ती वाचत असता कविता
डोळ्यात तरळले पाणी
गवसले हरवले शब्द
आठवली विस्मृत गाणी
ती वाचत असता कविता
भळभळल्या बुजल्या जखमा
दु:खाच्या शाश्वत प्रहरी
उन्मळल्या अविचल सीमा
ती वाचत असता कविता
मी पुन्हा हलाहल प्यालो
अवलाद नवी सर्पांची
मी गळा माळुनी नटलो
ती वाचत असता कविता
शेवटची बेडी तुटली
करुणेची धून अनाहत
झंकारत आतून आली
प्रतिक्रिया
2 Mar 2017 - 10:12 am | प्राची अश्विनी
अरेच्च्या, ही वाचायची राहून गेली. छान आहे.