लहरिच आणि किनाऱ्याच
नात जगावेगळ असत
जवळ असले तरीही
मिलन नाशिबि नसत
लहरिवर लहर सतत
त्याला असते भेदत
तरीही प्रेम करतो किनारा
बिन प्रश्न विचारत
किनाऱ्याच्या नशिबी फ़क्त
वाळूच लेण असत
लहरिला वेध मात्र
त्याला स्वतःत सामावून घेण असत
आलिंगन देऊन लहरिला
परत फिरायच असत
दुःख विरहाच मात्र
किनाऱ्यान सोसायच असत
जेव्हाहि जातो किनारयाजवळ
तेव्हा हेच विचारावस वाटत
प्रेम म्हणजे हे असत
तर आम्हा माणसात अस का नसत ????
प्रतिक्रिया
2 Jan 2017 - 3:01 pm | चांदणे संदीप
काय आहे हे, लहरि? बप्पी चेनवाला का??
Sandy