बंदीपायी जीवा लागलीसे वाट।
उभा रात्रंदिवस रांगेमध्ये।।
गणिताचा तास विना झंडू बाम।
तैसे एटीएम डोकेदुखी।।
खिसा खुळखुळा जीव कासावीस।
झालो कॅशलेस आपोआप।।
भोगतोय भक्त परी हर्ष करी।
नोट आहे भारी गुलाबी जी।।
स्वाम्या म्हणे मज द्यावी एक नोट।
भाजपाला वोट देत नाही।।
- स्वामी संकेतानंद
प्रतिक्रिया
12 Dec 2016 - 4:44 pm | पैसा
=)) सगळे एका झटक्यात एकसारखे झाले का नाय! =))
महिना झाला, अजून तेच सुरू आहे का? कुठे आहेस तू स्वाम्या? दिल्लीत का दगडांच्या देशात? मला इकडे गोव्यात काय प्रॉब्लेम नाही बघ! ते गुलाबी गांधीजी मासेवाले पण आरामात घेतात. =))
12 Dec 2016 - 4:57 pm | स्वामी संकेतानंद
आतापर्यंत झाडुवाल्याच्या देशात होतो, उद्या दगडांच्या देशात असणार. इकडे गुलाबी नोट कोणी घेत नाहीत.
12 Dec 2016 - 5:49 pm | संदीप डांगे
देशद्रोही क्लब आपले स्वागत करतंय रंगास्वामी!!! ;)
12 Dec 2016 - 6:48 pm | स्वामी संकेतानंद
12 Dec 2016 - 6:50 pm | स्वामी संकेतानंद
13 Dec 2016 - 10:09 am | sagarpdy
:D
13 Dec 2016 - 10:16 am | पिलीयन रायडर
मला पण घ्या तुमच्या क्लबात!
माझा विश्वास डळमळाय लागलाय. अर्थात मी नुसत्या चर्चा वाचुन मत बनवतेय, प्रत्यक्ष काय चाललंय हे बघु तर शकत नाही. पण आता मलाही तुम्हा लोकांचे काही काही मुद्दे पटायला लागलेत.
-(कुंपणावरची) पिरा!
13 Dec 2016 - 11:01 am | प्रीत-मोहर
नोटबंदीचा अज्जीबात त्रास झाला नसला तरीही माझा विश्वास थोडाफार डळमळीत झालाय.
मलापण घ्या तुमच्यात
14 Dec 2016 - 6:18 am | अत्रुप्त आत्मा
@देशद्रोही क्लब आपले स्वागत करतंय रंगास्वामी!!!››› =)) आता नमोरुग्ण तुम्हाला खवळून मारायला येणार! =))
12 Dec 2016 - 6:08 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम विडंबन स्वामीजी !
12 Dec 2016 - 6:10 pm | रातराणी
छान आहे.
13 Dec 2016 - 10:07 am | एस
:=))
14 Dec 2016 - 6:06 am | अत्रुप्त आत्मा
स्वामिज्जी की म-हा... न रचनांए|