आंबेडकर, मर्ढेकर, किर्लोस्कर, आपटे, जोशी, कारखानीस, जानोरकर (गाडगे महाराज)

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
28 Dec 2016 - 1:49 pm

मराठी विकिपीडियावरील येथील नोंदीनुसार खालील साहित्यिकांचे मृत्यू सुमारे ६० वर्षां पुर्वी इ.स. १९५६ या वर्षात झाले होते म्हणून भारतीय कॉपीराईट कायद्यानुसार त्यांचे लेखन १ जानेवारी २०१७ पासून कॉपीराईट मुक्त होणे अभिप्रेत आहे.

*भीमराव रामजी आंबेडकर
वेगळी ओळख लिहिण्याची आवश्यकता नाही
* पांडुरंग श्रीधर आपटे (६ एप्रिल, इ.स. १८८७ - १९ डिसेंबर, इ.स. १९५६) हे एक मराठी साहित्यिक होते. ते गांधीवादी होते. आपटे गुरुजी या नावाने ते ओळखले जात. भारतातली पहिली राष्ट्रीय शाळा आपटे गुरुजींनी येवला येथे काढली होती.
पुस्तके

अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्‍हासाबद्दल फिर्याद)
आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनच्या सिद्धान्तावर आधारित)
कुटुंब रंजन
जवाहरलाल नेहरू
महात्मा गांधी दर्शन
लाडका मुलगा
श्रीकृष्णाची आत्मकथा
श्रीविद्यानंदस्वामीमहाराज व श्री केशवगोविंदमाहात्म्य
साने गुरुजी : ओझरते दर्शन
सेनापती बापट दर्शन
स्वराज्य मार्गदर्शक लोकमान्य टिळक

*वामन गोपाळ जोशी (इ.स. १८८१ - ३ जून, इ.स. १९५६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते.

प्रकाशित साहित्य
नाटके

ढोटुंग पादशाही
धर्मसिंहासन
रणदुंदुभि (पहिला प्रयोग, बलवंत संगीत नाटक मंडळी ने १७-२-१९२७ रोजी केला होता).
राक्षसी महत्त्वाकांक्षा (पहिला प्रयोग, ललित कलादर्श ने २०-९-१९१३रोजी केला होता).
शीलसंन्यास

अन्य पुस्तके

चंद्रपूरची महाकाली
राष्ट्रपिता महात्मा गांधी

गाजलेली नाट्यगीते

आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि)
जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि)
दिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि)
परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि)
वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि)
*दीक्षित धुंडिराज गणेश बापट वाजपेययाजी (जन्म, पाचवड-सातारा जिल्हा : १५ नोव्हेंबर, १८८२; मृत्यू, पुणे : १३ फेब्रुवारी १९५६) हे एक वैदिक वाङ्‌मयाचे भाषांतरकार व यज्ञप्रधान वैदिक धर्माचा परिचय करून देणारे भाष्यकार होते.
श्रौताचार्य धुंडिराज गणेश बापट यांची ग्रंथसंपदा

आर्यांचे संस्कार
ऋग्वेदाच्या ऐतरेय ब्राह्मणांचे भाषांतर
कृष्ण यजुर्वेद भाग १ तैत्तिरीय संहिता
कृष्ण यजुर्वेद भाग २ तैत्तिरीय ब्राम्हण व आरण्यक
गणपतिअथर्वशीर्ष
वैदिक राष्ट्रधर्म
शुक्ल यजुर्वेद संहितेचे मराठी भाषांतर
* बाळ सीताराम मर्ढेकर ऊर्फ बा.सी.मर्ढेकर (डिसेंबर १, १९०९ - मार्च २०, १९५६) हे मराठी कवी व लेखक होते.
मर्ढेकरांची कविता कविता संग्रह मौज प्रकाशन
रात्रीचा दिवस/तांबडी माती/पाणी तीन कादंबर्‍या मौज प्रकाशन
सौंदर्य आणि साहित्य मौज प्रकाशन
कला आणि मानव

उपरोक्त साहित्यिकांचे साहित्य स्कॅन करुन मराठी विकिस्रोतावर १ जानेवारी २०१७ पासून टाकता येईल. सुलभ युनिकोडीकरणासाठी गूगल ड्राईव्हवरचे ओसीआर वापरता येऊ शकेल.

विकिस्रोतात इतरही लेखकांचे प्रताधिकारमुक्त साहित्य टंकनासाठी/ओसीआर, मुद्रित शोधन आणि अनुवाद करून देण्यासाठी उपलब्ध आहे.

(*तळटिप: मराठी विकिस्रोत प्रकल्पाबद्दल अधिक माहिती या ऑनलाईन सादरीकरणात सुद्धा उपलब्ध आहे.) )

टिप: उत्तरदायकत्वास नकार लागू

साहित्यिक

प्रतिक्रिया

पैसा's picture

28 Dec 2016 - 10:14 pm | पैसा

माहितीसाठी धन्यवाद!

सांरा's picture

28 Dec 2016 - 10:56 pm | सांरा

कोणी महाराज म्हटलेले आवडत नसे. तसेच पाया पडणाऱ्यांना ते काठीने मारीत.

प्रसाद गोडबोले's picture

14 Mar 2025 - 11:55 pm | प्रसाद गोडबोले

दीक्षित धुंडिराज गणेश बापट वाजपेययाजी

ह्यांचे कृष्ण यजुर्वेदाचे संपुर्ण भाषांतर शोधत शोधत ह्या इथे येऊन पोहचलो !

ह्यांची पुस्तके आहेत का कोठे उपलब्ध ?

कृपया यांना संपर्क करा +91 86683 36298- अभिजात मराठी साहित्य .अनेक दुर्मिळ अध्यात्मिक पुस्तके यांच्याकडे आहेत.https://www.facebook.com/share/1AzUcEDsrP/?mibextid=qi2Omg

खेडूत's picture

15 Mar 2025 - 9:51 am | खेडूत

एक समस्या आहे.
प्रताधिकार मुक्त झालेली पुस्तके पुन्हा कोणीतरी अधिकार विकत घेतले की बंधनात जातात. असे अधिकार घेतले हे कुठे ठळकपणे प्रकाशित केले जात नाही.
उदा. या धाग्यात दिवाकरांच्या सगळ्या नाट्यछटा २०१५ मधे उपलब्ध होत्या, पण कधीतरी त्यांचे अधिकार परत घेतले गेले. आता त्या मिळत नाहीत.

प्रताधिकारमुक्त झालेल्या पुस्तकांचे अधिकार मूळ मालकांना ( / किंवा विकत घेतलेल्या नव्या मालकांना )परत कसे विकता येणार? परंतू जुनी छापील पुस्तके ( किंवा नवीन संस्करणं) पुन्हा कुठे मिळतील हे कसे कळणार.

माहितगार's picture

23 Mar 2025 - 10:10 pm | माहितगार

एक समस्या आहे.
प्रताधिकार मुक्त झालेली पुस्तके पुन्हा कोणीतरी अधिकार विकत घेतले की बंधनात जातात. असे अधिकार घेतले हे कुठे ठळकपणे प्रकाशित केले जात नाही.

नीट समजून घ्यावे.

१) एखाद्या कलाकृतीचा कॉपीराईट केवळ संसदेतून कायदा मंजूर करून वाढवता येतो - तेही केवळ चालू कॉपीराईट समाप्त होण्याच्या आत नवा कायदा मंजूर झाला असेल तरच. अशात असा काही बदल केल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही.

२) प्रताधिकार मुक्त झालेली पुस्तके पुन्हा कोणीतरी अधिकार विकत घेतले की बंधनात जातात. हे कसे शक्य आहे ? लेखकाच्या मृत्यूनंतर ६१ वर्षांनी सर्व साधारणपणे कॉपीराईट संपतो ज्याच्यावरचा आधिकारच संपला त्याचा आधिकार पुन्हा विकत घेता येतो म्हणणे विपर्यस्त ठरते किंवा कसे?

२.१) केवळ एखादी कलाकृती लेखकाच्या हयातीत अप्रकाशित राहिली असेल तर काही वेळा प्रकाशकास काही अधिक कालावधी मिळतो का हे कदाचित रपासावे लागेल. पण अशा शक्यता फारच तुरळक असाव्यात.

३) नाट्यछटाकार दिवाकर (शंकर काशिनाथ गर्गे) (जन्म : १८ जानेवारी,१८८९; मृत्य्पू : १ ऑक्टोबर, १९३१) यांचा मृत्यू विकिपीडियावरील तारखेनुसार १९३१ दिला आहे ते बरोबर असेल तर १९९३ पासून कॉपीराईट संपलेला असणे अभिप्रेत आहे.

४) प्रकाशक मंडळी ( दिशाभूल) पळवाट कशी काढू शकतात? मराठी विकिपीडियावर दिवाकरांच्या नाट्यछटा लेखानुसार

दिवाकरांच्या नाट्यछटा हे पुस्तक कॉंटिनेन्टल प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले असून यात दिवाकरांच्या सर्व एक्कावन्न नाट्यछटांचा समावेश आहे. सदर पुस्तकाला रा.कृ. लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली असून विजय तेंडुलकर यांनी प्रत्येक नाट्यछटेचे रसग्रहण केले आहे.

* इथे हे लक्षात घेतले पाहिजे की रा.कृ. लागू यांच्या प्रस्तावनेवर त्यांच्या मृत्यू पासून ६१ वर्षापर्यंत आणि विजय तेंडुलकर यांच्या रसग्रहणांवर त्यांच्या मृत्यू पासून ६१ वर्षापर्यंत कॉपीराईट चालू राहील प्रकाशक याचा आधार घेऊन कॉपीराईट नमुद करून मोकळे होतात पण मूळ दस्तएवजाचा कॉपीराईट संपल्या असला तरी तसे नमुद न करता अळीमिळीगुपचिळी करतात. पण त्यांनी सांगितले नाही म्हणून मूळ दस्तएवजावरचा कॉपीराईट संपला नाही असे होत नाही.

५) एखाद्या साहित्याचा अनुवाद केला गेला असेल तर मात्र कॉपीराईट अनुवादकाच्या मृत्यूनंतर ६१ वर्षे मोजावा.

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2025 - 1:03 pm | चौथा कोनाडा

माहितीपुर्ण प्रतिसाद.

एखाद्या कलाकृतीचा कॉपीराईट केवळ संसदेतून कायदा मंजूर करून वाढवता येतो

हे वाचून अचंबित व्हायला झाले.. अश्या कामांसाठी संसद ?

एकंदरीत प्रताधिकार हे प्रकरण तसं गुंतागुंतीचं दिसतंय !
धन्यवाद !

माहितगार's picture

25 Mar 2025 - 4:22 pm | माहितगार

संसदेने पुर्वीच मंजुर केलेल्या कोणत्याही कायद्यात उप्लब्ध तरतुद वापरायची असेल तर पुन्हा संसदेकडे (किंवा न्यायालयाकडे) जाण्याची आवश्यकता नाही. जी तरतुद कायद्यात उपलब्धच नाही ती तशी हवी असेल तर संसदेकडेच जावे लागेल ना?

ज्या मर्यादेपर्यंत कॉपीराईट कायद्यात उपलब्ध आहे त्यासाठी संसदेकडे जाण्याची आवश्यकता नाही. कळत न कळत कायद्यात उपलब्ध नसलेल्या तरतुदीचा दावा केला गेला तर संसदेतून मंजूर झाल्याशिवाय कठीण आहे ही बाजू समजून द्यायला नको का?

* २०१५ मध्ये मी Indian Copyright Law हा लेख इंग्रजी विकिस्रोतवर अद्ययावत केला होता त्याला आता पहाता पहाता अदमासे ९ वर्षे होत आली
* https://copyright.gov.in/Copyright_Act_1957/index.html
* https://copyright.gov.in/notification.aspx

वरचे वर अशा चर्चा आणि वाचन झाल्यास जागरूक रहाणे अधिक सुलभ जावे

चौथा कोनाडा's picture

17 Mar 2025 - 12:49 pm | चौथा कोनाडा

जानोरकर यांनी कोणते साहित्य लिहिले आहे ?

बाकी किर्लोस्कर, कारखानीस यांची प्रथम नामे नमुद केल्यास नक्की कोणते ते समजून येईल.