एवढं करंच...

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in जे न देखे रवी...
19 Feb 2017 - 2:15 pm

अविचार करण्याआधी
एक काम कर
कृत्रिम जगाच्या चौकटीतून
एकदातरी बाहेर पड

दऱ्याखोऱ्या कडेकपारीतून
पाखरासारखं उडून बघ
खळाळणाऱ्या नदीमध्ये
मासोळीसारखं पोहून बघ

फेसाळ धबधब्याखाली
निमुट उभा रहा
पावलं थकेपर्यंत
बेलगाम धावून पहा

रस्ता हरवलेल्या पावलांना
खोलवर जंगलात ने
गळा फाटेपर्यंत ओरड
आसवं संपेपर्यंत रडून घे

संध्याकाळ झाली की
डोंगरमाथ्यावर जा
सावल्या लांबताना अन
सुर्य हरवतांना पहा

शक्य झाल्यास रात्रीही थांब तिथं
जंगल अंगावर येईल,
रातकिड्यांचे आवाज ओरबाडतील
हरवलेल्या दाही दिशा,
गळा दाबायला सरसावतील

पण लवकरच जिवंतपणा घेऊन
पहाटकिरणं उगवतील
अंधाररस्ता उजळेल
पक्षी आशेचं गीत गातील

आता थंडगार वारा पिऊन
परत फिर घरी
तिथेच असेल तू बांधलेली
गळफास अन दोरी

तुला पाहून कळेल त्यांना
काहीतरी बदल झालाय
ठणकावून सांग संकटांना
कालचा तू केव्हाच मेलाय
--------------------------------------------

कविताभाषाशब्दक्रीडा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

19 Feb 2017 - 4:06 pm | पद्मावति

सुरेख!

पैसा's picture

19 Feb 2017 - 8:01 pm | पैसा

फार छान लिहिलंय!

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2017 - 8:28 pm | संजय क्षीरसागर

शेवटचं कडवं असं होईल का पाहा

तुला पाहून कळेल त्यांना
काहीतरी झालायं बदल,
ठणकावून सांग संकटांना...
मृत्यूला मी दिलीये बगल

अॅस्ट्रोनाट विनय's picture

19 Feb 2017 - 10:49 pm | अॅस्ट्रोनाट विनय

शेवटचं कडवं असं होईल का पाहा

तुला पाहून कळेल त्यांना
काहीतरी झालायं बदल,
ठणकावून सांग संकटांना...
मृत्यूला मी दिलीये बगल

>> हम्म. शेवटचं कडवं वेगळ्या लयीत चाललं होतं. हे बेटर आहे.
फक्त
मृत्यूला मी दिलीये बगल ऐवजी मृत्यूला तू दिलीये बगल
असावं असं वाटतं.

संजय क्षीरसागर's picture

19 Feb 2017 - 11:53 pm | संजय क्षीरसागर

`मृत्यूला मी दिलीये बगल' असं होईल ते.

पण तुझी काव्यकल्पना खरंच सुरेख आहे. आणि तुझ्या प्रत्येक लेखनातून दिसणारा पॉझिटीव अ‍ॅटिट्यूड मला नेहमी भावतो.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

20 Feb 2017 - 9:43 am | अॅस्ट्रोनाट विनय

आनंद वाटला. प्रोत्साहनाने हुरुप वाढतो

अॅस्ट्रोनाट विनय's picture

19 Feb 2017 - 10:51 pm | अॅस्ट्रोनाट विनय

धन्स

सतिश गावडे's picture

19 Feb 2017 - 11:41 pm | सतिश गावडे

सुरेख कविता.

अभ्या..'s picture

19 Feb 2017 - 11:42 pm | अभ्या..

मला पन आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2017 - 7:14 am | अत्रुप्त आत्मा

मससससससस्त!

रुपी's picture

21 Feb 2017 - 7:28 am | रुपी

सुरेख!

एक एकटा एकटाच's picture

24 Feb 2017 - 7:36 pm | एक एकटा एकटाच

आवडली

सानझरी's picture

24 Feb 2017 - 8:26 pm | सानझरी

छान!!