तुमचच वाक्य आहे !

अस्तित्वात केवळ प्रक्रिया आहे पण काल हा निव्वळ भास आहे
हे देखील तुम्हीच म्हणालात.

मग वरती तुम्ही म्हणालात मध्यंतरीच्या काळात बर्‍याच गोष्टी घडल्या त्या कोणत्या काळात झाल्या ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cheeni Kum Title Track... :- Cheeni Kum

रानरेडा's picture

29 May 2020 - 10:32 pm | रानरेडा

आपलं तर रजनिष यांच्या १० टक्के वेळात अध्यात्म संगत होता ना ?
मग ही वेळ का आली ?
१० च्या ऑर्डर वरच पुस्तक छापणार हा तुमच्या आत्मविश्वासाचा अभाव किंवा न्यूनगंड दाखवत नाही ना ?
खरेच ही अपेक्षा नव्हती .

मी जिथे राहतो तिथे जागेचे भाव अशक्यप्राय कोटीतले आहेत त्यामुळे भारंभार पुस्तकं छापून त्याचं स्टोरेज करणं त्रासदायक काम आहे.

आज सुद्धा ओशोंच्या एक दशांश वेळेत मी कोणत्याही अध्यात्मिक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. त्यात काहीही फरक पडलेला नाही.

सुबोध खरे's picture

29 May 2020 - 10:44 pm | सुबोध खरे

पांढरी पाच मध्ये गाणाऱ्याचं गाणं सामान्य माणसांना समजत नाही.

मग त्यांचा त्यातील रस संपतो.

He is only for classes and not masses.

तुम्ही त्यांना आपल्या पातळीवरून जोखु नका.

संजय क्षीरसागर's picture

29 May 2020 - 10:49 pm | संजय क्षीरसागर

त्यात वरची किंवा खालची पट्टी, पातळी असं काही नसतं.

सुबोध खरे's picture

29 May 2020 - 11:05 pm | सुबोध खरे

मी जड वैद्यकीय भाषेत medullary carcinoma thyroid वर प्रबंध लिहिला तर किती लोक वाचतील?
कितीही सत्य असलं तरीही?
लोकांना झेपायला पाहिजे.
मी तुमची नाही लोकांची पातळी दाखवली आहे.

रानरेडा's picture

29 May 2020 - 11:06 pm | रानरेडा

पट्टी नसते तर रिंग असते का ?

स्पार्टाकस's picture

29 May 2020 - 11:09 pm | स्पार्टाकस

मला एक साधा प्रश्न आहे -

वेश्यावस्तीत गेलेलं गिर्‍हाईक समोर आलेल्या १० वेश्यांपैकी अमूक एकाच वेश्येची भोगण्यासाठी निवड करतो त्यामागची त्याची अध्यात्मिक भूमिका काय असते?

सुबोध खरे's picture

29 May 2020 - 11:22 pm | सुबोध खरे

दोन आत्म्यांचं मिलन वगैरे असावं बहुधा.
अध्यात्म शारीर पातळीवर कसं असेल?
पट्टी काळी एक कशी असणार?

एखाद्या गोष्टीत रस निर्माण होणं वा संपणं हे मनाचं कार्य आहे... पण मनाच्या इन्फ्लुएन्समधुन बाहेर पडायला शिकवणे हाच उद्देश होता ना या वेगसाईटचा ? मग शिक्षक स्वतःच मनाच्या प्रभावाखाली का आला?

अवांतरः
प्रश्न विचारावा कि नाहि याबद्दल कन्फ्युजन होतं. चर्चा भलत्याच वळणावर, किंबहुना नको त्या वळणावर जायला वेळ लागत नाहि. पण मग "प्रश्न विचारणे न विचरण्यापेक्षा चांगलं" हा महाजनी सल्ला आठवला. असो.

वेबसाईट तयार करण्याचा उत्साह दोन तीन घटनांनी संपला असं संक्षीना म्हणायचं आहे.

--------
मराठी सिनेमा आणि नाटक कलाकारांनी मागे वेबसाईटी केल्या होत्या. पण पुढे त्यांचं काय झालं? प्रेक्षकांना आवडत्या कलाकाराबरोबरचा फोटो किंवा सही हवी असते. कधी कुठे भेटायलाही आवडत असते . हे वेबसाईटवर शक्य नसते.

--------------

मला वाटतं ओडिओ क्लिप्स संग्रहीत केलेली साईट संक्षींनी करावी.
Podcast हे उत्तम माध्यम आहे. त्यात एमपी३ डाउनलोड करण्याचीही सोय असते.
अध्यात्म विषयिक भाष्य हे वाचण्यापेक्षा ऐकायला उत्तम आहे.

संजय क्षीरसागर's picture

30 May 2020 - 12:30 pm | संजय क्षीरसागर

अनन्य साधारण महत्त्व आहे.

एकेक वाक्य पुन्हापुन्हा वाचणं, ओळी अधोरेखित करणं हे पुस्तकानीच शक्य होतं. त्यामुळे साधकांचा भर पुस्तकावर असतो.

त्यामुळे पुस्तक हा योग्य पर्याय दिसतो.

रानरेडा's picture

30 May 2020 - 6:40 pm | रानरेडा

म्हणजे तुम्ही ३ वर्षात काहीही उखडू शकला नाहीत म्हणजे पोपट झाला आहे तर!

मग ३ वर्षात पुस्तक पण नाही लिहू शकला ? पण तुम्ही ओशो च्या दहापट फास्ट होता ना ? मग ५/६ पुस्तके तरी अली पाहिजेत ना ?
बाकी आपला आत्मविश्वास ( कि स्वतः बद्दल चा गॉड गैरसमज ) पाहून जाम हसायला आले होते खरे!

सुबोध खरे's picture

31 May 2020 - 3:41 pm | सुबोध खरे

मग झालं का पुस्तक लिहून?

का आता क्राउड सोर्सिंग करून छापायचंय?

कंजूस's picture

30 May 2020 - 1:21 pm | कंजूस

बरं राहिलं.