" ळ " च्या करामती

ऋतु हिरवा's picture
ऋतु हिरवा in जे न देखे रवी...
3 Apr 2017 - 9:40 pm

"ळ" हे अक्षर जास्तीत जास्त वापरुन मी काही रचना केल्या आहेत. छंदबद्ध किंवा चारोळी प्रकारचे हे लेखन आहे. म्हणून 'जे न देखे रवी ..' हे व्यासपीठ मी निवडले आहे. या रचना तुम्हाला कशा वाटतात बघा. सूचनांचे स्वागत आहे.

"ळ" चे यमक जुळावे असा प्रयत्न केलेला नाही.

१) आजोबांची कवळी
अळिमिळी गुपचळी,
नातू येता जवळी
आजोबांची खुलली कळी

२) कसलं खूळ , कोवळं मूल
डावा डोळा , लोण्याचा गोळा
बावळा बोका, मटकावी सगळा
मुलाच्या डोळा , पाणी गोळा

३) पिवळे पातळ, निळे काठ
गळा माळ पोवळ्याची |

पाठी रुळे नागीण काळी
माळी वळेसर बकुळीची |

बाळी शोभे आगळी
पाळी सजली कुड्यांनी |( पाळी .. कानाची )

भाळी टिळा रक्तवर्णी
तेज निराळे मुखकमळी (ली )|

नासिका चाफेकळी
नथ ल्यायली हिर्याची |

चाली चपळ पाउली
दिसे कोवळीक वयाची |

भोळा जीव खुळावला
न्याहाळिता नार नखर्याची ||

चारोळ्या

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Apr 2017 - 12:07 pm | पैसा

रचना आवडल्या.

ऋतु हिरवा's picture

17 Apr 2017 - 5:17 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद

पद्मावति's picture

6 Apr 2017 - 1:47 am | पद्मावति

मस्तच. सगळ्याच रचना आवडल्या.

ऋतु हिरवा's picture

17 Apr 2017 - 5:17 pm | ऋतु हिरवा

धन्यवाद पद्मवती ताई