माझी कविता

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
7 Oct 2008 - 12:32 am

माझ्या कवितेवर नाही संस्कार
भाषेच्या व्याकरणाचा,
प्रतिभा अलंकारांचा,
तो आहे केवळ उदगार
माझ्यातल्या अनुभूतिचा.

कुणाला तरी आई म्हणाव
इतका संस्कार
आईग! म्हणायला पुरेसा आहे,
कुणाला तरी बाप म्हणाव
इतका संस्कार
बापरे!! म्हणायला पुरेसा आहे
कुणापुढेतरी नतमस्तक व्हाव
इतका संस्कार
अरे देवारे!!! म्हणायला पुरेसा आहे

आईग! बापरे!! अरे देवारे!!!
इतक आणि इतकच
माझ्या कवितेच आयुष्य
बाकी शब्दांपेक्षा महत्वाच आहे
ते अनुभूतिच विश्व......!

कविता

प्रतिक्रिया

प्राजु's picture

7 Oct 2008 - 8:19 am | प्राजु

आवडली कविता. अगदी मनापासून.

कुणाला तरी आई म्हणाव
इतका संस्कार
आईग! म्हणायला पुरेसा आहे,
कुणाला तरी बाप म्हणाव
इतका संस्कार
बापरे!! म्हणायला पुरेसा आहे
कुणापुढेतरी नतमस्तक व्हाव
इतका संस्कार
अरे देवारे!!! म्हणायला पुरेसा आहे

खासाच!! - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

7 Oct 2008 - 11:48 pm | चन्द्रशेखर गोखले

तुम्ही करत असलेल्या कौतुका बद्दल धन्यवाद!!

अनिल हटेला's picture

7 Oct 2008 - 8:33 am | अनिल हटेला

साधी सरळ कविता आवडली !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चन्द्रशेखर गोखले's picture

7 Oct 2008 - 11:52 pm | चन्द्रशेखर गोखले

खर आहे , गाढव "माणूस पणा" करण्याचा गाढवपणा करत नाही

प्रकाश घाटपांडे's picture

7 Oct 2008 - 8:36 am | प्रकाश घाटपांडे

चुकुन मी अलंकारा ऐवजी अहंकार शब्द वाचला अगोदर्.पण काही फरक पडत नाही
प्रकाश घाटपांडे

सहज's picture

7 Oct 2008 - 8:45 am | सहज

गमतीशीर आहे. :-)

स्वगतः - केवळ आईग! बापरे!! अरे देवारे!!! हे तीन शब्द व अनुभूती येत असली की करा कविता, व लोकांना छळा.
असा संदेश तर नाही ना जात आहे? :-( कृ. ह. घ्या.

मनीषा's picture

7 Oct 2008 - 11:15 am | मनीषा

आवडली ...

माझ्या कवितेवर नाही संस्कार
भाषेच्या व्याकरणाचा,
प्रतिभा अलंकारांचा,
तो आहे केवळ उदगार
माझ्यातल्या अनुभूतिचा
....छानच !!!

विसोबा खेचर's picture

7 Oct 2008 - 1:32 pm | विसोबा खेचर

तो आहे केवळ उदगार
माझ्यातल्या अनुभूतिचा.

माझ्या कवितेच आयुष्य
बाकी शब्दांपेक्षा महत्वाच आहे
ते अनुभूतिच विश्व......!

वा!

साधी, सोपी व तेवढीच सुंदर कविता वाचल्याचा आनंद झाला..

तात्या.