आज मला इमेल आली, जी मला खूप इंटरेस्टींग वाटली म्हणून इथे देत आहे.. (मिपाच्या धोरणात बसतं का हे? बसत नसेल तर अवश्य काढू शकता.. )
ही सगळी बातमी इथे वाचता येईल.. त्यातला थोडाफार भाग, इथे मराठीमधे देत आहे...
१९१४ साली, त्यावेळच्या भारतात असलेल्या लाहोरमधे जन्मलेले व वाढलेले कुलवंत रॉय हे एक फोटोग्राफर होते, त्यांनी असोशिएटेड प्रेस फोटोग्राफ्स नावाची एजन्सी दिल्लीमधे चालू केली.. त्यांनी बरेच स्वातंत्र्य चळवळीचे आणि स्वातंत्र्योत्तर भारताचे फोटोज काढले.. तत्पूर्वी म. गांधींबरोबर ते पूर्ण भारतात फिरले असल्याने,त्यांना इनसायडर(आतल्या गोटातले?) मानले गेल्यामुळे महत्वाच्या घटना,व्यक्ती यांचे भरपूर छायाचित्र त्यांना काढता आली..
त्यांची बरीच छायाचित्रं तशी लोकांना माहीत आहेत, परंतू त्यांच्या नावाशिवाय. १९८४ साली मृत्यु झालेल्या या फोटोग्राफरची ७०००हून जास्त छायाचित्रं आदित्य आर्य यांनी स्कॅन केली, व कुलवंत रॉय यांचं पहीलं-वहीलं छायाचित्रांचं प्रदर्शन भरवलं Indira Gandhi National Centre for the Arts (IGNCA) इथे..
"No one knew him or his past," Arya said. Roy was a frequent visitor to Arya's parents' home in New Delhi, having known Arya's mother's family from Lahore. But by the time Arya was old enough to remember him, Roy was a poor and lonely man. "He never wanted me to be a photographer because of the hardships and the fact that one has to live a life a bit like a vagabond," Arya said. But when Roy died of cancer, virtually penniless and with no children of his own, he left Arya his photo collection.
हे काही फोटो आर्य यांनी वेगवेगळ्या न्युज एजन्सीला विकले तर काही फोटोंचे आता प्रदर्शन भरत आहे..
त्यातील ही काही दुर्मिळ छायाचित्रं...
Indian National Army personnel गांधींचे स्वागत करत आहेत, हरीजन कॉलनी,दिल्ली येथे.. (१९४६)
जवाहरलाल नेहेरू दिल्ली येथील प्रेस कॉन्फरंस मधे(१९४७)
Jinnah, sitting on a sofa like a modern potentate, surveys the scene from atop a truck at a procession in Allahabad in the 1940s, during a Muslim League session
सरदार पटेल व महाराजा ऑफ पतियाळा..
म. गांधी व जिना, एका तापलेल्या चर्चे मधे!
खान अब्दुल गफार खान आणि नेहेरू.. पलीकडे रिक्षेमधे सरदार पटेल..
नेहेरू त्यांचा नातू राजीव गांधी व मुलगी इंदिरा गांधी यांच्याबरोबर..
प्रतिक्रिया
8 Oct 2008 - 3:19 am | चित्रा
छान फोटो, धन्यवाद.
रंगीत छायाचित्रे चांगली दिसतातच, पण काळ्या आणि पांढर्यांची मजा काही औरच. आणि ही तर फारच सुंदर आली आहेत.
म. गांधी-बॅ. जिना, सरदार पटेल आणि पतियाळाचे महाराज - ही छायाचित्रे जास्त आवडली.
8 Oct 2008 - 3:41 am | टारझन
शेवटच्या फोटू मधे इंदिरा गांधीपाहून 'कुछ कुछ हुआ' .. असो .. त्यांनी "आणीबाणी" लागु केलेली असं जाणतो...
बाकी नेहरु या माणसावर आमचा गांधींप्रमाणेच राग आहे ... फार "लाळचाट्या" आणि "वासुगिरी" करणारं असं ध्यान होतं असं ऐकून आहोत ... खाली पहा बरं ... हेच का ते सन्माननिय नेहरू ? छोट्यामुलांवर (की मुलींवर ? ) प्रेम करणारे ...
काय हसतय काय हसतय .. च्यायला दंतमंजन पण अमेरिकेत्तलं वापरत असावं
सुभाषचंद्र बोस की जै
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
8 Oct 2008 - 4:21 am | भाग्यश्री
त्या लेडी माउंटबॅटन असाव्यात. त्यांचं आणि नेहेरूंच बरंच चांगलं जमायचं(हे जरा चांगल्या भाषेत म्हणायचं म्हणून..साध्या भाषेत त्यांचं अफेअर होतं..) असं वाचलं होतं एका बायोग्राफी मधे.. खरं खोटं तेच जाणोत..
या गोष्टीमुळेच लॉर्ड माउंटबॅटनने भारताला स्वातंत्र्य दिलं अशा आशयाचा एक विनोद आठवला..
असो.. राजकारणात कोण,कसं वागलं, अन कोण बरोबर-चुक ते माहीत नाही... दुर्मिळ दिसले फोटो म्हणून इथे डकवले...
8 Oct 2008 - 4:57 am | शितल
भाग्यश्री,
खुपच दिवसांनी अशी इतिहासातील व्यक्तीची छायाचित्र तुझ्या मुळे पहायला मिळाली :)
कुलवंत रॉय यांनी अनेक क्षण त्याच्या कॅमेरातुन जगासमोर आणले आहेत असे म्हणायला हवे.
8 Oct 2008 - 6:48 am | विसोबा खेचर
क्या बात है, सर्व फोटू सुंदर....
जुने दुर्मिळ फोटू, त्यावरील मराठी टिपण्णी, बातमीचे मराठीकरण इत्यादी गोष्टी लक्षात घेता हा लेख काढून न टाकता येथेच ठेवत आहे...
तात्या.
8 Oct 2008 - 8:03 am | सहज
असेच म्हणतो.
जुने दुर्मीळ फोटो बघायला छान वाटले.
8 Oct 2008 - 8:39 am | llपुण्याचे पेशवेll
शेवटच्या फोटोमधे नेहरूंच्या चेहर्यावरचे भाव हे सरकारनामा मधल्या यशवंत दत्त यांच्या चेहेर्यासारखे आहेत.
पुण्याचे पेशवे
8 Oct 2008 - 11:54 am | यशोधरा
मस्त प्रकाशचित्रे!!
कृष्ण धवल रंगसंगतीतल्या प्रकाशचित्रांची मजाच वेगळी!
8 Oct 2008 - 11:47 am | मनस्वी
>जुने दुर्मीळ फोटो बघायला छान वाटले.
धन्यवाद भाग्यश्री.
मनस्वी
10 Mar 2011 - 7:35 pm | चित्रगुप्त
....काय हसतय काय हसतय .. च्यायला दंतमंजन पण अमेरिकेत्तलं वापरत असावं...
कुठलीतरी भलत्याच 'कामा' साठी वापरायची अमेरिकन पेष्ट न्हेरून्नी दात घासायची पेष्ट म्हणून वापरली होती म्हणे या फोटोच्या दिवशी.